ADVERTISEMENT
home / Dating
#MyStory: विश्वासच बसत नाही की, माझी प्रेमकहाणी अशी संपली

#MyStory: विश्वासच बसत नाही की, माझी प्रेमकहाणी अशी संपली

प्रेमाच्या सुरूवातीचे दिवस गुलाबी असतात. प्रेमाला कधीतरी इतक्या सहजतेने सुरूवात होते की, कळतच नाही की, आपण प्रेमात कधी पडलो. पण जेवढी सुरूवात सहज होती तितकाच त्या नात्याचा किंवा प्रेमाचा अंत असेल, असं सांगता नाही येणार. अशीच एक #MyStory शेअर केली आहे #POPxoMarathi ची वाचक असलेल्या सीमाने. तिची कहाणी तिच्या शब्दात सादर करत आहोत. 

प्रेमाची एबीसीडी

कॉलेजला जाण्याआधी मी कधीच कोणत्याही रिलेशनशिपमध्ये नव्हते. त्यामुळे कॉलेज आणि तिथल्या लोकांचा असा सर्वच अनुभव माझ्यासाठी अगदी नवीन होता. सुरूवातीला मी अनेक प्रकारच्या लोकांना भेटले आणि त्यातील काहीजणांशी मैत्रीही झाली. मग मी चांगलीच रूळले आणि कॉलेज फ्रेंड्ससोबत चांगलाच टाईम स्पेंड करू लागले. खासकरून माझ्या एका क्लासमेटसोबत. मी याबाबत काही जास्त विचार केला नव्हता कारण तो आधीच एका रिलेशनशिपमध्ये होता आणि मीही एकाला डेट करत होते. पण काही कारणाने आम्हा दोघांच्या त्या रिलेशनशिप्सचा एकाच वेळी दी एंड झाला. त्याच वेळी मला जाणवलं की, मला त्याच्याबद्दल फिलींग्ज्स आहेत. नेमकं तेव्हाच त्याने मला बाहेर जाण्याविषयी विचारलं. मला कळलं की, त्यालाही मी आवडू लागले आहे. तोही माझ्याकडे आकर्षित होत आहे. तेव्हाच आमच्या नात्याला सुरूवात झाली आणि पुढचं एक वर्ष खूपच चांगल गेलं. 

Instagram

ADVERTISEMENT

नातं दुरावताना

नंतर सुरूवात झाली ती आमच्या कॉलेजमधल्या स्पर्धांना. न जाणो तेव्हाच मला थोडं चुकचुकल्यासारखं वाटू लागलं होतं. आम्ही दोघंही आमचं नातं टिकवणयाचा प्रयत्न करत होतो पण काही कारणास्तव सगळंच बिघडत गेलं आणि आम्ही दोघंही बॅड नोटवर वेगळे झालो. काळासोबत आम्ही दोघांनीही ते मान्य केलं आणि आमच्या वेगवेगळ्या प्रवासाला सुरूवात झाली. पण तरीही आम्ही एकमेंकासमोर आल्यावर आम्हाला त्रास व्हायचा. मी त्याच्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न केला पण तो माझ्याशी चांगलं वागायला तयारच नव्हता. आमच्या ब्रेकअपचा परिणाम फक्त आम्हा दोघांवरच नाही तर आमच्या कॉमन फ्रेंड्सवरही झाला. त्यामुळे पुढच्या काळात माझ्या फ्रेंड्स आणि इतर बॅचमेट्सपासूनही मी दुरावले. गोष्टी तेव्हा सुरळीत झाल्या जेव्हा कॉलेजचं शेवटचं वर्ष सुरू झालं. 

शेवटच्या वर्षी

कॉलेजमधल्या एका पॉलिटीकल अॅक्टीव्हीटीमुळे आम्ही पुन्हा बोलू लागलो. तेव्हा मला लक्षात आलं की, तो पुन्हा एकदा आमच्यातील दुरावा मिटवून माझ्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही पुन्हा एकत्र वेळ घालवू लागलो. डीनर, मूव्हीज आणि स्कूटी राईड्स इ. आमचा जास्तीतजास्त वेळ आमच्यामध्ये ज्या गोष्टींमुळे गैरसमज आणि दुरावा आला त्याबाबत बोलण्यावर जायचा. मग आम्ही एकमेकांना स्पष्टीकरण द्यायचो आणि समजवायचो. काही कळण्याच्या आतच आम्ही पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडलो. आमच्या काही फ्रेंड्सनी आम्हाला याबाबत वॉर्नही केलं. पण तरीही आम्ही पुन्हा एकत्र आलो आणि वेळसोबत घालवू लागलो. कॉलेज संपताना आम्ही एकमेकांना कमिट केलं आणि त्याच्या प्रपोजलला मी होकार दिला. 

Shutterstock

ADVERTISEMENT

होकारानंतर…

एक वर्ष असंच गेलं. त्या काळात आमचं नातं अनेक गोष्टीतून गेलं. खूप चढउतार पाहिले. पण तरीही आम्ही आमचं नातं टिकवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आता आम्ही लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होतो. आम्ही जास्तीतजास्त वेळ एकमेकांंशी बोलायचो. पण अचानक त्याने बोलण्यासाठी इतकाच वेळ द्यायचा असा नियम ठरवला आणि आपण एकमेकांना स्पेस देऊया असं ठरवलं. तेव्हाच मला जाणवलं की, गोष्टी पुन्हा बदलतेत.  मी त्याला सांगण्याचा प्रयत्न केला की, यामुळे आपल्या नात्याचं चांगल नाहीतर नुकसान होईल. पण मीही नंतर हार मानली आणि त्याची ही मागणी मान्य केली. त्याच्यापासून दूर राहू लागले. अगदी दोन महिन्याच्या काळात आम्ही फक्त दोनदा बोललो आणि त्याने मला सांगितलं की, हे वर्कआऊट होत नाहीयं. मला तर रडूच कोसळलं आणि त्याला पुन्हा एकदा विचारलं की, हे खरं आहे का. तरीही त्याच्या बोलण्यात काहीच फरक पडला नाही. 

पुन्हा नवी सुरूवात

आम्ही वेगळं होऊन काहीच दिवस झाले आहेत. पण आजही मला हे सगळं पचवणं अवघड झालं आहे की, दुसऱ्यांदा एकत्र येऊन आम्ही पुन्हा वेगळे झालो. प्रत्येक क्षणी मला त्याची आठवण येते. मला माहीत आहे की, मी असं वागणं डिझर्व्ह करत नव्हते. एका व्यक्तीमध्ये एवढं गुंतल्यावर ही परतफेड असू शकत नाही. पण आता मी हरप्रकारे जीवनात पुढे जाण्याचं ठरवलं आहे. एवढंच वाटतं की, आयुष्याने दुसऱ्यांदा कोणाला आपल्या जवळ आणल्यावर त्याचा शेवट असा होऊ नये. 

तुम्हीही अशाच नात्यात असाल किंवा पुन्हा एकदा एक्ससोबत पॅचअप करण्याच्या विचारात असाल तर भूतकाळात घडलेल्या गोष्टी आणि भविष्यातील शक्यतांचा नक्की विचार करा आणि मगच पाऊल उचला. तुमच्याकडेही अशी #MyStory असल्यास आम्हाला जरूर लिहून पाठवा. आम्हीही ती या सदरात सादर करू.

हेही वाचा – 

ADVERTISEMENT

#MyStory : माझं पहिलं प्रेम जे कधीच….

#MyStory… आणि आमच्या रिलेशनशीपमध्ये आली ती

#MyStory: तो माझ्या आयुष्यातून निघून गेला पण….

06 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT