मॉन्सून ऑफर सेलमध्ये शॉपिंग करताना काय काळजी घ्याल

मॉन्सून ऑफर सेलमध्ये शॉपिंग करताना काय काळजी घ्याल

पावसाळा हा सर्वांचा आवडीचा ऋतू आहे. पावसाळ्यात मनसोक्त भटकंती करण्यापासून ते अगदी पावसाळी सेलमध्ये स्वस्तात शॉपिंग करण्यापर्यंत अनेक गोष्टी करता येतात. पावसाळा आला की सर्वत्र पावसाळी ऑफर सेलला सुरूवात होते. त्यामुळे स्ट्रीट मार्केटपासून ते अगदी शॉपिंग मॉलमधील ब्रॅंडेड दुकांनांमध्येही सेल सुरू असतो. त्यामुळे हा मान्सून सेल नेहमीच ग्राहकांना आकर्षित करत असतो. ऑनलाईन शॉपिंग असो अथवा सुट्टीच्या दिवशी दुकानामध्ये जाऊन केलेली खरेदी असो ग्राहक यासाठी नेहमीच तयार असतात. मात्र यामुळे सेलमध्ये देण्यात येणाऱ्या मोठ्या डिस्काऊंटवर लक्ष ठेवता ठेवता तुमचं खरेदीचं  बजेट मात्र पुरतं कोलमडून जातं. मॉलमध्ये फिरताना ग्राहकांना दिवस अपुरा पडतो. काय घेऊ आणि काय नको अशी प्रत्येकाची अवस्था होते. शिवाय या सेलमधून स्वस्त आहेत म्हणून बऱ्याचदा अनावश्यक आणि बिनकामाच्या वस्तू खरेदी केल्या जातात. यासाठीच पावसाळी सेलमध्ये शॉपिंग करण्यापूर्वी या गोष्टींची काळजी जरूर घ्या.

Instagram

मॉन्सून सेलमध्ये खरेदी करताना काय चुका होतात

 • सेल आहे म्हटल्यावर कोणताही विचार न करता पटकन शॉपिंग करणं
 • बजेटचं प्लॅनिंग न करता सेलमधल्या गोष्टी खरेदी करत राहणं
 • गरेचेपेक्षा जास्त आणि अनावश्यक गोष्टी खरेदी करणं
 • ऑनलाईन मॉन्सून सेलमुळे कोणतेही नियोजन न करता शॉपिंग करत राहणं
 • वस्तूंवरील लेबल नीट न वाचणं
 • मॉलमधील ऑफर्स नीट न समजल्यामुळे अधिक पैसे खर्च करावे लागणं
 • फ्री असलेल्या मात्र पावसाळ्यात गरज नसलेल्या वस्तूंसाठी भरमसाठ खर्च करून शॉपिंग करणं
 • कोणाचाही सल्ला न घेता एकट्याने शॉपिंग करणं

मॉन्सून सेलमध्ये शॉपिंग करताना काय काळजी घ्याल

 • सेलमध्ये खरेदी करण्यापूर्वी तुमचं खरेदीचं बजेट आणि तुम्हाला वर्षभरात गरजेच्या आहेत अशा गोष्टींची यादी तयार करा. ज्यामुळे अनावश्यक गोष्टी खरेदी करणार नाही.
 • खरेदी करताना कपडे, गरजेच्या वस्तू, अॅक्सेसरीज, बॅग्स, फूटवेअर अशा गोष्टींची एकत्र खरेदी करू नका. कधी कोणत्या गोष्टी खरेदी करायच्या आहेत याचं नीट नियोजन करा. शिवाय प्रत्येक गोष्टीच्या खरेदीचं वेगवेगळं बजेट ठरवा.
 • मॉलमध्ये शॉपिंगसाठी जाण्यापूर्वी जाणकार व्यक्तीला अथवा मित्रमैत्रिणींना सोबत घेऊन जा. ज्यांच्या सल्लामुळे तुम्ही मान्सून ऑफरचा नीट विचार करून मगच खरेदी कराल.
 • सेलमध्ये लावलेल्या खाद्यपदार्थांची खरेदी करू नका. कारण ज्या गोष्टीं एकावर एक फ्री या ऑफरमध्ये सेलसाठी लावलेल्या असतात. कारण त्यांची एक्सपायरी डेट जवळ आलेली असते.
 • सिल्कच्या साड्या पावसाळ्यात खरेदी करत असाल तर त्या नीट तपासून घ्या. कारण  पावसाळ्यातील सेलमध्ये जुना माल विकला जातो. शिवाय सिल्क हा ठेवणीतला प्रकार आहे. त्यामुळे अशा सेलमधून घेतलेल्या साड्या लवकर खराब होऊ शकतात.
 • सेल मध्ये विकण्यात येणाऱ्या वस्तू न आवडल्यास त्या पुन्हा रिर्टन करता येत नाहीत. त्यामुळे त्या खरेदी करताना त्या व्यवस्थित तपासून घ्या.
 • कपड्यांची खरेदी करताना त्यांची ट्रायल घ्या, कापड व्यवस्थित तपासून घ्या. कारण जुना माल असल्यास त्यामध्ये बिघाड असण्याची शक्यता अधिक असते.
 • सौंदर्यप्रसाधनांची खरेदी करताना त्यावरील माहिती आणि ऑफर काळजीपूर्वक वाचा.
 • इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करताना ऑफर नीट वाचा. शिवाय एकाच दुकानावर अवलंबून न राहता इतरांच्या ऑफर्स आधी पाहून घ्या.
 • एखादी ऑफर पाहून लगेच शॉपिंग करू नका. थोडा मनावर ताबा ठेवा कारण पुढच्या दुकानात कदाचित आणखी चांगली ऑफर तुम्हाला मिळू शकते. 
 • ठराविक रक्कमेवर खरेदी केल्यावर फ्री मिळणाऱ्या वस्तूंसाठी बजेटपेक्षा जास्त खरेदी करत बसू नका. त्याआधी फ्री देण्यात येणारी गोष्ट खरंच तुमच्या गरजेची आहे का याकडे लक्ष द्या.

आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि त्यामुळे तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला जरूर कळवा.

अधिक वाचा

मुंबईत आवर्जून भेट द्यायला हवी अशा फॅशन स्ट्रीट्स (Fashion Streets in Mumbai)

लग्नासाठी शॉपिंग करताय, मग या ‘15’ गोष्टी जरूर लक्षात ठेवा

नागपूरात लग्नाची शॉपिंग करताय मग 'या' ठिकाणांना जरूर भेट द्या

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम