रक्षाबंधन.. हा भारतीय संस्कृतीचे उत्तम दर्शन घडवणारा एक सण आहे. भारतात बहिणीला आईप्रमाणे मानले जाते. भावा बहिणीचे नाते हे जगातील एक अनोखे नाते आहे. प्रत्येक भावाला त्याला सदैव पाठीशी घालणारी एरृक प्रेमळ बहीण हवी असते. तर प्रत्येक बहिणीला तिची सदैव पाठराखण करणारा आणि सतत तिच्या खोड्या काढणारा भाऊ हवा असतो. त्यामुळे भावा बहिणीच्या अनोख्या नात्याला हे रक्षाबंधनामुळे विशेष महत्त्व प्राप्त होते.या दिवशी बहीण भावाला राखीच्या पवित्र बंधनामध्ये बांधून ठेवते.
भावाच्या दिर्घायुष्यासाठी बहीण भावाच्या मनगटावर राखीचा धागा बांधते तर या राखीच्या बदल्यामध्ये भाऊ बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देतो. श्रावणातील शुक्ल पौर्णिमेला राखीपौर्णिमा साजरी केली जाते. या वर्षी 3 ऑगस्ट 2020 रोजी राखीपौर्णिमा साजरी केली जाणार आहे.
राजसूय यज्ञाच्या वेळी भगवान श्रीकृष्णाला द्रौपदीने रक्षासूत्रच्या स्वरूपात आपल्या पदराचा तुकडा बांधला होता. या क्षणाची आठवण म्हणून भारतात बहिणीले भावाला राखी बांधण्याची प्रथा पडली. या दिवशी ब्राम्हणाकडून शुभ मुहूर्त पाहून भावाला राखी बांधण्याची पद्धत आहे. शुभ काळात भावाला राखी बांधल्यास त्याचे आरोग्य चांगले राहते आणि आयुष्य वाढते असं म्हणतात.
राखीपौर्णिमेच्या दिवशी बहिण शुभमुहूर्तावर भावाला राखी बांधते. राखी बांधण्यासाठी एका चांदीच्या अथवा इतर धातूच्या तबकामध्ये ती औक्षणाची तयारी करते. यासाठी पुढील प्रमाणे विधीपूर्वक औक्षण करावे.
बहिणीचं नातं भावासाठी नेहमीच मोठं आणि महत्त्वाचं असतं. त्यामुळे तिला भेट देताना तिच्या आवडीनिवडीचा विचार करा. तिला अशी भेटवस्तू द्या जिच्यामुळे तिला आनंद होईल. शिवाय ती तिच्या उपयोगाचीपण असेल. भेटवस्तू देताना तिची किंमत पाहण्यापेक्षा त्यामागच्या भावनांचा जास्त विचार करा.
राखीसंदर्भातील उत्तम शुभेच्छा संदेश (Happy Raksha Bandhan Messages In Marathi)
साडी ही प्रत्येक स्त्रीसाठी अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे जर तुमची बहिण मोठी असेल अथवा विवाहित असेल तर तिला यंदा साडी नक्कीच द्या. साडी खरेदी करताना तिच्या आवडी निवडीचा विचार करा. तिला सिल्कची साडी आवडते की ती कॉटन, लीननच्या साड्या नेसते. तिला पारंपरिक डिझाईन्स आवडतात की मॉर्डन याचा नीट विचार करा. आम्ही तुम्हाला ही पेपरसिल्क साडी सूचवत आहोत. जी कोणत्याही स्रीला नक्कीच आवडेल.
घड्याळाची आवड प्रत्येकीला असतेच. शिवाय तुमच्या बहीणीला जर निरनिराळ्या ट्रेंडची घड्याळ कलेक्शन करण्याची आवड असेल तर हे गिफ्ट तिला जरूर द्या. आजकाल गोल्ड, रोज गोल्ड, सिल्व्हर, गोल्ड आणि सिल्व्हर अशी विविध प्रकारची घड्याळं मिळतात. मात्र तुमची बहिण कॉलेजला जाणारी असेल तर नव्या ट्रेंडचं एखादं घड्याळ तिच्यासाठी निवडा ज्यामुळे तिला ते नक्कीच आवडेल.
तुमची बहिण फॅशनेबल असेल तर तिला विविध प्रकारचे दागदागिने परिधान करणं नक्कीच आवडेल. मात्र जर तुम्हाला कोणते दागिने द्यावेत याबाबत शंका वाटत असेल तर या गिफ्टचा नक्कीच विचार करा. या राखीपौर्णिमेला तुम्ही तिला एखादा ज्वेलरी बॉक्स नक्कीच देऊ शकता. या बॉक्समध्ये एकूण नऊ खण आहेत. ज्यामध्ये तिचे विविध प्रकारचे दागदागिने छान राहू शकतील. कानातले, बांगड्या, इतर अॅक्सेसरीज वेगवेगळ्या ठेवण्यासाठी हा अगदी सोयीचा पर्याय आहे. तुमची बहिण हे गिफ्ट पाहून नककीच खुश होईल.
जर या रक्षाबंधनला बहिणीला काय गिफ्ट द्यावं हा प्रश्न तुम्हाला सतावत असेल तर हे गिफ्ट तुमचा हा प्रश्न नक्कीच सोडवू शकेल. ही हाताने विणलेली शोल्डर बॅग तुमच्या बहीणीला नक्कीच आवडेल. ही बॅग कोणत्याही लुकवर तिला कॅरी करता येईल शिवाय याच्यावर हाताने केलेलं विणकाम आणि लेदरचा लुक तुमचं गिफ्टचं निवडकौशल्य दाखवून देईल. त्यामुळे यंदाच्या रक्षाबंधनाला तुमच्या बहीणीला एक हटके गिफ्ट जरूर द्या.
बहिणीला रक्षाबंधनसाठी काहीतरी नेहमीच्या उपयोगाची वस्तू भेट द्यायची असेल तर हा पर्यायदेखील मस्त आहे. प्रत्येक स्त्रीसाठी तिचे केस खूप खास असतात. काळेभोर आणि घनदाट केस असावे असं प्रत्येकाला वाटत असतं. मग यासाठी प्रत्येक महिला चांगल्या शॅंपू, कंडिश्नर आणि हेअर सिरमच्या शोधात असते. जर तुम्हाला तुमच्या बहीणीसाठी असं काहीतरी घ्यावं असं वाटत असेल तर हे हेअर ट्रिटमेंट किट तिला नक्की द्या.
मुलींना मेकअप आणि त्या निगडीत गोष्टी नेहमीच आवडतात. जर तुमच्या बहिणीलादेखील मेकअपची आवड असेल तर तिला मेकअप ब्रशचं हे किट गिफ्ट करा. कारण मेकअपमध्ये तिला नेमकं काय आवडतं हे जरी तुम्हाला माहीत नसलं तरी हे गिफ्ट तिला नक्कीच आवडू शकेल. या मेकअप ब्रश किटमध्ये विविध प्रकारचे ब्रश आहेत. जे तिला अगदी फांऊडेशन बेस पासून लिपस्टिक लावण्यापर्यंत उपयोगी पडू शकतात. शिवाय हे गिफ्ट दिल्यामुळे तुम्ही तिच्या आवडीनिवडीची किती काळजी करता हे तिला जाणवेल. जे तुमचं नातं बांधून ठेवण्यासाठी तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल.
आजकालचा जमाना हा आरोग्याबाबत जागरूक राहण्याचा आहे. शरीर निरोगी आणि तंदरुस्त राहण्यासाठी प्रत्येकानेच आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. स्वतःप्रमाणेच आपल्या प्रिय व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घेण्याची ही वेळ आहे. जर तुम्हाला तुमच्या बहिणीच्या आरोग्याबाबत काळजी वाटत असेल तर तिला हे फिट बिट गिफ्ट करा. ज्यामुळे तुमच्या बहीणीला तिच्या आरोग्याबाबत अपडेट राहण्यास मदत होईल.
तुमची बहिण नोकरी करणारी असेल तर तिच्यासाठी हे गिफ्ट नक्कीच उपयोगाचं ठरेल. कारण रोज ऑफिसमध्ये जाताना हे गिफ्ट पाहून तिला तुमची आठवण येईल. बोरोसिलचा हा काचेचा टिफिन बॉक्स आरोग्यासाठी अगदी उत्तम आहे. शिवाय त्यामुळे तीला जेवण मायक्रोवेव्हमध्ये गरम करून खाता येईल. करिअर करणाऱ्या महिलंसाठी हे गिफ्ट अगदी वरदान ठरू शकेल.
संगीत हा अनेकांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे तुमची बहिण देखील संगीतप्रेमी असेल तर हे गिफ्ट तिला नक्कीच आवडेल. हेडफोनचा वापर प्रत्येकाला होतच असतो. त्यामुळे या राखीपौर्णिमेला बहीणीला हे छानसं हेडफोन देण्यास काहीच हरकत नाही. शिवाय हे फार महागडं गिफ्ट नसल्यामुळे तुम्हाला परवडण्यासारखं आहे.
जरी आता पावसाळा असला तरी सनग्लासेस अथवा गॉगल नेहमीच फॅशन म्हणून वापरता येतात. त्यामुळे जर तुमची बहिण थोडी ट्रेन्डी आणि चुलबुली असेल तर तिला सनग्लासेस गिफ्ट द्या. तिच्या व्यक्तीमत्वानुसार सनग्लासेस निवडले तर ती नक्कीच खुश होईल. या रक्षाबंधनला तिला फिरायला अथवा पिकनिकला घेऊन जा आणि ही भेट तिला द्या.
भटकंतीची आवड असणाऱ्यांसाठी हे अगदी मस्त गिफ्ट आहे. तुमच्या बहिणीला देखील सतत नवनवीन ठिकाणी फिरण्याची आवड असेल तर तिला हे गिफ्ट नक्कीच आवडेल.त्यामुळे या राखीपौर्णिमेच्या निमित्ताने या वर्षी एखादा परदेसदौरा करण्याचा बेत आखा आणि त्यासाठी बहिणीला हे पासपोर्ट होल्डर देऊन चकित करा. आमच्या POPxo Shop सेक्शनध्ये तुम्हाला आणखी गिफ्ट पाहता येतील
आजकाल अपूरी झोप, शिफ्ट ड्यूटी आणि रात्रभर जागरण अशा अनेक गोष्टी वाढत आहेत. कामाच्या ताणामुळे कधी कधी उशीरापर्यंत काम करावं लागतं. ज्यामुळे जेव्हा झोपण्याची वेळ येते तेव्हा झोप येत नाही. तुमची बहिण अशा प्रकारची जीवनशैली जगत असेल तर तिला या राखीपौर्णिमेला स्लीप मास्क गिफ्ट द्या. ज्यामुळे तिला पुरेशी झोप मिळू शकेल. शिवाय सोबत जीवनशैली बदलण्याचा सल्ला देखील द्या.
मुलींना पारंपरिक कपड्यांवर मॅचिंग बांगड्या घालायला आवडतात. अनेकींकडे निरनिराळ्या रंगाच्या आणि पॅर्टर्न्सच्या बांगड्या असतात. तुमच्या बहिणीलादेखील अशी आवड असेल. तर तिच्या बांगड्यांच्या कलेक्शनसाठी हे गिफ्ट नक्की घ्या. या खास बांगड्यांसाठी असलेल्या ज्वेलरी बॉक्समध्ये ती तिच्या आवडीच्या बांगड्या अगदी जपून ठेवू शकते.
पार्टी वेअरवर एखादं छान क्लच परफेक्ट दिसतं. तुमच्या बहिणीला पार्टी आणि पार्टीवेअरची आवड असेल तर तिला तुम्ही हे क्लच देऊ शकता. गोल्डन रंगाचं हे क्लच कोणत्याही पार्टीवेअरवर खुलून दिसेल. शिवाय बहिणीच्या आवडीचं गिफ्ट दिल्याचं समाधानदेखील तुम्हाला मिळेल.
जर तुमची बहिण तिच्या फिटनेस आणि व्यायामाकडे लक्ष देणारी असेल तर तिला हे गिफ्ट फारच आवडेल. कारण तिच्या या आवडीचा तुम्ही विचार करत आहात असं या गिफ्टमधून दिसून येतं. निरोगी राहण्यासाठी माणसाने नियमित व्यायाम आणि योगा करणं गरजेचं आहे. तेव्हा तुमच्या बहिणीला व्यायामासाठी प्रोत्साहन देण्यासाठी यंदा जीम वेअर जरूर द्या.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात वाहन ही सर्वांच्याच गरजेची गोष्ट झाली आहे. त्यामुळे जर तुमची बहिण स्कुटी अथवा बाईकवरून फिरणारी असेल तर तिलागे गिफ्ट नक्कीच आवडेल. शिवाय हे तिच्या हाताची सुर्यप्रकाशापासून काळजीदेखील घेईल. सन प्रोटेक्शन आर्म स्लीव्हज ही एक हटके भेटवस्तू तुम्ही तुमच्या बहिणीला देऊ शकता.
आजकाल टोट बॅगची फॅशन आहे. कॉलेजला जाणाऱ्या मुलींमध्ये याची विशेष आवड दिसून येते. कारण या बॅग्जवर निरनिराळे ट्रेंडी मेसेज लिहीलेले असतात. तुमची बहिण अशा प्रकारच्या आवडीनिवडी असलेली असेल तर तिला हे गिफ्ट नक्कीच आवडेल. आमच्या POPxo shop मध्ये तुम्हाला असे हटके मेसज असलेल्या टोट बॅग्ज नक्कीच मिळतील.
महिला करिअर आणि घर उत्तमपणे सांभाळू शकतात. नोकरी करणाऱ्या महिलांना ऑफिसचा लॅपटॉप बऱ्याचदा स्वतःसोबत कॅरी करावा लागतो. अशा वेळी एखादं छानसं लॅपटॉप कव्हर त्यांच्या लुकला परफेक्ट करू शकतो. यासाठीच या राखीपौर्णिमेला तुमच्या बहिणीला हे POPxo shop मधलं लॅपटॉप कव्हर गिफ्ट द्या.
जर तुमच्या बहिणीला कॉफी पिण्याची आवड असेल तर तिला हे कॉफी मग देखील तुम्ही भेट देऊ शकता. POPxo shop च्या कॉफी मग वर निरनिराळे ट्रेंडी मेसेज लिहिले आहेत. जे तुमच्या बहिणीला नक्कीच आवडतील.
जर तुमच्या बहिणीला लिखाणाची आवड असेल तर प्रत्येकाच्या राशीनूसार मेसेज असलेले हे नोटबूक तिला नक्कीच आवडतील. यासाठी तिची रास जाणून घ्या आणि त्यानूसार एखादं छान मेसेज असलेलं नोटबूक निवडा. आमच्या POPxo shop मधून ऑनलाईन शॉपिंग करून तुम्ही ते खरेदी करू शकता.
राखीपौर्णिमेला बहिणीने भावाला राखी बांधल्यावर तिला काहीतरी भेटवस्तू देण्याची पद्धत आहे. मात्र आजकाल बहीण देखील नोकरी करणारी असते. त्यामुळे तिलादेखील भावाला काहीतरी गिफ्ट देण्याची ईच्छा असते. या राखीपौर्णिमेला तुमच्या लाडक्या भावाला या भेटवस्तू तुम्ही देऊ शकता.
मुलांना बाईकवरून फिरताना अथवा ट्रॅव्हल करताना लेदरचं जॅकेट घालायला नक्कीच आवडतं. तुमच्या भावाची ही आवड ओळखून तुम्ही यंदा ही भेट देऊन चकित करू शकता. या जॅकेटमध्ये त्याचा लुकदेखील परफेक्ट दिसेल.
मुलांना नेहमी फॉर्मल्स पेक्षा कॅज्युअल लुकचे कपडे आवडतात. नेहमीच्या वापरासाठी अशा प्रकारचं एखादं छान टी शर्ट तुम्ही तुमच्या भावाला नक्कीच देऊ शकता. कारण त्यामुळे त्याला आरामदायकदेखील वाटेल. तुमच्या भावाची आवड ओळखा आणि एखादं मस्त टी शर्ट त्याला गिफ्ट करा.
आजकाल सर्वांनाच स्वतःच ग्रूमिंग करायला आवडत असतं. त्यामुळे मुलींप्रमाणे मुलांनादेखील सौंदर्यप्रसाधनांची आवड असते. जर तुमच्या भावाला बिअर्ड लुकमध्ये इंटरेस्ट असेल तर त्याला हे गिफ्ट जरूर द्या. ज्यामुळे त्याच्या दाढी आणि मिशीचे केस लवकर वाढू शकतील.
आजकाल सर्वांनाच स्वतःच ग्रूमिंग करायला आवडत असतं. त्यामुळे मुलींप्रमाणे मुलांनादेखील सौंदर्यप्रसाधनांची आवड असते. जर तुमच्या भावाला बिअर्ड लुकमध्ये इंटरेस्ट असेल तर त्याला हे गिफ्ट जरूर द्या. ज्यामुळे त्याच्या दाढी आणि मिशीचे केस लवकर वाढू शकतील.
तुमच्या भावाला कॉफी पिण्याची आवड असेल तर त्याला राखीसोबत हे गिफ्ट तुम्ही नक्कीच देऊ शकता. बऱ्याचदा एखादा चांगला मेसेज लिहून कस्टमाईज केलेले कॉफी मग भेट दिले जातात. राखीपौर्णिमेचा एखादा छान मेसेज लिहून तुम्ही हा मग त्याला देऊ शकता. हे गिफ्ट त्याला नक्कीच आवडेल.
आजकाल मार्केटमध्ये खास राखीपौर्णिमेसाठी काही गिफ्टस् तयार केले जातात. जे तुम्हाला नक्कीच आवडू शकतील. अशा सेट्स मध्ये कुशन, कॉफी मग, नोटबूक आणि किचेनचा समावेश असतो. त्यामुळे भावासाठी तयार केलेलं हे खास गिफ्ट तुम्ही त्याला नक्कीच देऊ शकता.
पुरूषांनी रूबाबदार दिसावं यासाठी बाजारात अनेक ग्रूमिक किट उपलब्ध असतात. मुलं स्वतःकडे विशेष लक्ष देत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारचं एखादं गिफ्ट त्यांना दिलं तर ते त्यांना नक्कीच आवडतं. शिवाय प्रत्येक बहिणीला आपला भाऊ नेहमीच रूबाबदार दिसावा असं वाटत असतं.
आजकाल इअर फोनपेक्षा हेडफोनची फॅशन आहे. शिवाय वायरलेस अथवा ब्लू टुथ कनेक्शन असलेले हे हेडफोन प्रवासात सोयीचेदेखील असतात. तुमच्या भावासाठी तुम्हाला एखादं उपयुक्त् गिफ्ट घ्यायचं असेल तर हे गिफ्ट त्याला नक्की द्या. कारण ते त्याला आवडेल आणि त्याचा वापरही होईल.
पाकीट ही सर्वांच्याच गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे तुमच्या भावाला याची गरज ही असणारच. जर तुम्हाला त्याला काहीतरी उपयुक्त भेट द्यायची असेल तर त्याला पाकीटच द्या. लेदरचं पैशांचं पाकीट अथवा वॉलेट कोणालाही आवडू शकतं.
आजकाल पोर्टेबल वायरलेस ब्लू टुथ स्पीकरची फॅशन आहे.हे स्पीकर तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता. एकदा चार्ज केलं की बराच काळ त्यावर गाणी अथवा इतर गोष्टी ऐकता येतात. शिवाय हे फार आकर्षक असल्यामुळे गिफ्ट देण्यासाठी उत्तम ठरतात. या राखीपौर्णिमेला तुम्ही तुमच्या भावाला हे गिफ्ट देऊ शकता.
भावाला या राखीपौर्णिमेला काय गिफ्ट द्यावं असा प्रश्न तुम्हाला सतावत असेल तर मुळीच काळजी करू नका. कारण हे गिफ्ट त्याच्या नक्कीच उपयोगाचं आहे. या राखीपौर्णिमेला तुम्ही त्याला बोरोसिलचा हा टिफिन बॉक्स गिफ्ट करू शकता.
ही सर्वांच्याच गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे तुमच्या भावाला याची गरज ही असणारच. जर तुम्हाला त्याला काहीतरी उपयुक्त भेट द्यायची असेल तर त्याला पाकीटच द्या. लेदरचं पैशांचं पाकीट अथवा वॉलेट कोणालाही आवडू शकतं.
प्रत्येकाला फिरायला जाण्याची आवड असतेच. त्यामुळे तुम्ही तुमच्या भावाला हे गिफ्ट नक्कीच देऊ शकता. ज्याचा त्याला फार उपयोग होईल. परदेशी जाण्यासाठी पासपोर्ट होल्डल गिफ्ट देऊन तुम्ही त्याच्या फिरण्याच्या आवडीला प्रोत्साहन देऊ शकता.
मुलांना जीमला जाण्याची आवड असते. उत्तम आरोग्यासाठी नियमित जीमला जाण्याची गरज असते. जर तुमचा भावाला जीमला जाण्याची आवड असेल तर त्याला तुम्ही जीम वेअर गिफ्ट देऊ शकता. शिवाय अशा प्रकारची एखादी जीम बॅगदेखील तुम्ही त्याला गिफ्ट देऊ शकता.
आजकाल मुलंदेखील स्वतःसाठी स्वयंपाक करू शकतात. जर तुमच्या भावाला स्वयंपाक करण्याची आवड असेल तर त्याला हे गिफ्ट नक्कीच आवडेल. ऑफिसमध्ये जाताना घाईच्या वेळी अशा टोस्टरमध्ये टोस्ट ब्रेड अथवा सॅंडविच करण्यासाठी त्याच्या हे नक्कीच उपयोगी पडेल.
आजकाल बदलत्या काळानुसार अनेक गोष्टीमध्ये बदल घडू लागले आहेत. त्यामुळे सहाजिकच राखीपौर्णिमादेखील आजच्या काळातील बहिणभावांच्या आवड आणि सोयीनुसार साजरी केली जाते. बऱ्याचदा राखी पौर्णिमा ही विकडेजमध्ये येते. त्यामुळे नोकरी करणाऱ्या भावंडांना एकमेंकांसाठी वेळ काढणं शक्य होत नाही. त्यामुळे आपल्या सोयीनुसार तुम्ही विकऐन्डला राखीपौर्णिमा साजरी करू शकता. यंदा मात्र 15 ऑगस्टला राखीपौर्णिमा आणि स्वातंत्र्यदिन दोन्ही असल्यामुळे तुम्हाला नक्कीच सुट्टी मिळू शकते. त्यामुळे हा दिवस तुम्ही तुमच्या भांवडांसोबत नक्कीच मजेत साजरा करू शकता.
अधिक वाचा -
Friendship Day Special : मित्रमैत्रिणींना काय द्यायचे स्पेशल गिफ्ट्स
#Friendshipday साठी शुभेच्छा संदेश आणि स्टेटस (Friendship Day Quotes In Marathi)