Sensitive Skin Care Tips-तुमचीही त्वचा आहे नाजूक ? मग या सोप्या पद्धतींनी घ्या काळजी | POPxo

तुमचीही त्वचा आहे नाजूक? मग या सोप्या पद्धतींनी घ्या काळजी (Sensitive Skin Care Tips)

तुमचीही त्वचा आहे नाजूक? मग या सोप्या पद्धतींनी घ्या काळजी (Sensitive Skin Care Tips)

प्रत्येकाची त्वचा ही वेगळी असते. त्यामुळे त्वचेसंदर्भातील प्रत्येकाच्या तक्रारी या वेगवेगळ्या असतात. जर तुमची त्वचा नाजूक असेल तर मात्र तुम्हाला इतर त्वचेच्या तुलनेत थोडी जास्त काळजी घ्यावी लागते. ही काळजी इतर त्वचेच्या प्रकारात फार वेगळी असते. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता. आज आपण जाणून घेऊया नाजूक त्वचेची अगदी सोप्या पद्धतीने कशी काळजी घ्यायची ते..मग करायची सुरुवात

Table of Contents

  नाजूक त्वचेची लक्षणे कोणती (Signs Of Sensitive Skin)

  Instagram
  Instagram

  तुमची त्वचा जर नाजूक असेल तर तुमच्या त्वचेवर काही लक्षणे पटकन दिसून येतील. ही लक्षणे पुढील प्रमाणे

  बेकिंग सोडा पेस्ट बद्दल देखील वाचा

  पटकन लाल होणे (Redness)

  नाजूक त्वचेला चेहऱ्यावर काहीही नवे लावले तर ते सहन होत नाही. जर एखादे ब्युटी प्रोडक्ट या त्वचेला सूट होणारे नसेल तर त्या गोष्टी तुमच्या चेहऱ्यावर रिअॅक्ट करु लागतात. अशावेळी तुमचा चेहरा पटकन लाल पडतो. जर काहीही न करता तुमचा चेहरा असा लाल पडत असेल तर मग तुम्हाला काळजी करण्याची फारच गरज आहे.

  खाज येणे (Itchy)

  नाजूक त्वचेचा आणखी एक त्रास होण्याची शक्यता असते ती म्हणजे त्वचेला खाज येण्याची. जर त्वचेला काहीही लावल्यानंतर तुम्हाला खाज येत असेल तर समजावे की, तुमची त्वचा नाजूक प्रकारातील आहे. त्वचेवरील खाजेमुळे तुम्ही जर त्वचा खाजवत राहाल तर तुम्हाला त्यामुळे जखमा होऊ शकतात.

  वाचा - स्किनकेअर साठी टीपा (Skin Care Tips)

  त्वचा कोरडी वाटणे (Feels Dry)

  हवामानानुसार प्रत्येकाच्या त्वचेमध्ये बदल होत असतात. नाजूक त्वचा असल्यास हा बदल जास्त जाणवतो. ज्यांची त्वचा नाजूक असते त्यांना त्यांची त्वचा कोरडू पडू लागते. जर तुमची त्वचाही काहीही कारण नसताना कोरडी पडत असेल तर तुमची त्वचा नाजूकदेखील नाजूक आहे.

  त्वचा जळजळणे (Burning)

  काही वेळा काहीही कारण नसताना तुमची त्वचा जळजळू लागते. त्वचेवर काहीही केलेले नसतानाही अनेकांना हा त्रास होतो. याचाच अर्थ तुमची त्वचा इतकी नाजूक आहे की, तुम्हाला काहीही न करता देखील काही क्षुल्लक कारणामुळे जळजळ होऊ लागते.

  त्वचा ताणल्यासारखी वाटणे (Tightness)

  त्वचा नाजूक असल्यास ती ओढल्यासारखी वाटते. त्वचा ताणल्यामुळे याला पटकन एखादी जखम होऊ शकते. या जखमेतून रक्तही येऊ शकते.जर तुमची त्वचाही तुम्हाला ताणल्यासारखी वाटत असेल तर तुमची त्वचा नाजूक आहे.

  वाचा: भारतीयांची त्वचा आहे वेगळी, म्हणून त्यांनी घ्यावी अशी काळजी

  संवेदनशील त्वचेसाठी घरगुती उपचार (Home Remedies For Sensitive Skin)

  प्रत्येकवेळी तुम्हाला तुमच्या नाजूक त्वचेची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांकडे जाण्याची काहीच गरज नाही. तुम्ही घरच्या घरी देखील तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता. काही सोप्या उपायांचा अवलंब करुन तुम्ही तुमची त्वचा चांगली करु शकते.

   

  1. आपली त्वचा ओलावा (Moisturize Your Skin)

  Shutterstock
  Shutterstock

  त्वचा नाजूक असेल तर हवामानबदलाची वाट पाहावी लागत नाही. या त्वचेला काही काही तक्रारी सतत असतात .पण तुम्ही थोडी काळजी घेतली तर तुमच्या त्वचेसंदर्भातील तक्रारी नक्कीच कमी होतील. अशा त्वचेसाठी चांगले मॉश्चरायझर वापरणे फारच गरजेचे असते. त्यामुळे तुम्ही उत्तम प्रतीने मॉश्चरायझर निवडा. आंघोळीनंतर आणि घराबाहेर पडताना चांगले मॉश्चरायझर लावून घराबाहेर पडा.

  2.योग्य प्रमाणात प्या पाणी (Keep Hydrated)

  Shutterstock
  Shutterstock

  त्वचेसाठी पाणी किती महत्वाचे आहे हे तुम्हाला सांगण्याची काहीच गरज नाही. जर तुम्हाला तुमच्या नाजूक त्वचेतील तजेला टिकवून ठेवायचा असेल आणि त्वचेवरील टिश्श्यू हेल्दी ठेवायचे असतील तर तुम्ही पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करायला हवे. 

  वाचा: कमी वेळात तजेलदार त्वचा हवी असेल तर वापरा बदामाचं तेल

  3.मध वापरा (Use Of Honey)

  Shutterstock
  Shutterstock

  तुमच्या त्वचेतील तजेला टिकवून ठेवण्यासाठी चेहऱ्याला मध लावायला विसरु नका. तुमच्या चांगल नैसर्गिक मध असेल तर अगदी बोटभर मध घेऊन ते चेहऱ्याला लावा तुम्हाला लगेचच फरक जाणवेल. तुमची त्वचा ताणली जात असेल तर मग तसे होणार नाही.मध हा उष्ण असतो त्यामुळे तो लावताना तुम्ही अधिक काळजी घ्यायला हवी.

  4.ग्रीन टी (Green Tea)

  Shutterstock
  Shutterstock

  नाजूक त्वचेच्या इतर समस्या दूर करण्याचे काम ग्रीन टी करु शकते. जर तुम्हाला पिपंल्स आले असतील तर मग ग्रीन टी तुमच्यासाठी खूप चांगला पर्याय आहे. ग्रीन टी पिऊन झाल्यानंतर आपण ते पाऊच फेकून देतो. पण तसे न करता तुम्हाला तुमच्या ग्रीन टी बॅग्ज तुमच्या चेहऱ्यावर फिरवायच्या आहेत. असे करण्यामुळे तुमच्या त्वचेवरील पिंपल्स, रॅशेश कमी होतील.

  वाचा: घरच्या घरी whiteheads वर करा झटपट उपाय

  5. कोरफड जेलचा वापर (Aloe Vera)

  Shutterstock
  Shutterstock

  नाजूक त्वचा काहीवेळा खूप जळजळते अशावेळी त्वचा थंड करण्यासाठी कोरफडीचा गर हा कामी येतो. जर तुम्हाला कोरफडीचा खरा गर मिळणे शक्य नसेल तर तुम्ही बाजारात विकत मिळणारी कोरफड जेल चेहऱ्याला लावू शकता. जर तुम्ही कोरफडीचा गर काढणार असाल तर तो गर कोणत्या कोरफडीचा आहे ते देखील माहीत असायला हवे. कोणत्याही कोरफडीचा थेट गर चेहऱ्याला लावणे त्रासदायक ठरु शकते. त्यामुळे जर तुम्हाला त्या संदर्भातील कोणतीही माहिती नसेल तर बाजारात विकत मिळणारी कोरफड जेल चेहऱ्याला लावणे नेहमीच उत्तम

  6.फिश ऑईल (Fish Oil)

  Shutterstock
  Shutterstock

  व्हिटॅमिन A,D, कॅल्शिअम असते. तुमच्या त्वचेसाठी व्हिटॅमिन C सोबत A आणि D देखील तितकेच गरजेचे असते त्यामुळे तुम्ही फिश ऑईलने तुमच्या चेहऱ्याला चांगला मसाज करु शकता. त्यामुळे तुमची त्वचा तुम्हाला मुलायम वाटेल. चेहऱ्यावरील रॅशेसदेखील कमी होतील.

  7.नारळाचे तेल (Coconut Oil)

  Shutterstock
  Shutterstock

  नारळाचे तेल म्हणजे सर्वगूणसंपन्न असे तेल. तुम्ही या तेलाचा वापर अगदी कसाही केलात तरी त्याचा त्रास तुम्हाला अजिबात होत नाही. तुम्हाला फिश ऑईल मिळत नसेल तर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला नारळाचे तेल लावू शकता. 

  8.कांद्याचा अर्क (Onion Extract)

  Shutterstock
  Shutterstock

  कांद्याचा अर्क तुमच्या त्वचेसाठी चालू शकतो असा तुम्ही कधी विचारही केला नसेल नाही का? पण कांद्याचा अर्क तुम्ही तुमच्या त्वचेला लावू शकता. व्हिटॅमिन A,C आणि B कॉम्पलेक्स असते. पिंपल्स विरुद्ध लढण्याची ताकद कांद्याच्या अर्कामध्ये असते त्यामुळे नाजूक त्वचा असणाऱ्यांनी कांद्याचा अर्क लावला तरी त्याचे कोणतेही दुष्परिणाम तुमच्या त्वचेवर होणार नाही. 

  कांद्याचा दर्प जर तुम्हाला आवडत नसेल किंवा तुम्हाला कांद्याची एलर्जी असेल तर मग तुम्ही कांद्याचा अर्क वापरले नाही तरी चालेल.

  9.शिआ बटर (Shea Butter)

  Shutterstock
  Shutterstock

  त्वचेतील आर्दता टिकवून ठेवण्यासाठी शिआ बटर हे उत्तम आहे. पण जर तुमची त्वचा फारच कोरडी असेल तर शिआ बटरचा वापर करा. तुमच्या चेहऱ्यावरील कोरडेपणा कमी होईल.

  10.बर्फ (Ice)

  Shutterstock
  Shutterstock

  त्वचेला बर्फ लावण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. नाजूक त्वचा असणाऱ्यांनी त्यांच्या त्वचेला बर्फ लावण्यास काहीच हरकत नाही. पण बर्फ लावताना तुम्ही तो थेट लावू नका. कपड्यात घेऊन तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर बर्फ चोळा. जर तुमच्या त्वचेवर सुरकुत्या असतील तर त्या सुरकुत्या बर्फामुळे कमी होतील. या शिवाय तुम्हाला त्वचेवर जळजळ होत असेल तर ती देखील बर्फाच्या वापरामुळे कमी होईल. त्यामुळे तुम्ही एखाद्या टर्कीश टॉवेलमध्ये बर्फ गुंडाळून तो तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावा. तुम्हाला लगेच फरक जाणवेल.

  11.तूप (Ghee)

  Shutterstock
  Shutterstock

  तूप हे सगळ्यावरील उत्तम उपाय आहे. जर तुमच्याकडे काहीच उपलब्ध नसेल. पण घरी किचनमध्ये तूप असेल तर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला तूपाने मसाज करा. तूप लावा असं म्हणताना तुम्हाला अगदी 3 ते 4 थेंब तुपाचे घ्यायचे आहे आणि चेहऱ्यावर छान मसाज करायचा आहे.

  12.कोथिंबीर (Coriander)

  Shutterstock
  Shutterstock

  भाजी, भात, आमटी, कढी यावर भुरभुरली जाणारी कोथिंबीर एक चांगले ब्युटी प्रोडक्ट आहे. कोथिंबीर स्वच्छ करुन तुम्हाला ती थोडी वाटून घ्यायची आहे. त्यात मध किंवा ओट्स घालून त्याचा पॅक चेहऱ्याला लावा.तुम्हाला तुमच्या चेहऱ्यात लगेच फरक जाणवेल. 

  *वरील सगळे प्रयोग एकाचवेळी करुन पाहू नका. कारण त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकेल.

  संवेदनशील त्वचेसाठी चेहर्याचा (Facial For Sensitive Skin)

  नाजूक त्वचा असलेल्यांना नेमकं कोणतं फेशिअल करायचे हे कळत नाही. पण चिंता करण्याचे काहीच कारण नाही कारण तुमच्या त्वचेच्या प्रकारासाठीही काही फेशिअल उपलब्ध असतात. कदाचित ही फेशिअल्स तुम्ही तुमच्या पार्लरमध्ये ऐकली देखील असतील पण हे फेशिअल करायचे की नाही अशी भीती तुम्हाला वाटत असेल तर आधी या फेशिअलविषयी माहिती करुन घ्या.

  पपई फेशिअल(Papaya Fruit Facial)

  पपईच्या अर्काचा वापर करुन तयार केलेल्या प्रोडक्टने पपई फेशिअल केले जाते. हे फेशिअल नैसर्गिक असल्यामुळे त्याचा त्रास तुमच्या त्वचेला अजिबात होत नाही. उलट पपईतील आवश्यकतत्वे तुमच्या त्वचेत गेल्यामुळे तुमची त्वचा अधिक चांगली होण्यास मदत मिळते. अनेक चांगल्या ब्रंँडचे फेशिअल सध्या उपलब्ध आहेत. महिन्यातून एकदा तरी तुम्ही हे फेशिअल करायला काहीच हरकत नाही.

  अॅलोवेरा फेशिअल(Aloe Vera Facial)

  अॅलोवेरा तुमच्या चेहऱ्याला थंडावा देण्याचे काम करते.त्यामुळे अॅलोवेरा फेशिअल नाजूक त्वचा असणाऱ्यांना आरामात चालू शकते. अॅलोवेरा फेशिअलमध्ये मसाज क्रिममध्ये अॅलोवेरा जेलचा समावेश केलेला असतो. हे फेशिअल केल्यानंतर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यात लगेच बदल जाणवेल तुम्हाला छान फ्रेश वाटेल.

  अरोमा फेशिअल (Aroma Facial)

  सध्या सगळीकडे अरोमा फेशिअलची चर्चा आहे. किंमतीचा विचार केला तर हे फेशिअल थोडे महाग असते. कोणत्याही त्वचेसाठी हे फेशिअल उत्तम आहे. पण जर तुमची त्वचा नाजूक असेल तर तुम्हाला हे फेशिअल करण्याचा सल्ला दिला जातो. याचे कारण असे की, या फेशिअलमुळे तुमच्या त्वचेला आवश्यक असलेले मॉश्चरायझर मिळते. शिवाय चेहऱ्यावरील तेल नियंत्रणात राहते.

  हर्बल फेशिअल (Herbal Facial)

  जर तुम्हाला त्वचेशी निगडीत कोणताही त्रास असेल तर तुम्हाला हमखास हर्बल फेशिअल करण्याचा सल्ला दिला जातो. बजेटमध्ये बसणारे हे फेशिअल असते शिवाय त्याचे कोणतेही साईफ इफेक्ट होत नाहीत. त्यामुळेच हे फेशिअल करण्याचा सल्ला बहुतेकदा देण्यात येतो. या फेशिअलमध्ये फळ किंवा काही आयुर्वेदीक गोष्टींचा वापर केला जातो. त्यामुळे त्याचे काही दुष्परिणाम चेहऱ्यावर होत नाहीत.

  मिक्स फ्रुट फेशिअल (Mix Fruit Facial)

  सगळ्यात स्वस्त आणि मस्त असे असतात मिक्स फ्रुट फेशिअल. संत्र, कलिंगड, काकडी, स्ट्रॉबेरी, अॅपल अशा वेगवेगळ्या फळांचा वापर यामध्ये केला जातो. त्यामुळे हे फेशिअल केल्यानंतर एकदम ताजेतवाने वाटते. तुम्ही अगदीच काही फेशिअल करत नसाल आणि तुम्हाला फेशिअल करण्याची इच्छा असेल तर तुम्ही अगदी सुरुवातीला मिक्स फ्रुट फेशिअल करु शकता. 

  संवेदनशील त्वचेसाठी चेहर्याचा किट (Facial Kit For Sensitive Skin)

  Skin Care

  VLCC Papaya Fruit Facial Kit

  INR 142 AT VLCC

  Skin Care

  Oriflame Sweden Love Nature Facial Kit Tea Tree 425 ml (Set of 4)

  INR 478 AT Oriflame

  Skin Care

  NutriGlow Set of 1 Green Tea Facial Kit + 1 Green Tea Toner + 1 Serum 420 g (Set of 3)

  INR 378 AT Nutriglow

  FAQs

  त्वचा नाजूक कशी आहे हे कसे ओळखावे?

  त्वचा लाल होणे, खाज येणे, सतत फुटणे ही काही नाजूक त्वचेची लक्षणे आहेत. जर तुम्हाला हा त्रास सतत होत असेल तर तुमची त्वचा नाजूक आहे असे समजावे. या शिवाय नाजूक त्वचेची अन्यही काही लक्षणे आहेत. 
   

  नाजूक त्वचेसाठी चांगले मॉश्चरायझर कोणते?

  नाजूक त्वचेसाठी बाजारात काही खास मॉश्चरायझर मिळते.clinque, biotiuqe,nutrogena या कंपनीचे चांगले मॉश्चरायझर बाजारात आहेत. त्याच्या आऊटलेटवर गेल्यावर तुम्हाला तेथे तुमच्या त्वचेनुसार चांगले मॉश्चरायझर मिळू शकतील.

  त्वचा नाजूक असलेल्यांसाठी काही फेशिअल ट्रिटमेंट असतात का?

  सगळ्या त्वचेच्या प्रकारांसाठी चांगल्या फेशिअल ट्रिटमेंट हल्ली सगळीकडेच उपलब्ध असतात. पण जर तुम्हाला तुमची त्वचा खूपच नाजूक वाटत असेल तर तुम्ही एक्सपर्टचा सल्ला घेऊन तुमच्या त्वचेसाठी .योग्य फेशिअल निवडावे.

   

  नाजूक त्वचा बरी होऊ शकते का?

  त्वचेची तुम्ही काळजी घेऊ शकता. त्वचा हा कोणता आजार नाही त्यामुळे तो बरा होण्याचा प्रश्नच येत नाही. पण जर तुम्ही योग्यवेळी तुमच्या त्वचेची काळजी घेतली तर तुमच्या नाजूक त्वचेच्या समस्या कमी होऊ शकतील. 

   

  नाजूक त्वचेसाठी चांगले प्रोडक्ट कोणते

  नाजूक त्वचेसाठी फेसवॉशपासून ते अगदी टोनरपर्यंत सगळे प्रोडक्ट मिळतात. इतकेच काय नाजूक त्वचेसाठी वेगळे मेकअप प्रोडक्टही बाजारात उपलब्ध आहेत.जे तुम्ही विकत घेऊ शकता.