प्रत्येकाचे आयुष्य अनुभवांनी भरलेले असते. काहींना आयुष्य जगताना चांगले अनुभव येतात. तर काहींना वाईट. काहींना त्यांचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी अनेक आडमार्गही प्रसंगी स्विकारावे लागतात.असाच काहीसा वेगळा प्रवास आहे पॉर्न स्टार सनी लिओनचा.. ज्या सनी लिओनला लोकांच्या अनेक टीकांना सामोरे जावे लागले. तीच सनी लिओन आता अनेकांच्या गळ्याचे ताईत बनली आहे.
सनी लिओन एक पॉर्नस्टार, अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने अनेक अॅडल्ट मुव्हिजमधून काम केले आहे. पॉर्न इंडस्ट्रीमधील सगळ्यात प्रसिद्ध चेहरा अशी तिची ओळख आहे. पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर आणि आपली वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर बॉलीवूडमध्ये येण्याचा मोह आवरला नाही. तिने पॉर्न इंडस्ट्रीसोडून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. सध्या ती चित्रपटातून तर काम करतेच. पण तिने स्वत:ची कॉस्मेटिक रेंजही बाजारात आणली आहे. त्यामुळे पॉर्नस्टार ते बिझनेस वुमन आणि अभिनेत्री ते समाजसेविका अशी ओळख तिने आता निर्माण केली आहे. तिचा हा प्रवास लहान नव्हता याचा तुम्हाला अंदाज आला असेलच बहुधा.
सनी लिओनच्या आयुष्यातील अनेक असे कंगोरे आहेत. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिच्या आयुष्यातील महत्वपूर्ण गोष्टी जाणून घेणे गरचेचे आहे. बघुया तिच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण टप्पे
सनी लिओनचे खरे नाव करणजीत कौर वोरा असे असून तिचा जन्म कॅनडामधील ओंटारिओ येथे 13 मे 1981 रोजी झाला.पंजाबी- शीख कुटुंबात तिचा जन्म झाला. तिच्या कुटुंबाचे वेगळेपण सांगायचे तर तिच्या वडिलांचा जन्म हा तिबेटचा असून तिची आई हिमाचल प्रदेशची आहे. वडिलांचे लहानपण दिल्लीत गेले. पण कामानिमित्त ते कॅनडाला राहू लागले. सनीला एक लहान भाऊ असून त्याचे नाव संदीप सिंह वोरा आहे आणि तो सध्या शेफ म्हणून नावारुपाला आला आहे. तिचे काही शिक्षण ओंटारिओ येथील कॅथलिक शाळेत झाले. टीपिकल शीख कुटुंबाला कॅथनलिक शाळेत मुलांना घालणे धोक्याचे वाटत होते. म्हणूनच त्यांनी कॅनडा सोडण्याचा निर्णय घेतला. आणि ते अमेरिकेतील कॅलिफोर्नियात स्थिरावले. सनीने तिची व्हर्जिनिटी वयाच्या सोळाव्या वर्षी घालवली. त्यानंतर तिला तिच्या सेक्शुअॅलिटी बाबतही संभ्रम निर्माण झाला. सनीच्या घरातील परिस्थिती बेताची होती. पण वडिलांचे काम सुटल्यामुळे तिला काम करणे गरजेचे होते. म्हणून ती जर्मन बेकरीमधून काम करु लागली. पण तिथे काम करुन मिळणारा पैसा हा तिच्या आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करु शकेल अशा नव्हत्या. त्यामुळे तिने मॉडेलिंगही सुरु केले. त्याकाळी प्रसिद्ध असलेल्या penthouse या पुरुषांच्या इरॉटिक मॅगझीनमध्ये तिने एक अॅडल्ट फोटो काढला. या फोटोनंतर तिच्या करिअरला एक वेगळेच वळण मिळाले. Penthouseचा pet of the year 2003 चा मान तिला मिळाला. यासाठी तिला मिळालेल्या बक्षीसाची रक्कम सगळ्यांचेच प्रश्न सोडू शकेल अशी होती. यानंतर खऱ्या अर्थाने तिच्या पुढील प्रवासाला सुरुवात झाली. सनी ही पहिली साऊथ एशियन मॉडेल होती जी या मासिकाच्या कव्हरमधून झळकलेली होती.
अनेकदा वाईट गोष्टी किंवा वाईट काम करण्याचा निर्णय हा अपरिहार्य कारणांमुळे घेतला जातो. सनीकडे अपरिहार्य असे काही कारण नव्हते. तिला penthouse च्या यशानंतर एक आत्मविश्वास आला होता. घरात ती कमावती असल्यामुळे यापुढे तिने अॅ़डल्ट इंटरटेन्मेंट इंडस्ट्रीमध्ये काम करायचे ठरवून टाकले. तिच्या या निर्णयावर घरातील अनेकांचा आक्षेप असला तरी तिचा भाऊ संदीप सिंह वोरा (शेफ) याने तिला कायमच तिच्या कामासाठी पाठिंबा दिला. तिने vivid entertainment मधून तिच्या सेक्स टेपला सुरुवात केली. तिच्या sex टेप फारच प्रसिद्ध झाल्या.पण करणजीत कौर यानावाने काम करणे तिला शक्य नव्हते. म्हणून नाव बदलण्याचा निर्णय घेतला. तिने तिचे नाव ‘सनी’ असे ठेवले तर ‘लिओन’ हे नाव तिला penthouse मासिकाचा मालक याने दिले. याशिवाय ती किरण मल्होत्रा या नावाने देखील ओळखली जात होती. पण पुढे केवळ सनी नावाने ओळखली जाऊ लागली त्यामुळे तिचे खरे नावही अनेकांना तेच वाटत होते. अॅडल्ट फिल्मशिवाय तिने अनेक मासिकांसाठी अॅडल्ट फोटोशूट केले आहे.
सनी लिओनचा पॉर्न इंडस्ट्रीमधील स्ट्रगलही तितकाच महत्वाचा आहे. या इंडस्ट्रीतून तिला पैसा तर मिळत होता. पण यामध्ये तिला टिकवून ठेवणे गरजेचे होते. तिने या इंडस्ट्रीत पाऊल ठेवल्यानंतर तिला काही नियमांखालीच काम करायचे होते. त्यामुळे तिची या ठिकाणी अस्तित्वाची लढाई होती. लोकांना आपण आवडत आहोत हे माहीत असताना ते टिकवून ठेवण्यासाठी अन्य पॉर्नस्टार्सपेक्षा तिला काहीतरी वेगळे करणे गरजेचे होते.
सनी लिओनच्या कामासोबतच तिच्या लव अफेअर्सच्या चर्चा चांगल्याच गाजल्या. आधी तिने अनेक सोलो व्हिडिओ केले आहेत. पण पहिल्यांदाच पुरुषासोबत सेक्स व्हिडिओ तिने करायचे ठरवले. vivid entertainmet चा करार साईन करताना तिने तिचा फियाॅन्से मॅट इरिक्सनसोबत काम करणार असल्याचे सांगितले.त्याच्यासोबत तिने काही व्हिडिओ केले सुद्धा पण लग्नाच्या काहीच दिवस आधी त्याची फसवणूक लक्षात आली आणि तिने त्याला आपल्या आयुष्यातील बाहेर काढले. त्या आधी ती रसेल पिटरसोबत नात्यात होती. रसेल हा स्टँडअप कॉमेडिअन म्हणून प्रसिद्ध आहे. पण ही दोघं 2007मध्ये वेगळी झाली. त्यानंतर तिच्या आयुष्यात मॅट आला.त्यानंतर तिच्या आयुष्यात डॅनिअल वेबर आला. तिने 2011साली त्याच्याशी लग्न केले. डॅनिअल बेवर ही तीच व्यक्ती आहे. जिच्यासोबत सनी लिओनने जास्तीत जास्त व्हिडिओमध्ये काम केले आहे.
पॉर्न इंडस्ट्रीतील करिअर चांगलं सुरु असताना सनी लिओनला बॉलीवूडमध्ये काम करण्याची इच्छा होती. तिचा बॉलीवूडमधील प्रवासही खडतर होता. पण तिला चांगल्या संधी मिळाल्या. तिने 2011साली बिग बॉस सीझन 5 मध्ये आली. या स्पर्धेत तिने स्वत:ची ओळख मॉडेल म्हणून सांगितली. तिची प्रसिद्धी या काळात इतकी वाढली की, लोकांनी तिला गुगलवर सर्च केले पण त्यानंतर ती एक पॉर्नस्टार असल्याचे कळले. त्यानंतर तिला अनेक विरोधकांना सामोरे जावे लागले. पण त्यानंतर तिला चांगल्या चित्रपटांच्या ऑफर्ससुद्धा आल्या. महेश भट यांनी तिला 2011 मध्ये ‘जिस्म2’या चित्रपटाची ऑफर दिली. ती ऑफर तिने स्विकारली हा चित्रपट हिट चित्रपटांच्या यादीत नसला तरी या चित्रपटाने चांगला गल्ला जमवला. त्यानंतर तिला रागिनी MMS चा सिक्वल असलेल्या ‘रागिनी MMS2’ साठी निवडण्यात आले. या चित्रपटातही तिने चांगले काम केले. यानंतर ती ‘शूट आऊट अॅट वडाळा’ या चित्रपटात आयटम साँग केले. या शिवाय ‘एक पहेली लिला’, ‘सिंग इज ब्लिंग’, ‘मस्तीजादे’, ‘रईस’, ‘वन नाईट स्टँड’ अशा चित्रपटांमधूनही कामे केली. बॉलीवूडमध्ये पूर्णपणे शिरल्यानंतर तिने पॉर्न व्हिडिओजमधून 2013 साली निवृत्ती घेतली. तिने तब्बल 10 वर्ष या क्षेत्रात काम केले आहे.
तुम्हालाही रात्री बाहेर जायला वाटते भीती मग तुम्ही या ठिकाणी जाणे टाळाच
सनी लिओनला आता प्रत्येक जण ओळखतात. काहींना ती पॉर्नस्टार म्हणून माहीत आहे तर अनेकांना ती अभिनेत्री म्हणून तिच्या आयुष्यात असे काय घडले की, तिने करिअरचा हा मार्ग स्विकारला हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना आहे म्हणूनच इतर सेलिब्रिटींच्या तुलनेत तिचा गुगल सर्च अधिक आहे. शिवाय सनी लिओन आपली स्वत:ची एक वेबसाईट चालवते. ती पॉर्नस्टार, मॉडेल, अभिनेत्री आणि व्यवसायिका आहे. कारण तिचा LUST नावाचा परफ्युम फारच प्रसिद्ध आहे. या शिवाय तिच्या अनेक चांगल्या कामांमुळे लोकांसमोर असते.यामुळेच इतरांच्या तुलनेत सनी लिओन यामध्ये पुढे असावी.
सनी लिओनने girls next door( 2004) यातून करिअरला सुरुवात केली. जिस्म (2011), जॅकपॉट (2013), शुट आऊट अॅट वडाळा (2013),कुछ कुछ लोचा है (2015),एक पहेली लिला (2015), रागिनी mms 2 (2014),सिंग इज ब्लिंग (2015), वन नाईट स्टँड (2016),तेरा इंतजार (2017), बॉईज (2017), लैला मे लैला गाणं (रईस, 2017), करणजीत कौर द अनटोल्ड (2018-2019)
या शिवाय तिने अनेक टीव्ही शोज केले आहे. या मध्ये Mtv rodies, splitsvilla, बेईमान ईश्क या चित्रपटात तिने काम केली आहेत.
एकाएकी चर्चेत आलेल्या अभिनेत्री आता नेमक्या काय करत आहेत, वाचा
सनी लिओनने तिचा प्रवास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तिची एक वेबसिरिज नुकतीच तिने काढली होती. करणजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी असे या वेबसिरिजचे नाव होते. यामध्ये तिने तिची सगळी कहाणी या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला पडलेल्या सनी लिओनच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिने यातून दिलेली आहेत. याला देखील लोकांनी चांगला प्रतिसाद दिला.
सनी लिओन लहानपणापासूनच आपलं ते करणारी आहे. तिला अभिनयाव्यतिरिक्त खेळाची आवड आहे. ती उत्तम फुटबॉल प्लेअर आहे.तिने तिच्या तरुणपणात अनेक लहानमोठ्या टिममधून तिच्या खेळाचे प्रदर्शन केले आहे. याशिवाय तिला क्रिकेट पाहायला आवडते. ती चेन्नई स्वॅगर्स या टीमची मालक आहे.
वयाच्या 18 व्या वर्षी पॉर्नमधून काम करत असताना तिचे अनेक व्हिडिओ हे लेस्बियन होते. त्यानंतर तिला ती बायसेक्शुअल असल्याचे कळले. पण नंतर तिने तिची आवड कायमच पुरुषांमध्ये ठेवली. त्यामुळे सनी लिओन ही आधी बायसेक्शुअल होती.
आपल्याला ऑस्कर पुरस्कार माहीत आहेत. पण अॅडल्ड ऑस्कर पुरस्कारही आहेत. सनी लिओनला हा पुरस्कार मिळालेला आहे. या शिवाय तिने पॉर्न विश्वातील अनेक पुरस्कारही मिळवले आहे.
सनी लिओन इतके वर्ष अमेरिका आणि कॅनडाला राहून देखील तिला भारतीय पदार्थांची आवड आहे. तिला चाट खायला खूप आवडतात. दहीपुरी ही तिचा सगळ्यात आवडता पदार्थ आहे.
सनी लिओन जरी पार्टी क्रेझी वाटत असली तरी ती नाही. तिला पार्टीमध्ये जाण्यात कोणताच रस वाटत नाही.त्यापेक्षा तिला तिचा वेळ घरी घालायला आवडतो. तिला वाचनाची आवड असून तिने पुस्तकं सुद्धा लिहली आहे.
एकूणच हा होता सनी लिओन म्हणजेच करणजीत कौरचा प्रवास.. तिचे आयुष्य नक्कीच वाटले होते तितके सोपे नाही. तिने काही चुका आयुष्यात केल्या. पण त्या चुकांना कुरवाळण्यात तिला काही रस नाही. उलट पुढे जाण्यात तिला अधिक रस आहे. म्हणूनच आजही ती वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवत आगेकूच करत आहे. तुम्हालाही सनी लिओनची ही वेबसिरिज पाहायाची असेल तर