ADVERTISEMENT
home / आरोग्य
प्रेगनन्सीत  विमान प्रवास करताना या गोष्टी जरूर लक्षात ठेवा

प्रेगनन्सीत विमान प्रवास करताना या गोष्टी जरूर लक्षात ठेवा

गरोदरपणात महिलांनी स्वतःची आणि बाळाच्या आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. बांळतपण म्हणजे एखाद्या स्त्रीचा दुसरा जन्मच असतो असं म्हणतात. कारण या काळात तिच्या शरीरात विविध प्रकारचे बदल होत असतात. या काळात महिलांना प्रवास करण्याचासुद्धा त्रास होऊ शकतो. यासाठीच तिसऱ्या तिमाहीनंतर गरोदर महिलांना प्रवास टाळण्याचा सल्ला दिला जातो. या मागचं महत्त्वाचं कारण असं की तिसऱ्या तिमाहीत महिलांची कधीही प्रसूती होऊ शकते. त्यामुळे त्यांनी या काळात सुरक्षित ठिकाणी असणं फार गरजेचं आहे. मात्र पहिल्या दोन तिमाहीमध्ये प्रवास करण्यास काहीच हरकत नसते. शिवाय आजकाल महिला मोठमोठ्या पदांवर कार्यरत असतात. ज्यामुळे त्यांना बिझनेस, मिटींग, सेमिनार, वर्कशॉप यासाठी प्रवास हा करावाच लागतो. बऱ्याचदा कुटुंबासोबत फिरायला जाण्यासाठीदेखील थोडासा प्रवास करण्यास काहीच हरकत नसते. प्रवासासाठी सर्वात जलद आणि सोपे वाहतुकीचे साधन म्हणजे विमान प्रवास. त्यामुळे बऱ्याचदा आपण विमानाने प्रवास करण्याचाच मार्ग स्वीकारतो. जर तुम्ही देखील गरोदरपणात विमानाने प्रवास करणार असाल तर या काही सोप्या टिप्स जरूर फॉलो करा.

गरोदरपणात विमानाने प्रवास करण्यासाठी काही सोप्या टिप्स

Shutterstock

  • एकट्याने प्रवास करू नका. जर प्रेग्नसीच्या काळात तुम्ही विमान अथवा इतर कोणत्याही साधनाने प्रवास करावा लागला तर तो एकटीने न करता कोणाच्या तरी सोबतीने करा. ज्यामुळे एखादी अडचण आल्यास तुम्हाला त्या व्यक्तीची मदत घेता येईल.
  • डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. कारण त्यांना तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या आरोग्याविषयी व्यवस्थित माहिती असते. जर पुढे काही समस्या येणार असतील तर ते तुम्हाला आधीच याबाबत सावध करू शकतात. त्यामुळे गरोदरपणात विमानाने प्रवास करण्याआधी तुमच्या डॉक्टरांची परवानगी जरूर घ्या. शिवाय त्यांनी परवागनी देताना प्रवासादरम्यान सांगितलेल्या सावधगिरीच्या सूचना जरूर फॉलो करा.
  • विमान प्रवाासादरम्यान लावावा लागणारा सीट बेल्ट पोटाच्या खालील भागावर लावा.
  • प्रवासात काही समस्या आल्यास डॉक्टरसोबत चर्चा करण्यासाठी त्यांचा संपर्कासाठी असलेला फोन नंबर जवळ ठेवा. ज्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.  
  • प्रवासासाठी फार लांबच्या प्रवासाची फ्लाईट बूक करू नका. कारण फार काळ एका ठिकाणी बसून राहणं तुमच्यासाठी या काळात मुळीच योग्य नाही. कमी वेळात करावा लागणारा प्रवास करण्यास मात्र काहीच हरकत नाही.
  • प्रवास सुरू करण्याआधी तुमचा आहार, औषधे याची नीट काळजी घ्या. यासाठी प्रवासाला जाण्याआधीच सर्व गोष्टींचं व्यवस्थित नियोजन करा. ज्यामुळे प्रवासादरम्यान तुमची तारांबळ उडणार नाही. 
  • विमान प्रवासादरम्यान स्वतःला हायड्रेट ठेवा कारण या काळात द्रवपदार्थ कमी घेतल्यामुळे तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो.
  • प्रवासादरम्यान सुटसुटीत  आणि आरामदायक कपडे घाला. कारण जर तुम्ही या काळात फॅशनेबल आणि तंग कपडे घातले तर तुम्हाला त्रास होण्याची शक्यता अधिक आहे. 
  • स्वतःच्या मर्जीने कोणतेही औषध घेऊ नका. कारण विमानात असताना जर तुम्हाला काही त्रास झाला तर लवकर योग्य ती वैद्यकीय मदत मिळणं कठीण जाऊ शकतं.
  • जर प्रवासादरम्यान तुम्हाला काही त्रास जाणवत असेल तर फ्लाईट अटेंडंट अथवा इतर सहप्रवाश्यांची मदत घेण्याचा संकोच करू नका. 
  • प्रवासादरम्यान अती सामान घेऊ नका. ज्या गोष्टी तुम्हाला प्रवासात उपयोगी पडणार आहेत अशाच गोष्टी स्वतःसोबत कॅरी करा. ज्यामुळे तुमचा प्रवास सुखकर होईल.
  • लगेजबॅगमध्ये महत्वाच्या गोष्टी ठेवू नका. तुम्हाला लागणारी औषधं अथवा इतर महत्त्वाच्या गोष्टी केबिनबॅग ठेवा. ज्यामुळे त्या वेळ पडल्यास त्या तुम्हाला सहज मिळू शकतील.
  • बराच वेळ प्रवास केल्यामुळे जर तुमच्या हातापायांना सूज आली असेल तर अशा परिस्थिती आधी थोडावेळ बसून हात-पाय स्ट्रेच करा आणि मगच चालण्यास सुरूवात करा.
  • प्रवासादरम्यान तुमची मानसिक स्थिती शांत आणि  निवांत राहील याची काळजी घ्या. कारण चिडचिड झाल्यामुळे तुमच्या रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो. 

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

प्रेगन्सीनंतर पुन्हा सुडौल दिसण्यासाठी करा ‘हे’ उपाय

प्रेगन्सीमध्ये कशी घ्याल तुमची आणि तुमच्या बाळाची काळजी

नोकरी करणाऱ्या महिलांनी गरोदरपणी अशी घ्यावी स्वतःची काळजी

गरोदरपणानंतर काय घ्यावी काळजी, जाणून घ्या

ADVERTISEMENT

जर तुम्हाला ही लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही प्रेग्नंट असू शकता

फोटोसौजन्य

 

31 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT