ADVERTISEMENT
home / Family
ब्रेकअपमधून बाहेर पडण्यासाठी तुमच्या किशोरवयीन मुलांना अशी करा मदत

ब्रेकअपमधून बाहेर पडण्यासाठी तुमच्या किशोरवयीन मुलांना अशी करा मदत

मुलांशी अचूक संवाद साधणं हे आईवडीलांसाठी नेहमीच आव्हानात्मक असतं. मात्र जेव्हा तुमची मुलं टीन एजमध्ये प्रवेश करतात तेव्हा मात्र त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. किशोरवयीन मुलांना आपल्या धाकात ठेवणं थोडं कठीणच असतं. त्यांच्या समस्या आणि प्रश्न नेहमीच वेगळ्या असतात. यासाठी अशा मुलांसोबत आईवडीलांचं नातं हे पालकांपेक्षा मैत्रीचं जास्त असावं. ज्यामुळे मुलं त्यांच्या मनातील समस्या मोकळेपणाने तुम्हाला सांगू शकतात.  

किशोरवयीन मुलांमध्ये शारीरिक आणि मानिसिक बदल होत असतात. ज्यामुळे त्यांचं या वयात प्रेमात पडणं अथवा दुसऱ्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटू लागणं स्वाभाविक आहे. मात्र हे वय परिपक्व नसल्यामुळे या वयातील प्रेमप्रकरणं फार काळ टिकू शकत नाहीत. किशोरवयात मुलं जितक्या लवकर प्रेमात पडतात तितक्याच लवकर त्यांचं ब्रेकअपदेखील होतं. अशा नाजूक आणि कोमल वयात अभ्यास आणि करिअरचा विचार करण्याऐवजी मुलं ब्रेकअपच्या चिंतेने ग्रस्त होतात. पालक या नात्याने तुम्हाला मुलांचं चुकीचं वागणं आणि त्याचे त्यांच्या भविष्यावर होणारे दुष्परिणाम ठाऊक असतात. यासाठी जर तुमच्या मुलांच्या बाबत असं काही घडलं असेल तर त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी पुढाकार घ्या. कारण अशा परिस्थितीत पालकांच्या चुकीच्या वागण्याचा मुलांवर भविष्यावर नक्कीच परिणाम होऊ शकतो.

टीन एज मुलांना ब्रेकअपच्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी कशी मदत कराल –

1. संवाद साधताना सावध रहा –

जेव्हा तुमच्या किशोरवयीन मुलाचं अथवा मुलीचं ब्रेकअप झालं आहे हे तुम्हाला समजतं तेव्हा त्यांच्यासोबत अगदी सावधपणे संवाद साधा. कारण तुम्ही त्यांना कसे समजावता यावर त्यांचे भविष्य अवलंबून असतं. जर तुम्ही मुलांना प्रेमात पडण्याबाबत अथवा नको त्या वयात नको ते करण्याबाबत दोष देऊ लागला तर तुमची मुलं तुमचं काहीच ऐकणार नाहीत. या वयात मुलांच्या मनात अशा प्रकारच्या भावना निर्माण होणं ही एक स्वाभाविक आणि नैसर्गिक गोष्ट आहे हे समजून घ्या. त्यामुळे आधी तुमच्या मुलांच्या भावना समजून घ्या आणि त्यानुसार त्यांना यातून बाहेर पडण्यासाठी मदत करा.

ADVERTISEMENT

shutterstock

2. तुम्ही तुमच्या मुलांसाठी सदैव आहात हे त्यांना पटवून द्या –

जेव्हा तुमच्या मुलांना अशा परिस्थितीला सामोरं जावं लागतं तेव्हा त्यांना तुमच्या आधाराची फार गरज असते. प्रेमात नकार अथवा अपयश आल्यामुळे तुमच्या किशोरवयीन मुलांचं मन कोमेजून जातं. मुळातच त्यांना या वयात नेमकं काय करावं हे समजत नसतं. त्यात ब्रेकअप विषयी इतरांकडून बरंच काही ऐकल्यामुळे ती फारच गांगरून जातात. तुमच्या मुलांच्या पाठी तुम्ही सदैव आहात ही भावना त्यांना या दुःखातून बाहेर पडण्यास मदत करू शकते. शिवाय जर तुम्ही त्यांना मदत केली नाही तर ती आणखी एखाद्या व्यक्तीचा आधार शोधू शकतात. अशा वेळी प्रत्येकाला कोणाच्यातरी मदतीची गरज असते. दुसरी व्यक्ती अथवा मित्रांच्या चुकीच्या संगतीमुळे तुमच्या मुलांचं अधिक नुकसान होऊ शकतं. यासाठी कोणत्याही परिस्थितीत तुम्ही त्यांच्या पाठीशी आहात हे त्यांना पटवून द्या. 

3. त्यांचे मनापासून ऐकून घ्या

ब्रेक अप झाल्यामुळे मुलांना आपण जगात ऐकटे पडलो आहोत असं वाटू लागतं. अशा वेळी मुलांना फक्त त्यांचं कुणीतरी मनापासून ऐकावं असं वाटत असतं. मन शांत झालं की ते नक्कीच सारासार विचार करू शकतात. त्यांच्या मनातील या कटू भावनांना वाट करून देण्यासाठी त्यांना तुमच्या मदत आणि आधाराची गरज असते. यासाठी अशा वेळी त्यांचं म्हणणं काहिही न बोलता फक्त ऐकून घ्या.

4. वाईट गोष्टी सोडून देण्याची कला शिकवा

बऱ्याचदा अशा परिस्थितीत पालक मुलांना चुकीचं मार्गदर्शन करण्याची शक्यता असते.  अशा परिस्थितीत तुमच्या मुलांवर रागावू नका, अथवा आपल्या मुलांवरील प्रेमापोटी इतरांच्या मुलांना दोष देऊ नका. त्यापेक्षा मुलांना झालेल्या प्रकारातून चांगले घेण्यास शिकवा. जे काही चुकीचे आणि वाईट घडले ते सोडून द्यायला त्यांना शिकवा. भविष्यात सुखी होण्यासाठी वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करून चांगल्या गोष्टींवर कसं लक्ष केंद्रित करायचं हे त्यांना पटवून द्या.

ADVERTISEMENT

5. घरात आनंदी वातावरण राहील याची काळजी घ्या

घरात नेहमीच आनंदी आणि खेळीमेळीचं वातावरण असणं फार गरजेचं आहे. मात्र अशा परिस्थितीत जर तुम्ही जाणिवपूर्वक घरातील वातावरण प्रसन्न असेल याची काळजी घेतली तर तुमच्या मुलांना त्यांच्या दुःखातून बाहेर पडण्यास नक्कीच मदत होईल.

अधिक वाचा

ब्रेकअप झाल्यानंतर हमखास रडवतात ही ११ ब्रेकअप गाणी

रिलेशनशीपमध्ये तुमच्यासोबतही होत असेल असे, तर आताच करा ब्रेकअप

ADVERTISEMENT

पालक आणि मुलांमधील हरवत चाललेल्या नात्याला हवी ‘सुसंवादाची गरज’

फोटोसौजन्य –  इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक

24 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT