मॉलमध्ये कितीही वेळा फेऱ्या मारल्या तरी आपल्याला कमीच असतात नाही का?. त्यातल्या त्यात जर तुम्हाला कपड्यांची खरेदी करायची असेल तर मग काही सांगायलाच नको. कारण कपडे घेताना कोणते घेऊ पाहून कोणता रंग निवडू यापर्यंतचे अनेक प्रश्न अनेकांना पडतात. तुम्हालाही असे काही प्पश्न पडत असतील तर आज आम्ही तुम्हाला थोडीशी मदत करणार आहोत. तुम्ही शॉपिंग करताना या टीप्सचा वापर करु शकता.
अनेकांना आपल्या रंगाचा न्युगंड असतो. इतरांच्या तुलनेत आपण सावळेच आहोत किंवा आपल्याला हे चांगले दिसणार नाही किंवा जर तुम्हाला कोणी तुमच्या रंगावरुन काहीही बोलले असेल तर तुम्ही काही रंगाचे कपडे घेण्याचा विचार करत नाही. पण जर तुम्ही असा विचार केला तर तुम्हाला तुमच्या आवडीचा रंग कधीही वापरता येणार नाही. त्यामुळे तुमच्या त्वचेचा रंग कोणताही असो तुम्हाला जो रंग आवडतो तुम्ही नक्कीच निवडा.
उदा. पांढरा. बॉटल ग्रीन, निळा, काळा, पिवळा, ग्रे,लाल हे रंग सगळ्यांवरच चांगले दिसतात. यातील वेगवेगळे शेड्स तुम्ही नक्कीच ट्राय करुन पाहायला हवे.
एखादा रंग निवडताना तुम्ही त्यावर लगेचच कोणतीही कमेंट देऊ नका. एखादा रंग गडद किंवा फिकट असे लगेच ठरवून मोकळे होऊ नका. तुम्ही जो पर्यंत रंग घालून पाहणार नाही. तोपर्यंत तुम्हाला तो रंग चांगला आहे की नाही ते तुम्हाला कळेल. जो रंग तुम्हाल बघून चांगला वाटत नसेल पण तो कदाचित तुम्हाला तुम्ही घातल्यानंतर चांगला दिसू शकतो. त्यामुळे तुम्ही सगळ्यात आधी कपडे ट्राय करा.
कॉटन, होजिअरी, सिथेंटीक, वुलन, सिल्क, नेटेड अशा कित्येक प्रकारच्या मटेरिअलमध्ये कपडे असतात. त्या प्रत्येक रंगामध्ये मटेरिअल वेगळे दिसू शकते. त्यामुळे तुम्ही कोणत्या मटेरिअलमधील कपडे पाहत आहात ते देखील महत्वाचे आहे.
उदा. सिल्कमधील काही कपडे हे चमकदार असतात. अशा चमकदार कपड्यांवर जर तुम्ही बॉटम चमकदार घातले तर ते नक्कीच चांगले दिसणार नाही. त्यामुळे तुम्ही कोणत्या मटेरिअलमध्ये कपडे घेत आहात ते देखील महत्वाचे आहे. त्यामुळे मटेरिअल ही गोष्ट देखील तितकीच महत्वाची आहे.
रंग निवडताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे तुम्ही काय घेताय. तुम्ही कोणत्या पॅटर्नचे कपडे घेताय यावर रंग निवडणे आवश्यक असते.
उदा. जर तुम्ही टॉप किंवा टिशर्टची खरेदी करायला आला असाल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे तुम्ही जर गडद रंगाचा टॉप निवडत असाल तर तुम्ही बॉटम निवडताना नेहमी फिकट रंगाची निवडा. हे झालं टीशर्ट, जीन्स किंवा फॉर्मल कपड्यांच्याबाबतीत पण जर तुम्ही ट्रेडिशनल कपडे घालत असाल तर त्याबाबतीतही तोच नियम लागू पडतो. तुम्ही असे केले तर तुम्ही कोणताही आऊटफिट निवडा तुम्हाला चांगलाच दिसेल.
मुळात अनेकांचा गोंधळ यासाठी होतो की त्यांना एखादा रंग आवडतो. तो ते घालतात. पण जर तुम्ही तुमचा टॉप किंवा पँट चुकीच्या पद्धतीने घातला की, मग लोक तुम्हाला हा रंग चांगला दिसत नसल्याची कमेटं देतात.जर तुम्ही योग्य रंगसंगती केली तर तुम्हाला कोणताही रंग चांगला दिसू शकतो