ADVERTISEMENT
home / फॅशन
#Pregnancy मध्येही राहा फॅशनेबल

#Pregnancy मध्येही राहा फॅशनेबल

तुम्ही लवकरच आई होणार आहात. पण याचा अर्थ असा नाही की, तुम्ही फॅशनेबल दिसणं किंवा फॅशन फॉलो करणं बंद करावं. करिना कपूर ते नेहा धुपियासारख्या अनेक अभिनेत्रींनी आपले फोटो शेअर करत गर्भावस्थेतही कसं फॅशनेबल राहता येईल हे दाखवून दिलं आहे. 

पूर्वीचा काळ

तुमच्या आई-आजी यांना चांगलंच लक्षात असेल की, त्या गरोदर असताना त्यांना वाढत्या वजनामुळे त्यांचे जुने कपडे कसे होत नसतं. खरंतर पूर्वी गर्भावस्थेच्या काळात जास्तीत जास्त पौष्टीक खाणं, कमीत कमी घरकाम आणि कमी प्रमाणात हालचाल होत असे. त्याकाळी जी महिला आई होणार असेल, तिचे कपडे आरामदायक असावेत असं कोणालाच वाटत नसे. तर स्टाईलिश किंवा फॅशनचा प्रश्नच येत नाही. पण आता काळ बदललाय.

आता काळ बदललाय…

आताच्या काळात प्रेग्नंसीदरम्यान महिला अगदी नवव्या महिन्यांपर्यंत ऑफिसला जातात आणि घरची कामंही स्वतःच करतात. घरातला किंवा बाहेरचा कोणताही समारंभ असला तरी महिला आवर्जून जातात. त्यामुळे आता गर्भवती महिलांसाठी गर्भावस्थेतही आकर्षक आणि स्टाईलिश दिसणं आवश्यक आहे. ही चांगली गोष्ट आहे की, बाजारात आणि ऑनलाईनही गर्भवती महिलांची ही गरज लक्षात घेऊन अनेक आरामदायक, आकर्षक आणि ट्रेंडी कपडे बाजारात उपलब्ध आहेत. पण याचा अर्थ असा नाही की, बाजारात फॅशनच्या नावाखाली मिळणारे कोणतेही कपडे तुम्ही घालावेत. 

ADVERTISEMENT

फॅशन करताना…

प्रेग्नंसीदरम्यान वाढतं वजन आणि हार्मोन्समधील चढउतार यामुळे महिलांना अनेकदा अवघड किंवा अनकंफर्टेबल वाटतं. त्यामुळे या काळात कपडे खरेदी करताना कपड्यांचं फॅब्रिक, कट्स, स्टाईल आणि रंग यासारख्या गोष्टींवर नक्की लक्ष द्या. जाणून घेऊया गर्भावस्थेत कपडे निवडताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी.

हवामानानुसार निवडा फॅब्रिक

गर्भावस्थेदरम्यान कपड्यांच्या फॅब्रिकबाबत विशेष काळजी घ्यावी. मग हवामान गरम असो वा थंड असो. असं फॅब्रिक निवडा जे आरामदायक असेल आणि तुम्हाला आरामात वावरता येईल.

उदा. उन्हाळ्याच्या दिवसात कॉटन किंवा लिननपासून बनवलेले प्रेग्नंसी ड्रेसेस चांगले ठरतील. तर थंडीच्या दिवसात उबदार आणि ब्लँडेड फॅब्रिक्सना पसंती द्यावी. 

ADVERTISEMENT

अजून एक लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे जे फॅब्रिक तुम्ही घालणार आहात ते थोडं स्ट्रेचेबल असाव. 

उदा. जर्सी, लायक्रा आणि स्पँडेक्सपासून बनवलेले कपडे हे आरामदायक असतात. तसंच ते तुमच्या शरीराच्या आकारमानाप्रमाणे बसतात.

इलॅस्टीक वेस्ट बँड

गर्भावस्थेदरम्यान साडी, सलवार किंवा जीन्स घालणं खूपच त्रासदायक ठरतं. त्यामुळे तुम्ही खास गर्भवती महिलांसाठी उपलब्ध असलेले लोअर्स घालू शकता किंवा सर्वात आरामदायी असं लेगिंग्ज्स वापरू शकता. ज्यामुळे तुमच्या पोटावरही दबाव येणार नाही.

लेयरिंग करा

ADVERTISEMENT

प्रेग्नंसीमध्ये तुम्हाला अजून एक उपयोगी पडणारी फॅशन म्हणजे लेयरिंग. उदा. वनपीस घालून त्यावर श्रग, केप किंवा एखादं स्मार्ट फिट जॅकेट घाला. ज्यामुळे तुम्ही नक्कीच दिसाल फॅशनेबल

कंफर्टेबल ईनरवेअर आवश्यक

गर्भावस्थेदरम्यान आपल्या शरीराचा आकार पूर्णतः बदलतो आणि वाढतो. त्यामुळे योग्य प्रकारच्या ईनरवेअरचा वापरही आहे आवश्यक. बाजारात खासकरून गर्भवती महिलांसाठी बनवण्यात आलेले मॅटर्निटी वेअरही उपलब्ध आहे. जे खूपच आरामदायक असतात. यामुळे तुमच्या त्वचेवर वळही पडणार नाहीत. तसंच शरीराला सपोर्ट मिळून कंबरही दुखत नाही.

रंगांची निवड

रंगीबेरंगी कपडे घालण्याऐवजी तुम्ही एकच रंग निवडलेला कधीही चांगला ठरेल. या काळात तुम्ही इलेक्ट्रीक ब्लू, ग्रीन, पर्पल, लाल रंगाचे कपडे घातल्यास ते नक्कीच सुंदर दिसतील.

ADVERTISEMENT

लक्षात ठेवा, आकर्षक दिसण्याच्या नादात कोणतेही कपडे किंवा फॅशन कॅरी करू नका.

हेही वाचा –

पाहा अभिनेत्री समीरा रेड्डीच्या बेबी शॉवरचे सुंदर फोटोज

नेहा धुपियाच्या या १० फॅशन टिप्समुळे गरोदरपणातही दिसू शकता स्टायलिश

ADVERTISEMENT

धमालमस्ती करत ईशा देओलचं दुसरं ‘बेबी शॉवर’

01 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT