वजन कमी करण्यासाठी खा chia seeds च्या चविष्ट रेसिपी

वजन कमी करण्यासाठी खा chia seeds च्या चविष्ट रेसिपी

वजन कमी करण्यासाठी कितीतरी वेगळे प्रयत्न केले जातात. अनेक जण डाएटसुद्धा करतात. आत तुमच्या डाएटमध्ये तुम्ही आणखी एका गोष्टीचा समावेश केला तर तुम्हाला तुमचे वजन अगदी नैसर्गिक पद्धतीने कमी करता येईल. ही नवी गोष्ट आहे chia seeds. याच्या नित्यसेवनामुळे तुम्ही तुमचे वाढलेले वजन अगदी आरामात कमी करु शकता. आता chia seeds खाण्याआधी ते नेमकं काय आहे ते पण जाणून घेऊया.

Chia seeds म्हणजे नेमकं काय?

shutterstock

आता अनेकांना chia seeds आणि सब्जा हा एकच वाटतो. पण chia seeds आणि सब्जा हे दोन्ही वेगळे आहेत. दोघांच्याही रंगामध्ये तुम्हाला फरक जाणवेलच.  सब्जा हा अगदी बारीक बारीक असतो. chia seedsचा आकार थोडासा अंडाकृती असून तो सब्जाच्या तुलनेमध्ये थोडा मोठा असतो. सब्जा पाण्यात टाकल्यानंतर अगदी काहीच वेळात छान फुगतो. पण chia seeds पाणी शोषण्यासाठी थोडा वेळ घेते. सब्जामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते. तर chia seedsमध्ये फायबर त्यामुळे या दोघांचेही गुणधर्म फार वेगळे आहेत. 

*आता पाहुया chia seeds तुम्ही नेमके कशाप्रकारे खावू शकता. म्हणजेच chia seedsच्या चविष्ट रेसिपी

डिटॉक्स वॉटर (Detox Water)

shutterstock

वजन कमी करणाऱ्यांना Detox water काही नवीन नाही.आता chia seeds चा वापर करुन हे पाणी कसे बनवायचे ते पाहुया. 

साहित्य: 1 कप पाणी, 1मोठा चमचा chia seeds, लिंबाचा रस, मध, (आवडत असल्यास स्ट्रॉबेरी किंवा किवी)

कृती: एका काचेच्या भांड्यात एक कप पाणी घेऊन त्यात 1 मोठा चमचा chia seeds घाला. त्यात थोडे मध आणि चिरलेली फळ घालून मिश्रण रात्रभर ठेऊन द्या. सकाळी हे पाणी तुम्ही प्या. तुमचे detox water तयार

वजन कमी करण्याआधी लक्षात ठेवा या महत्वाच्या गोष्टी

हेल्दी रताळी (sweet potatoes and chia seeds)

shutterstock

साहित्य: रताळी, chia seeds, तुमच्या आवडीचे बटर (पीनट बटर आवडत असल्यास उत्तम. मीठ

कृती: रताळी भाजून किंवा उकडून घ्या. गरमा गरम रताळी बाहेर काढून त्याला मध्ये एक काप त्या. त्यावर मीठ, बटर आणि  chia seeds घालून तुम्ही ते रताळे खाऊ शकता. तुमच्या ब्रेकफास्टमध्ये तुम्ही ही रेसिपी खाऊ शकता.

तुम्ही बटाटाही अशा पद्धतीने खाऊ शकता.

या कारणामुळे महिलांनी आवर्जून खायला हवे चॉकलेट

chia seeds ड्रायफ्रुट एनर्जी बार

shutterstock

साहित्य:  मिक्स ड्रायफ्रुट, गूळ, chia seeds

कृती: ड्रायफ्रुट भाजून घ्या. chia seeds वेगळे भाजून घ्या. गुळाचा एकतारी पाक तयार करुन त्यात ड्रायफ्रुट आणि chia seeds घालून त्याचे बार किंवा गोळे करुन लाडू  बनवून घ्या. तुम्हाला काहीही बाहरचे खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही chia seeds ड्रायफ्रुट एनर्जी बार खाऊ शकता. 

या पावसाळ्यात करा कडधान्यांच्या हेल्दी रेसिपी

chia seeds पुडींग

shutterstock

chia seeds चा वापर फक्त टॉपिंग किंवा सजवण्यासाठी केला जात नाही तर त्यापासून काही गोडाचे पदार्थही केले जातात यापैकीच एक आहे पुडींग हा प्रकार. वजन कमी करणे म्हणजे गोड बंदच करणे असे होत नाही. तर तुम्ही chia seeds घालून केलेले पुडींग चविष्ट आणि हेल्दी असते. 

साहित्य: chia seeds, दुध, आवडतं फळ, मॅपल सिरप किंवा मध 

कृती: आदल्या रात्री दुधात chia seeds भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी तुमच्या आवडीच्या फळाचा क्रश तयार करुन तुम्ही ज्या भांड्यात पुडींग सेट करणार त्यात तो क्रश घाला.भिजवलेले chia seeds आणि बर फळांचे तुकडे घालून पुडींग थंड करा.आणि मस्त पुडींगचा आस्वाद घ्या. 

बद्दल देखील वाचा

chia seedsचे फायदे

shutterstock

chia seedsच्या नित्यसेवनामुळे तुम्हाला फायदेच मिळतात. वजन कमी करणाऱ्यांसाठी आहारात फायबर असणे किती महत्वाचे असते ते सांगायला नको. chia seedsमध्ये फायबर असते जे तुमचे वजन कमी करण्यासाठी मदत करते. या शिवाय तुमची पचनशक्ती सुधारुन तुमचे पोटाचे आरोग्यही सुधारते.

You Might Like These:

Health Benefits Of Pistachios & Recipe In Marathi

जिऱ्याचे हे फायदे जाणून तुम्ही व्हाल आश्चर्यचकीत