जेव्हा लग्नाच्या पहिल्या रात्री….

जेव्हा लग्नाच्या पहिल्या रात्री….

लग्न आणि लग्नानंतर येणारी पहिली रात्र हे खूपच खास क्षण असतात. जेव्हा नवरा-बायको एकमेकांच्या सहवासात पहिल्यांदाच पुर्ण रात्र घालवणार असतात. लव्ह मॅरेज असेल तर नवविवाहीत कपल एकमेकांना आधीपासूनच ओळखत असतं. पण तरीही लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीचं आणि नातं ऑफिशियल झाल्याचं फिलींग काही औरच असतं. तर अरेंज मॅरेज असणाऱ्यांसाठी ही नव्या अनुभवांची, थोडा संकोच आणि प्रेम अशी मिक्स फिलींगची रात्र असते. लग्न ठरल्यावर एकमेकांशी बोलणं आणि फिरणं झालेलं असलं तरी असं पहिल्यांदाच एकत्र राहणं वेगळंच नाही का? 

Instagram

लग्नानंतरची ती पहिली रात्र अनेक कल्पनांचे पंख लावून प्रत्येकाच्या आयुष्यात येते. असाच एक सोशल साईट क्वोरावरील अनामिक पहिल्या रात्रीचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहोत. जो तुम्हाला नक्कीच इंटरेस्टींग वाटेल. जो सांगितला आहे त्याने.

आमचं लग्न होऊन एकच दिवस झाला होता. लग्नानंतर नशिबाने दुसऱ्याच दिवशी सत्यनारायणाची पूजा होती. त्यामुळे पहिल्या रात्रीची उत्सुकता जास्त ताणणार नव्हती. संध्याकाळपासूनच आमच्या घरी बायकांची कुजबूज सुरू होती. ती आणि तिच्यासोबत आलेली पाठराखीण त्या कुजबूजीने जरा शरमल्याच होत्या. मलाही एकीकडे एक्सायटमेंट होती तरी एकीकडे हा काय गोंधळ सुरू होता तेच कळतं नव्हतं. नंतर कळलं की, लग्नाच्या पहिल्या रात्री नवविवाहीत वधूची ओटी भरली जाते. खरोखरच मसाल्याचं दूध खोलीत ठेवलं जातं. वगैरे वगैर. हे सगळं पाहून तर मी मनातल्या मनात अजूनच उत्साहीत झालो होतो. 

रात्रीसाठी पूर्वतयारी….

ती माझी आणि तिची लग्नानंतरची पहिलीच रात्र होती. या आधी मी कोणाबरोबरही सेक्स केला नव्हता. त्यामुळे माझ्या लग्नाच्या पहिल्या रात्री मी खूपच एक्सायटेड होतो आणि मनात थोडा संकोचही होता. त्यामुळे या रात्रीबद्दलची सगळी तयारी मी आधीपासूनच सुरू केली होती. मी लग्न होण्याच्या दोन दिवस आधीच विचार केला होता की, सेफ सेक्ससाठी मी आधी कंडोम घेऊन ठेवलं पाहिजे. त्यामुळे मी लग्नाच्या सगळ्या धामधुमीतून वेळ काढून केमिस्टकडे गेलो होतो. तिकडे नेमकं माझ्या दुर्दैवाने एक वयस्कर व्यक्ती बसला होता. त्यामुळे मला त्याच्याकडे कंडोम मागायला कसंतरीच वाटतं होतं. त्यामुळे मी त्याला घाईघाईत सांगितलं की, काका मला एक (प्रसिद्ध कंपनीचं) कंडोमचं पाकिट द्या, असं सांगितलं. त्यांनी मला एका पेपर बॅगमध्ये ते पाकिट घालून दिलं. मी हे ते लगेच मी नेलेल्या पिशवीत ठेवलं आणि घरी गेलो. घरी येऊन लगेच मी ते कपाटातल्या एका जागी सुरक्षितपणे लपवून ठेवलं. 

आणि अखेर तो क्षण आला….

घरातल्या सगळ्या बायकांनी माझ्या बायकोची ओटी भरली. आश्चर्य म्हणजे आमचं बेडरूमही छान सजवण्यात आलं होतं. मला चिंता होती ती कपाटाला कोणी हात लावू नये. नाहीतर उगाच गाजावाजा व्हायचा. मग सगळ्यांनी अगदी टीपीकल हिंदी चित्रपटाप्रमाणे मला खोलीत ढकललं. मस्तपैकी सजवलेली बेडरूम, मसाला दूधाचा ग्लास आणि बेडवर बसलेली बायको सगळ एकदम स्वप्नवतच वाटत होतं. 

Shutterstock

माझी सुंदर बायको बेडवर माझी वाट पाहात होती. सुरूवात कशी करावी तेच कळत नव्हतं. मुद्दामून मीच काहीतरी बोलायला सुरूवात केली. लग्नातील काही गमतीजमतींबाबत आम्ही बोललो. काही वेळानंतर आमच्यातील संकोच थोडा कमी झाला. मला आणि तिला एकाच वेळेला क्लीक झालं आणि एकमेकांच्या जवळ आलो. त्यावेळी मला ती फारच उत्साहीत दिसत होती. अखेर आम्ही त्या क्षणासाठी तयार झालो. अचानक तिने मला कंडोम लावण्याची आठवण केली. मीही लगेच तत्परता दाखवत कपाटातून ती पेपर बॅग काढली. पण ते पाकिट बघताच माझ्या सगळ्या उत्साहावर पाणीच फिरलं. 

Giphy

मला आश्चर्याचा धक्काच बसला जेव्हा त्यात कंडोम पाकिट नाही तर त्या प्रसिद्ध कंडोम कंपनीचं सेक्स एनहान्समेंट टॅबलेटचं पाकिट होतं. आम्हाला दोघांनाही धक्का बसला. आता काय करणार. दुसरा कोणताही उपाय नसल्याने मी ती टॅबलेट खाल्ली आणि तिला विना कंडोम सेक्स करण्याचा पर्याय सुचवला. मी तिला “Coitus-interrupts” म्हणजेच पुलआऊट मेथड वापरण्याबाबत सांगितलं. जो एक सुरक्षित उपाय मानला जातो. पण ती काही केल्या तयार होईना. तिने कोणत्याही परिस्थितीत विना कंडोम सेक्स करण्यास नकार दिला. कारण त्यावेळी तिचा महिन्यातील मोस्ट फर्टाईल पीरियड सुरू होता. पण माझी मात्र पुरती पंचाईत झाली होती. मग काय टॅबलेटने तिचा परिणाम दाखवायला सुरूवात केली आणि मला संधी असूनही काहीच न करता तसंच झोपावं लागलं. असा होता माझ्या पहिल्या रात्रीचा अविस्मरणीय अनुभव.