तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा 'आई' आहात

तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा 'आई' आहात

आई होणं ही प्रत्येक स्त्री च्या आयुष्यातील एक सुखद घटना असते. मात्र बाळाला जन्म देणं  आणि मुलांचं संगोपन करणं ही एक फार मोठी जबाबदारी आहे. प्रत्येक महिलेला आपण एक परफेक्ट आई असावं असं नक्कीच वाटत असतं. जर तुम्ही आई होण्याचं प्लॅनिंग करताय अथवा तुम्हाला लहान मुलं असतील तर तुम्ही भविष्यात कशा आई असणार हे जाणून घेण्याची तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. यासाठीच आम्ही तुम्हाला तुमच्या राशीनुसार तुम्ही कशा आई व्हाल हे सांगत आहोत. ज्याचा तुम्हाला तुमच्या भविष्यात नक्कीच फायदा होऊ शकतो.

मेष ( 21 मार्च - 19 एप्रिल)

जर तुम्ही मेष राशीच्या असाल तर तुम्ही एक दृढ इच्छाशक्ती  आणि मजबूत मन असलेल्या माता बनू शकता. तुमच्या स्वभावानुसार तुम्ही तुमच्या मुलांना हवी तितकी मोकळीक आणि त्यांची स्पेस द्याल. जर तुमच्या मुलांना कोणी बंधनात बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ते मुळीच आवडणार नाही. अशा लोकांना तुम्ही बिनधास्तपणे प्रतिकार कराल. मात्र कधी कधी तुम्ही समाजातील स्पर्धेत अव्वल येण्यासाठी तुमच्या मुलांना त्यांच्या मनाविरूद्ध जबरदस्ती देखील कराल.

कुंभ (20 जानेवारी - 18 फेब्रुवारी)

कुंभ राशीच्या माता या मुलांसाठी केवळ एक आई नाही तर एक चांगली मैत्रिणदेखील असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना त्यांचे निर्णय घेण्याचे सर्व स्वातंत्र्य द्याल. तुमची मुलं तुमच्यासोबत अगदी मोकळेपणे संवाद करू शकता. 

मीन ( 19 फेब्रुवारी - 20 मार्च)

तुमच्या स्वभावामुळे तुम्ही तुमच्या मुलांनाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला आनंदी कराल. तुम्ही एक आदर्श माता होऊ शकता. मुलांना आनंदी ठेवणं, त्यांना हव्या त्या सर्व गोष्टी देणं हे तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने जमू शकतं. मात्र कधी कधी तुमचा अती संवेदनशील स्वभाव तुमच्या कुटुंबासाठी त्रासदायक ठरू शकतो.

वृषभ (20 एप्रिल - 21 मे)

वृषभ राशीच्या महिलांच्या स्वभावात एक विशिष्ठ प्रकारची स्थिरता असते. जी त्यांच्या मातृप्रेमातदेखील दिसून येते. कारण अशा माता मुलांवर एक जबरदस्त नियंत्रण ठेवण्यात यशस्वी होतात. जर तुम्ही वृषभ राशीच्या माता असाल तर तुम्ही मुलांवर अती प्रेम अथवा त्यांचे अती लाड न करता त्यांना शिस्तीत ठेवण्याचा प्रयत्न कराल. मात्र यासोबत मुलांना आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू नये याचीदेखील काळजी घ्याल.

मिथुन (21 मे - 21 जून)

मिथुन राशीची आई ही एक आधुनिक आई असू शकते. कारण या राशीच्या महिलांना जगभरातील गोष्टी, तंत्रज्ञान यांची माहिती असते. त्यामुळे आपल्या मुलांनीदेखील याबाबत अपडेट असावं असं तुम्हाला वाटत असतं. तुम्ही एक कूल स्वभावाच्या आई आहात जिला तिच्या मुलांना कसं आनंदी आणि यशस्वी करायचं हे माहीत आहे.

कर्क (22 जून - 22 जुलै)

कर्क राशीची माणसं ही फारच भावनाप्रधान असतात. ज्यामुळे कर्क राशीच्या माता आपल्या मुलांवर सर्वात जास्त प्रेम करतात. वास्तविक सर्वच माता आपल्या मुलांवर स्वतःपेक्षा अधिकच प्रेम करत असतात. मात्र कर्क राशीच्या मातांचे प्रेम करण्याची पद्धत थोडी वेगळी असते. मात्र असं असलं तरी कर्क राशीच्या सतत बदलणाऱ्या मूडमुळे आणि अतीप्रेमामुळे त्यांची मुलं मात्र थोडीशी चिडचिड्या स्वभावाची होऊ शकतात. 

सिंह (23 जुलै- 22 ऑगस्ट)

सिंह राशीच्या महिला या नेहमी उत्साही आणि हरहुन्नरी स्वभावाच्या असतात. त्यामुळे या माता ड्रिम मॉम म्हणून ओळखल्या जातात. सर्वच मुलांना तुमच्या राशीसारखी आई हवी असते. कारण तुमच्या स्वभावामुळे तुमची मुलं तुमच्यासोबत एखाद्या मित्रमैत्रिणीसारखी वागतात. म्हणूनच तुम्ही एक बेस्ट मॉम नक्कीच होऊ शकता. 

कन्या (23 ऑगस्ट - 22 सप्टेंबर)

कन्या राशीच्या महिला स्वतःच मुळात अगदी परफेक्ट असतात. त्यामुळे सहाजिकच तुम्हाला तुमच्या मुलांनीदेखील प्रत्येक गोष्टीत परफेक्ट असावं असं वाटत असतं. त्यामुळे तुमच्या मुलांनी आहार, व्यायाम, अभ्यास, खेळ अशा सर्वच गोष्टीत उत्तम असावं हा तुमचा हट्ट असतो. मुलांना असं वळण लावणं हे तुमच्यासाठी सर्वात मोठं आव्हान असू शकतं.

तूळ (23 सप्टेंबर - 22 ऑक्टोबर)

तूळ राशीच्या माता मुलांना नेहमीच प्रिय असतात. कारण तुम्ही तुमच्या मुलांवर कधीच कोणतेही मानसिक प्रेशर देत नाही. मात्र या तुमच्या स्वभावामुळे तुमची मुलं फार मस्तीखोर आणि हट्टी होतात. तुम्ही फारच प्रेमळ स्वभावाच्या असल्यामुळे मुलांबाबत एखादा कठोर निर्णय घेणं अथवा त्यांना शिक्षा देणं तुम्हाला सहज शक्य होत नाही.

वृश्चिक (23 ऑक्टोबर - 21 नोव्हेंबर)

वृश्चिक राशीच्या माता  इतर राशींच्या मातांपेक्षा अधिक शिस्तप्रिय आणि कठोर स्वभावाच्या आई असतात. तुम्हाला सतत तुमच्या मुलांना अभ्यास करावा, सर्वांशी प्रेमाने आणि सलोख्याने वागावं, फार मस्ती करू नये, अभ्यासासोबत इतर गोष्टींमध्ये नेहमी अव्वल असावं असं वाटत असतं. तुम्ही कितीही प्रेमळ स्वभावाच्या असला तरी तुमच्या शिस्तप्रिय स्वभावामुळे तुमच्या मुलांना मात्र तुमची भिती वाटू शकते.  

धनु (22 नोव्हेंबर - 21 डिसेंबर)

धनु राशीच्या लोकांना आपली मुलं खेळात प्रविण असावं असं नेहमी वाटत असतं. यासाठीच तुमच्या मुलांना शारीरिक प्रकृतीत स्वस्थ असावं असं वाटत असतं. शिवाय तुम्ही तुमच्या मुलांना खेळ खेळण्यासाठी प्रवृत्त करता, बाहेरगावी फिरायला घेऊन जाता, त्यांच्यासोबत मौजमस्ती करता. मात्र तुमच्या स्वभावात सयंम कमी असल्यामुळे कधी कधी मुलं तुमच्या अकस्मित रागाचे बळी पडू शकतात.

मकर (22 डिसेंबर - 19 जानेवारी)

मकर राशीच्या माता या एक रॉकिंग मॉम असतात. अभ्यासासोबत मुलांसोबत खेळण्यापर्यंत तुम्ही सर्व काही करता. ज्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना फारच प्रिय असाल. तुमच्या या स्वभावामुळे तुमच्या मुलांचे संगोपन तुम्ही अगदी परफेक्ट पद्धतीने कराल.

 

अधिक वाचा

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी

राशीनुसार निवडा तुमचे करिअर (Choose career according your zodiac in Marathi)