Funny Whatsapp Status In Marathi - खळखळून हसायला लावतील मराठीतील हे 75+ विनोदी स्टेटस | POPxo

खळखळून हसायला लावतील मराठीतील हे विनोदी स्टेटस.. मग ठेवताय ना! (Funny Whatsapp Status)

खळखळून हसायला लावतील मराठीतील हे विनोदी स्टेटस.. मग ठेवताय ना! (Funny Whatsapp Status)


हल्लीच्या जगात सोशल मीडियाचं सगळं काही आहे बॉस… सगळं काही सोशल मीडियाचं झालं आहे. काहींसाठी सोशल मीडिया बातम्यांचा भंडार आहे काहींसाठी गॉसिप शेअरींगचे दुकान तर काहींसाठी केवळ मनोरंजनाचा भाग.. अनेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना खळखळून हसवायला आवडते.  खास तुमच्यासाठीच आम्ही मराठीतील विनोदी स्टेटस एकत्र केले आहेत. हे असे स्टेटस आहेत जे तुम्ही व्हॉटसअॅपवर ठेऊ शकता आणि इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकता. आम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुनच हे झक्कास स्टेटस काढले आहेत.

Table of Contents

  सोशल मीडियावर हल्ली स्टेटस का झालेत महत्वाचे

  आता सोशल मीडिया जीव की प्राण झाला आहे. त्यातल्या त्यात तुम्हाला एखादी गोष्ट लोकांपर्यंत पटकन पोहोचवायची असेल तर पटकन स्टेटस ठेवले जाते. तुमच्या पोस्टपेक्षाही स्टेटस अधिक लोकांपर्यंत पोहोचते. तुम्ही स्टेटस ठेवल्या ठेवल्या त्याचे नोटीफिकेशन समोरच्या व्यक्तीला जाते आणि तुमची अधिक माहिती लोकांना कळते. त्यामुळे हल्ली सगळीकडेच सोशल मीडिया स्टेटसला महत्व प्राप्त झाले आहे. आता पाहूया मराठीतील विनोदी स्टेटस जे तुम्ही शेअर करु शकता

  Also Read About भावनिक स्थिती

  खास मित्रांसाठी विनोदी स्टेटस (Funny Whatsapp Status for Friends)

  shutterstock
  shutterstock

  1. आज कबीर सिंह पाहिला.. एक तास रडलो… पण जेव्हा आपल्याला gf नाही हे कळलं तेव्हा 2 तास रडलो.
  2. तू जर A फॉर  Attitude दाखववा.. तर मी B फॉर भाव देणार नाही.
  3. जर तुमची आई तुम्हाला फोन खाली ठेव सांगत असेल तर ठेवत जा कारण आईच्या पायाशी स्वर्ग असतो असे म्हणतात. पण त्याच पायात चप्पलही असते.
  4. असं म्हणतात, पोरगी हसली की फसली..इथे इतक्या पोरींना हसवून मोकळा झालो.. पण एकही नाही फसली.
  5. आपण हुशार आहोत हे सिद्ध करता आले नाही तरी चालेल पण समोरचा वेडा आहे हे सिद्ध करता आले पाहिजे.
  6. परफेक्ट जोडी ही फक्त चपलांची असते.उरलेल्या सगळ्या या अंधश्रद्धा आहेत.
  7. गूण जुळले की लग्न होतं आणि अवगुण जुळले की, होते मैत्री
  8. पोटाचा प्रश्न सुटला की, सुटलेल्या पोटाचा प्रश्न असतो.. शेवटी काय तर पोटाचा प्रश्न कायम राहतो.
  9. लहानपणी मी single होतो. आता single लोकांचा अॅडमिन आहे.
  10. नातेवाईक: मग पुढे काय करायचं ठरवलं आहे??
               मी: सध्या काही नाही. पण तुम्ही गेल्यावर उरलेलं फरसाण खायचं ठरवलं आहे
  11. हल्ली आमच्याकडे पाहुणचाराची एक वेगळीच पद्धत सुरु झाली आहे. बसा असं म्हणण्याआधी फोन चार्जिंगला लावायचा आहे का असे विचारले जाते.

  वाढदिवसाला पाठवा हे मजेशीर स्टेटस

  मित्रांच्या वाढदिवसाला ठेवा हे विनोदी स्टेटस (Funny Whatsapp Status for Birthday)

  shutterstock
  shutterstock

  1. खूप आठवण येते अशा मित्रांची जे वाढदिवस झाल्यावरही पार्टी देत नाही… कुठे आहेस रे तू
  2. आयुष्य डॉक्टरांच्या गोळ्या नाही तर मित्रांच्या टोळ्या घेऊन फिरायचे असते. वाढिदिवसाच्या शुभेच्छा 
  3. इतरवेळी कुठे आहेस विचारणारा नेमका वाढदिवसाच्या दिवशी गायब होतोस.. पार्टीला इतका का घाबरतोस रे 
  4. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुझा फोटो ठेवलाय.. आता पार्टी द्यायला विसरु नकोस 
  5. तू च आहेस आमची आनबानशान… आता पार्टीच्या नावानेही होऊद्या की छान
  6. आज तुझा वाढदिवस… इतका मोठा झाला आहेस आता तरी एक गर्लफ्रेंड पटव भावा
  7. नशीब बाबा तुझा वाढदिवस चार वर्षातून एकदा येतो… नाहीतर माझे किती पैसे वाया गेले असते. 
  8. भावा आज तुझा वाढदिवस.. मग देतोयस ना पार्टी 
  9. वाढदिवस तुझा… पार्टीची सोय आमची.. किती वाट पाहिली रे बाबा या दिवसाची
  10. विचार करतोय या वाढदिवसाला तुला काहीच देत नाही.. सारखं तरी काय द्यायचं ना
  11. मित्रांच्या वाढदिवसाचा एक प्रॉब्लेमच आहे... पार्टी दे म्हटलं की, सगळे गायब कुठे होतात हेच कळत नाही.
  12. यावेळी मी काय म्हणतोय.. पार्टी कशाला.. त्यापेक्षा आजपासूनच डाएट सुरु करुया ना
  13. आज तुझा वाढदिवस म्हणून उद्यापासून डाएट करायचे ठरवले आहे.. मग कुठे भेटू नाक्यावर,चौकात की थेट हॉटेलात
  14. तुझा वाढदिवस आला की, मला इतके बरे वाटते की, सकाळपासून उपाशी राहून रात्री पार्टी करावेसे वाटते.

  लग्न वर्धापनदिनासाठी शुभेच्छा संदेश

  वर्षपूर्तीसाठी विनोदी स्टेटस (Funny Whatsapp Status for Anniversary)

  shutterstock
  shutterstock

  1.  बारा महिने खरंतर सुखात गेले...पण कोणाच्या ते कळलं नाही
  2. कितीही भांडण झालं तरी आजचा दिवस मी कधीच विसरत नाही.. कारण हा दिवस विसल्यानंतरच भांडणाला खरी सुरुवात होते.
  3. अरे वर्ष कधी झाले कळलेच नाही… कारण तू तुझ्या यादीच्या कामातील कामच पूर्ण केली नाहीत.
  4. समुद्राच्या लाटांपेक्षाही जास्त कधीकधी खवळतेस तू… पण तरीही माझ्यासाठी एकदम खास असतेस तू 
  5. यंदाच्या वर्षपूर्तीला एकच मागते गिफ्ट… कधी तरी वेळेवर आलास तर होईल ना काहीतरी नीट
  6. लग्नवर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यास आज विसरलीस तू … नशीब मला या वर्षी वाचवलेस तू
  7. झालं आता वर्ष… पुरे झाली तुझी नाटकं… या पुढे मिळणार नाही… तुला याहून काही जास्त
  8. सहा सहा महिन्यांनी काम सोडणारा तू आज वर्ष झाल्यानंतरही एकाच ठिकाणी आहे. यापेक्षा वेगळा आनंद काय आहे
  9. वर्षपूर्तीच्या निमित्ताने करुया एक संकल्प यापुढे कितीही विसरलो तारखा… तरी करायचा नाही राडा… राहायचं एकदम शांत
  10. तू मला मी तुला ओळखू लागलो… पण अजूनही तारखा लक्षात ठेवण्याशी जुळवू नाही शकलो.
  11. तुझे माझे सूर जुळले इतके की, आता भांडणही अगदी सूरात होतात नाही का?
  12. झालं बाबा वर्ष आता काय म्हणणं आहे तुझं 

  जबरदस्त मराठमोळे वॉट्सअप स्टेटस

  आठवडी सुट्टीवर विनोदी स्टेटस (Funny Whatsapp Status for Weekend)

  shutterstock
  shutterstock

  1. आयुष्य खूप बोअरींग झालयं देवा…. उचल एकदाच आणि नेऊन टाक एकदा गोव्याच्या बीचवर
  2. तुम्ही कुठेतरी खूप घाईघाईने बाहेर जाता आणि अचानक काळी मांजर समोरुन जाते…. याचा अर्थ काय? ...त्या मांजरीला तुमच्यापेक्षाही जास्त घाई असते.
  3. आळसाचे दुसरे नाव आहे ‘रविवार’ आणि अन्यायाचे दुसरे नाव ‘सोमवार’
  4. हल्ली जरा प्राॅब्लेमच झाला आहे.  रात्री लवकर झोप येत नाही आणि सकाळी लवकर जाग येत नाही.
  5. माणूस तीन गोष्टी कधीच लपवू शकत नाही. प्रेम .. खोकला आणि पापड खाण्याचा आवाज
  6. आताच हाती आलेल्या माहितीनुसार मुंबईत wow how  romantic वरुन पाण्याची पातळी…आईशप्पथ केवढं ते पाणीवर गेली आहे… जरा जपून
  7. आपण जसजसे मोठे होऊ लागतो. त्यावेळी कळायला लागतं की, झोपेपेक्षा महत्वाचं अस जगात काहीच नसतं.
  8. ट्रेनच्या चौथ्या सीटवर बसणारी तिचं असतात. ज्यांना इतर बसलेल्या प्रवाशाचे सुख पाहवत नाही.
  9. लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात आणि हेडफोन्सच्या खिशात
  10. सून आणि मान्सून यांची लोक खूप वाट पाहतात. पण आल्यानंतर सारखी चिडचिड करतात.
  11. आयुष्यात सगळ्यांचे ऐका पण आठवडी सुट्टी मात्र स्वत:च्या मर्जीनेच घालवा
  12. रविवारी झोपण्यात जितकं सुख आहे तितकं कदाचित कशातच नाही... पण होऊ दे झोप पूर्ण... घड्याळ बंद झोप सुरु
  13. आठवडी सुट्टी पगारापेक्षाही क्षणिक आहे येते कधी जाते कधी कळतच नाही राव
  14. शुक्रवार नवचैतन्य घेऊन येतो कारण दुसऱ्या दिवशी शनिवार जो येणार असतो.
  15. सोमवारी ऑफिसला गेल्यानंतर किती जण weekend कधी यासाठी दिवस मोजतात??

  शिक्षणावर विनोदी स्टेटस (Funny Whatsapp Status on Education)

  1. स्त्रियांना त्यांचे वय विचारु नये…. पुरुषाला त्याचा पगार… आणि विद्यार्थ्याला त्याचे मार्क्स .. कारण त्याचा खूप त्रास होतो.
  2. ज्या दिवशी विचार करतो की, आयुष्यात खूप काही तरी मोठं करायचं… नेमकं त्याच दिवशी घरातले दळण आणायला पाठवतात.
  3.  कितीही शिकलो तरी दरवाज्यावरील  Push आणि Pull वाचल्यानंतर काही सेंकद तरी विचार करतो…. अरे दरवाजा ओढायचा की, ढकलायचा
  4. शाळेतली एक आठवण… बाई मी खरचं घरचा अभ्यास केलाय.. पण श्या.. अभ्यास ज्यात केला ती वहीच घरी विसरलो.
  5. चला सगळ्यांनी पटापट आपले Qualification सांगा.बघू कोण किती शिकलं आहे ते.
  6. पाऊस कमी होण्याचे कारण आहे इंग्लिश मीडियम स्कुलची वाढती संख्या.. कारण ते येरे येरे पावसा ऐवजी rain rain go away असे मुलांना शिकवतात.
  7. ती: तू काय करतोयस? मी: इंजिनीअरींग.. खाली काय बघता इज्जत वरच गेली आहे.
  8. अवघड प्रश्न खूप अवघड प्रश्न… आज शाळेत काय शिकवलयं.
  9. काही लोक इतके उतावळे असतात की, फळ्यावर बाईंनी शिकवल्यावर सगळं कळालं असं सांगतात. पण घरचा अभ्यास केला नाही की, कळलं नाही असे सांगतात.
  10. जर तुम्हाला कोणी शिक्षण विचारुन जज करत असेल तर आताच दूर व्हा.. कारण उद्या रिझल्ट दाखवायची वेळ आली तर वांदे होतील.
  11. तू मला काहीही बोल चालेल फक्त महिन्याच्या शेवटी पगाराचा शिल्लक आकडा विचारु नकोस . इ.ति. मी
  12. हल्ली 1 तारीख आली की, मला खूपच भीती वाटते.पगाराची नाही तर तो किती शिल्लक राहील याची
  13. पगारदेवा नेहमीच ये ना रे भेटायला.. बरं वाटतं जाईल मला
  14. पगार असल्यावर असं वाटतं की, अपुनीच भगवान है... बाकी साला सब.... है

  तुमची सकाळ बनवा अधिक सुंदर ‘शुभ सकाळ’ संदेशांनी (Good Morning Messages In Marathi)

   

  पगारावर विनोदी स्टेटस (Funny Whatsapp Status on Salary)

  shutterstock
  shutterstock

  1. मुंबईत माणसं प्रवासाचा पगार घेतात, बाकी जॉब वगैरे सगळी अंधश्रद्धा आहे हो
  2. जेव्हा आयुष्यात सगळे काही चांगले आहे असे वाटायला लागते… नेमकं तेव्हाच हेडफोनची एक बाजू वाजायची बंद होते.
  3. पगार… आला … आला … आला… पगाराच्या दुसऱ्या दिवशी गेला रे सगळा पगार गेला
  4. या महिन्यात मी saving करणार होतो… जाऊ दे आता पुढच्या महिन्यात करतो.
  5. पगारवाढीचा प्रस्ताव बॉस काही केल्या स्विकारत नाहीए. म्हटलं आता स्टेटसच ठेवावं… पोट्याला दया आली तर ठीक
  6.  ये रे ये रे पैसा… जाऊ नको कुठेसा… सेल आला मोठा… पगार झाला खोटा
  7. आज मेरा पास क्या हैं. हाय्यसाला … पगार.. दुसऱ्यादिवशी… आज मेरे पास सिर्फ कुछ चिल्लर है
  8. यावेळी मी पगार आल्यावर सगळं घेणार.. पण पगार गेला कुठे?
  9. मासे तरी गळाला लागतील.. पण हा पगार नाही… 
  10. पगारावर बोलू काही.. जाऊ दे ना भावा यापेक्षा मोठं दु:ख माझ्या आयुष्यात नाही.

  यंदा रक्षाबंधनाला पाठवा हे शुभेच्छा संदेश आणि व्यक्त करा तुमचे प्रेम

  FAQ

  सोशल मीडियावरील स्टेटस म्हणजे नेमकं काय?

  फेसबुक, व्हॉटसअॅप सगळीकडेच हल्ली स्टेटस ठेवण्याची सोय आहे. स्टेटस किंवा स्टोरी नावाने या गोष्टी ओळखल्या जातात. तुमची एखादी लेटेस्ट अपडेट या ठिकाणी पोस्ट करु शकता.

  स्टेटसमध्ये इमोजी वापरु शकतो का?

  अर्थात जर तुम्हाला काही विनोद किंवा आनंदाची गोष्ट शेअर करायची असेल तर तुम्ही नक्कीच स्टेटसमध्ये इमोजीचा वापर करु शकता. पण इमोजीचा वापर करताना मात्र जपून कारण त्यातून कोणताही गैर आणि वाईट अर्थ निघणार नाही याची काळजी घ्या.

  मीम्स आणि विनोदी स्टेटस म्हणजे एकच का? 

  तसं पाहायला गेलं तर आताचा काळ हा मीम्सचा आहे. मीम्ससाठी एखादया फोटो किंवा व्हिडिओचा आधार घेतला जातो. विनोदी स्टेटससाठी इतर कशाचाही आधार घेतला जात नाही. त्याच्यासाठी केवळ शब्दांची जुळवणूकच पुरेशी असते. दोघांचेही काम हसवणे आहे. पण ही दोन्ही वेगवेगळी माध्यमं आहेत

  मराठीतील विनोदी स्टेटस कसे शोधायचे

  हल्ली ऑनलाईनसुद्धा तुम्हाला असे विनोदी स्टेटस मिळू शकतात. जर तुम्ही स्वत: क्रिएटीव्ह असाल तर तुम्ही स्वत:देखील काही विनोदी स्टेटस आणि मीम्स बनवू शकता.

  विनोदी स्टेटस GIF मध्ये असतात का? 

  विनोदी स्टेटस मध्ये जर GIF असतील तर त्याला मीम्स म्हटले जाते.  स्टेटसमध्ये तुम्ही GIF घालू शकता.  आता तर सगळे प्रेझेंटेशनवर अवलंबून आहे. एखादा विनोद अधिक पटवून देण्यासाठी व्हिडिओचा हल्ली सर्रास वापर केला जातो. त्यात कोणताही शंका नाही.