तुमच्या नात्यात तुम्हाला नक्की काय हवं सांगते तुमची रास (Zodiac)!

तुमच्या नात्यात तुम्हाला नक्की काय हवं सांगते तुमची रास (Zodiac)!

आपल्या रोजच्या आयुष्यात आपलं जोडीदाराबरोबर नक्की नातं कसं हे आहे हे नक्कीच तुमची रास सांगू शकत नाही अथवा तुम्ही आनंदी आहात की तुम्हाला दु:खी हेदेखील कदाचित कळणार नाही कारण प्रत्येकाचं व्यक्तीमत्व हे वेगवेगळं असतं. पण तुमची रास अर्थात तुमच्या Zodiac signs वरून तुमच्या नात्यात नक्की तुम्हाला काय हवं हे नक्कीच जाणून घेता येतं. ग्रह ताऱ्यांचा अभ्यास हा एक वेगळा विषय आहे आणि त्यावरून काही गोष्टी कळतात हे आतापर्यंत सिद्धही झालं आहे. काही लोक या गोष्टी मानतात तर काही लोकांचा या गोष्टींवर विश्वास नाही. पण या गोष्टीकडे दुर्लक्ष नक्कीच करता येत नाही. जाणून घेऊया आपल्या नात्यातील ग्रह तारे काय सांगतात :

मेष

GIPHY

या राषीच्या व्यक्तींना नात्यामध्ये उत्साह आणि अधिक स्पार्क खूपच आवडतो. पण तुमच्याबरोबर जर तुमच्या जोडीदाराने मर्यादेबाहेर जाऊन मजा मस्ती केली तर ते तुमच्या जोडीदाराला नक्कीच महागात पडू शकते. तुम्हाला नेहमीच जास्त काळासाठी आनंदी राहायची इच्छा असते. तसंच नात्यात असूनही तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य आणि आपली स्पेस सर्वात जास्त महत्त्वाची असते.

वृषभ

GIPHY

तुम्हाला नात्यामध्ये जर अथवा तर अशा परिस्थितीचा प्रचंड तिटकारा आहे. तुमच्या जोडीदाराने प्रत्येक गोष्टी अगदी प्रामाणिकपणे तुमच्यासमोर ठेवावी असं तुमचं म्हणणं असतं. तुमच्या नात्यात आनंदी आणि कम्फर्टेबल राहण्यासाठी तुमच्या जोडीदाराला तुमच्यावर अवलंबून राहावं लागतं. कारण तुमचा मूड कधी बदलेल हे तुम्हालाही माहीत नसतं. 

मिथुन

GIPHY

ज्या नात्यामध्ये मजा मस्ती आणि प्रामाणिकपणा नसेल ते नातं टिकणं जरा कठीणच असतं. जेव्हा नात्यामध्ये राहायचं आहे किंवा नात्यातून बाहेर पडायचं आहे असा निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा तुम्हाला खूपच वेळ लागतो. कारण तुम्हाला नक्की काय करायचं आहे हे तुम्हाला कळत नाही. तुम्ही तुमच्या जोडीदाराकडून प्रेम आणि सहनशक्ती या दोन्ही गोष्टींची अपेक्षा करता. तुम्हाला त्यांच्याकडून प्रोत्साहन आणि पूर्ण उर्जेची गरज असते, ज्यामुळे तुम्ही तुमच्या दोघांचं नातं अधिक घट्ट करू शकता.

कर्क

तुम्हाला एखाद्यामध्ये मिसळण्यासाठी थोडा वेळ लागतो. तसंच नात्यामध्ये तुमच्या जोडीदाराबरोबर भावनिक कनेक्शन होणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला रोमान्स तर हवा असतोच पण त्याचबरोबर तुम्हाला आनंद, सुखशांती आणि सुरक्षितता या गोष्टींचीही गरज भासते. तुम्ही सुरुवात केली नाही तरीही तुम्हाला रोमँटिक व्हायला खूप आवडतं. तुमच्या दृष्टीने विश्वास ही गोष्टी तुमच्या नात्याला अधिक घट्ट आणि सुंदर बनवते. 

सिंह

GIPHY

नात्यामध्ये तुम्हाला ते सांभाळण्यासाठी मेहनत करण्याची गरज आहे. तुम्ही नेहमी खरं बोलता त्यामुळे तुम्हाला अशा जोडीदाराची गरज आहे जो तुमच्या बोलण्याचा आदर करू शकेल. तुम्हाला गंभीर आणि कॅज्युअल नात्यामध्ये बॅलेन्स ठेवण्याची गरज आहे. कंटाळवाणं आयुष्य तुम्ही अजिबातच सहन करू शकत नाही. त्यामुळे तुमच्या नात्यात जास्त उत्साह असेल तितकेच तुम्ही जास्त आनंदी राहाल. 

कन्या

GIPHY

तुम्हाला प्रत्येक काम एका पद्धतीने करणं आवडतं. हीच गोष्ट तुम्हाला तुमच्या नात्यामध्येही लागू होते. तुम्हाला सिक्युरिटी, स्टॅबिलिटी आणि या गोष्टीची हमी हवी असते की, तुम्ही या नात्यामध्ये कायम आनंदी राहाल. तुम्हाला तुमच्या नात्यात योग्यरित्या आणि प्रॅक्टिकली पुढे जाणं जास्त आवडतं. 

तूळ

GIPHY

तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये ताळमेळ आणि सुखशांती ठेवायला खूपच आवडतं. तसंच भांडण आणि त्रागा करणं तुम्हाला अजिबात आवडत नाही. त्यामुळे असं नातं तुम्ही टिकवून ठेऊ शकत नाही. तुमच्या जोडीदाराकडून प्रशंसा ऐकणंही तुम्हाला खूप आवडतं. पण त्याचबरोबर नात्यात असूनही तुम्हाला तुमची स्पेसदेखील तितकीच महत्त्वाची आहे. 

वृश्चिक

GIPHY

तुमच्या आयुष्याची गाडी ही तुमच्या पॅशनवर चालते. नात्यामध्येही तुम्हाला पॅशनची गरज भासते. तुमचा जोडीदाराने नेहमी तुमचं ऐकावं असं तुम्हाला वाटतं आणि ज्या व्यक्तीमध्ये सहनशक्ती असेल असाच जोडीदारा तुम्हाला हवा असतो. प्रामाणिकपणा आणि दयाळूपणा या दोन्ही गोष्टीत तु्म्ही कधीही तडजोड करू शकत नाही. तुम्ही कितीही कठोर असल्याचं दाखवलंत तरीही तुम्ही प्रचंड हळवे असता. त्यामुळे तुम्हाला समजून घेणारा आणि सावरणारा जोडीदार तुम्हाला हवा असतो.

धनु

GIPHY

तुम्हाला साहस आणि सकारात्मकता या दोन गोष्टींची गरज भासते. त्यामुळे तुमच्या जोडीदारामध्ये या दोन गोष्टी असाव्यात असं तुम्हाला वाटतं. एक तर जोडीदारात उत्साह असावा आणि दुसरं म्हणजे क्रिएटिव्हिटी. कोणत्याही नियम अथवा वादविवादांमध्ये अडकून राहणंं तुम्हाला आवडत नाही. लहानलहान गोष्टींनी तुम्ही आनंदी होता. नात्यात तुम्हाला दोनच गोष्टी हव्यात त्या म्हणजे स्वातंत्र्य आणि दुसरं म्हणजे प्रामाणिकपणा.

मकर

GIPHY

तुम्ही प्रचंड जिद्दी आहात आणि त्याचा परिणाम तुमच्या नात्यावरही होतो. सुरुवातीपासूनच सगळ्या गोष्टीची योजना तुम्ही आखता. तुम्हाला असा जोडीदार हवा असतो जो अतिशय सहनशील असेल आणि तुम्हाला आनंदी ठेवणं त्याला कळत असेल. नात्यात राहण्यासाठी तुम्हाला पॅशनेट जोडीदाराची गरज भासते.

कुंभ

GIPHY

नात्यामध्ये तुम्हाला तुमचे नियम करायला आवडतात. तुम्हाला उत्साह आणि स्वातंत्र्य गरजेचं असतं. असा जोडीदार तुमच्यासाठी योग्य  आहे जो परफेक्ट असून डाऊन टू अर्थ असेल. तुमचा जोडीदार तुम्हाला जर महत्त्व देत नसेल तर अशा परिस्थितीत राहणं तुमच्यासाठी अतिशय कठीण होतं. 

मीन

GIPHY

नात्यात Compassion असणं तुमच्यासाठी खूपच गरजेचं आहे. तुम्ही अतिशय संवेदनशील आणि प्रामाणिक आहात. त्यामुळे तुम्हाला असा जोडीदार हवा जो प्रामाणिक असेल. तुम्हाला नात्यात कम्फर्ट आणि सुरक्षित वाटणं गरजेचं वाटतं. त्यामुळे तुम्ही असाच जोडीदार शोधता जो तुमची काळजी घेऊ शकेल.