जेव्हा अशा गोष्टी तुमच्यासोबत घडू लागतात… तेव्हा तुम्हाला असते sex ची गरज | POPxo

जेव्हा अशा गोष्टी तुमच्यासोबत घडू लागतात… तेव्हा तुम्हाला असते sex ची गरज

जेव्हा अशा गोष्टी तुमच्यासोबत घडू लागतात… तेव्हा तुम्हाला असते sex ची गरज

तुम्ही कितीही नाही म्हणालात तरी प्रत्येकाला sex ची गरज असते. आता प्रत्येकाची sexची गरज ही वेगवेगळी असू शकते. म्हणजे काहींमध्ये ही गरज फारच लवकर जागृत होते. तर काहींमध्ये उशिरा… पण जगात अशी एकही व्यक्ती नाही की, ज्याला sexची गरज नाही. त्यामुळे जर तुमच्या मनातही हे विचार सतत घोळत असतील तर त्यात गैर वाटण्यासारखे असे काही नाही. उलट जर काही गोष्टी तुमच्यासोबत घडत असतील तर तुम्हालाही sex ची गरज आहे असेच तुम्ही समजायला हवे. जर तुम्ही पंचविशीच्या पुढे आहात आणि तुम्ही आतापर्यंत एकदाची sex केले नसेल. तर तुम्हाला या गोष्टी नक्कीच जाणवतील.

sex करताना तुमच्या मनातही येतात का विचार 

Table of Contents

  मनात सतत sex चे विचार येणे

  GIPHY
  GIPHY

  आपल्या मनात एकावेळी लाखो विचार घोळत असतात.  कामाचे, भविष्याचे किंवा तत्सम पण आज मला sex करायचे आहे असा विचार मनात येत नाही. पण जर तुमच्या मनात  sex बद्दलच्या वेगवेगळ्या भावना येत असतील तर समजून जावे तुम्हाला sex ची गरज आहे. तुमच्या सुप्त मनात सतत sex चा विचार सुरु आहे आणि तुम्हाला ते योग्यवेळी करण्याची गरज आहे. तुमची ही गरज तुम्ही तुमच्या पार्टनरकडे बोलून दाखवणे गरजेचे आहे.

  उदा. तुम्ही तुमच्या पार्टनरपासून खूप दूर राहता तुमचे बऱ्याच दिवसांपासून काही संबंध आले नसतील. तर तुम्हाला नक्कीच असे वाटणे स्वाभाविक आहे. त्यावेळी तुम्ही दोघं संमतीने नक्कीच sex करण्याचा विचार करु शकता. 

  कोणत्याही गोष्टीमध्ये sex दिसणे

  GIPHY
  GIPHY

  आपण आठवड्याचे दिवस कामांमध्ये व्यग्र असतो. शहरांमध्ये राहताना जबाबदाऱ्या आणि लाईफस्टाईलमुळे काही गोष्टींसाठी आपल्याला वेळच मिळत नाही. पण जर तुम्हाला इतक्या सगळ्या व्यापातही सतत सगळ्या गोष्टीमध्ये sex दिसत असेल याचा अर्थ तुम्हाला सध्या sex ची गरज आहे. हे अगदी तुमच्या भुकेप्रमाणे आहे. जर तुमचे पोट भरलेले असेल तर तुमच्या पुढ्यात अगदी पंचपक्वान जरी आणून ठेवली तरी तुम्हाला ते खायची इच्छा होणार नाही. तुमच्या sexual desire बाबतही अगदी तसेच आहे. जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीत sex दिसू लागले असेल तर तुम्हाला त्याची गरज आहे. 

  उदा. जर तुम्हाला काहीही पाहिल्यानंतर त्यामधून sex करण्याची इच्छा होत असेल किंवा सतत स्वत:ला समाधानी करण्यासाठी हस्तमैथुन करावेसे वाटत असेलतर मग तुम्हाला sex ची गरज आहे. 

  sexनंतर तुमच्या रिलेशनशीपमध्ये होतात हे महत्वाचे बदल

  एखादा स्पर्श हवाहवासा वाटणे

  GIPHY
  GIPHY

  दिवसभरात आपल्याला इतके स्पर्श होत असतात की, सगळेच स्पर्श आपल्याला हवे असतातच असे नाही. पण आपल्या जवळच्या व्यक्तीचे स्पर्श आपल्याला कायम हवे असतात. जर तुमच्यामध्ये ही इच्छा जास्त प्रबळ झाली तर तुम्ही हे समजावे की, तुम्हाला काहीवेळ तुमच्या खास व्यक्तीसोबत घालवण्याची गरज आहे. त्यांच्या स्पर्शाची.ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या जवळ असण्याची तुम्हाला गरज आहे असे वाटू शकते. 

  उदा. एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडते याचा अर्थच त्या व्यक्तीला तुमच्यामध्ये काहीतरी आवडलेले असते.  काहींना नुसत्या स्पर्शानेच दुसऱ्या व्यक्तीबद्दल मनात प्रेम निर्माण होते

  पहिल्या sexचा अनुभव होता खास... वाचा  महिलांना नेमकं काय वाटतं 

  एकटेपणा जाणवू लागणे

  GIPHY
  GIPHY

  जर तुम्ही खूप वर्ष रिलेशनशीपमध्ये नसाल तर एकटेपणा जाणवणे अगदी स्वाभाविक आहे. म्हणजे तुमच्या इतर मित्रमैत्रिणी त्यांच्या संसारात व्यग्र असतील  किंवा त्याचे रिलेशनशीप अगदी उत्तम सुरु असेल तर तुम्हाला हे जाणवणे अगदीच स्वाभाविक आहे. पण खूप वेळासाठी तुम्ही एकटे राहिलात तर हा एकटेपणा तुमच्यामध्ये जास्त वाढू लागतो. हा एकटेपणा संपवण्यासाठी तुम्हाला एका पार्टनरची, प्रेमाची आणि पर्यायाने sexची गरज असते. या sex मध्ये फक्त प्रेमाच्या व्यक्तीसोबतचा काळ येतो. 

  उदा. एका वाचकाने आमच्यासोबत  त्याचा अनुभव शेअर केला होता. त्याने सांगितले होते की, तो 30 वर्षांचा असूनही सिंगल होता. पण काही वर्षानंतर त्याला हा एकटेपणा जास्त जाणवू लागला. त्याने योग्यवेळी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे त्याच्या आयुष्यात येत चाललेले डिप्रेशन कमी झाले. 

  या उदाहरणावरुन इतकेच सांगायचे आहे की, प्रत्येकाची एक वेळ असते आणि ती तुम्हाला माहीत असायला हवी.

  बोलण्याचा चुकीचा अर्थ काढणे

  GIPHY
  GIPHY

  आता जर तुम्ही फारच मिश्किल स्वभावाचे असाल तर तुम्हाला प्रत्येक समोरच्या व्यक्तीचे बोलणे हे चीझी आणि आकर्षित करणारे वाटू लागते. तुम्हाला प्रत्येकवेळी त्या व्यक्तीच्या बोलण्यात काहीतरी वेगळेच संकेत आहेत असे वाटू लागतात. तुमचा पार्टनर तुम्हाला काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करत आहे.पण तुम्ही मात्र त्याचा कोणताही अर्थ समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही तर तुम्हाला त्यातून तुमच्या मनाला पटणारा अर्थ काढायचा असतो. 

  उदा. तुमचा जोडीदार कदाचित तुम्हाला काही वेगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असेल पण तुमचे लक्ष त्याच्या बोलण्याकडे नाही तर त्याच्या इतर हालचालींकडे असेल. तुम्ही त्यांच्या ओठांना त्यांच्या चेहऱ्याला त्याल न्हाळत असाल. तर समजून जावे तुम्ही मनाने सध्या कुठेतरी वेगळीकडेच विहार करत आहात. तुम्हाला sex attentionची फारच गरज आहे.

  एखाद्या चित्रपट सीनमध्ये गुंगून जाणे

  GIPHY
  GIPHY

  चित्रपटांचा, मालिकांचा आपल्या डोक्यावर खूपच पगडा असतो. एखाद्या चित्रपटातील गोष्टीत आपण स्वत:ला लगेचच गुंतवून पाहायला बघतो. एखादा रोमँटीक सीन सुरु असेल आणि तुम्हाला तो रोमँटीक सीन जगावासा वाटत असेल तर तुम्हाला त्या क्षणी तुमच्या पार्टनरची गरज आहे. एका अर्थाने तुम्हाला तो आनंद जगण्याची फारच गरज आहे. आता तुम्ही म्हणाल एखादा अॅक्शन सीन पाहून तुम्हाला त्या हिरोप्रमाणे वागायची इच्छा होते मग काय करायचे. विनोदाचा भाग वगळता तुम्हाला तुमच्या सुप्त इच्छा अशाच काही गोष्टींमधून कळत असतात. 

  उदा. एखादा रोमँटीक सीन तुमच्यासमोर सुरु आहे. पण तो दिवसभर तुमच्या डोक्यात घोळत आहे. तुम्ही त्याचा जितका विचार करता तितके तुम्हाला तुमच्या जोडीदाराला जवळ घ्यावेसे किंवा तिला कवेत घेऊन वेळ घालवावेसे वाटू लागते

  पार्टनरची सतत आठवण येत राहणे

  GIPHY
  GIPHY

  आता जे कपल एकमेकांपासून दूर राहतात.त्यांनात त्यांच्या पार्टनरची आठवण येणे अगदीच स्वाभाविक आहे. पण जर तुम्हाला अगदी रोज तुमच्या पार्टनरच्या सहवासात राहूनही पार्टनरची ूप आठवण येत असेल तर मात्र तुम्हाला तुमच्या पार्टनरच्या सहवासाची खूप जास्त गरज आहे. 

  उदा. जर तुम्ही तुमच्या पार्टनरला अगदी संध्याकाळीच भेटणार असाल. पण सकाळपासूनच तुम्हाला तुमच्या पार्टनरला भेटण्याचे वेध लागले असतील तर तुम्हाला तुमच्या पार्टनरच्या जवळ असण्याची फारच गरज आह. 

  असे तुमच्यासोबत होत असेल तर तुम्हाला नक्कीच तुमच्या पार्टनरला वेळ देण्याची गरज आहे. 

  पार्टनरशी Naughty बोलावेसे वाटणे

  GIPHY
  GIPHY

  खूप जणांना पार्टनरसोबत लाडात बोलायला आवडते. हा म्हणजे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत नक्कीच लाडात बोलायला हवे. पण हे लाडात बोलणे ज्यावेळी naughty बोलण्याकडे जाते त्यावेळी मात्र तुम्हाला तुमच्या पार्टनरची सगळ्यात जास्त गरज असते. 

  उदा. Sexting नावाचा प्रकार आता अनेकांना माहीत आहे. पार्टनरसोबत एकातांत बोलताना मोबाईलमध्ये हा प्रकार वापरला जातो. म्हणजे पार्टनरला रिझवण्यासाठी किंवा त्याला आकर्षित करण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जातात. तुम्हाला जेव्हा अशाप्रकारचे sexting करावेसे वाटत असेल त्यावेळी तुम्ही समजून जा. तुम्हाला तुमच्या पार्टनरची किती गरज आहे ते

  सतत चीडचीड होणे

  GIPHY
  GIPHY

   काहींना काही गोष्टी वेळेवर मिळाल्या नाहीत तर त्यांची चीडचीड होते. Sex च्या बाबतीतही अगदी तसेच आहे. जर ती गोष्ट वेळेवर झाली नाही तर एखाद्याची चीडचीड होणे स्वाभाविक आहे. जर तुमची कारण नसताना सतत चीडचीड होत असेल तर त्या मागील एक कारण sex असू शकते. त्यामुळे तुम्ही याकडे थोडं लक्ष द्यायला हवे. 

  उदा. तुमचे कामात लक्ष लागत नसेल. तुमच्या पार्टनरला सांगूनही तिला तुमच्या मनातील भावना कळत नसतील तर नक्कीच तुम्हाला याचा त्रास होणे स्वाभाविक आहे. तुमची चीडचीड होत राहते आणि मग तुम्ही एका वेगळ्या झोनमध्ये निघून जाता.