Festive Fashion Trend: या 5 स्टायलिश कपड्यांनी करा सण साजरा | POPxo

Festive Fashion Trend: या 5 स्टायलिश कपड्यांनी करा सण साजरा

Festive Fashion Trend: या 5 स्टायलिश कपड्यांनी करा सण साजरा

फेस्टिवल सीजन आलाच आहे. अर्थात आता सणांना सुरुवात झाली आहे. लवकरच घरोघरी गणपती बाप्पाचंही आगमन होईल. त्यामुळे आता वेगवेगळ्या फॅशन ट्रेंड्सनुसार वेगवेगळे कलेक्शनही येतील. तुम्ही यावर्षी सणासुदीला या कलेक्शनमधून आपल्यासाठी फेस्टिव्ह आऊटफिट नक्कीच निवडू शकता. आपल्यासाठी एक वेगळा आणि सुंदर आऊटफिट डिझाईनदेखील तुम्ही करून घेऊ शकता. या सणाला तुम्ही नक्की कोणत्याही प्रकारचे Festive Fashion Trends वापरू शकता याबद्दल काही खास माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. हे आऊटफिट्स घालून दिसा ट्रेंडी आणि स्टनिंग. 

1. हेवीपेक्षा लाइट वर्कला पसंती

Instagram
Instagram

आजकालच्या ट्रेंडमध्ये कंटेम्परेरी इंडियन वेअरमध्ये हलक्या कामासह चिक डिझाइन्सकडे जास्त लक्ष देण्यात येत आहे. अर्थात हल्ली हेवीपेक्षा लाईट अशा हलक्या वर्कला पसंती जास्त देण्यात येते. त्यामुळे तुमच्या शरीराला योग्य वाटेल आणि फिट बसतील असे वेगळ्या कट्सचे टॉप्स घ्या आणि आपल्या पँट्ससह स्टाइल करून एक वेगळा फेस्टिव्ह आणि ट्रेंडी लुक करा. याबरोबर तुम्ही जर ब्राईट लिप कलर आणि न्यूड मेकअप तसंच स्टेटमेंट गोल्ड दागिने घातलेत तर तुमच्या या स्टायलिश लुककडे सगळेच बघत राहतील. 

वाढत्या वयात तरूण दिसण्यासाठी फॉलो करा 'या' फॅशन टीप्स

2. हँडक्राफ्टेड एम्बेलिशमेंट

Instagram
Instagram

यावेळी फॅशन ट्रेंडमध्ये असे आऊटफिट्स राहतील ज्याचे हँडक्राफ्टेड मोतिफ आणि कट्सची नवी स्टाईल डिफाईन करतील. हँडक्राफ्टेड कामामध्ये तुम्ही वेगवेगळे एक्सपरिमेंट करू शकता. तसंच फॅशन मोतिफसह तुम्ही नव्या गोष्टी करू शकता. यावेळी फेस्टिव्हल सीझनमध्ये कंटेम्परेरी इंडियन वेअरमध्ये मुगल नेटप्रमाणे मोटिफ्सदेखील ट्रेंडमध्ये आहेत. 

3. फॅब्रिक

Instagram
Instagram

तुम्हाला थोडं ग्लॅमरस दिसायचं सेल तर त्यासाठी फॅब्रिक चांगलं असायला हवं. त्यासाठी तुम्ही चंदेरी कॉटन, मलमल, जॉर्जेट आणि मॉडल सॅटिनसारख्या फॅब्रिकमध्ये अनेक मॉडर्न स्टाईल्स करू शकता. तुम्हालादेखील या सणासुदीला वेगळं काहीतरी करायचं असेल तर अशा कम्फर्टेबल फॅब्रिक्ससह तुम्ही तुमचं खास स्टाईल स्टेटमेंट बनवा. 

उंची जास्त असलेल्या मुलींसाठी खास फॅशन टीप्स

4. स्ट्रेट पँट्स

Instagram
Instagram

अनारकली कुरत्यांसह चुणीदार पायजमा आता बऱ्यापैकी आऊटडेटेड झाला आहे आता बऱ्याच मुली आपल्या लॉन्ग फ्लोई ड्रेसेससह पँट्स, सॉफ्ट प्लाजोच घालताना दिसतात. तुम्हाला जास्त क्लीन आणि स्लीक दाखवणारे आऊटफिट्स केवळ फेस्टिव्हल वेअरसाठीच नाही तर रोज ऑफिसला जाण्यासाठीही उपयोगी ठरू शकतात. तुम्ही सणाला मॉडर्न लुकसह पारंपरिक घालण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अशा स्ट्रेट पँट्स एथनिक कुरती आणि लाईट चंकी दागिन्यांसह घाला. 

5. पॅटर्न आणि रंग

Instagram
Instagram

यावेळी फॅशनमध्ये जे आधीपासून फ्लोरल पॅटर्न चालू आहे त्याबरोबरच ज्योमॅट्रिक पॅटर्नदेखील चालेल. याशिवाय हलक्या हँडक्राफ्टेड कामासह सॉलिड रंग जास्त चालतील. सणासुदीला आपल्या आवडत्या रंगामध्ये कोरल कलर्ससह आयवरी आणि गोल्ड सर्वांना आवडतात. बऱ्याच लग्नांमध्येही तुम्ही ही फॅशन पाहिली असेल. त्यामुळे सध्या हे स्टाईल स्टेटमेंंट झालं असून तुम्ही आताच्या फेस्टिव्ह सीझनलाही याचा वापर करू शकता. 

सणाला साडी नेसून दिसायचं असेल स्टायलिश तर फॉलो करा Draped Saree

फॅशन स्टायलिस्टचा सल्ला

फॅशनसंबंधित सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा आत्मविश्वास आणि तुम्हाला मिळणारा आराम. तुम्हाला या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल वाटणं गरजेचं आहे. आमच्या सल्ल्यानुसार, तुम्हाला जे कपडे कम्फर्टेबल वाटतील तेच तुम्ही घाला. ट्रेंड लक्षात घेणं गरजेचा असला तरीही तुम्हाला एखादा पेहराव आवडत नसेल तर तुम्हाला हवा तसा पेहराव तुम्ही घालू शकता. तुम्ही एखाद्या वेगळ्या स्टायलिश लुकमध्ये कम्फर्टेबल असाल तर तुम्ही त्याचा वापर करावा. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या आऊटफिट्ससह मॅचिंग अॅक्सेसरीजचा वापर करा. उदाहरणार्थ दागिने, चप्पल आणि तुमच्या आवडीची पर्स. 

(स्टूडियो कासा 9 (Studio CASA 9) च्या संस्थापक निकिता कौशिकच्या मतानुसार)