Spa आता करता येईल घरच्या घरी, वापरा या 6 Tricks

Spa आता करता येईल घरच्या घरी, वापरा या 6 Tricks

कोणीही काहीही म्हटलं तरी घर आणि काम या दोन्ही गोष्टी एकत्र सांभाळण्याची कला ही महिलांशिवाय कोणालाच चांगली जमू शकत नाही. सततच्या या धावपळीतून थोडासा ब्रेकही गरजेचा आहे. अशावेळी सर्वात पहिला समोर पर्याय येतो तो म्हणजे स्पा (Spa). अशा धावपळीतून तुम्हाला स्पा सेशनची गरज तर नक्कीच असते. पण बऱ्याचदा बाहेर पार्लरमध्ये हे स्पा सेशन सर्वांनाच परवडतं असं नाही. आता लवकरच सणांना सुरुवात होते आहे. तर आता तरी निदान आपल्यासाठी वेळ काढून थोडंसं स्पा करून घ्या. तुम्हाला आता घरच्या घरीदेखील स्पा करता येईल. आम्ही तुम्हाला इथे सोप्या स्पा ट्रि्क्स सांगणार आहोत. त्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा. 

1. Exfoliation - ब्राऊन शुगर स्पा ट्रिटमेंट

Shutterstock

जेव्हा गोष्ट cleansing, मसाज आणि exfoliation ची असते तेव्हा स्क्रब हा साबणापेक्षा अधिक चांगला काम करू शकतो. स्क्रब त्वचेच्या texture चा दर्जा सुधारतो आणि त्वचा अधिक मऊ आणि मुलायम बनवतो. तुम्ही घरच्या घरी स्क्रब बनवून एक परिणामकारक स्पा ट्रिटमेंट करू शकता.

स्टेप 1 - एका भांड्यात 1 कप साखर घ्या 

स्टेप 2 – त्यामध्ये कच्चं ओटमील आणि 3 चमचे ऑलिव्ह ऑईल (olive oil) घाला 

स्टेप 3 – हे सर्व मिश्रण नीट एकत्रित करा 

स्टेप 4 – आता आपल्या कोरड्या त्वचेवर हे मिश्रण बोटांनी नीट लावा 

स्टेप 5 – हळूहळू हलक्या हाताने मसाज करा (घाई अजिबात करू नका) 

स्टेप 6 – हा स्क्रब साधारण 20-30 मिनिट्स लावून ठेवा आणि मग धुवा

2. रेशमी मुलायम केस – Egg Yolk स्पा ट्रिटमेंट

Shutterstock

तुम्हाला माहीत आहे का की आपला प्रत्येक केस हा अमीनो अॅसिड आणि प्रोटीनपासून बनलेला असतो. तुमच्या केसांना अंड्यापासून त्यामुळे योग्य पोषण मिळतं. हे तुमच्या केसांना repair करण्यासह मजबूत बनवतं. त्यामुळे तुम्हाला जर हेअर स्पा करायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. 

स्टेप 1 – एक अंडं (egg) फोडून त्यातील पिवळा भाग एका ग्लास कंटेनरमध्ये काढा 

स्टेप 2 – त्यामध्ये एक चमचा mayonnaise, 2 चमचे ऑलिव्ह ऑईल (olive oil) आणि जर तुमच्या स्वयंपाकघरात avocado असेल तर ते बारीक कापून यामध्ये मिसळा 

स्टेप 3 – हे मिक्स व्यवस्थित मिसळून घ्या आणि 5 मिनिट्ससाठी तसंच ठेवा 

स्टेप 4 – हे लावण्यापूर्वी तुम्ही केसांना कंडिशनर लावून घ्या कारण त्यापैकी कोणताही घटक जर तुमच्या scalp ला सूट झाला नाही तर तुम्हाला त्रास होणार नाही.  

स्टेप 5 – केसांवर नीट कंडिशनर लावल्यावर त्यावर हे मिश्रण लावा आणि मसाज करा

स्टेप 6 – हे एक तास असंच राहू द्या आणि मग कोमट पाण्याने धुवा

कोरड्या त्वचेला म्हणा Bye… करा असे 6 घरगुती उपाय

3. Choco Facial – चेहऱ्यासाठी Chocolate क्रिम स्पा ट्रिटमेंट

Shutterstock

तुम्हाला मऊ, मुलायम आणि निरोगी त्वचा हवी असल्यास, त्यासाठी chocolate क्रिम हा योग्य पर्याय आहे. हे क्रिम नैसर्गिक मॉईस्चराईजरप्रमाणे काम करतं आणि dead स्किन सेल्स काढून त्वचा अधिक तजेलदार बनवतं आणि त्याशिवाय याचा सुगंधही चांगला येत राहातो. 

स्टेप 1 – एक स्टील कंटेनरमध्ये 1/3 कप कोको पावडर घ्या 

स्टेप 2 – यामध्ये 3 चमचे हेवी रिच क्रिम मिक्स करा 

स्टेप 3 – हे तोपर्यंत ढवळा जोपर्यंत याचा क्रिमचा रंग ब्राऊन होत नाही

स्टेप 4 – यामध्ये बारीक कापलेलं पनीर आणि 3 चमचे मध मिसळा 

स्टेप 5 – हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या 

स्टेप 6 – ब्रशच्या मदतीने नंतर चेहऱ्यावर लावा आणि अर्धा तास साधारण सुकण्यासाठी राहू द्या

स्टेप 7 – सुकल्यानंतर थंड पाण्याने धुवा

4. डोळ्यांसाठी – काकडी आणि थंड टी बॅग्जची स्पा ट्रिटमेंट

Shutterstock

तुम्हाला नेहमी puffy आणि लाल डोळ्यांची समस्या उद्भवते का? असं असेल तरी घाबरून जाऊ नका. हे सगळ्यांबरोबर होतं. शांत राहून तुम्ही ही स्पा ट्रिटमेंट करून घ्या. तुम्हाला याचे परिणाम लवकर हवे असतील तर आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हे करून पाहू शकता.

स्टेप 1 – काकडी कापून घ्या आणि त्याचे गोल तुकडे तुम्ही तुमच्या डोळ्यांवर ठेवा 

स्टेप 2 – या तुकड्यांच्या वर थंड थंड (chilled) टी बॅग्ज ठेवा. हे डोळ्यांना थंडावा देतात 

स्टेप 3 – हे तुमच्या डोळयांवर ठेऊन द्या आणि आरामात एक तास झोपून जा 

स्टेप 4 – तुम्हाला जेव्हा जाग येईल तेव्हा काकडी आणि टी बॅग्ज काढा आणि मग चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या

Hair Spa: घरीच पार्लरप्रमाणे 'हेअर स्पा' कसा कराल

5. मऊ मुलायम पायांसाठी – सिट्रस ज्युस स्पा ट्रिटमेंट

Shutterstock

खरं तर तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागाला प्रेम आणि काळजीची गरज असते. तुम्हाला जर वाटत असेल की, तुमचे पाय निरोगी, सुंदर आणि चमकदार दिसावेत तर तुम्ही त्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही सिट्रस ज्युसचा वापर करा. यामुळे तुमचे पाय मऊ, मुलायम आणि चमकदार होतात. 

स्टेप 1 – एका भांड्यात 1 ¼ कप साखर घ्या

स्टेप 2 – त्यामध्ये ½ कप तेल घाला 

स्टेप 3 – हे नीट मिसळून घ्या आणि मग त्यामध्ये 3 चमचे सिट्रस ज्युस मिक्स करा 

स्टेप 4 – ज्युस व्यवस्थित मिसळून घ्या आणि मग पायांवर हलक्या हाताने मसाज करा

स्टेप 5 – अर्धा तास हे असंच राहू द्या आणि मग आंघोळ करा 

स्टेप 6 – आंघोळ केल्यानंतर तुमच्या पायांवर olive oil लावा. हे एक चांगल्या मॉईस्चराईजरप्रमाणे काम करतं

6. तुमच्या मनाप्रमाणे सुंदर पाय – मध आणि साखरेची स्पा ट्रिटमेंट

Shutterstock

तुम्ही जर ही स्पा ट्रिटमेंट घरी केलीत तर तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन पेडीक्युअर करण्याची गरज नाही.  मध आणि साखर तुम्हाला यामध्ये चांगली मदत करतील. त्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करायला लागतील. 

स्टेप 1 – एका लहानशा वाटीत ¼ कप साखर, 1/8 कप olive oil आणि एक चमचा मध मिसळा 

स्टेप 2 – हे मिश्रण तोपर्यंत मिक्स जोपर्यंत साखर विरघळत नाही

स्टेप 3 – हे मिश्रण पायावर लावा आणि नीट फूट मसाज करा

स्टेप 4 – मसाज साधारण 15-20 मिनिट्स करा आणि मग पाय कोमट पाण्याने धुवा

टिप: हे मिश्रम तुम्ही आपल्या हातावर आणि खांद्यावरदेखील वापरू शकता

आजच्या काळातंही तुम्हाला सौंदर्य मिळवून देतात या ‘पुरातन’ गोष्टी