काही मुलींना आपल्या प्रायव्हेट भागांवर हॉट वॅक्स लावून बिकिनी वॅक्स करण्याची सवय असते तर काही जणींना याबाबत विचार केला तरी घाबरायला होतं. तुम्हीदेखील या मुलींपैकी एक असाल तर, तुमच्यासाठी बिकिनी शेव्ह हा एक चांगला पर्याय आहे. पण बिकिनी शेव्ह करताना रेजरने कट तर होणार नाही ना अशी भीतीही तुमच्या मनात असते. मग अशावेळी नक्की काय करायचं असाही विचार मनात येतो. पण या विचारांना आता आम्ही उत्तर देणार आहोत. आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स आणल्या आहेत जे तुम्ही बिकिनी शेव्ह करत असाल तर, त्याचा त्रास होऊ देणार नाही आणि तुमचं हे शेव्ह स्ट्रेस फ्री करण्यास फायदेशीर ठरतील. त्यामुळे आता प्युबिक हेअर काढण्यासाठी आणि स्मूथ बिकिनी लाईनला हॅलो म्हणण्यासाठी तयार व्हा!
बिकिनी शेव्ह करण्यापूर्वी ट्रिम करून घेणं आवश्यक आहे. काहीही करण्यापूर्वी तुम्हाला केस व्यवस्थित ट्रिम करून घेण्यासाठी एका चांगल्या आणि शार्प कात्रीची गरज आहे. एका हातात लहान आरसा घेऊन तुम्ही कात्रीच्या मदतीने केस ट्रिम करून घ्या, जेणेकरून शेव्ह करत असताना तुमचे प्रायव्हेट भागावरील केस त्यामध्ये अडकणार नाहीत. केस वाढले असतील तर ते रेजरमध्ये अडकतात आणि त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. कारण यामुळे रेजरने तुमच्या त्वचेलाही नुकसान होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ यामध्ये तुमची त्वचा कट होण्याची शक्यता असते. असं होणं कोणालाही आवडणार नाही. त्यामुळे काळजीपूर्वक हे करून घ्या.
आंघोळ करायला गेल्यावर लगेच बिकिनी शेव्ह करू नका. 5-10 मिनिट्स वाट पाहा आणि हेअर फॉलिकल्स गरम पाणी आणि वाफेमुळे जरा सॉफ्ट आणि सैलसर होऊ द्या. कारण जाड्या केसांवर रेजर काम करणार नाही. रेजर करण्यापूर्वी तो भाग व्यवस्थित साफ करून घ्या. जिद्दी इन्ग्रोंन हेयर (जे कोणालाच आवडत नाहीत) असल्याने तुम्ही ते कमी करण्यासाठी आणि सोप्या पद्धतीने काढून टाकण्यासाठी तुम्ही सर्वात पहिले हा भाग एक्स्फोलिएट करून घ्या. कोणत्याही प्रकारची घाई केल्यास, तुमच्या त्वचेलाच त्याने नुकसान पोहचण्याची शक्यता असते.
तुम्हाला जर सोपं आणि व्यवस्थित बिकिनी शेव्ह करायचं असेल तर आणि कोणतीही जखम आपल्या प्रायव्हेट भागाला होऊ द्यायची नसेल तर ही स्टेप सर्वात महत्त्वाची आहे. यासाठी तुम्ही सुपर माईल्ड आणि गंध नसलेलं अर्थात सेंट फ्री शेव्हिंग क्रिम अथवा जेलचा वापर करायला हवा. सुगंध असलेल्या शेव्हिंग क्रिममध्ये असलेल्या रसायनांमुळे त्वचा जळजळते. त्यामुळे अशा क्रिमचा वापर करा ज्यामध्ये रसायन नसेल. तुमच्याजवळ शेव्हिंग फोम नसल्यास, तुम्ही बेबी ऑईलचादेखील वापर करू शकता.
सर्वात पहिले तुम्ही असं रेजर वापरण्याचा विचार करा जे एकदम नवीन आणि शार्प नसेल. तुमच्याकडे बिकिनी एरिया, पाय आणि अंडरआर्म्स यासाठी वेगवेगळे रेजर असायला हवेत. प्युबिक हेअर काढण्यासाठी तुम्ही शेव्हिंग योग्य तऱ्हेने करताय की नाही हेदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. यासाठी तुम्ही रेजर हलक्या हातांना केसांच्या वाढीच्या दिशेने ग्लाईड करा, कारण याच्या उलट दिशेने तुम्ही शेव्ह केल्यास, तुमची त्वचा जळजळू शकते आणि त्यावर पुळ्याही येण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा रेजरचा वापर करा ज्याबरोबर ल्युब्रिकेटिंग स्ट्रिप्स मिळतात. तसंच तुम्ही हे रेज खालच्या दिशेने दाबू नका कारण असं केल्यास तुमची त्वचा कापण्याची शक्यता असते. तसंच लक्षात ठेवा की, हा भाग अतिशय नाजूक आहे. त्वचा खेचून तुम्ही टाईट करा आणि लहान लहान स्ट्रोकचा वापर करा. शेव्ह नेहमी हलक्या हातांनी आणि हळूहळू करावा. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये तुम्हाला घाई करून चालत नाही. कारण त्या ठिकाणी तुमची त्वचा कापली गेल्यास, तुम्हाला नंतर जास्त प्रमाणात त्रास होऊ शकतो हे नेहमी लक्षात ठेवा.
तुम्ही प्युबिक हेअर काढून टाकल्यानंतर जर तुमच्या बिकिनी लाईनवर लाल आणि पांढऱ्या पुळ्या आल्या तर हे तुमच्या रेजरमुळे घडलं आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही यापासून वाचण्यासाठी नेहमी लक्षात घ्यायला हवं की, एकाच ठिकाणी रेजर सतत फिरवू नका. तसंच याची लाली कमी करण्यासाठी शेव्हिंग झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बेबी पावडर लावा. असं काही दिवसांपर्यंत तुम्हील केलंत ही हा लालसरपणा कमी होईल. तसंच खाज येणाऱ्या भागाला तुम्ही बर्फ अथवा कोरफड जेलदेखील लावू शकता. पण हे सगळं करूनही कमी न झाल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणंच योग्य आहे. पण चिंता करण्याची गरज नाही कारण ही तितकीशी गंभीर गोष्ट नाही. औषधांनी हे बरं होतं.
तुम्हाला हे माहीत आहे ना की, प्युबिक हेअर काढल्यानंतर तुम्हाला खाज आल्यासारखं वाटू शकतं. याचं कारण असतं ते म्हणजे तुमची कोरडी झालेली त्वचा. अशा भागावर खाज येणं हे अतिशय नैसर्गिक आहे. पण हे आपल्यालाही आवडत नाही. यापासून वाचण्यासाठी तुम्ही आंघोळ करताना त्वचा व्यवस्थित भिजवून घ्या, त्यानंतरच शेव्हिंग क्रिम लावा आणि साबणाचा वापर करू नका. त्यानंतर हलक्या हातांना स्ट्रोक करा आणि बिकिनी शेव्ह करून झाल्यावर सुगंधरहीत लोशन त्या भागावर लावून मॉईस्चराईज करा. सुरक्षित शेव्हिंगसाठी नेहमी रेजरचा वापर करा आणि आठवड्यातून एकदा हा भाग एक्स्फोलिएट करा. त्यापेक्षा अधिकवेळा करू नका. शेव्हिंगनंतर कॉटनची अंडरवेअर घाला, ज्यामुळे तुमची त्वचा व्यवस्थित श्वास घेऊ शकेल. तसंच शेव्ह केल्यानंतर त्वरीत सॅटिन पँटी अथवा थाँग्स घालणं चुकीचं ठरेल. त्यामुळे याचा वापर करू नका. या गोष्टींची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे.