तुमच्या डोळ्यांखाली काळे डाग अर्थात dark circles दिसतात का? तुमच्या नेहमीच्या complexion पेक्षा हे डाग काळे आहेत का? आजकाल ही खूपच कॉमन समस्या आहे. मुलींच्या डोळ्यांखाली आलेले हे डाग तुम्हाला नेहमीच त्रासदायक ठरतात. याची अनेक कारणं असू शकतात. झोप पूर्ण न होणं, तणावग्रस्त असणं, वाढतं वय, आपल्या मोबाईलवर तासनतास बघत बसणं अशी अनेक कारणं आहेत. पण हे काळे डाग काढण्यासाठी सर्वात पहिले तुम्ही आपल्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्यासाठी वेळ काढा, झोप व्यवस्थित घ्या आणि तणाव कमी करा. तुम्ही जर महाग eye creams चा वापर करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला घरगुती उपायांनीदेखील हा काळेपणा दूर करता येऊ शकतो. आम्ही तुम्हाला इथे घरगुती उपायांनी dark circles कसे कमी करता येतील ते सांगणार आहोत.
डोळ्यांखाली नक्की काळे डाग का निर्माण होतात असा प्रश्न नेहमीच सतावतो. पाहूयात नेमकी याची कारणं काय आहेत -
अनुवंशिक - काही जणांना डोळ्यांखाली आलेले काळे डाग हे अनुवंशिक असतात. त्यावर बऱ्याचदा काहीही उपचार केले तरीही ते डाग तसेच राहतात.
सूर्यकिरण - सूर्यकिरण हे चेहऱ्यावर डाग येण्याचं मुख्य कारण आहे. त्वचेतील मेलॅनीनचं प्रमाण सूर्यकिरणांमुळे वाढतं. जेव्हा आपली त्वचा सतत सूर्यकिरणांच्या संपर्कात येते तेव्हा हे मेलॅनीन कमी अधिक प्रमाणात वाढतं आणि काळे डाग वाढतात.
तणाव - आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात प्रचंड तणाव येतो. तसंच झोपही पूर्ण होत नसते. त्यामुळे तुमच्या डोळयांखाली काळी वर्तुळं जमा होऊ लागतात.
वाढतं वय - वाढत्या वयात त्वचेसंबंधी अनेक समस्या निर्माण होत असतात. त्यामध्येच डोळ्यांखाली डाग येण्यासारखीदेखील समस्या उद्भवते. वयाच्या चाळीशीनंतर साधारण त्वचेची पुनर्निर्मितीची क्षमता कमी होते. त्यामुळे काळे डाग अधिक वाढते.
प्रदूषण - प्रदूषणामुळे तुमच्या त्वचेवरील छिद्रांमध्ये धूळ जमा होते आणि त्याचा परिणाम चेहऱ्यावर आणि डोळ्यांखाली डाग निर्माण होण्यात होतो.
डोळ्यांखाली काळे डाग पडू नयेत यासाठी आपल्याला काय काळजी घेता येईल ते आपण पाहूया. याची काळजी आपण नक्कीच घेऊ शकतो. त्यानंतरही काळे डाग आले तर त्यावर घरगुती उपचार हे आहेतच. वाचूया कशी घ्यायची काळजी
काळे डाग येण्याचं कारण म्हणजे सूर्यकिरण. त्यामुळे तुम्ही कधीही घराच्या बाहेर जाणार असाल तेव्हा नियमित SPF चा वापर करा. त्याशिवाय तुम्ही घराबाहेर पडलात तर तुम्हाला या सूर्यकिरणांच्या त्रासाने चेहऱ्यावर नक्कीच काळे डाग येऊ शकतात.
उन्हात जाताना नियमित तुम्ही टोपी अर्थात हॅट अथवा गॉगल्सचा वापर करा. सूर्याची किरणं डायरेक्ट तुमच्या त्वचेवर येण्यापासून वाचवण्यासाठी तुम्हाला याचा फायदा मिळतो. हॅट आणि गॉगल्स वापरून तुम्ही चेहरा आणि तुमची त्वचा सूर्यकिरणांपासून वाचवणं हा अतिशय सोपा उपाय आहे.
आजकाल सतत कामाचा आणि इतर गोष्टींचाही तणाव असतो. पण त्याचा तणाव न घेणं हेदेखील तुमच्याच हातात आहे. सतत काम करत राहण्यापेक्षा कधीतरी रिलॅक्स होऊन स्वतःसाठी वेळ काढा. तसंच आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर वेळ घालवा. यामुळे तणाव कमी होतो.
तुम्हाला जर अनुवंशिक डोळ्यांखाली डाग येण्याची माहिती आधीपासूनच असेल तर त्याची मुळापासूनच काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्ही नियमितपणे तुमच्या डोळ्यांची काळजी घेत नेहमी डोळ्यांखाली थंड दूध अथवा काकडी ठेवण्याचा वापर करा. यामुळे तुमची डोळ्यांखालील त्वचा ही अधिक चांगली राहाते.
डोळ्यांखाली काळे डाग होण्याची नक्की काय कारणं आहेत हे आपण जाणून घेतलं पण यावर नक्की काय घरगुती उपाय करू शकतो ते पाहूया
टॉमेटोमध्ये भरपूर प्रमाणात असणारी पोषक तत्व आणि अँटिऑक्सिडंट्समुळे कॅन्सरसारख्या आजाराशी लढण्याची क्षमता वाढते. दृष्टी, पचनक्रिया, रक्तप्रवाह यांची देखभाल करण्यासाठीही टॉमेटोचा उपयोग होतो. तुम्हाला या गोष्टी कदाचित माहीत असतील पण तुम्हाला हे माहीत आहे का? टॉमेटो हा एक ब्लिचींग एजंटदेखील आहे.
Step 1: एका वाटीत एक चमचा टॉमेटोचा रस आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा. दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्या
Step 2: कापसाच्या बोळ्याने हे मिश्रण तुम्ही तुमच्या डोळ्यांखालच्या काळ्या झालेल्या वर्तुळांना लावा
Step 3: 10 मिनिट्स हे तसंच राहू द्या त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या
टॉमेटोप्रमाणेच बटाटादेखील तुमचा रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी फायदेशीर ठरतो. काळ्या डागांना हे काढून टाकण्यासाठी मदत करतं आणि त्याशिवाय झोपल्यानंतर डोळ्यांना येणारी सूजही कमी करतो.
Step 1: 1 अथवा 2 थंड बटाट्याचा रस काढून घ्या
Step 2: या रसामध्ये कापसाचा बोळा घालून मग तुमच्या eyelids ठेवा आणि 10-15 मिनिट्स तसंच ठेवा
Step 3: नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या
बदाम केवळ तुमच्या केसांसाठी नाही तर तुमच्या त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. यामध्ये असणारे विटामिन ई त्वचेसाठी वरदान ठरतं.
Step 1: झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या काळ्या वर्तुळांना बदामाचं तेल लावा
Step 2: लावल्यावर मसाज करा जेणेकरून तेल तुमच्या त्वचेमध्ये मुरू द्यावं
Step 3: रात्रभर तसचं ठेवा आणि सकाळी उठल्यावर थंड पाण्याने धुवा
चहामध्ये कॅफेन आणि अँटिऑक्सिडंट्सचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे तुम्ही सकाळी सकाळी चहा पिऊन तुम्हाला ताजंतवानं वाटतं. तुमच्या डोळ्यांच्या पफीनेससाठी हा पर्याय खूपच चांगला ठरतो.
Step 1: 2 Green tea bags फ्रिजमध्ये ठेवा
Step 2: थंड झाल्यानंतर तुमच्या दोन्ही डोळ्यांवर ठेवा
Step 3: 10-15 मिनिट्स तसंच राहू द्या आणि मग थंड पाण्याने डोळे धुवा
हळद हे फक्त पदार्थांमध्ये वापरण्याची वस्तू नाही. तुमच्या त्वचेसाठीही हळद गुणकारी असते. चेहऱ्याचा रंग उजळवण्यासाठी याचा उपयोग केला जातो हे सर्वांना माहीत आहेच. पण तुमच्या डोळ्यांखालील डाग कमी करण्यासाठीही याचा उपयोग करण्यात येतो.
Step 1: एका वाटीत अननसाचा रस काढून घ्या
Step 2: यामध्ये 2 चमचे हळद घालून मिक्स करा
Step 3: ही पेस्ट व्यवस्थित तयार झाली की काळ्या वर्तुळांवर लावा आणि सुकण्यासाठी साधारण 10 मिनिट्स वाट पाहा
Step 4: सुकल्यावर ओल्या कपड्याने पुसून घ्या
काकडी अतिशय थंड असते आणि त्वचेवर तजेलदारपणा आणण्यासाठीही याचा उपयोग केला जातो. डोळ्यांखालील काळे डाग काढण्यासाठी ही उपयुक्त ठरते. याचा वापर करणंही सोपं आहे.
Step 1: काकडीचे गोलाकार काप काढून घ्या
Step 2: हे काप काही वेळ फ्रिजमध्ये थंड करायला ठेवा
Step 3: अर्ध्या तासानंतर फ्रिजमधून काढून तुमच्या डोळ्यांवर ठेवा
Step 4: 15 मिनिट्स नंतर काढून डोळे धुवा
गुलाबपाणी तुम्हाला नेहमी फ्रेश आणि ताजंतवानं करतं. केवळ चेहऱ्यासाठीच नाही तर डोळ्यांनाही यामुळे थंडावा मिळतो.
Step 1: एका भांड्यात थंड गुलाब पाणी घ्या आणि त्यामध्ये 2 कापसाचे बोळे बुडवा
Step 2: कापसाचे हे बोळे 15 मिनिट्स तसंच राहू द्या
Step 3: नंतर तुमच्या डोळ्यांखाली आलेल्या काळ्या वर्तुळांवर हे 10 मिनिट्स ठेवा
Step 4: कोमट पाण्याने डोळे धुवून घ्या
अगदी अनादी काळापासून सौंदर्यासाठी केशराचा वापर करण्यात येत आहे. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि अँटिइन्फ्लेमेटरी तत्व तुमच्या डोळ्यांखालील काळी वर्तुळं कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
Step 1: एक चमचा दूध घेऊन त्यामध्ये केशर भिजवून ठेवा
Step 2: काही वेळानंतर हे मिश्रण तुमच्या डोळ्याखाली लावा आणि मसाज करा
Step 3: रात्री झोपताना हे करा आणि रात्रभर तुम्ही हे मिश्रण तसंच डोळ्याखाली मुरू द्या
Step 4: सकाळी उठल्यानंतर हे धुवा. चांगल्या परिणामासाठी तुम्ही रोज हे करा.
वाचा - आता Underarms मध्ये दिसणार नाहीत काळे डाग...घालवा ‘अशा’ पद्धतीने
कोरफड हे त्वचेसाठी उत्कृष्ट औषध आहे. याचे अनेक फायदे आहेत. त्यापैकीच एक फायदा म्हणजे डोळ्यांखालील काळी वर्तुळं कमी करण्यासाठी होतो. तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग कमी करून चेहरा अधिक उजळवण्यासाठी तुम्ही कोरफडचा वापर करू शकता.
Step 1: कोरफडमधील जेल काढून तुमच्या डोळयांखालील काळ्या वर्तुळांवर लावा
Step 2: साधारण 1 मिनिट मसाज करा
Step 3: रात्री झोपताना हे करा आणि रात्रभर तुम्ही हे मिश्रण तसंच डोळ्याखाली मुरू द्या
Step 4: सकाळी उठल्यानंतर हे धुवा. चांगल्या परिणामासाठी तुम्ही रोज हे करा.
थंड दूध हा अगदी पूर्वीपासून करण्यात येणारा उपाय आहे. दुधामध्ये असणाऱ्या लॅक्टिक अॅसिडमुळे डोळ्यांखालील डाग जाण्यास मदत मिळते. तसंच डोळ्यांखाली येणाऱ्या सुरकुत्या आणि डाग कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो.
Step 1: एका वाटीत दूध घ्या आणि कापसाचा तुकडा त्यात बुडवून ते शोषून घ्या
Step 2: डोळ्यांखालील काळ्या डागांवर ते लावा आणि साधारण 15 मिनिट्स तसंच ठेवा
Step 3: थंड पाण्याने त्यानंतर चेहरा धुवून घ्या आणि स्वच्छ करा
संत्र्याच्या रसामध्ये विटामिन सी जास्त प्रमणात असतं जे तुमच्या डोळ्यांखाली आलेल्या काळ्या डागांसाठी उपयुक्त ठरतं. तसंच यामध्ये असणारं सायट्रिक अॅसिडदेखील तुमच्या काळ्या डागांवर चांगला परिणाम दर्शवतं.
Step 1: संत्र्याचा रस काढून घ्या
Step 2: डोळ्यांखालील काळ्या डागांवर ते लावा आणि साधारण 30 मिनिट्स तसंच ठेवा
Step 3: अतिशय हळूवारपणे कापसाच्या सहाय्याने हे पुसून काढा आणि नंतर चेहरा धुवा
ताक आणि हळदीची पेस्ट जेव्हा तुम्ही बनवता तेव्हा हे अतिशय उत्तम मिश्रण आहे. या दोन्हीतील घटकांमुळे काळे डाग निघून जाण्यास मदत होते.
Step 1: ताक आणि हळद नीट मिक्स करून पेस्ट करून घ्या
Step 2: डोळ्यांखालील काळ्या डागांवर ते लावा आणि साधारण 30 मिनिट्स तसंच ठेवा
Step 3: चांगल्या परिणामांसाठी तुम्ही आठवड्यातून किमान तीन वेळा तरी हा प्रयोग नक्की करा
नारळाच्या तेलाचा वापर केल्याने तुमची त्वचा अधिक नरम आणि मुलायम होते त्याशिवाय निरोगी राहते. काळ्या डागांना काढून टाकण्यासाठी हा सर्वात सोपा आणि कमी खर्चिक उपाय आहे.
Step 1: डोळ्यांखालील नारळाचं तेल तुम्ही क्लॉकवाईज आणि अँटिक्लॉकवाईज लावा
Step 2: रात्रभर तुम्ही हे तेल त्वचेमध्ये मुरू द्या आणि सकाळी उठल्यानंतर तुमचा चेहरा धुवा
वाचा - काळवंडलेल्या buttocks च्या त्वचेसाठी सोपे घरगुती उपाय
हर्बल टी तुमच्या डोळ्यांखालील काळे डाग कमी करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. यामध्ये असणाऱ्या विविध वनस्पतींमुळे तुम्हाला त्याचा फायदा मिळतो. तुमची त्वचा अधिक सुंदर होण्यासाठीही याचा उपयोग तुम्हाला होतो.
Step 1: एक कप पाण्यामध्ये टी बॅग घालून ठेवा
Step 2: ही टी बॅग तुम्ही तुमच्या डोळ्यांखालील काळ्या डागांवर लावा आणि काही वेळ तसंच ठेवा. नंतर चेहरा धुवा
बेकिंग सोड्यामध्ये अँटिइन्फ्लेमेटरी गुण आढळतात, जे तुमच्या डोळ्याखाली झालेले काळे डाग काढून टाकण्यास मदत करतात. पुन्हा डाग न येण्यासाठीही हे फायदेशीर आहे.
Step 1: एक चमचा बेकिंग सोडा कोमट पाण्यात घाला आणि नीट मिक्स करा
Step 2: यामध्ये कापसाचा बोळा बुडवा आणि नंतर त्याच बोळ्याने तुमच्या डोळ्यांखालील झालेल्या काळ्या डागांवर मसाज करा. असं तुम्ही आठवड्यातून तीन वेळा तरी चांगल्या परिणामांसाठी करणं फायदेशीर ठरेल.
डोळ्यांखालील काळी वर्तुळं लपवण्यासाठी तुम्ही काही मेकअप ट्रिक्सदेखील करू शकता. तुम्हाला जर कितीही उपाय करूनही योग्य परिणाम मिळत नसेल तर तुम्ही आम्ही सांगत आहोत त्या मेकअप ट्रिक्स नक्की ट्राय करू शकता.
1. सर्वात पहिल्यांदा तुम्ही तुमचा चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील अथवा डोळ्यांखालील सूज कमी होण्यास मदत होईल
2. यानंतर तुमच्या संपूर्ण चेहऱ्याला तुम्ही मॉईस्चराईजर लावून घ्या. त्यानंतर तुमच्या डोळ्यांखाली काळ्या वर्तुळांवर मॉईस्चराईजर लावा अथवा आयक्रिम लावा. यामुळे तुमचा मेकअप चांगला होईल आणि काळे डाग योग्यरित्या झाकले जातील. तुमचे डोळे चोळल्याने सुरकुत्या वाढतील हे सततची सवय असल्यास, होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही कधीतरी हे करणार असाल तर त्याला काहीच हरकत नाही
3. मेकअप जास्त काळ टिकावा म्हणून तुम्ही सर्वात पहिले प्राईमरचा करा वापर. तुमचा मेकअप जास्त काळ टिकण्यासाठी याचा उपयोग होतो. पण याचा उपयोग तुम्ही फाऊंडेशन लावण्याच्या आधी करायला हवा. तुमची त्वचा जर कोरडी असेल तर मॉईस्चराईजर प्राईमरचा वापर करा. त्वचा जर निस्तेज असेल तर इल्युमिनिटिंग प्राईमर वापरा आणि जर त्वचा तेलकट असेल तर मॅटिफाईंग प्राईमरचा वापर करा.
4. यानंतर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला फाऊंडेशन लावा. फाऊंडेशन हा कन्सीलरसाठी बेस असतो. डोळ्याखालील अथवा चेहऱ्यावरील काळे डाग लपवण्यासाठी याचा उपयोग करण्यात येतो
5. हे झाल्यावर तुमच्या स्किन टोनपेक्षा एक लेव्हल कमी असणारं कन्सीलर तुम्ही निवडा. तुम्ही तुमच्या डोळ्यांखाली हे व्यवस्थितरित्या लावा. अजिबात चोळून लावू नका. अन्यथा पॅच दिसण्याची शक्यता असते. सहसा स्टिक कन्सीलरचा वापर करा. हे झाल्यावर मेकअप नीट सेट करण्यासाठी तुम्ही कन्सीलर पावडरचा उपयोग करा. जेणेकरून तुमच्या डोळ्यांखालील काळी वर्तुळं अजिबात दिसणार नाहीत. तसाच कन्सीलरचा पॅचही दिसणार नाही
6. व्यवस्थित ब्लेंड करून घ्या. कारण जर पॅच दिसले तर तुमचा चेहरा आणि डोळे अधिक खराब दिसतात. त्यामुळे ब्लेंड करून घेणं अत्यंत गरजेचं आहे
7. हे सगळं करून झाल्यावर केवळ गालांना तुम्ही ब्लश अप्लाय करा आणि काळ्या डागांंपासून तुमचा चेहरा सुटका मिळवलेला तुम्हाला दिसून येईल. बाहेर जाताना तुम्ही अशा सोप्या पद्धतीने तुमच्या डोळ्यांखालील काळे डाग लपवू शकता
डोळ्याखाली काळी वर्तुळं होण्याची खरं तर अनेक कारणं आहेत. पण त्यापैकी हेदेखील महत्त्वाचं कारण आहे. झोप अपुरी राहिल्याने काळी वर्तुळं होतात. त्यामुळे पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे.
हो घरगुती उपाय तुम्ही जर नियमित आणि योग्य रितीने केले तर घरगुती उपाय करून डोळ्यांखालील काळी वर्तुळं निघून जाण्यास मदत मिळते. फक्त तुम्ही ते उपाय नियमित करणं आवश्यक आहे.
औषधांमध्ये असणारी उष्णता ही चेहऱ्यावर मुरूमं आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळं निर्माण करण्यास काही प्रमाणात कारणीभूत ठरतात. त्यामुळे तुम्ही औषध घेत असताना काळजी घेणं आवश्यक आहे.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या क्लिक करा.