प्रत्येक मुलीला माहीत असायलाच हव्यात Masturbation बद्दल ‘या’ 7 गोष्टी

प्रत्येक मुलीला माहीत असायलाच हव्यात Masturbation बद्दल ‘या’ 7 गोष्टी

तुम्ही जर ही स्टोरी वाचण्यासाठी क्लिक केलं आहे तर नक्कीच तुम्हाला Masturbation बद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे. बऱ्याच जणींना याबद्दल माहीत असतं. तर काही जणींना लाजेपोटी हा शब्दही उच्चारायला नकोसा वाटतो. पण खरं तर हेच आहे की, एका विशिष्ट वयानंतर सेक्स (Sex) ही शरीराची गरज असते. आपल्याला हा आनंद हवा असतो. पण ही गोष्ट अशी आहे ज्याबद्दल अजूनही खुलेआम बोललं जात नाही. या लेखातून आम्ही तुम्हाला Masturbation बद्दल काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या प्रत्येक मुलीला माहीत असणं आवश्यक आहे. Masturbation ही वाईट गोष्ट नसून तुमचं शरीर निरोगी ठेवणारी बाब आहे. त्यामुळे यामध्ये लाज बाळगण्यासारखं काहीच नाही. म्हणून ही गोष्ट सर्वात पहिल्यांदा प्रत्येक मुलीने मनातून काढून टाकायला हवी हे लक्षात घ्या. 

1. वयाबरोबर sex drive वाढतो

GIPHY

हे तुम्हालाही कळायला हवं की, वयाबरोबर सेक्स ड्राईव्ह वाढतो आणि masturbate करण्याची गरजही वाढते. ही शरीराची आवश्यकता आहे. यामध्ये लाज बाळगण्यासारखं काहीही नाही. तुम्ही तुमच्या शरीराच्या गरजा मुळात समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे.  वाढत्या वयानुसार तुम्हाला त्याची जाणीव जास्त होऊ लागते. त्यामुळे या गोष्टीपासून दूर राहू नका. 

2. वास्तविक, तुम्ही जितकं अधिक masturbate करता, तितकं चांगलं सेक्स करू शकता

Masturbate केल्याने तुम्हाला नक्की कसं सेक्स करायला आवडतं हे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे तुमच्या जोडीदाराबरोबर सेक्स करत असताना तुम्हाला कसं सेक्स करायचं आहे हे तुम्ही बिनधास्त सांगू शकता. सेक्स करताना तुम्हाला अडचण होणार नाही. 

उदाहरणार्थ - तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर सेक्स करत असताना तुम्हाला त्याच्यावर झोपून करायचं आहे किंवा एखादी पोझिशन ट्राय करायची आहे हे तुम्ही त्याला सहजपणे सांगू शकता. कारण मास्टरबेट करताना तुम्ही ते करून पाहिलेलं असतं. त्यामुळे तुम्हाला ती गोष्ट जोडीदाराबरोबर करताना संकोच येणार नाही. 

3. Masturbate करताना वेगवेगळ्या लोकांचा विचार तुमच्या मनात येतो

GIPHY

बऱ्याचदा Masturbate करत असताना तुम्हाला तुमच्या आवडत्या अभिनेत्याचा अथवा तुमच्या क्रशचा विचार मनात येत असेल तर याचा अर्थ ते चुकीचं आहे असं नाही. याचा अर्थ तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर सेक्स करायचा आहे असा होतो. अशा तऱ्हेचे विचार येणं अतिशय साहजिक आहे. त्यामुळे चुकीचे आहात हा विचार मनातून काढून टाका. तुम्हाला समाधान मिळण्यासाठी तुमच्या मनात जी व्यक्ती आहे तिला डोळ्यासमोर ठेऊन Masturbate करणं यामध्ये काहीही चुकीचं नाही अथवा असा विचार येणं हेदेखील चुकीचं नाही हे लक्षात ठेवा.

जेव्हा अशा गोष्टी तुमच्यासोबत घडू लागतात… तेव्हा तुम्हाला असते sex ची गरज

4. बऱ्याचदा तुम्हाला masturbate करणं शक्य नाही

तुम्हाला बऱ्याचदा Masturbate करता येत नसेल अथवा तुम्ही या प्रक्रियेचा आनंद घेऊ शकत नसाल तर त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असतं. कदाचित तुम्हाला सेक्स करण्याची इच्छा नसेल अथवा तुम्हाला आनंद आणि उत्साह मिळत नसेल म्हणूनही असं होत असेल. त्यामुळे तुम्हाला जेव्हा मनापासून याची इच्छा होईल तेव्हाच ते करा. Masturbate करण्याला तुमचं व्यसन बनवून घेऊ नका. हे करणं चांगलं असलं तरीही अतिपणा केल्यास, त्यामुळे तुमच्या शरीराचं आणि मनाचंही नुकसान होऊ शकतं. 

5. External stimulation ची घेऊ शकता मदत

GIPHY

बाजारामध्ये अनेक तऱ्हेचे सेक्स toys मिळतात. तसंच बरेच catalyst देखील असतात. ज्यामुळे तुमचं काम अधिक सोपं होतं. तुम्हाला याची आवड असल्यास, तुम्ही अशा तऱ्हेचा अनुभव घेऊ शकता. तुम्ही तुमच्या शरीरासह असे प्रयोगही करून पाहू शकता. पण तुम्हाला याची आवड असली आणि व्यवस्थित आत्मविश्वास असेल तरच तुम्ही याचा आधार घ्या. 

Sex बाबत तुमच्याही मनात येत असतील या 14 गोष्टी

6. मुलींच्या तुलनेत मुलं जास्त masturbate करतात

हे तर अर्थात प्रत्येक वयात आलेल्या मुलीला माहीत असतं. मुलं वयात आल्या आल्या masturbation करणं सुरु करतात. तर मुली साधारणपणे late teenage अथवा वयाच्या विशीनंतर Masturbate करायला लागतात. एका रिसर्चनुसार हे सिद्ध झालं आहे की, मुली महिन्यातून किमान 5 वेळा masturbate करतात तर मुलं ही महिन्यात कमीत कमी 12 वेळा masturbate करतात. अर्थात मुलं ही मुलींपेक्षा दुपटीने Masturbate करतात. त्यामुळे तुम्हाला या गोष्टीची लाज वाटायची अजिबातच गरज नाही. 

7. Masturbation केल्याने पाळीच्या दिवसात येणारे cramps कमी होतात

GIPHY

तुम्हाला हे वाचून नक्कीच आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. Masturbate केल्याने पाळीच्या दिवसात येणाऱ्या कळा कमी होतात. तसंच तुमची पाळी वेळेवर येण्यासाठीही याचा उपयोग होतो. त्यामुळे Masturbate करणं ही मुलींच्या फायद्याचीच गोष्ट आहे. 

या ‘8’ ‘टिप्स Sex लाईफ करतील अधिक interesting

तुम्हालाही Masturbate करायचं असेल आणि तुमच्या डोक्यात काही शंका असतील तर तुम्ही हे वाचून तुमच्या डोक्यातील शंकानिरसन करून घ्या. यामध्ये कोणत्याही प्रकारची तुमची चूक नाही. सेक्स ही प्रत्येक माणसाच्या शरीराची गरज आहे. त्यामुळे हे करणं चुकीचं नसून योग्य आहे हे लक्षात घ्या.