तुमचे केस नैसर्गिकरित्या कोरडे आणि पातळ असतील अथवा कलर केलेले वा हेअर ट्रिटमेंट केलेल असतील, पण तुम्हाला नियमित सुंदर, निरोगी आणि घनदाट केस तसेच राखून ठेवणं हे जरा कठीणच आहे. पण अशक्य नक्कीच नाही. केस चांगले दिसावे म्हणून आपण बऱ्यात गोष्टी करतो. पण मुख्य काम मात्र करत नाही. आम्ही तुम्हाला तुमचे केस घनदाट दिसण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत. तसंच या ट्रिक्स केल्यानंतर तुम्हाला नक्कीच काही मिनिट्समध्येच घनदाट केस मिळतील याची खात्री आहे. तुम्ही या टिप्स वापरल्यावर तुमचे केस पातळ असले तरीही घनदाट दिसायला मदत होईल आणि तुमचे खराब झालेले केस पुन्हा एकदा चमकदार होतील. जाणून घेऊया काय आहेत या टिप्स.
तुम्ही जो शँपू अथवा कंडिशनर वापरत आहात त्याजागी अशा उत्पादनांचा वापर करा जे तुमच्या केसांची व्यवस्थित निगा राखू शकतील. जसं Schwarkopf Bonacure Volume Boost Shampoo अथवा Giovanni Roots 66 Max Volume Shampoo. नेहमी कंडिशनरचा वापर करा जे जास्त हेव्ही नसतील आणइ तुमच्या केसांना weigh down होऊ देणार नाहीत याची काळजी घ्या. त्यासाठी तुम्ही Biotique Bio Thyme Fresh Sparkle Volume Conditioner चा वापर करू शकता आणि केसांना निरोगी आणि घनदाट लुक मिळवून देऊ शकता.
Straightening iron हे केसांना केवळ फ्लॅट बनवतं. जर तुमचे केस फ्लॅट असतील तर तुम्ही यापासून लांबच राहिलेलं बरं. याऐवजी तुम्हाला राऊंड ब्रशबरोबरच ब्लो-ड्रायर अथवा कार्लिंग iron चा वापर करायला हवा. यामुळे केसांना योग्य बाऊन्स आणि चमक येते. तसंच स्ट्रेटनिंगने केस तुटून खराब होण्याचीही शक्यता असते. असे केस घनदाट दिसत नाही. त्यामुळे शक्यतो स्ट्रेटनिंग करणं टाळा.
चांगल्या दर्जाचे हेअर प्रॉडक्ट्स तुमच्या केसांना निरोगी आणि घनदाट दाखवण्यासाठी फायदेशीर ठरतात. अशाच उत्पादनांचा वापर करा. त्यासाठी तुम्ही Kerastase Substantive चा उपयोग करू शकता. यामुळे तुमच्या केसांना fuller लुक मिळतो आणि केसांना glossy चमक येते. हे तुम्ही केस साधारण ओले असतील तेव्हा तुमच्या केसांवर (damp hair) लावा. पण जास्त प्रमाणात याचा वापर करू नका. स्प्रे केसांच्या मुळांना व्यवस्थित लिफ्ट करतात आणि mousse नेहमीच केसांच्या मिड-लेंथपासून ते शेवटापर्यंत लावा. अशी पद्धत अवलंबली तर केस नक्कीच घनदाट दिसण्यासाठी मदत होते.
सकाळी खूपच घाई असते. त्यामुळे तुमच्या केसांसाठी सोपा आणि जलद उपाय म्हणजे backcombing. तुम्ही व्यवस्थित दात असलेला कंगवा घेऊन केसांच्या मुळापासून backcomb करा आणि असं केल्याने तुमच्या केसांना चांगला वॉल्यूम आणि fullness मिळतो. असं करण्यासाठी तुम्ही केसांना random सेक्शनमध्ये वरच्या बाजूला पकडा. यानंतर तुम्ही मुळांवर volumizing स्प्रे करा अथवा उत्पादनांशिवाय केसांना हलक्या हाताने वरच्या आणि खालच्या बाजूने असं tease करा. हे पूर्ण केल्यानंतर backcomb करत कंगव्याच्या मदतीने स्मूथ करणं विसरू नका.
केसांवर उत्पादनांचा वापर केल्यानंतर ब्लो ड्राय करताना तुम्ही नेहमी राऊंड ब्रशने केसांची मूळं लिफ्ट करायला विसरू नका. ब्लो ड्राय करताना केसांना एका बाजूने दुसऱ्या बाजूला पलटत राहा आणि जादुई परिणामांसाठी केसांना चेहऱ्यापासून थोडं लांब ठेऊन मगच ब्लो ड्राय करा. अन्यथा चेहरा कोरडा पडेल आणि त्याचा तुम्हालाच त्रास होईल.
पातळ, कोरड्या केसांचं मुख्य कारण आहे ते म्हणजे split ends. यापासून सुटका हवी असेल तर सर्वात चांगला पर्याय म्हणजे तुम्ही नियमित आपल्या केसांचं ट्रिम करून घ्या आणि खूप जास्त हिटने स्टायलिंग करू नका. कारण हे केसांना अधिक कोरडं बनवतात.
तुमच्या केसांचा लुक हा तुमच्या हेअरकटवर अवलंबून असतो. तुमचे केस जर पातळ असतील आणि तरीही तुम्ही केस लांब ठेवले असतील तर ते केस अतिशय stringy वाटतात. त्यामुळे असे केस कापून घेतल्यास, तुमच्या दुहेरी केसांची समस्या निघून जाते तसंच तुमच्या केसांना घनदाट असल्याचा लुकही मिळतो. तुमचे केस फाईन असतील तर शोल्डर लेंथ अथवा बऱ्याच लेअर्ससह हेअरकट ठेवल्यास, तुम्हाला खूपच चांगला लुक मिळेल आणि तुमचे केसही घनदाट वाटतील.