मांड्यांचा काळपटपणा दूर करायचा असल्यास, जाणून घ्या सोपे उपाय

मांड्यांचा काळपटपणा दूर करायचा असल्यास, जाणून घ्या सोपे उपाय

मांड्या हा आपल्या शरीराचा महत्त्वपूर्ण भाग आहे. कोणालाही थुलथुलीत आणि काळपट मांड्या नक्कीच आवडणार नाहीत. मुख्यत्वे ज्यांना शॉर्ट ड्रेस घालायची आवड आहे त्यांना तर या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागते. बऱ्याचदा नीट काळजी न घेतल्याने आपल्या मांड्या काळ्या पडण्याची शक्यता असते. पण त्यामुळे घाबरून जायची गरज नाही. तुम्हाला घरच्या घरी मांड्यांचा काळपटपणा घालवण्यासाठी उपाय करता येतात. त्यासाठी तुम्हाला जास्त खर्चही येत नाही. शिवाय तुम्हाला सतत पार्लरच्या पायऱ्याही घासाव्या लागत नाहीत. अतिशय सोप्या उपायांनी तुम्ही तुमच्या काळवंडलेल्या मांड्या स्वच्छ आणि सुंदर करू शकता. आम्ही तुम्हाला त्यासाठी इथे काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत. 

लिंबू

Shutterstock

लिंबामध्ये विटामिन सी जास्त प्रमाणात असतं हे सर्वांनाच माहीत आहे. याचा त्वचेसाठी अप्रतिम उपयोग करून घेता येतो. तसंच लिंबू हे तुमची डेड स्किन स्वच्छ करण्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. तुम्ही पाण्यामध्ये एका लिंबाचा रस मिसळून ठेवा. काही वेळाने हे पाणी तुमच्या काळपट झालेल्या मांड्यांवर लावून ठेवा आणि साधारण पाच मिनिट्स हे तसंच मांड्यांवर राहू दे. त्यानंतर धुवून टाका. काही दिवसातच तुम्हाला याचा योग्य परिणाम दिसून येईल. 

तुमच्या नितंबांना द्या स्टनिंग लुक या 9 ब्युटी ट्रिक्सने

मध

Shutterstock

मध हेदेखील एक नैसर्गिक औषध आहे. याचा तुम्हाला काळपट मांड्यांसाठी वापर करून घेता येऊ शकतो. तुम्हाला यामध्ये जास्त काहीच करायची गरज भासत नाही. मधामध्ये काहीही मिक्स न करता मध हातावर घेऊन तुमच्या मांडीवरील भाग जिथे काळा झाला आहे तिथली त्वचा घासावी. मध चिकट असला तरीही तुम्ही घासलेला हा मध मांडीवर त्या ठिकाणी किमान अर्धा तास तसाच राहू द्यावा. त्यानंतर पाण्याने मांडी धुवा. तुमची त्वचा मऊ तर होईलच पण त्या ठिकाणचा काळेपणाही निघून जाईल. 

दही

Shutterstock

दह्यामध्ये त्वचेवरील डेड स्किन काढून टाकणारे घटक असतात. त्यामुळे असे काळे डाग काढून टाकण्यासाठी तुम्हाला दह्याचा उपयोग करून घेता येतो. एक चमचा दह्यामध्ये तुम्ही ओट्स पीठ, बेसन आणि कणकेचा कोंडा घालून स्क्रब तयार करून घ्या. हे स्क्रब तुम्ही काळवंडलेल्या मांडीवर लावून साधारण पाच मिनिट्स मसाज करा. त्यानंतर काही वेळ तसंच राहू द्या. सुकल्यानंतर तुम्ही आंघोळ करा. 

मांड्यावर मांड्या घासण्याचा तुम्हाला होतो का त्रास, मग वाचा

काकडी

Shutterstock

काकडी हा त्वचेच्या प्रत्येक भागासाठी उत्तम उपाय आहे. त्वचेवरील कोणताही भाग काळा झाल्यास तुम्हाला काकडीचा फायदा होतो. मांड्याच्या काळेपणासाठी तुम्ही काकडीचे स्लाईस करून घ्या आणि मग त्या स्लाईसने काळा झालेला भाग घासा. हवं असल्यास, तुम्ही काकडीच्या स्लाईसवर लिंबूही पिळून घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला त्याचा लवकर चांगला परिणाम झालेला पाहायला मिळेल. याचा वापर केल्यास, तुमच्या मांडीचा काळसरपणा लवकर निघून जातो. 

टॉमेटो

Shutterstock

टॉमेटोमध्ये जास्त प्रमाणात अॅसिड असतं याची सर्वांनाच कल्पना आहे. त्यामुळे त्वचेसाठी टॉमेटो हा फायदेशीर ठरतो. टॉमेटोचा पल्प तुम्ही करून घ्या आणि हा पल्प तुमच्या मांड्यांवर लावा. साधारण हे 20 मिनिट्स तुम्ही तसंच ठेवून द्या. त्यानंतर आंघोळ करा. तुम्ही हे आठवड्यातून किमान दोन वेळा केल्यास, तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल. 

त्वचा, केस आणि बऱ्याच रोगांवर गुणकारी मोहरीच्या बिया

नारळ तेल

Shutterstock

नारळ तेल हे तुमच्या त्वचेला अधिक मऊ आणि मुलायम बनवतं. तसंच तुम्हाला याचे अन्य फायदेही आहेत. तुमच्या मांड्या काळ्या झाल्या असतील तर त्यासाठी तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता. एक चमचा नारळाच्या तेलामध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळा आणि हे नीट मिक्स करून तुमच्या काळवंडलेल्या मांड्यांच्या ठिकाणी लावा. साधारण 20 मिनिट्सनंतर कोमट पाण्याने हा भाग धुऊन टाका. 

ओट्सचे पीठ

Shutterstock

मांड्यांच्या जवळपासच्या त्वचेचा काळेपणा हटवण्यासाठी तुम्ही याचा स्क्रब म्हणून वापर करू शकता. यामुळे डेड स्किन घालवण्यास मदत होते. दोन चमचे ओटमीलमध्ये लिंबू अथवा टॉमेटोचा रस मिसळून घ्या. त्यानंतर हे मिश्रण हातावर घेऊन मांड्यावर स्क्रबप्रमाणे चोळा आणि हलका मसाज करा. साधारण 20 मिनिट्स तसंच ठेवा. नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. 

पपई

Shutterstock

पपई हा सौंदर्यासाठी एक नैसर्गिक उपाय आहे. यामुळे त्वचा तर चमकदार होतेच. पण तुमच्या त्वचेवरील काळपटपणा निघून जातो. पपईची पेस्ट करून घ्या आणि ती पेस्ट मांड्यांच्या काळ्या भागावर लावा. पपई ही अशुद्धी दूर करण्यासाठी मदत करते. त्यामुळे काही वेळ ही पेस्ट तशीच ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. 

ऑलिव्ह ऑईल

Shutterstock

ऑलिव्ह ऑईल हे डेड स्किन मऊ मुलायम करण्यास उपयुक्त ठरतं. मांड्यांचा काळेपणा घालवण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईल, लिंबाचा रस, गुलाबपाणी आणि अंड्याचा पिवळा बलक मिक्स करून घ्या. ही तयार झालेली पेस्ट तुम्ही मांड्यांवर लावा. साधारण अर्धा तास गेला की, आंघोळ करा. तुम्ही हे आठवड्यातून दोन वेळा केल्यास, तुम्हाला याचा अप्रतिम परिणाम दिसून येतो.