उपाशीपोटी ‘हे’ पदार्थ खाल्ले तर होऊ शकतो आरोग्यावर उलट परिणाम

उपाशीपोटी ‘हे’ पदार्थ खाल्ले तर होऊ शकतो आरोग्यावर उलट परिणाम

बऱ्याचदा तुमच्या आरोग्याला फायदेशीर असणारे पदार्थ चुकीच्या वेळी खाल्ले तर त्याचा उलट परिणाम तुमच्या शरीरावर होत असतो. कोणते पदार्थ कधी खावेत हे माहीत असणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच खाण्याच्या पदार्थांमध्ये अॅसिडचं प्रमाण अधिक असतं.  त्यामुळे रिकाम्या पोटी जर हे पदार्थ तुमच्या पोटात गेले तर शरीरावर याचे परिणाम वाईट होतात. त्यामुळे हे पदार्थ खाताना तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. कोणत्या वेळी कोणते पदार्थ खायला हवेत हे समजून घ्यायला हवं. आम्ही तुम्हाला याविषयी काही माहिती देणार आहोत. 

1 - चहा आणि कॉफी

Shutterstock

रिकाम्या पोटी चहा अथवा कॉफी प्यायल्यामुळे अॅसिडिटी वाढते. त्यामुळे पूर्ण दिवस जळजळ आणि अपचनाचा त्रास तुम्हाला होत राहातो. बऱ्याचदा लोक सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी चहा अथवा कॉफी घेणं पसंत करतात. पण असं करणं चुकीचं आहे. यामध्ये असणारं निकोटिन अथवा कॅफिनमुळे अॅसिड तयार होतं जे रिकाम्या पोटी पोटात गेलं तर त्यामुळे अधिक त्रास होतो. त्यामुळे तुमची पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. तुम्हाला जर सकाळी चहा किंवा कॉफी प्यायचीच असेल तर त्याबरोबर खाण्यासाठी काही पदार्थही घ्या. जर तुम्हाला काही खायचं नसेल तर किमान चहा किंवा कॉफी घेण्यापूर्वी एक ग्लास पाणी तुम्ही पिणं आवश्यक आहे. 

2 - तिखट अथवा मसालेदार पदार्थ

Shutterstock

तुम्ही सकाळीच जर तिखट अथवा मसालेदार खाल्लंत तर तुम्हाला दिवसभर घशात त्याची जळजळ सहन करावी लागते. वास्तविक यामध्ये नैसर्गिक अॅसिड असतं जे पोटाची पचनक्रिया बिघडवण्याचं काम करतं. या कारणामुळेच पोटामध्ये पोटशूळ उठणं अथवा दुखण्यासारखे त्रास उद्भवतात. तसंच काही लोकांना यामुळे जुलाब होण्याचा त्रासही होतो. 

शिळी पोळी खाल्ल्याने होतात फायदे, जाणून व्हाल हैराण

3 - औषधं

Shutterstock

तसं तर तुम्हाला माहीत असायला हवं की, डॉक्टर सकाळीच (काही औषधं सोडल्यास) रिकाम्या पोटी औषधं घेण्यास मनाई करतात. औषधं रिकाम्या पोटी खाल्ल्यानेदेखील पोटामध्ये अॅसिड जमा होत असतं. यामुळे दिवसभर जळजळ अथवा कडवट ढेकर येत राहण्याचा त्रास होतो. काही बाबतीत तर हालत अधिक खराब होते. 

उपवासाच्या दिवसात चहा-कॉफी पिणं योग्य की अयोग्य

4 - गोड पदार्थ

Shutterstock

सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी गोड पदार्थ खाण्याच्या सवयीमुळे मधुमेह होण्याची शक्यता असते. रिकाम्या पोटी तुम्ही जर गोड पदार्थ खाल्ला तर तुमच्या शरीरातील रक्ताची पातळी उच्च होते. तुम्हाला उठल्या उठल्या गोड पदार्थ खायचा असेल तर तुम्ही पहिले पाणी प्या आणि मग काहीतरी गोड पदार्थ खा. 

5 - केळं

Shutterstock

खरं तर केळं हे सुपरफूड आहे. पण तज्ज्ञांच्या मतानुसार केळं चुकीच्या वेळी खाल्ल्याने शरीराचं नुकसान होतं. केळ्यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम जास्त प्रमाणात असतं जे रक्तामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियममध्ये असंतुलितपणा निर्माण करतं. त्यामुळे केळं कधीही रिकाम्या पोटी खाणं योग्य नाही. 

परफेक्ट आणि कुरकुरीत भजी करायच्या असतील तर फॉलो करा या टीप्स

6 - आंबट फळं

Shutterstock

तसं तर आंबट असणारी फळं योग्य वेळी खाल्ली तर त्याचा शरीराला फायदा होतो पण जर रिकाम्या पोटी सकाळीच खाल्ली तर तुमच्या शरीराला यामुळे हानी पोहचू शकते. रिकाम्या पोटी अशी आंबट फळं खाल्ल्यास शरीरात अॅसिड तयार होतं आणि त्यामुळे पचनतंत्राची क्रिया बिघडते. 

7 - दही

Shutterstock

तुम्ही रिकाम्या पोटी दही खाल्ल्यास, पोटातील अॅसिड हे अधिक प्रमाणात वाढतं. त्यामुळे दह्यात असणाऱ्या लॅक्टिक अॅसिड बॅक्टेरियाचा लाभ अप्रभावी होतो. त्यामुळे सकाळी खाण्यात येणाऱ्या कोणत्याही पदार्थामध्ये दह्याचा समावेश नसणं योग्य आहे. जर दही रिकाम्या पोटी खाल्लं तर पोटशूळ उठू शकतो आणि पोटात दुखूही शकतं. 

8 - टॉमेटो

Shutterstock

टॉमेटोमध्येदेखील जास्त प्रमाणात अॅसिड असतं. त्यामुळे रिकाम्या पोटी टॉमेटो खाल्ल्यास, पोटदुखीला कारण निर्माण होतं. तसंच यामुळे गॅस्ट्रिक अल्सर होण्याचा त्रासही वाढतो.