आपल्या स्वयंपाकघरामध्ये पदार्थांमध्ये सर्रास वापरला जाणारा पदार्थ म्हणजे आले. आल्यामध्ये अनेक औषधीय गुणधर्म असतात. पण तुम्हाला माहीत आहे का आलं हे पदार्थामध्ये चव आणण्याव्यतिरिक्त आरोग्य आणि स्मरणशक्तीसाठीही वरदान ठरतं. आपण आल्याचा वापर नेहमीच करतो पण त्याचे इतर गुणधर्म मात्र आपल्याला पूर्ण स्वरुपात माहीत नसतात. प्रत्येक हंगामात आल्याचा उपयोग आपल्याला करून घेता येतो. मुख्यत्वे हिवाळ्यामध्ये तर याचा खूपच चांगला उपयोग होतो. आलं हा मुळातच कफनाशक आणि शरीराला उष्ण ठेवणारा पदार्थ आहे. आल्याबरोबर काही गोष्टींचं मिश्रण करून त्याचा वापर नियमित केल्यास, तुमचं आरोग्य निरोगी राखण्यास मदत होते. या लेखामध्ये तुम्हाला आम्ही आल्याविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहोत. तुम्हाला तुमच्या रोजच्या आयुष्यातही याचा उपयोग करून घेता येईल. पाहूया तर मग आल्याचे नक्की काय फायदे आहेत. नैसर्गिक पेनकिलर्स म्हणूनही तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता.
आल्यामध्ये सर्वाधिक मिनरल्स आणि महत्त्वाची विटामिन्स असतात. तसंच आरोग्य निरोगी राखण्यासाठी यामध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स आणि अँटिइन्फ्लेमेटरी घटकांचा जास्त उपयोग होत असतो. आल्यामध्ये अनेक पोषक तत्व आहेत ज्याची तुम्हाला कल्पनाही नसेल. साधारण 100 ग्रॅम आल्यामध्ये तुम्हाला 80 कॅलरीज मिळतात. तर यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट, पोटॅशियम, मॅंगनीज, डाएटरी फायबर, कॉपर, लोह हे सगळे घटक असतात. जे तुमच्या शरीराला निरोगी ठेवतात. याचा नियमित तुमच्या जेवणामध्ये तसंच अन्य तऱ्हेने वापर करणं आवश्यक आहे. याबरोबरच आल्यामध्ये झिंक, पँटोथेनिक अॅसिडचाही अंश असतो. तुम्हाला यामधून अनेक पोषक तत्व मिळतात. तुम्हाला एका आल्यामुळे शरीरामध्ये आवश्यक असणारे अनेक घटक मिळतात.
आल्याचा केवळ पदार्थांमध्ये चव आणण्यासाठी फायदा आपल्याला माहीत असतो. तसंच आलं पचनक्रिया चांगली करण्यासाठीही उपयोगी ठरते. पण तुम्हाला याचे अन्य फायदे माहीत आहेत का? याव्यतिरिक्तही आलं तुम्हाला अन्य कोणत्या गोष्टींमध्ये उपयुक्त ठरतं हे जाणून घेऊया.
बऱ्याचदा अधिक कामामुळे नेहमी सकाळी उठताना थकवा जाणवतो. याला आपण नॉशिया येणं असंही म्हणतो. पण यावर सर्वोत्तम नैसर्सिक उपाय म्हणजे आलं. सकाळी उठल्यानंतर मळमळ होत असेल तर आलं त्यावर फायदेशीर ठरतं. त्यामुळेच बऱ्याचदा आल्याचा चहा केला जातो. तुम्हाला सकाळचा थकवा घालवण्यासाठी हा उपयुक्त ठरतो. तसंच गरोदर बायकांसाठीही आलं फायदेशीर असल्याचं अभ्यासातून सिद्ध झालं आहे. तसंचं ज्यांना कॅन्सर आहे अशा रूग्णांना केमिओथेरपी चालू असताना नॉशिया घालवण्यासाठी आल्याचा उपयोग होतो. अशा वेळी त्यांना आल्याची वडी, आल्याचा चहा तुम्ही देऊ शकता.
बऱ्याच जणांना खाज अथवा यीस्ट इन्फेक्शन होत असतं. यावरही आलं हे गुणकारी आहे. जे अॅथलिट असतात त्यांच्या पायांना खाज येण्याचं प्रमाण जास्त असतं. यावर आलं हा सर्वोत्तम उपाय आहे. यामध्ये असणाऱ्या अँटिफंगल घटकांमुळे हा आजार लवकर बरा होतो. त्वचेवर फंगस इन्फेक्शन कमी करण्यासाठी असणारे सर्व गुणधर्म आल्यामध्ये आढळतात. एका अभ्यासात सिद्ध झालं आहे की, साधारण 29 अँटिफंगल मसाल्याच्या झाडांमधून आल्याच्या झाडात जास्त अँटिफंगल गुणधर्म असतात.
बऱ्याच जणांना पोटाच्या समस्या असतात. मुख्यत्वे अपचनामुळे अल्सरसारखी समस्या काही लोकांना उद्भवतात. पोटाचा अल्सर हा अतिशय त्रासदायक आजार आहे. फटिग येणं, जळजळ होणं आणि सतत मळमळत राहणं ही याची लक्षणं आहेत. पण आल्याची पावडर यावर एक चांगला उपाय आहे. यामध्ये असणारे इन्फ्लेमेटरी प्रोटीन्स पोटाच्या अल्सरची समस्या कमी करण्यास फायदेशीर ठरतात.
आल्याचा तुम्ही नियमित तुमच्या अन्नपदार्थांमध्ये वापर केल्यास, तुम्हाला पाळीचा त्रास सहसा होत नाही. आलं हे उष्ण असतं. तसंच पाळीच्या वेळी तुमच्या पोटातून येणाऱ्या कमी करण्यासाठीही आल्याच्या उपयोग होतो. यातील गुणधर्म पाळीच्या वेळी पोटातून येणाऱ्या कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. पाळीच्या वेळी पोटामध्ये जास्त गॅस तयार होत असतो. आल्याच्या सेवनाने गॅस कमी होऊन पाळीचा त्रासही कमी होतो.
आल्यामध्ये अँटिकॅन्सर घटक जास्त प्रमाणात आढळतात. यामध्ये असणारा 6 जिंजरोल हा महत्त्वाचा घटक कॅन्सर रोखण्यास मदत करतो. पण तुम्ही तुमच्या जेवणामध्ये असो अथवा इतर वेळेस आल्याचा नियमित खाण्यामध्ये उपयोग करायला हवा. अर्थात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. अन्यथा त्याचे उलट परिणाम होतात. गर्भाशय, प्रोस्टेट कॅन्सरच्या वाढीला थांबवण्यासाठी याचा उपयोग होतो. कॅन्सरची वाढ होत असल्यास, आल्याच्या नियमित सेवनाने थांबते.
साखरेची पातळी रक्तामध्ये जास्त असेल तर त्यामुळे शरीरावर अत्यंत वाईट परिणाम होतात. जर याकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर त्यामुळे नर्व्ह डॅमेज अथवा अन्य काही रोग उद्भवण्याची शक्यता असते. पण हे सर्व दुष्परिणाम कमी करण्यासाठी आल्याचा उपयोग होतो. अभ्यासात सिद्ध झाल्याप्रमाणे आल्याच्या नियमित सेवनाने रक्तातील साखरेचं प्रमाण हे 12 टक्के कमी होण्यास मदत होते. तसंच याचा परिणाम त्वरीत होतो त्यासाठी वाट पाहावी लागत नाही.
सांधेदुखीवर आलं हे हा उपाय असू शकतो हे बऱ्याच जणांना माहीत नाही. पण हे खरं आहे. आल्याच्या नियमित सेवनाने तुमच्या सांधेदुखीच्या त्रासामध्ये बऱ्याच प्रमाणात फरक पडतो. फक्त तुम्ही हे प्रमाण तुमच्या त्रासानुसार एकदा डॉक्टरांना विचारून घ्यावं. आल्यामध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्समुळे सांधेदुखी बरी होण्यास मदत होते.
आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात बऱ्याच जणांना कोलेस्ट्रॉलच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. पण कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यासाठी तुम्हाला आल्याचा फायदा होतो. आलं हे नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी उपयोगात येतं. त्यामुळे कोलेस्ट्रॉलच्या काही औषधांमध्येही आल्याचा अंश तुम्हाला दिसून येतो. पण तुम्हाला घरच्या घरी कमी करायचं असेल तर तुम्ही आल्याचं नियमित सेवन करून कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करू शकता.
तुमच्या मेंदूचं आरोग्य निरोगी राखण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढण्यासाठी आलं वरदान ठरतं. आल्यामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स आणि अँटिइन्फ्लेमेटरी घटक हे तुमच्या डोक्याला आलेला थकवा नाहीसा करून उत्साह निर्माण करतं. त्यामुळे तुमची स्मरणशक्ती व्यवस्थित राहाते आणि मेंदूला थकवा येत नाही. इतकंच नाही तुम्ही जर तुमच्या वयाच्या मधल्या फळीत असाल तर तुम्हाला तुमची स्मरणशक्ती चांगली राखण्यासाठीही याचा उपयोग होतो.
आल्यामध्ये असलेल्या अँटिफंगल घटकांमुळेच तुमच्यापर्यंत बॅक्टेरियल इन्फेक्शन आलं पोहचू देत नाही. बॅक्टेरियल इन्फेक्शनपासून तुमची सुरक्षा आलं करतं. बॅक्टेरियाविरोधात लढण्यासाठी लागणारे सर्व गुणधर्म आल्यामध्ये असल्याने तुम्ही निरोगी राहता.
कॅन्सर, जाडेपणा, मधुमेह अशा आजारासाठी लागणारी प्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम आलं करतं. यातील अँटीइन्फ्लेशनमुळे यामध्ये नैसर्गिक अॅसिड असतं. जे तुमच्या शरीरात निर्माण होणाऱ्या बॅक्टेरियाशी लढा देत तुमची प्रतिकारशक्ती वाढण्याचं काम करतं. आलं हे अतिशय गुणकारी असल्यानेच नेहमी पदार्थांमध्ये त्याचा वापर करण्यात येतो. जेणेकरून नियमित पोटात जाऊन शरीर निरोगी राहावं.
आल्यामुळे पचनक्रिया योग्य होते हे सर्वांनाच माहीत आहे. पोटातील गॅस काढून टाकण्यासाठी याचा उपयोग होतो. गॅसमुळेच पचनक्रियेला बाधा येत असते. पण आल्याच्या गुणधर्मामुळे तुमच्या शरीरातील पचनक्रिया उत्तम राहाते. कधीही पोटदुखी झाल्यास, नेहमी आल्याचा रस हेच पहिलं औषध देण्यात येतं. कारण या औषधाने गुण येणार आणि आलं हे पोटदुखीसाठी बाधक आहे हे सर्वांनाच माहीत आहे.
आल्याचा वापर केसांच्या वाढीसाठी आणि केसांना चमकदार बनवण्यासाठीही केला जातो. आपल्याला केवळ खाण्यापिण्याच्या पदार्थांमधील आल्याचा वापर आणि त्याचे फायदे माहीत आहेत. पण आता केसांना यामुळे काय फायदा मिळतो ते पाहूया.
वाचा - पदार्थ जी तुमच्या निरोगी केसांसाठी च्या डाएटमध्ये असणे आवश्यक आहे
केसांच्या वाढीसाठी सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे कोरडा स्काल्प. आल्याची पावडर यावर उत्तम उपाय आहे. आल्यामध्ये केसांना पोषण देणारी विटामिन्स आणि मिनरल्स असल्यामुळे कोरडा स्काल्प नष्ट करण्यासाठी याचा चांगला उपयोग करून घेता येतो. साधारण आठवड्यातून एक दिवस केस धुताना तुम्ही आल्याच्या पावडरचा केस धुण्यासाठी वापर केल्यास, तुमच्या कोरडा स्काल्प निघून जातो आणि केसांना पोषण मिळतं.
केसांची दुसरी सर्वात मोठी समस्या कोणती असेल तर ती म्हणजे केसातील कोंडा. कोंड्यामुळे केसगळतीही अधिक प्रमाणात होते आणि त्यातून दुहेरी केसांची समस्याही निर्माण होते. आल्याच्या रसाने तुमच्या केसातील कोंडा निघून जाण्यास मदत होते. यामध्ये असणाऱ्या अँटिसेप्टिक घटकांमुळे केसांमध्ये कोंंडा राहात नाही आणि स्काल्प स्वच्छ होण्यासही मदत होते. केसातील कोरडेपणा आणि कोंडा घालवण्यासाठी याचा उपयोग होतो.
केसांची समस्या मुळात सुरु होते ती म्हणजे मेंदूपर्यंत रक्तप्रवाह नीट होत नसल्यास, केसांना योग्य पोषण मिळत नाही. पण आल्याच्या ज्युस तुम्ही नियमित प्यायल्यास, त्याचा तुम्हाला फायदा होतो. तुमचा रक्तप्रवाह सुधारतो आणि त्यामुळे केसांची समस्याही राहात नाही. आल्यामध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे तुमच्या रक्तप्रवाहामध्ये सुधारण होऊन मेंदूला चांगला रक्तप्रवाह होतो.
आल्याच्या तेलामुळे केसांचं योग्य पोषण होतं. केसांची मुळापासून वाढ होऊन अगदी केसांना मुळापर्यंत हे तेल पोषण देतं. आल्याच्या तेलामध्ये असणारे पोषण घटक हे केवळ केसांची वाढच नाही करत तर तुमच्या शरीरातील रक्तप्रवाहदेखील चांगला करतं. तसंच तुमचे केस अधिक सुंदर आणि चमकदार बनवण्यासाठीही आल्याच्या तेलाचा वापर करता येतो.
आल्यामुळे रक्तप्रवाह योग्य होतो त्यामुळे केसांची वाढही चांगली होते. तसंच नियमित तुम्ही केसांना आल्याचं तेल लावलं आणि आल्याचा ज्युसही वापरलात तर तुमच्या केसांना एक वेगळी चमक मिळते आणि केसगळती रोखल्यामुळे केसांची वाढही चांगली होते. तसंच यातील अँटिसेप्टिक गुणधर्मामुळे सहसा केसांमध्ये कोंडा होत नाही आणि केस व्यवस्थित राखले जातात.
केसांची काळजी घेण्यासाठी आल्याचा वापर करता येतो हे तर आपण जाणून घेतलं. पण याचा नक्की वापर कसा करायचा ते पण पाहू. प्रत्येकवेळी तुम्हाला केसांची काळजी घेण्यासाठी पार्लरमध्ये जायची गरज नाही. आल्याचा वापर करून तुम्ही घरच्या घरीदेखील केसांची योग्य निगा राखू शकता.
तुमच्या केसांच्या वाढीसाठी हे मिश्रण अतिशय उपयुक्त आहे. दोन्हीमध्ये विटामिन्स असल्याने केसांसाठी अतिशय पोषक ठरतात. तुमच्या स्काल्पची पीएच लेव्हल सांभाळून ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो.
कसे वापरावे
नारळ तेल हे तुमच्या केसांना योग्य पोषण देतं. त्यामुळे नारळाचं तेल आणि आलं हे एक चांगलं कॉम्बिनेशन आहे. यामध्ये बेसिल तेल आणि काकडी मिक्स करून केसांना अधिक चांगलं पोषण देता येतं.
कसे वापरावे
प्रत्येक वेळी आल्यामध्ये काही मिक्स करायला हवं असं काही नाही. आल्याचा मुळातच गुणधर्म केसांसाठी चांगला ठरतो. त्यामुळे तुम्ही नुसती आल्याची पेस्ट जरी केसांना लावली तरी केसांची मजबूती टिकायला याचा उपयोग होतो.
कसे वापरावे
कांद्याचा रस हा केसांसाठी अतिशय उपयुक्त ठरतो. केसांचा कोंडा काढून टाकण्यासाठी आणि केसांना व्यवस्थित पोषण देण्यासाठी कांद्याचा रस आल्यासह फायदेशीर ठरतो.
कसे वापरावे
कोरडे केस आणि कोंड्याची समस्या असणाऱ्यांसाठी आलं आणि ऑलिव्ह ऑईलचं कॉम्बिनेशन उत्तम आहे. नैसर्गिकरित्या तुमचा स्काल्प मॉईस्चराईज करून त्यातून कोंडा काढून टाकायला ऑलिव्ह ऑईलची मदत होते.
कसे वापरावे
आल्याचा वापर तुम्ही विविध स्वरूपात करू शकता. त्यामुळे याचा वापर करणं सोपं आहे. तुम्ही नुसतं आलंं खाऊ शकता अथवा कोणत्याही तिखट पदार्थात घालून खाऊ शकता. तसंच याचा ज्युस करूनही पिऊ शकता. कोणत्याही थंड पेयामध्ये आल्याचा वापरू करून त्याचा स्वाद वाढवू शकता. तसंच जिंजर रूट पिल्सही येतात. तुम्ही त्याचाही वापर करू शकता. आल्याचं एसेन्शियल ऑईल येतं ज्याचा उपयोग तुम्ही खाण्यात करू शकता. केसांसाठीही आल्याचं तेल आहे. किततरी पदार्थांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने याचा वापर करता येऊ शकतो. आल्याच्या विविध रेसिपीजदेखील तुम्हाला मिळू शकतात. अगदी मेन कोर्स ते डेझर्टपर्यंत सगळ्यात याचा वापर तुम्ही करू शकता. सूप, सलाड आणि गोड पदार्थ या सगळ्यात याचा वापर होऊ शकतो.
आरोग्यासाठी आल्याच्या काही रेसिपीज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घेऊया काय आहेत या सोप्या रेसिपीज
बऱ्याचदा पोट साफ होत नाही. त्यासाठी आल्याचा ज्युस अतिशय बहुगुणी आहे.
कसे करावे
उलटसुलट खाण्याने पोट फुगण्याची समस्या बऱ्याच जणांना उद्भवते. असं असताना तुम्हा आलं फायदेशीर ठरतं.
कसे करावे
पोट दुखत असल्यास, तूप, गूळ आणि आलं हा उत्तम उपाय आहे. यामुळे पोटदुखी त्वरीत थांबते
कसे करावे
मासिक पाळीच्या दिवसात पोटातून बऱ्याच महिलांना क्रॅम्प येत असतात. त्यासाठी आलं योग्य उपचार आहे.
कसे करावे
घसा दुखत असल्यास आल्याचा त्यावर चांगला उपयोग करून घेता येतो
कसे करावे
आपण नेहमीच म्हणतो कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नाही. त्याचप्रमाणे आल्याचाही अतिवापर चांगला नाही. आलं हे उष्ण असतं. त्यामुळे अतिप्रमाणात खाल्ल्यास त्याचा दुष्परिणाम होतो. उष्ण असल्याने तुमच्या त्वचेवर फोड येण्याची शक्यता असते. तर जास्त प्रमाणात आलं खाल्ल्यास, डायरिया होण्याची शक्यता असते. तसंच आलं जास्त पोटात गेल्यास अंगावर सूज येणं आणि श्वास घ्यायला त्रास होणं अशा गोष्टीही घडू शकतात. तुमची त्वचा संवेदनशील असल्यास, आल्याच्या अतिवापराने तुमच्या त्वचेवर पॅच येऊ शकतो.
आल्यामध्ये अनेक पोषक तत्व आहेत. त्यामुळे आलं तुमच्या शरीरासाठी अँटिसेप्टिक, अँटिइन्फ्लेमेटरी म्हणून उपयोगी ठरतं. यामुळे तुमच्या केसांना आणि त्वचेलाही फायदा होतो.
आलं हे तिखट असतं. आल्याला मुळातच चव असते. त्यामुळे पदार्थामध्ये आल्याचा सुगंध आणि चव अशा दोन्ही गोष्टी मिक्स होतात. त्यामुळे पदार्थाला आल्याची एक विशिष्ट चव येते.
आलं प्रमाणात खाल्ल्यास संवेदनशील त्वचेवर काही परिणाम होत नाही. पण जर अतिप्रमाणात खाल्लं तर संवेदनशील त्वचेवर पॅच येतात.
You Might Like This: