नववधूच्या मेकअप किटमध्ये असायलाच हव्यात या '25' वस्तू (Bridal Makeup In Marathi)

नववधूच्या मेकअप किटमध्ये असायलाच हव्यात या '25' वस्तू (Bridal Makeup In Marathi)

प्रत्येक नववधूला तिने लग्नाच्या दिवशी सुंदर आणि सर्वांपेक्षा वेगळं दिसावं असं वाटत असतं. लग्नसोहळ्यात मेकअप करताना तिला तिच्या मेकअप आर्टिस्ट, हेअर ड्रेसरची नक्कीच मदत होते. मात्र लग्नसोहळ्याआधी आणि नंतरही असे अनेक विधी असतात. जेव्हा तिला स्वतःच तयार होणं गरजेचं असतं. लग्नानंतर अनेक रिसेप्शन देण्याची पद्धत आहे. लग्नानंतर एखाद्या पार्टी, गेट-टूगेदर, मंगळागौर, पुजा-पाठ, घरगुती कार्यक्रम, मंगल सोहळे अशा कार्यक्रमात बऱ्याचदा पारंपरिक, एथनिक लुक केला जातो. अशा कार्यक्रमात सर्वांचं लक्ष नुकतच लग्न झालेल्या नवरीकडे जास्त असतं. यासाठीच प्रत्येक नववधूकडे परिपूर्ण मेकअप किट तयार असायलाच हवं. ज्यामध्ये चेहऱ्यावर मेकअप करण्यासाठी काही खास उत्पादने असणं अतिशय गरजेचं आहे.

 

Table of Contents

  Instagram

  नववधूच्या मेककिट मधील मेकअपचे साहित्य (Makeup Products)

  लग्नानंतर पटकन तयार होण्यासाठी तुम्हाला मेकअप किट नक्कीच उपयोगी पडू शकतं. यासाठीच लग्नाआधीच तुमच्या मेकअप किटमध्ये या गोष्टी ठेवा. ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही क्षणी स्वतःचा मेकअप स्वतः करता येईल. बेसिक मेकअप करण्याचं ज्ञान आणि एक परिपूर्ण मेकअप किट या क्षणी तुमच्या फायद्याचंच ठरेल. यासाठी तुमच्या मेकअप किटमध्ये चेहऱ्यावर मेकअप करण्यासाठी नेमकी कोणती उत्पादने असावीत हे जरूर जाणून घ्या.

  बद्दल देखील वाचा वधू मेकअप

  1. प्रायमर (Primer)

  कोणताही मेकअप करण्यापूर्वी सर्वात आधी लावलं जातं ते म्हणजे प्रायमर. प्रायमर तुमच्या  चेहऱ्यावर सुरकुत्या, काळे डाग, पिंपल्स, चट्टे झाकून टाकतं. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ते न दिसता तुमचा मेकअप बेस अप्रतिम दिसतात. तुमचा मेकअप चांगला करण्यासाठी याचा नक्कीच चांगला फायदा होतो. यासाठी तुमच्या मेकअप किटमध्ये एक चांगलं प्रायमर नक्की ठेवा. 

  Beauty

  Lakme Absolute Blur Perfect Makeup Primer

  INR 437 AT Lakme

  2. फाउंडेशन (Foundation)

  तुमच्या मेकअप किटमध्ये फाउंडेशन असायलाच हवं . कारण मेकअप करताना फाउंडेशन फेसवर सगळ्यात आधी  चेहऱ्यावर लावण्यात येतं. फाउंडेशन हा तुमच्या मेकअपचा बेस असतो. भारतीय स्कीनटोन साधारणतः नॉर्मल, ड्राय, ऑयली, मिक्स, डार्क आणि लाइट अशा असतात. फाउंडेशनची शेड ही स्कीनटोन्स लक्षात घेऊन बनवल्या जातात. त्यामुळे फाउंडेशनची शेड निवडताना तुमच्या चेहऱ्याशी कोणती शेड ब्लेंड होईल ते पाहून घ्या. योग्य टोनचं फाउंडेशन खरेदी करताना सर्वात आधी आपल्या अंगठ्यावर किंवा हातावर थोडं फाउंडेशन लावून बघा. फाउंडेशन तुम्ही गालांवर देखील लावून बघू शकता की ती शेड तुमच्या स्कीनशी मॅच होते की नाही.

  वाचा - नवरीच्या हातावर रंगलेल्या मेंदीवरून कळून येतं नवऱ्याचं प्रेम

  Lifestyle

  L'Oreal Paris Infallible Liquid Foundation

  INR 1,020 AT L'Oreal

  3. कंसीलर (Concealer)

  कंसीलर तुम्हाला मेकअप करताना फारच उपयोगी पडू शकतं. कारण कंसीलरचा वापर चेहऱ्यावरील डाग, व्रण आणि बरेच वेळा लाल चट्टे लपवण्यासाठी केला जातो. डोळ्याखालील डार्क सर्कल्स लपवण्यासाठीदेखील तुम्ही कंसीलर ही वापरू शकता. कंसीलरच्या वापराने चेहऱ्यावरील पिंपल्ससुध्दा दिसत नाहीत. त्यामुळे जर तुमच्या मेकअप किटमध्ये कंसीलर असेल तर तुम्हाला काळजी करण्याचं मुळीच कारण नाही.

  M.A.C Studio Waterweight Concealer

  INR 2,100 AT M.A.C

  4. कॉम्पॅक्ट (Compact)

  कंसीलर आणि फाऊंडेशनच्या बेसवर योग्य शेडचं कॉम्पॅक्ट लावलं की मेकअपचा बेसकोट परफेक्ट दिसू लागतो. यासाठी योग्य शेड कॉम्पॅक्ट निवडा. तुमच्या शेडचं कॉम्पॅक्ट तुमच्या मेकअप किट आणि पर्समध्ये असायलाच हवं. कारण अगदी घाईच्या वेळी नुकतं कॉम्पॅक्ट लावूनदेखील तुम्ही परफेक्ट दिसू शकता. 

  वाचा - सेलिब्रिटी ब्राइडल मराठीत दिसते

  Make Up

  Elle 18 Glow Compact

  INR 99 AT Elle

  5. हायलाईटर (Highlighter)

  हायलायईट लावल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काही भाग उठावदार दिसू लागतात. चिक बोन्स, भुवयांचे उंचवटे, नाकाचा शेंडा, हनुवटीवर उत्तम हायलाईटर लावल्यामुळे तो भाग उठून दिसतो. ज्यामुळे तुमचा चेहरा अधिक आकर्षक नक्कीच दिसू शकतो.

  Make Up

  NYX Professional Makeup Away We Glow Liquid Highlighter, Crystal Glare

  INR 1,652 AT NYX

  6. ब्रांऊझर (Bronzer)

  आजकाल ब्लशरला ब्राऊंझर हे एक चांगला पर्याय निर्माण झालं आहे. ज्यामुळे तुम्हाला ब्राऊंझरमुळे तुम्हाला हायलायटर आणि ब्लश न वापरताही पटकन परफेक्ट ग्रॅमरस मेकअपचा लुक मिळू शकतो.  आजकाल असे दुहेरी परिणाम देणारे ब्राऊंझर्स बाजारात उपलब्ध असतात. जे तुमच्या बॅगेत अथवा मेकअप किटमध्ये असले तर तुम्हाला चिंता करण्याची मुळीच गरज नाही.  

  Palladio Matte Bronzer

  INR 750 AT Palladio

  7. ब्लश (Blush)

  तुमच्या गालांना ब्लशरमुळे एक छान लुक येतो. जर तुमच्याकडे काही शेड्सचे ब्लशर हे असायलाच हवे.ब्लशरमध्ये गुलाबी, गोल्डन असे काही शेड्स मिळतात. ब्लशरचे पॅलेट तुमच्या  बॅग अथवा मेकअप किटमध्ये असेल तर क्या बात है.

  Make Up

  Lakme Absolute Face Stylist Blush Duos, Peach Blush

  INR 600 AT Lakme Absolute

  8. लिप लायनर (Lip liner set)

  लिपस्टिक लावण्यापूर्वी  त्या शेडच्या लिपलायनरने ओठांना आकार देणं सोपं जातं. नेहमीची गोष्ट वेगळी पण लग्नानंतर तुमचा लुक हा परफेक्ट असणं गरजेचं आहे. लिप लायनरमुळे जाड अथवा पातळ ओठांना एक विशिष्ठ आकार देता येतो. ज्यामुळे तुमच्या ओठांवरील लिपस्टिकचा रंग नक्कीच खुलून दिसू शकतो. 

  Make Up

  Coloressence Rollon Lip Liner Pencil

  INR 145 AT Coloressence

  9. लिपस्टीक सेट (Lipstick set)

  लिपस्टीक ही गोष्ट प्रत्येक मुलीच्या अगदी जिव्हाळ्याची असते. लिपस्टीक तुमचा लुक कंप्लीट तर करते. लिपस्टीक खरेदी करताना मात्र नीट काळजी घ्यायला हवी.  प्रत्येक शेड तुमच्या हातावर लावून बघा. ह्यासाठी तुम्ही शॉपकीपरची मदत पण घेऊ शकता. जर तुमचा रंग सावळा असेल तर रेड, मरून, ब्राऊनसारख्या थोड्या डार्क शेड्स तुम्हाला चांगल्या दिसतील. जर तुम्ही गोऱ्या आहात तर सॉफ्ट पिंक, ऑरेंज आणि निऑन कलर्ससुध्दा चांगले अॉप्शन आहेत. अशा तुमच्या रंग आणि आवडीनुसार कमीत कमी पाच-सहा शेड्स तुमच्या मेकअप किटमध्ये जरूर असायला हव्यात.

  Fashion

  Lipstick Combo Kit

  INR 1,199 AT Lakme

  10. आयलायनर (Eyeliner)

  डोळे व्यक्तिमत्त्वाचा चेहरा असतो असं म्हणतात. समोरच्या व्यक्तीची सर्वात आधी नजर जाते ती म्हणजे तुमच्या डोळ्यांकडे. डोळ्यांच्या सौंदर्याला अजूनच खुलवतं ते म्हणजे आयलायनर. आयलायनर वेगवेगळ्या पद्धतीने लावता येत असल्याने तुम्ही प्रत्येकवेळी आपल्या डोळ्यांना नवा लूक देऊ शकता. ह्यासाठी तुम्ही लिक्वीड किंवा पेन्सील आयलायनरचा वापर करू शकता. तसं तर सर्वात जास्त ब्लॅक आयलायनरचा वापर केला जातो. पण तुम्ही नेहमीपेक्षा हटके ब्लू, डार्क ग्रीन किंवा इतर ही कलर आयलायनरचा वापर करून नवा लूक ट्राय करू शकता.

  वाचा - हिवाळ्यात तेलकट त्वचेकरिता मेकअप टिप्स (Winter Makeup Tips for Oily Skin)

  Latest Trends: Western

  L.A. Girl Shockwave Neon Eyeliner - Screamin

  INR 595 AT L.A. Girl

  11. आयशॅडो (Eyeshadow)

  डोळे उठावदार दिसण्यासाठी आयशॅडोचा वापर केला जातो. त्वचेच्या रंगसंगतीप्रमाणे आयशॅडोची शेड निवडायला हवी. जर तुम्ही सावळ्या असाल तर गोल्ड, कॉपर, मॅक्स ब्राऊन, ब्रॉंझ, मॅक्स बर्गंडी यासारख्या शेड्स वापरा. जर तुम्ही गोऱ्या असाल तर रेड, ब्लू, ग्रीन, पिंक, पर्पल, गोल्ड असे कलर डोळ्यांवर फार सुंदर दिसतात. यासाठीच विविध कलर्सच्या आयशॅडोच्या शेड्स असलेली एक दोन पॅलेट तुमच्या मेकअप किटमध्ये जरूर ठेवा.

  12. आयब्रो पेन्सिल (Eyebrow pencil)

  भुवयांना परफेक्ट आकार देण्यासाठी आयब्रो पेन्सिल गरजेची असते. जर तुमच्या भुवया पातळ आणि विरळ असतील तर त्यांना काळ्याभोर आणि जाडसर करण्यासाठी आयब्रो पेन्सिल परफेक्ट ठरेल. यासाठी तुमच्या मेकअप किटमध्ये एक दुसरी आयब्रो पेन्सिल जरूर ठेवा.   

  Make Up

  Lakme Black EyeBrow Pencil

  INR 70 AT Lakme

  13. काजळ (Kajal Pencil)

  डोळ्यांच्या मेकअपमध्ये आणखी एक महत्वाची आणि बेसिक गोष्ट आहे ती म्हणजे काजळ. काजळमुळे तुमच्या डोळ्यांना एक पटकन आणि आकर्षक लुक मिळू शकतो. यासाठीच तुमच्या मेकअप किटमध्ये काजळ पेन्सिल जरूर ठेवा. आजकाल कलरफुल काजळची फॅशन आहे. काळ्या, रेड, ब्लू, ग्रीन अशा रंगांमध्ये काजळ उपलब्ध आहे. 

  Make Up

  Jovees Kajal

  INR 115 AT JOVEES

  14. मस्कारा (Mascara)

  डोळ्यांचे सौंदर्य आणखी वाढवतात त्या सुंदर, लांब आणि दाट पापण्या. जर तुमच्या पापण्या दाट दिसाव्या असं तुम्हाला वाटत असेल तर मस्कारा योग्यरित्या लावता येणं गरजेचं आहे. मस्कारा लावण्याआधी पापण्यांचे केस आयलेश कर्लरने कर्ल करून घ्या आणि मग मस्कारा लावा. यामुळे पापण्या अजून छान दिसतात. मस्कारा लावलेले तुमचे काळेभोर, दिलखेचक डोळे त्यांची नजर तुमच्यावरून हलू देणार नाहीत. 

  Make Up

  Lakme Eyeconic Lash Curling Mascara

  INR 262 AT Lakme

  15. नेल पेंट सेट(Nail paints set)

  नेल पेंटमुळे तुमच्या हाताची बोटं आकर्षक दिसतात. लग्नानंतर वेगवेगळ्या लुकवर सूट करणाऱ्या काही नेलपेंट शेड्स तुमच्याकडे असायलाच हव्या. यासाठी मेकअप किटमध्ये काही बेसिक शेडच्या नेलपेंट जरूर ठेवा. मात्र यात पारदर्शक, सफेद, न्यूड, लाल, गुलाबी , पेस्टल आणि ग्लिटर शेड्स अशा काही बेसिक नेलपेंट ठेवा.

  Nails

  Colour Show Bright Matte Nail Paint

  INR 175 AT Maybelline New York

  16. मेकअप ब्रश सेट (Make up brushes set)

  मेकअप करणं ही एक कला आहे. कारण मेकअपमुळे तुमचा लुक जसा चांगला दिसू शकतो तसा बिघडूदेखील शकतो. चांगला मेकअप करण्यासाठी मेकअप किटमध्ये चांगले मेकअप ब्रशदेखील असणं गरजेचं आहे. मात्र बऱ्याचजणी एखाद्या कॉमन ब्रशने अथवा हाताने मेकअप करतात. निरनिराळ्या मेकअप उत्पादनासाठी निरनिराळ्या मेकअप ब्रशची गरज असते. यासाठीच तुमच्या मेकअप किटमध्ये काही बेसिक ब्रश असायलाच हवे.

  वाचा - एअरब्रश मेकअप म्हणजे काय

  Beauty

  Naked-plus Nylon and Wooden Makeup Brush

  INR 182 AT Naked-plus

  17. मेकअप रिमूव्हर (Make up remover)

  मेकअप नक्की काढून कसा टाकायचा? हे अनेकांना माहीत नसते.  काहीजणी बऱ्याचदा पाण्याने अथवा साबणाने धुवून मेकअप काढतात. मात्र मेकअप हा नेहमी ब्रँडेड रिमूव्हरनेच काढायला हवा. नारळाचे तेल अथवा  बेबी ऑईलनेदेखील तुम्ही मेकअप काढू शकता. मात्र लग्नानंतर काही कार्यक्रमात तुम्हाला यासाठी जास्त वेळ नसेल तर एखादं चांगलं मेकअप रिमूव्हर नक्की ठेवा. 

  Beauty

  Garnier Skin Naturals Micellar Cleansing Water

  INR 175 AT Garnier

  18. नेल पेंट रिमूव्हर (Nail paint remover)

  वेगवेगळ्या लुकसाठी निरनिराळ्या नेलपेंट शेड्स वापराच्या असतील तर तुमच्या बॅगेत चांगलं मेकअप रिमूव्हर असायला हवा. ज्यामुळे तुम्ही कोणत्याही क्षणी तुमच्या नखांवरील नको असलेली नेलपेंट काढून टाकू शकता. 

  19. गुलाबपाणी (Rose water)

  लग्नाची गडबड, निरनिराळे विधी, हेव्ही मेकअप, भरजरी साड्या, हेअरस्टाईल्स यामुळे लग्नात तुमची फारच दगदग होऊ शकते. अशा वेळी लग्नानंतर पुन्हा अनेक विधींसाठी तयार राहण्यासाठी गुलाबपाणी तुमच्या फायद्याचं ठरेल. कारण गुलाबपाण्यामुळे तुम्हाला पटकन फ्रेश वाटेल. शिवाय तुमची त्वचा फ्रेश दिसण्यास मदत होईल. एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये गुलाबपाणी भरून ठेवा. ज्यामुळे तुम्ही कधीही गुलाबपाणी तुमच्या चेहऱ्यावर स्प्रे करणं तुम्हाला सोपं जाईल.  

  Skin Care

  Dabur Gulabari Premium Rose Water

  INR 58 AT Dabur

  20. कॉटन पॅड अथवा टीश्यू पेपर (Cotten pads or tissue paper)

  मेकअप रिमूव्हर, नेलपेंट रिमूव्हर आणि गुलाब पाणी वापरण्यासाठी तुम्हाला कधीही कॉटनपॅडची गरज लागू शकते. शिवाय टीश्यू  कोणत्याही कारणासाठी नेहमीच उपयोगी पडतात. यासाठी लग्नाची तयारी करताना कॉटनपॅड आणि टीश्यू पेपर तुमच्या मेकअप किटमध्ये ठेवण्यास मुळीच विसरू नका.

  Beauty

  Bella Cotton Pads

  INR 203 AT Bella

  21. आरसा (Mirror)

  आरसा मेकअप किटमध्ये असणं अगदी गरजेचं आहे. कारण जर मेकअप केल्यावर तुमच्या जवळ मोठा ड्रेसिंग टेबल नसेल तर काहीच हरकत नाही. एक छोटासा आरसा तुमच्या कधीही उपयोगी पडेल. यासाठी तुमच्या  मेकअप किटमध्ये आरसा ठेवाच.

  Beauty

  Baal Oval Shaped Double-Sided Lighted Makeup Mirror

  INR 499 AT Baal

  22. हेअर पिन्स आणि सेफ्टी पिन्स (Hair pins and Safety pins)

  लग्नात साडी, लेहंगा परिधान करताना आणि हेअरस्टाईल करताना सर्वात महत्त्वाच्या असतात त्या म्हणजे हेअर पिन्स आणि सेफ्टी पिन्स. यासाठी लग्नाच्या तयारीत या गोष्टी आधीच समाविष्ठ करा. शिवाय खरेदी केल्यावर त्या तुमच्या मेकअप किटमध्ये लगेचच ठेवून द्या. ज्यामुळ वेळेवर त्या तुम्हाला मिळू शकतील. 

  Elite Models Bobby Pins

  INR 399 AT Elite Models

  23. कंगवा अथवा हेअर ब्रश (Comb or hair brush)

  कंगवा आणि हेअर ब्रश ही प्रत्येकाची दैनंदिन गरजच आहे. मात्र लग्नानंतर सासरी जाताना तुमचा स्वतःचा कंगवा अथवा हेअर ब्रश तुमच्या जवळच असायला हवा. कारण कधी तुम्हाला तुमची हेअरस्टाईल नीट करण्याची वेळ येईल हे सांगता येणार नाही. त्यामुळे अशा वेळी कंगवा तुमच्या मेकअप किटमध्ये असेल तर फार शोधाशोध करावी लागणार नाही.

  Tangle Teezer Unisex Paddle Hair Brush

  INR 1,399 AT Tangle Teezer

  24. सिंंदूर आणि टिकली (Sindoor and bindi)

  नववधूचं मुळ सौैंंदर्य अधिक खुलून येतं ते म्हणजे तिच्या डोक्यावरील सिंदूर आणि डोक्यावरील टिकली. कारण या गोष्टी सौभाग्याचं प्रतिक मानल्या जातात. म्हणूनच लगेच हातात याव्या यासाठी त्या तुमच्या मेकअप किटमध्ये ठेवा. 

  Beauty

  ZARKAN Multi-Color Round Shape Bindi

  INR 240 AT ZARKAN

  25. सॅनिटरी पॅड (Sanitary napkins)

  प्रत्येक स्त्रीसाठी सॅनिटरी पॅड ही एक महत्त्वाची आणि गरजेची गोष्ट आहे. लग्नाच्या गडबडीत तुम्हाला कधीकधी लवकर मासिक पाळी येण्याची गरज असते. यासाठी तुमच्या मेकअप किटमध्ये सॅनिटरी पॅड ठेवा.  

  Whisper Ultra Plus Sanitary Pads XL Plus (44 Count)

  INR 399 AT Generic