मुंबईतील बेस्ट डान्स क्लासेस (Best Dance Classes In Mumbai In Marathi)

मुंबईतील बेस्ट डान्स क्लासेस (Best Dance Classes In Mumbai In Marathi)

डान्स हे फक्त आता छंद किंवा फॅड राहिलेला नाही. तर अनेकांची गरज बनली आहे. त्यामुळे डान्स हा आजकाल फक्त नृत्यप्रकार राहिला नसून फिटनेससाठीही बरेचजण यालाच पसंती देतात. बदलत्या लाईफस्टाईलमध्ये लोक फिटनेससाठी हेवी एक्सरसाईजऐवजी डान्सच्या वेगळ्या आणि हलक्याफुलक्या एक्सरसाईजला पसंती देत आहेत. तर काहीजण प्रोफेशनली डान्स करता यावा म्हणूनही डान्स क्लास लावतात. आपल्या मुलांना काहीतरी एक्स्ट्रा कला यावी या हेतून पालक मुलांना लहानपणापासूनच डान्स क्लासला घालतात. डान्स क्लासेसचं प्रस्थ वाढण्याचं अजून एक कारण म्हणजे डान्स रिएलिटी शोजची चलती हेसुद्धा आहे. तसंच डान्समुळे तुमच्या शरीराला एक प्रकारे चालना मिळते आणि आत्मविश्वासही मिळतो. 

Table of Contents

  https://www.justdial.com/photos/5th-gear-fitness-goregaon-west-mumbai-dance-classes-2f9lp4w-pc-42526978-sco-43iu6eq622q

  मुंबईच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये लोकं रिलीफ म्हणूनही डान्स क्लासेसना जातात. ज्यामुळे त्यांना रोजच्या रूटीनमधून थोडा चेंज मिळतो आणि काहीतरी नवीन केल्याचं समाधानही मिळतं. त्यामुळे मुंबईसारख्या मॉर्डन सिटीमध्ये डान्ससाठी अनेक ऑप्शन्स आहेत. क्लासिकल डान्स ते मॉर्डन डान्समधील अनेक प्रकार इथल्या वेगवेगळ्या क्लासेसमध्ये तुम्ही जॉईन करू शकता. तसंच तुमच्या बजेटप्रमाणे इथे डान्स क्लासेस उपलब्ध आहेत. नजर टाकूया मुंबईतील विविध डान्स फॉर्म्सच्या क्लासेसवर.

  Also Read : मुंबईतील अभिनय शाळा

  मुंबईतील शास्त्रीय डान्स क्लासेस (Classical Dance Classes)

  भारतामध्ये मॉर्डन डान्सचं फॅड येण्याआधी क्लासिकल डान्सचं प्रस्थ होतं आणि आजही कायम आहे. आजही वयाच्या पाचव्या वर्षापासून छोट्या मुलींना कथ्थक आणि भरतनाट्यमच्या डान्स क्लासेसना पाठवलं जातं. आतातर अनेक विद्यापीठातून नृत्य विशारद म्हणून पदवीही घेता येते. त्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना या शास्त्रीय डान्स क्लासेसना आवर्जून पाठवतात.  

  कुलाबा कॉजवे देखील वाचा

  कथ्थक डान्स क्लासेस (Kathak Dance Classes)

  https://www.justdial.com/photos/pt-girdhar-chand-kathak-dance-and-music-academy-andheri-west-mumbai-dance-classes-for-kathak-55y1r-pc-76402300-sco-43khjmix

  भारतीय नृत्य प्रकारातील हा लोकप्रिय नृत्य प्रकार आहे. आज या नृत्यप्रकारातील शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी विशारद होत आहेत. ज्यामुळे त्यांची भविष्याची चिंताही मिटली आहे.

  1. कला परिचय भारता कॉलेज

  पत्ता Address - 1, माया कॉ ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., 5 एमटीएनएल मार्ग, दादर पश्चिम, मुंबई - 400028, प्रभादेवी टेलिफोन एक्सचेंजजवळ. 

  कसे जाल How to Reach - या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही बस किंवा रिक्शाचा वापर करू शकता. हे दादरच्या मध्यभागी असल्याने कनेक्टीव्हीटीसाठीही चांगलं आहे. 

  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - या डान्स क्लासेसला 1993 मध्ये सुरूवात झाली असून इथे शास्त्रीय नृत्यप्रकारासोबतच इतरही नृत्यप्रकार शिकवले जातात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या विकासावर इथे विशेष लक्ष दिले जाते. 

  अंदाजे खर्च Fees - हजार रूपयांपासून पुढे.  

  2. प्रशा नृत्य अकॅडमी 

  पत्ता Address - करमरकर स्टुडिओ, फिल्मसिटी रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई - 400063, ऑबेरॉय मॉलजवळ 

  कसे जाल How to Reach - इथे पोचण्यासाठी तुम्ही स्टेशनहून बस किंवा रिक्शाचा पर्याय वापरू शकता. तसंच हे वेस्टर्न हायवेलगत असल्याने खाजगी वाहनाचाही वापर करणं सहज शक्य आहे. 

  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - ही अकॅडमी खासकरून कथ्थक नृत्यासाठी आहे. इथे महिला आणि पुरूष दोघांसाठीही बॅचेस आहेत. तसंच इथे घरी येऊन खाजगी नृत्य शिकवण्याचाही पर्याय आहे. 

  अंदाजे खर्च Fees - एक हजार रूपयांपासून पुढे. 

  3. कथा क्रिएशन 

  पत्ता Address - 1/7, उन्नत नगर 3, एमजी रोड, गोरेगाव पश्चिम, मुंबई - 400062, शबरी (उडिपी) रेस्टॉरंटजवळ. 

  कसे जाल How to Reach - या ठिकाणी पोचण्यासाठी तुम्हाला गोरेगाव पश्चिमहून बसेसचा पर्याय आहे. तसंच खाजगी किंवा शेअर रिक्षाही मिळू शकतात. 

  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - या डान्स क्लासेसमध्ये मुख्यतः कथ्थक नृत्य तसंच सेमी क्लासिकल नृत्यही शिकवलं जातं. इथे फक्त स्त्रिया आणि लहान मुलांसाठी डान्स क्लासेस उपलब्ध आहेत. 

  अंदाजे खर्च Fees - पाचशे रूपयांपासून पुढे. 

  4. एकदंत कलाक्षेत्र अकॅडमी ऑफ म्युझिक एंड डान्स 

  पत्ता Address - शॉप नं 4, एनजी सनसिटी फेज 3, कांदिवली पूर्व, मुंबई - 400101

  कसे जाल How to Reach - इथे जाण्यासाठी तुम्हाला खाजगी किंवा शेअर ऑटो मिळतील. तसंच बसचाही पर्याय आहे. 

  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - हे क्लासेस खास प्रयाग संगीत समिती अलाहाबादशी संलग्न आहेत. इथे संगीत आणि नृत्य दोन्ही शिकता येतं. त्यामुळे शास्त्रीय नृत्यात पारंगत होण्यासाठी इथे चांगली संधी मुलांना उपलब्ध होते. 

  अंदाजे खर्च Fees - पाचशे रूपयांपासून पुढे. 

  5. कथ्थक डान्स आणि क्लासिकल म्युझिक अकॅडमी 

  पत्ता Address - B/102, संगम, सुचीधाम, ए के वैद्य मार्ग, मालाड पूर्व, मुंबई - 400097.

  कसे जाल How to Reach - या ठिकाणी पोचण्यासाठी तुम्ही रिक्शा किंवा बसचा वापर करू शकता. तसंच हे वेस्टर्न हायवेजवळ असल्याने खाजगी वाहनाचा वापरही शक्य आहे. 

  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - या क्लासेसची सुरूवात 2013 साली झाली. येथील दिव्या मॅमकडून शिकलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. तसंच या क्लासेसमध्ये मुख्यतः भारतीय नृत्य कलाप्रकारांवर भर दिला जातो. 

  अंदाजे खर्च Fees - पाचशे रूपयांपासून पुढे. 

  6. समिधा कथ्थक क्लासेस 

  पत्ता Address - D/103, गुरूदर्शन, प्लॉट नं.7, लोखंडवाला, अंधेरी (पश्चिम), मुंबई -400053, राजपूत क्लासेसजवळ 

  कसे जाल How to Reach - इथे पोचण्यासाठी तुम्हाला स्टेशनहून बस आणि रिक्शाचा पर्याय आहे. तसंच तुम्ही मेट्रोने डी एन नगरपर्यंत येऊन पुढे रिक्शाने लोखंडवाला येथे पोचू शकता. 

  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - या क्लासेसची स्थापना 2011 मध्ये झाली. या क्लासेसची खासियत म्हणजे कथ्थक आणि सेमी क्लासिकल डान्सेस. इथे खास लहान मुलं आणि स्त्रियांसाठी क्लासेस आहेत. तसंच घरी जाऊनही डान्स शिकवला जातो. 

  अंदाजे खर्च Fees - पाचशे रूपयांपासून पुढे. 

  7. कला वर्क्स 

  पत्ता Address - रेखा अपार्टमेंट, एल टी रोड, गोरेगाव पश्चिम, मुंबई - 400104, नूतल दाल मिलजवळ, ऑफ एमजी रोड

  कसे जाल How to Reach - या ठिकाणी तुम्ही बस किंवा रिक्षाने जाऊ शकता. 

  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - हे जणू कलामंदिरच आहे. कारण इथे मुलांसाठी डान्ससोबतच विविध आर्ट एक्टीव्हिटीजही उपलब्ध आहेत. इथे अनेक वर्कशॉप्सही आयोजित केली जातात. या क्लासेसना तब्बल 12 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. या डान्स क्लासेसना खास करून हॉबी क्लासेस म्हणून ओळखलं जातं. 

  अंदाजे खर्च Fees - पाचशे रूपयांपासून पुढे.  

  8. कलामंदिर कथ्थक एंड फॉक डान्स क्लासेस 

  पत्ता Address - स्वाती अपार्टमेंट, फ्लॅट नं 10, बिल्डींग नं. 22/बी, अपना घर युनिट 5, लोखंडवाला क्रॉस रोड नं 1, अंधेरी पश्चिम, मुंबई - 400053, डॉमिनोज पिझ्झाजवळ, मॅक्डॉनल्ड्सच्या मागे. 

  कसे जाल How to Reach - हे क्लासेस अगदी मोक्याच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे तुम्हाल पोचणे कठीण जाणार नाही. तुम्ही बस किंवा रिक्षाचा पर्याय वापरू शकता. 

  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - क्लासेसची सुरूवात तब्बल 1998 साली झाली असून येथे कथ्थक आणि इतर क्लासिकल डान्सेसही शिकवले जातात.  

  अंदाजे खर्च Fees - पाचशे रूपयांपासून 

  9. पंडित गिरधरचंद कथ्थक डान्स म्युझिक अकॅडमी

  पत्ता Address - D-66, पहिला मजला, डी ब्लॉक, तारापूर गार्डन बिल्डींग, न्यू लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई - 400053, ओशिवरा पोलीस स्टेशनसमोर 

  कसे जाल How to Reach - या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला स्टेशनच्या बाहेरच बससेवा उपलब्ध आहे. तसंच रिक्षा आणि खाजगी वाहनांचा पर्यायही उपलब्ध आहे. 

  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - हे क्लासेस खूप जुने असून याची सुरूवात 1992 साली करण्यात आली होती. येथे खासकरून कथ्थक हा नृत्यप्रकार शिकवला जातो. तसंच कथ्थकमधील प्रसिद्ध नृत्यगुरू पंडित बिरजू महाराज यांचं मार्गदर्शनाखालील कथ्थक शिकवलं जातं तसंच हे क्लासेस प्राचीन कला केंद्राशी संलग्न आहे. येथे घरी येऊन नृत्य शिकवण्याचीही सोय उपलब्ध करून दिली जाते. 

  अंदाजे खर्च Fees - पाचशे रूपयांपासून पुढे. 

  10. नटराज की झंकार नृत्यमंदिर 

  पत्ता Address - हरिओम हाऊस, बंगलो नं. 22, गुलमोहर सोसायटी, कोरा केंद्र, न्यू लिंक रोड, बोरिवली पश्चिम, मुंबई - 400092, राधेमां पॅलेसजवळ 

  कसे जाल How to Reach - बस किंवा रिक्षाने तिथे तुम्ही पोचू शकता. 

  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - इथे मुख्यतः कथ्थकचे क्लासेस महिला आणि लहान मुलांसाठी घेतले जातात. तसंच घरी येऊनही नृत्याचे धडे दिले जातात. 

  अंदाजे खर्च Fees - पाचशे रूपयांपासून पुढे. 

  मुंबईत स्ट्रीट फूड देखील वाचा

  भरतनाट्यम डान्स क्लासेस (Bharatnatyam Dance Classes)

  https://www.justdial.com/photos/swaranik-dance-institute-by-gracy-singh-andheri-west-mumbai-dance-classes-2f7myk4zlg-pc-105109314-sco-43eiyay2iue

  कथ्थकप्रमाणेच भरतनाट्यम या नृत्यप्रकारालाही खूप मागणी आहे. त्यामुळे मुंबईत याचेही अनेक क्लासेस आहेत. तुम्ही हा नृत्यप्रकार शिकण्यासाठी मुंबईतील अनेक पर्यायांचा वापर करू शकता.

  1. स्वरणिक डान्स इन्स्टिट्यूट बाय ग्रेसी सिंग

  पत्ता Address - भक्तीवेदांत स्वामी मिशन स्कूल, जुहू वर्सोवा लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई - 400058
  कसे जाल How to Reach - या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही बस, मेट्रो किंवा रिक्षाचा पर्याय वापरू शकता
  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - बॉलीवूडमध्ये गाजलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे लगान हा चित्रपट. यातील नायिका ग्रेसी सिंग तुम्हाला लक्षात आहे का, याच नायिकेने सुरू केलेलं हे इन्स्टिट्यूट आहे. इथे भरतनाट्यम आणि इतरही क्लासिकल डान्सचे प्रकार आवर्जून शिकवले जातात.
  अंदाजे खर्च Fees - पाच हजारांपासून पुढे.

  2. नृत्यांजली द डान्स कल्चर भरतनाट्यम् 

  पत्ता Address - 702, शिवतीर्थ सोसायटी प्लॉट नं 258, सेक्टर 10, खारघर सेक्टर 10, नवी मुंबई - 410210, बँक ऑफ इंडियाजवळ
  कसे जाल How to Reach - इथे जाण्यासाठी तुम्ही बस किंवा रिक्षाचा वापर करू शकता.
  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - इथे मुख्यतः भरतनाट्यमच शिकवलं जातं. या नृत्यांजलीची सुरूवात 2011 मध्ये करण्यात आली होती. इथे खासकरून महिला आणि लहान मुलांना भरतनाट्यम शिकवलं जातं. तसंच घरी जाऊनही शिकवलं जातं.
  अंदाजे खर्च Fees - पाचशे रूपयांपासून पुढे.

  3. किनकिन्नी डान्स अकॅडमी

  पत्ता Address - लाईफ लाईन हॉस्पिटलच्या पुढे, न्यू समर्थ कॉ ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी, स्टेशन रोड, ऐरोली सेक्टर 2, नवी मुंबई - 400708, ऐरोली रेल्वे स्टेशनसमोर.
  कसे जाल How to Reach - ही अकॅडमी अगदी मोक्याच्या ठिकाणी असल्याने तुम्ही अगदी चालतही जाऊ शकता किंवा रिक्शाचा पर्याय वापरू शकता.
  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - या क्लासेसमध्ये पारंपारिक भरतनाट्यम आणि कथ्थक तसेच नृत्याचे इतरही प्रकार शिकवले जातात.
  अंदाजे खर्च Fees - हजार रूपयांपासून पुढे.

  4. विस्डम डान्स अकॅडमी

  पत्ता Address - भूमिका हाईट्स नमन ग्रुप सेक्टर नं.18, खारघर, नवी मुंबई - 410210
  कसे जाल How to Reach - तुम्ही बस, रिक्षा किंवा रेल्वेचा पर्याय उपलब्ध आहे.
  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - इथे भरनाट्यमसोबत डान्सचे इतरही प्रकार शिकवले जातात.
  अंदाजे खर्च Fees - पाचशे रूपयांपासून पुढे.

  5. नतनाम भरतनाट्यम डान्स क्लासेस

  पत्ता Address - ऐक्य दर्शन कॉ ऑप हाऊसिंग सोसायटी, जी डी आंबेडकर मार्ग, काळा चौकी, मुंबई - 400033, किंगस्टन टॉवरजवळ
  कसे जाल How to Reach - हे मुंबईतील अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. त्यामुळे इकडे जाण्यासाठी तुम्हाला बस, टॅक्सी आणि रेल्वेचा पर्याय उपलब्ध आहे.
  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - येथे मुख्यतः भरतनाट्यम शिकवले जाते. इथे डान्स एट होमची सुविधाही उपलब्ध आहे.
  अंदाजे खर्च Fees - हजार रूपयांपासून पुढे

  6. नृत्यमाया डान्स क्लास

  पत्ता Address - चारकोप सेक्टर - 2, कांदिवली पश्चिम, मुंबई - 400067.  
  कसे जाल How to Reach - इथे तुम्ही जाण्यासाठी बस किंवा रिक्षाचा पर्याय उपलब्ध आहे.
  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - या क्लासेसच्या माध्यमातून प्रामुख्याने घरी जाऊन विद्यार्थ्यांना भरतनाट्यम शिकवलं जातं.
  अंदाजे खर्च Fees - पाचशे रूपयांपासून पुढे.

  7. नुपूर ललित

  पत्ता Address - स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, वीर सावरकर रोड, दादर वेस्ट, मुंबई - 400028, शिवाजी पार्कसमोर.
  कसे जाल How to Reach - येथे तुम्ही दादर स्टेशनहून चालत, टॅक्सी किंवा बसने पोचू शकता.
  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - येथे खासकरून लहान मुलांना क्लासिकल डान्सचे धडे दिले जातात.
  अंदाजे खर्च Fees - हजार रूपयांपासून पुढे

  8. अकॅडमी ऑफ डान्स

  पत्ता Address - बी 903, सिल्व्हर प्रेसिडेंसी, आरएससी 8, चारकोप सेक्टर 2, मुंबई - 400067, चारकोप पोलीस स्टेशनच्या मागे.
  कसे जाल How to Reach - इकडे जाण्यासाठी बस किंवा रिक्षाचा पर्याय उपलब्ध आहे.
  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - येथे मुख्यतः भरतनाट्यमचे महिलांसाठी क्लासेस घेतले जातात. तसंच डान्स एट होमचीही सुविधा उपलब्ध आहे.
  अंदाजे खर्च Fees - हजार रूपयांपासून पुढे.

  मुंबईतील मॉर्डन डान्स क्लासेस (Modern Dance Classes In Mumbai)

  सर्वांनाच पारंपारिक किंवा क्लासिकल डान्स शिकण्याची इच्छा नसते. नो प्रोब्लेम तुमच्याकरताही डान्स क्लासेसचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पाहा मुंबईतील मॉर्डन डान्स अकॅडमीजची लिस्ट

  हिपहॉप डान्स क्लासेस (Hip Hop Dance Classes)

  https://www.justdial.com/photos/tijos-dance-academy-goregaon-east-mumbai-dance-classes-l80c75-pc-55782375-sco-43sp55g4

  हिपहॉप डान्सची क्रेझ सध्या युवामध्ये जास्त आहे. अनेक डान्स रिएलिटी शोजमुळे या डान्सच्या क्लासेसना जास्त मागणी आहे. 

  1. द डान्स डेस्टिनेशन

  पत्ता Address - मॅन हाऊस बेसमेंट, एसव्ही रोड, पवन हंससमोर, विलेपार्ले पश्चिम, मुंबई - 400056

  कसे जाल How to Reach - या ठिकाणी जाण्यासाठी सर्वात सोपा पर्याय म्हणजे पार्ले रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला उतरून रिक्षा पकडणे. 

  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - येथे हिपहॉप आणि इतर मॉर्डन डान्स प्रकार शिकता येतील. या क्लासेसना बेस्ट डान्स फिटनेस क्लास म्हणूनही ओळखले जाते. 

  अंदाजे खर्च Fees - पाच हजार रूपयांपासून पुढेच. 

  2. टेरेन्स लुईस प्रोफेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट 

  पत्ता Address - युनिट 155, ब्लॉक 33, लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेट, अंधेरी पश्चिम, मुंबई - 400053.

  कसे जाल How to Reach - या ठिकाणी तुम्हाला रिक्षा आणि बसेसचा पर्याय आहे. इथे जाण्यासाठी शेअर ऑटोही उपलब्ध आहेत. तसंच बसची फ्रिकवेन्सीही चांगली आहे. 

  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - भारतीय प्रसिद्ध कोरिओग्राफरपैकी एक असलेल्या टेरेन्स लुईसने हे क्लासेस सुरू केले आहेत. ज्याची ख्याती कंटेपररी डान्समध्ये आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लासिकल आणि मॉर्डन नृत्य प्रकार शिकता येतील. या क्लासेसची सुरूवात 1998 मध्ये झाली होती. 

  अंदाजे खर्च Fees -  दहा हजारांपासून पुढे. 

  3. एन्सेंबल डान्स स्टुडिओज 

  पत्ता Address - सिटी मॉलच्या मागे, शास्त्री नगर, अंधेरी पश्चिम, भक्ती वेदांत स्वामी मिशन स्कूल. मुंबई - 400053.

  कसे जाल How to Reach - या ठिकाणी जाण्यासाठी बस किंवा रिक्षाचा तसंच शेअर रिक्षाचा पर्यायही उपलब्ध आहे. 

  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - या स्टुडिओजमध्ये हिपहॉपसारखे सर्व प्रकारचे कमर्शियल तसेच मॉर्डन डान्सेस शिकता येतील. 

  अंदाजे खर्च Fees - पाच हजारांपासून पुढे. 

  4. जोजो डान्स अकॅडमी 

  पत्ता Address - डीबी मॉल, जुहू पीव्हीआर, 2nd बेसमेंट, चंदन सिनेमाच्या पुढे, एसडी रोड, मुंबई - 400049.

  कसे जाल How to Reach - येथे जाण्यासाठी तुम्ही बस किंवा रिक्षाचा पर्याय निवडू शकता. 

  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - या डान्स अकॅडमीची खासियत म्हणजे हिपहॉप, बॉलीवूड, कंटेपररी, फ्री स्टाईल आणि साल्सा डान्स आहेत. तसंच इकडे विद्यार्थ्यांवर खास वैयक्तिक लक्ष दिलं जातं 

  अंदाजे खर्च Fees - पाच हजारांपासून पुढे. 

  5. शामक दावर इन्स्टिट्यूट फॉर परफॉर्मिंग आर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड 

  पत्ता Address - 1203, मॅरेथॉन आयकॉन, पेनिन्सुला पार्कसमोर, गणपतराव कदम मार्ग, लोअर परेल पश्चिम, मुंबई - 400013

  कसे जाल How to Reach - इथे तुम्ही लोअर परेल स्टेशनला उतरून चालत किंवा टॅक्सीने जाऊ शकता. 

  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - डान्सच्या दुनियेत शामक दावर हे नाव एखाद्या लेजंडसारखं आहे. त्यामुळे इथे प्रवेश घेणं हे कोणत्याही डान्सर्ससाठी स्वप्नवत आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी यांच्या शाखा आहेत. 

  अंदाजे खर्च Fees - वीस हजारांपासून पुढे.  

  6. नमिषा डान्स क्लासेस 

  पत्ता Address - ई 403, रहेजा नेस्ट, पवई, चांदिवली, मुंबई - 400076 

  कसे जाल How to Reach - बस किंवा रिक्षाने तुम्ही इथे जाऊ शकता. पण शक्यतो ट्रॅफिकची वेळ टाळूनच इथे जाणं चांगलं आहे. 

  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - या क्लासेसमध्ये हिपहॉप या डान्स प्रकारासोबतच तुम्ही इतरही मॉर्डन डान्स प्रकार शिकू शकता. 

  अंदाजे खर्च Fees - पाच हजारांपासून पुढे. 

  7. सुधाकर डान्स अकॅडमी 

  पत्ता Address - 105, पहिला मजला, रिलायबल बिझनेस सेंटर, ओशिवरा, मुंबई - 400102, हिरापन्ना मॉलजवळ. 

  कसे जाल How to Reach - इथे तुम्ही रिक्षा किंवा बसने जाऊ शकता. 

  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - इथे तुम्हाला हिपहॉप, साल्सा, बेली डान्स आणि इतरही मॉर्डन डान्स प्रकार शिकता येतील. डान्स क्लासेस एट होमचाही पर्याय इथे उपलब्ध आहे. 

  अंदाजे खर्च Fees - दहा हजारांपासून पुढे. 

  8. स्पार्टन अकॅडमी ऑफ डान्स 

  पत्ता Address - प्रती रक्षा नगर सोसायटी हॉल, वाकोला ब्रीज, सांताक्रूझ पूर्व, सोना हॉस्पिटलजवळ, मुंबई- 400055.  

  कसे जाल How to Reach - इथे जाण्यासाठी बस किंवा रिक्षाचा पर्याय वापरू शकता. 

  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - या डान्स क्लासेसमध्ये मॉर्डन डान्समधील बहुतेक सर्व प्रकार जसं हिपहॉप, सालसा, वेस्टर्न डान्स अगदी भांगडा आणि लावणीसुद्धा शिकवली जाते. हे क्लासेस फक्त मुलांसाठी आहेत. 

  अंदाजे खर्च Fees - पाच हजारांपासून पुढे.  

  9. बंटी डान्सिंग क्रू 

  पत्ता Address - बीडीडी चाळ नं 70, रूम नं 22, भागोजी वाघमारे मार्ग, वरळी, मुंबई - 400018

  कसे जाल How to Reach - तुम्ही टॅक्सी किंवा बसने येथे जाऊ शकता. 

  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - या डान्स क्लासमध्ये हिपहॉप, साल्सा, झुंबा, पॉपिंग आणि इतरही डान्सचे प्रकार शिकवले जातात. 

  अंदाजे खर्च Fees - एक हजारांपासून पुढे. 

  मुंबईतील झुंबा आणि बेली डान्स क्लासेस (Zumba And Belly Dance Classes)

  https://www.justdial.com/photos/sway-dance-studio-vile-parle-east-mumbai-gyms-7fc17-pc-6302620-sco-4327hvfu

  सध्या फिटनेससाठीही डान्सला प्राधान्य दिलं जात असल्याचं चित्र आहे. फिटनेससाठी मुख्यतः झुंबा आणि बेली डान्स या प्रकारांना जास्त महत्त्व आहे. 

  1. बेली डान्स इन्स्टिट्यूट 

  पत्ता Address - लिकींग रोड, बांद्रा पश्चिम, मुंबई - 400050

  कसे जाल How to Reach - येथे तुम्ही रिक्शा किंवा बसने जाऊ शकता. 

  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - हे क्लासेस मुख्यतः बेली डान्ससाठी ओळखले जातात. हे क्लासेस तब्बल 15 वर्ष जुने आहेत. हे डान्स इन्स्टिट्यूट रितंभरा साहनी यांनी सुरू केले असून त्यांच्या दोन बहिणी यामध्ये त्यांना मदत करतात. 

  अंदाजे खर्च Fees - पाच हजारांपासून पुढे. 

  2. वर्ल्ड वन स्टुडिओ 

  पत्ता Address - 207, दुसरा मजला, अकॉर्ड क्लासिक, स्टेशन रोड, गोरेगाव पश्चिम, मुंबई - 400063, अनुपम स्टेशनरीच्या वर

  कसे जाल How to Reach - हे डान्स क्लासेस गोरेगाव रेल्वे स्टेशनपासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर आहेत. तुम्ही वेस्टर्न एक्सप्रेस हायवेनेही इथे येऊ शकता. 

  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - या डान्स स्टुडिओमध्ये मुख्यतः डान्सच्या माध्यमातून फिटनेसवर भर दिला जातो. 

  अंदाजे खर्च Fees - पाच हजारांपासून पुढे. 

  3. युनिव्हर्सल डान्स स्टुडिओज 

  पत्ता Address - स्टुडिओ हाऊस ऑफ हॅपीनेस, राणा रेसिडेन्सी, शेर ए पंजाब सोसायटी, ऑफ महाकाली केव्हस रोड, अंधेरी पूर्व, मुंबई - 400093, एचडीएफसी बँकच्या बाजूला, टोलानी नाका. 

  कसे जाल How to Reach - येथे जाण्यासाठी तुम्ही बस किंवा रिक्षाचा पर्याय वापरू शकता. 

  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - या स्टुडिओजना 2015 साली सुरूवात झाली. येथे बॉलीवूड डान्सपासून ते अगदी कथ्थकपर्यंत सर्व प्रकारचे डान्सेस शिकवले जातात. 

  अंदाजे खर्च Fees - पाच हजारांपासून पुढे. 

  4. द वर्ल्ड द डान्स स्टुडिओ 

  पत्ता Address - खार मीनाक्षी बिल्डींग, तळमजला, 12th रोड, खार पश्चिम, मुंबई - 400052, रॉयल फर्निशिंग समोर. 

  कसे जाल How to Reach - इथे तुम्ही बस आणि रिक्षाने जाऊ शकता. तसंच खाजगी वाहनाने पोचू शकता. 

  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - या डान्स स्टुडिओमध्ये खासकरून झुंबा हा प्रकार शिकवला जातो. येथे लहान मुलं आणि महिलांसाठी डान्स बॅचेस आहेत. 

  अंदाजे खर्च Fees - दहा हजारांपासून पुढे

  5. जस्ट डान्स स्टुडिओ 

  पत्ता Address - तळमजला, बिल्डींग नं 49, साईकृपा कॉ ऑप हाउसिंग सोसायटी लि., गांधी नगर, बांद्रा पूर्व, मुंबई - 400051, एमआयजी क्लबसमोर. 

  कसे जाल How to Reach - या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही रिक्षा, बस किंवा टॅक्सीचा वापर करू शकता. 

  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - या क्लासेसना 2015 मध्ये सुरूवात झाली. येथे सर्व मॉर्डन डान्स प्रकार शिकवले जातात. 

  अंदाजे खर्च Fees - पाच हजारांपासून पुढे.

  6. राज डान्स फिटनेस स्टुडिओ 

  पत्ता Address - ए1, आयट्स बिल्डींग, दीनानाथ सोसायटी, आरटीओ रोड, चार बंगला, अंधेरी पश्चिम, कोकिलाबेन हॉस्पिटलसमोर, मुंबई - 400053

  कसे जाल How to Reach - या ठिकाणी तुम्ही बस किंवा रिक्षाचा पर्याय वापरू शकता. 

  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - येथे झुंबापासून कथ्थकपर्यंत लहान मुलांना सर्व डान्स फॉर्म शिकवले जातात. 

  अंदाजे खर्च Fees - पाच हजारांपासून पुढे.  

  7. फील फ्री 2 डान्स एक्टीव्हिटी सेंटर 

  पत्ता Address - रॉ हाऊस नं C-5, ऐरोली सेक्टर 4, नवी मुंबई - 400708, फायर ब्रिगेडसमोर. 

  कसे जाल How to Reach - इथे जाण्यासाठी तुम्ही बस किंवा रिक्षाचा वापर करू शकता. 

  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - इथे मुख्यतः पिलाटेज, झुंबा आणि वेटलॉसवर भर दिला जातो. 

  अंदाजे खर्च Fees - एक हजारांपासून पुढे. 

  8. 5th गिअर फिटनेस 

  पत्ता Address - स्टुडिओ नं 6, उन्नत नगर 2 रोड नं 1, ऑफ एसव्ही रोड, गोरेगाव पश्चिम, मारूती मंदीराजवळ, मुंबई  - 400104.

  कसे जाल How to Reach - इथे जाण्यासाठी तुम्ही बस किंवा रिक्षाचा पर्याय वापरू शकता. 

  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - येथे मुख्यतः झुंबा या वेटलॉससाठी करण्यात येणाऱ्या डान्स फॉर्मवर भर दिला जातो. 

  अंदाजे खर्च Fees - एक हजारांपासून पुढे. 

  9. शशी सिंग डान्स अकॅडमी 

  पत्ता Address - सिएरा टॉवर हॉल, कांदिवली पूर्व, मुंबई - 400101

  कसे जाल How to Reach - येथे जाण्यासाठी रिक्षा किंवा बसचा पर्याय आहे. 

  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - येथे मुख्यतः झुंबा आणि बेली डान्स क्लासेस घेतले जातात. 

  अंदाजे खर्च Fees - एक हजारांपासून पुढे. 

  10. रूद्रशाला डान्स अँड फिटनेस स्टुडिओ 

  पत्ता Address - प्लॉट नं 319/2548, मोतीलाल नगर नं 2, एमजी रोड, गोरेगाव पश्चिम, मुंबई - 400104, पिकासो रेस्टॉरंटजवळ. 

  कसे जाल How to Reach - इथे जाण्यासाठी तुम्ही बस किंवा रिक्षाचा वापर करू शकता. 

  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - येथे मुख्यतः बेली डान्स आणि झुंबासारखे डान्स फॉर्मेट शिकवले जातात. या क्लासेसची सुरूवात 2011 मध्ये झाली. 

  अंदाजे खर्च Fees - एक हजारपासून पुढे. 

  साल्सा डान्स क्लासेस (Salsa Dance Classes In Mumbai)

  https://www.justdial.com/photos/rahul-saxenas-dance-connection-andheri-west-mumbai-dance-classes-yfbda6dipb-pc-126447002-sco-43nhytie

  साल्सा हा डान्स प्रकार कपल्स डान्स म्हणून ओळखला जातो. आपल्या पार्टनरसोबत ट्युनिंग जुळवत हा डान्स प्रकार करणं सोपं नाही. पण तरीही साल्सा डान्स शिकण्याची अनेकांना आवड असल्याचं चित्र आहे. 

  1. टिजोज डान्स अकॅडमी 

  पत्ता Address - करमरकर जिम, फिल्मसिटी रोड, गोरेगाव पूर्व, मुंबई - 400063, ऑबेरॉय मॉलजवळ, एचडीएफसी बँकच्या मागे. 

  कसे जाल How to Reach - हे क्लासेस वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या अगदी जवळ आहेत. तसंच इथे जाण्यासाठी बस आणि रिक्षाही उपलब्ध आहेत. 

  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - तब्बल 2007 सालापासून हे क्लास सुरू आहेत. येथे साल्सासोबत इतरही मॉर्डन डान्सेस शिकवले जातात. 

  अंदाजे खर्च Fees - दोन हजारांपासून पुढे. 

  2. डान्सस्टार स्टुडिओ

  पत्ता Address - 207 रायगड कमर्शिअल कॉम्प्लेक्स, न्यू लिंक रोड, जोगेश्वरी पश्चिम, मुंबई - 400102, हॉलीवूड बॉलीवूड ड्रेसवाल्याच्या वर

  कसे जाल How to Reach - बस किंवा रिक्षाचा पर्याय तुम्हाला आहे. 

  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - येथे साल्सा, झुंबा आणि इतर मॉर्डन डान्स फॉर्म शिकवले जाातात. तसंच डान्स एट होमचंही ऑप्शन आहे. 

  अंदाजे खर्च Fees - एक हजारांपासून पुढे.

  3. मॅड्स एंटरटेनमेंट 

  पत्ता Address - ऑफिस नं. 8, खांडवाला आर्केड, खांडवाला लेन, मालाड पूर्व, मुंबई - 400097, कॉसमॉस बँकेच्या पुढे. 

  कसे जाल How to Reach - इथे जाण्यासाठी तुम्ही बस किंवा रिक्षाचा वापर करू शकता. 

  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - इथे साल्सा ते हिपहॉपपर्यंत सर्व डान्स शिकवले जातात. या क्लासला तब्बल सात वर्ष पूर्ण झाली आहेत. 

  अंदाजे खर्च Fees - एक हजारापासून पुढे

  4. राहुल सक्सेनाज डान्स कनेक्शन 

  पत्ता Address - 007/008 ऋषभ कॉम्प्लेक्स, ऑफ लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई - 400053, फन रिपब्लिक सिनेमासमोर 

  कसे जाल How to Reach - येथे जाण्यासाठी तुम्ही मेट्रो, बस, रिक्षा किंवा खाजगी वाहनाचा वापर करू शकता. 

  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - या क्लासेसची खासियत आहे साल्सा डान्स. इतरही मॉर्डन डान्स फॉर्म्स इथे शिकवले जातात. या क्लासेसना सुरू होऊन आता तब्बल दोन दशकांहून अधिक काळ झाला आहे. 

  अंदाजे खर्च Fees - पाच हजारांपासून पुढे. 

  5. स्टेप एन डान्स फिटनेस हब 

  पत्ता Address - श्री राजस्थान रिक्रिएशन क्लब, जेबी नगर, अंधेरी पूर्व, चकाला मेट्रो स्टेशनजवळ, पिरामल गार्डनच्या आत. 

  कसे जाल How to Reach - चकाला मेट्रो स्टेशन जवळ असल्यामुळे इथे पोचणं खूपच सोपं आहे. 

  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - इथे मुख्यतः डान्सच्या माध्यमातून फिटनेसवर भर दिला जातो. 2011 साली या क्लासेसना सुरूवात झाली. 

  अंदाजे खर्च Fees - एक हजार रूपयांपासून. 

  6. अर्पिता स्टेप अप डान्स अकॅडमी 

  पत्ता Address - स्टुडिओ 511, ई स्केअर कॉप्लेक्स, गरवारे हाऊस, विलेपार्ले पूर्व, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वरती, मुंबई - 400057. 

  कसे जाल How to Reach - हा डान्स क्लास वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या अगदी जवळ आहे तसंच इथे जाण्यासाठी तुम्ही रिक्षाचा वापर करू शकता. 

  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - क्लासेसची खासियतच आहे साल्सा डान्स फॉर्मेट. 2005 मध्ये या क्लासेसना सुरूवात झाली. 

  अंदाजे खर्च Fees - पाच हजारांपासून पुढे. 

  7. स्वे डान्स स्टुडिओ 

  पत्ता Address - शुभंकर सोसायटी, सुभाष रोड, विलेपार्ले पूर्व, साईबाबा मंदिरच्या पुढे, मुंबई - 400057

  कसे जाल How to Reach - इथे जाण्यासाठी तुम्ही बस किंवा रिक्षाचा वापर करू शकता. 

  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - या क्लासेसमध्ये सर्व मॉर्डन डान्सेस शिकवले जातात. तेही खासकरून महिला आणि लहान मुलांना.  

  अंदाजे खर्च Fees - एक हजारांपासून पुढे. 

  8. फंकी फीट डान्स स्टुडिओ 

  पत्ता Address - बी/7, दुसरा मजला, धनलक्ष्मी बिल्डींग, रायफल रेंज रोड, घाटकोपर पश्चिम, मुंबई - 400086, 

  कसे जाल How to Reach - येथे पोचण्यासाठी तुम्हाला बस आणि रिक्षाचा पर्याय उपलब्ध आहे. 

  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - येथे साल्सासोबतच इतरही मॉर्डन डान्स फॉर्मेट शिकवले जातात. या क्लासेसला 2011 मध्ये सुरूवात झाली. 

  अंदाजे खर्च Fees - दोन हजारांपासून पुढे.  

  9. टी आर डान्स कंपनी 

  पत्ता Address - 3 रोज निवास, माऊंट मेरी स्टेप्स, काडेश्वरी मंदिर रोड, बांद्रा पश्चिम, मुंबई - 400050, सचिन तेंडुलकर बिल्डींगजवळ 

  कसे जाल How to Reach - इथे जाण्यासाठी तुम्हाला बस आणि रिक्षाचा पर्याय आहे. 

  क्लासेसची स्पेशालिटी Classes Speciality - साल्सापासून क्लासिकल डान्सपर्यंत सर्व फॉर्मेट इथे शिकवले जातात. 

  अंदाजे खर्च Fees - पाच हजारापासून पुढे. 

  मुंबई डान्स क्लासेसबाबत विचारले जाणारे काही FAQs

  मुंबईतल्या डान्स क्लासेसमध्ये पुरूष आणि महिलांसाठी वेगवेगळ्या बॅचेस असतात का?

  हो, बऱ्याचश्या डान्स क्लासेसमध्ये कॉमन बॅचेससोबतच पुरूष आणि महिलांसाठी वेगवेगळ्या बॅचेस असतात.

  डान्स क्लासेसमध्ये इंडस्ट्रीतील एक्स्पर्ट्सना बोलावून वर्कशॉप्स घेतली जातात का?

  बऱ्याचश्या डान्स क्लासेसमध्ये डान्सर्ससाठी इंडस्ट्रीतील प्रसि्द्ध कोरिओग्राफर्सना बोलावून डान्स वर्कशॉप्स घेतली जातात. 

  मला या डान्स क्लासेसच्या माध्यमातून डान्स स्पर्धांमध्ये भाग घेता येईल का?

  हो, काही डान्स क्लासेस असे आहेत ज्यांच्यातर्फे तुम्ही डान्स स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकता किंवा तुम्ही व्यक्तीगतरित्याही डान्स स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकता.

  मुंबईतल्या डान्स क्लासेसमध्ये डान्स घरी शिकवण्याची सोय उपलब्ध केली जाते का?

  हो, काही डान्स क्लासेसमध्ये खाजगी किंवा घरी येऊन डान्स शिकवला जातो. पण याची चौकशी नोंदणी आधीच करून घ्यावी.