झोपायला आवडत नाही.. असे म्हणणारी 100 पैकी एखादीच व्यक्ती असेल.. काहींना कधीही विचारा त्यांना झोपायला फार आवडत असते. ते अगदी कधीही कोणत्याही वेळी ऑफिसमध्ये, प्रवासात… जिथे वेळ मिळेल तिथे काही झोपायला तयार असतात. म्हणजे एखादी डुलकी का असेना.. डोळे बंद करुन छान आराम करायला अनेकांना आवडते. पण ज्यावेळी अगदी व्यवस्थित झोपायची वेळ येते त्यावेळी मात्र तुम्हाला झोपण्याची योग्य पद्धत माहीत हवी. म्हणजे तुम्ही नेमकं कसं झोपावं हे देखील तुम्हाला कळायला हवं. जर तुम्हाला तुमच्या झोपण्याची योग्य पद्धत कळली तर तुम्ही अगदी आरामदायी पद्धतीने झोपू शकता. आणि त्या झोपेचा तुम्हाला फायदा देखील होईल.
आता Underarms मध्ये दिसणार नाहीत काळे डाग...घालवा ‘अशा’ पद्धतीने
प्रत्येक मानवी शरीराला ऑक्सिजनची जितकी गरज असते. तितकीच जास्त गरज झोपेची असते. जर शरीराला आवश्यक असलेली 7 ते 8 तासांची झोप जर तुम्हाला मिळाली तर तुम्हाला ताजेतवाने झाल्यासारखे वाटते. पण तुम्हाला तुमची झोप पूर्ण मिळाली नाही तर तुमचा संपूर्ण दिवस कसातरी जातो. तुम्हाला सतत झोप येत राहते. वयोगटानुसार झोपेचे तास ठरलेले असतात. म्हणजे अगदी तान्ह मूलं साधारण 9 तासांपेक्षा जास्त झोपते. साधारण 10 वर्षांपर्यंत 9 तासांची पूर्ण झोप गरजेची असते. तर प्रौढ व्यक्तींनी किमान 7 ते 8 तासांची झोप हवी असते. तुमच्या शरीराला आराम देण्याचे काम झोप करत असते. त्यामुळे झोप ही महत्वाची असते.
आता तुम्ही म्हणाल झोपण्याची कसली आली पद्धत आणि कसलं काय… अंग बेडवर टाकलं की झालं. पण तसं अजिबात नाही. तुम्ही कसे झोपता यावर तुमचे आरोग्य अवलंबून असते. आता पाहूया झोपण्याची योग्य पद्धत आणि त्यांचे फायदे
जर तुम्ही पाठीवर झोपणारे असाल तर तुमच्यासाठी झोपण्याची ही पहिली उत्तम पद्धत आहे. तुम्हाला तुमच्या पाठीवर झोपायचे आहे. पण आता अगदी सरळ झोपण्यापेक्षा तुम्हाला तुमच्या गुडघ्यांना थोडा आधार द्यायचा आहे. म्हणजे गुडघ्यातून पाय दुमडून तुम्हाला त्याखाली नरम उशी ठेवायची आहे. या उशीची उंची जास्त असता कामा नये. झोपण्याची ही पद्धत आरामदायी असून तुमचा रक्तपुरवठाही चांगला होतो.
फायदे (benefits): शरीराला आराम मिळतो. रक्तपुरवठा चांगला राहतो.
लहान मुलं आईच्या पोटात असताना जशी झोपतात. अगदी त्याच पद्धतीने अनेकांना झोपायची सवय असते. जर तुमचा मज्जारज्जू चांगला राहावा असे वाटत असेल तर तुम्ही आवर्जून असे झोपायला हवे. ज्यांचा मज्जारज्जूचा त्रासअसतो. त्यांनी नक्कीच अशा पद्धतीत झोपायला हवे. कोणत्याही एका बाजूने झोपून तुम्हाला तुमचे दोन्ही पाय छातीजवळ घ्यायचे आहेत. तुम्ही तुमचे हात डोक्याखाली घेऊ शकता.
फायदे (benefits): पाठीचा कणा फ्लेक्झिबल राहतो. रक्तपुरवठा चांगला होतो.
काही जणांना पाठीवर किंवा पोटावर झोपायला आवडत नाही. तर त्यांना एका बाजूने झोपायला आवडते. त्यांनी त्यांच्या झोपण्यामध्ये थोडासा बदल करायला आहे. तुम्ही जसे साईडला झोपता अगदी तसेच तुम्हाला झोपायचे आहे. पण असे करताना तुम्हाला तुमच्या दोन पायांच्या मध्ये उशी घ्यायची आहे. पण ही उशी चपटी असावी. तुम्ही एक चपटी उशी तुमच्या कंबरेखील ठेवायला हवी. ज्यांना पाठदुखीचा त्रास असेल त्यांना तर अगदी हमखास ही गोष्ट करायला हवी. अशा प्रकारे झोपल्यामुळे तुमची पाठदुखी किंवा इतर त्रास कमी होतील.
फायदे (benefits): पाठदुखी बरी होते. पाठीसंदर्भातील इतर त्रास कमी होतात.
अनेकांना बसल्याजागी झोपण्याची सवय असते. पण जर तुम्ही थोडे बदल केले तर झोपण्याची ही पद्धत ठरु शकते योग्य. काही सोफे हे रेकलाईन असतात. म्हणजे तुमच्या पाठीपासून ते तुमच्या पायांना अगदी आरामात या पोझीशनमध्ये ठेवता येते. तुम्ही हॉस्पिटलमध्ये बेड पाहिले असतील तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल की, पेशंटचा बेड अनेकदा रेकलाईनसारखा वर केला जातो. त्यामुळे तुम्हाला आराम मिळतो. शिवाय तुम्हाला पाठीवर झोपून कंटाळा आला असेल ही देखील योग्य पद्धत आहे.
फायदे (benefits): आराम मिळतो. पाठीचा कणा नीट राहतो.
खरंतरं पोटावर झोपणे चांगले नाही. पण तुम्ही या झोपण्याच्या पद्धतीत थोडा बदल केला तर झोपण्याची हीच पद्धत तुम्हाला आरामदायी ठरु शकते. तुम्हाला पोटावर झोपताना पोटाखाली एक पातळशी उशी घेऊन झोपायचे आहे. त्यामुळे तुमच्या शरीरावर येणारा ताण येणार नाही. जर तुम्हाला पोटाशी उशी नको असेल तर तुम्ही ती छाती लगतही ठेऊ शकता. तुम्हाला उशी न घेता होणारा त्रास टाळता येईल.
फायदे (benefits): उशी घेऊन अशा प्रकारात झोपल्यामुळे तुमच्या छातीवर येणारा ताण कमी होईल. श्वासोच्छवास नीट होईल. तुम्हाला घोरण्याची भीती असेल तर तसे होणार नाही. कारण तुम्हाला श्वास घ्यायला अडथळा निर्माण होणार नाही.
जर तुम्हाला पोटावर झोपण्याची सवय सोडताच येत नसेल पण त्याचे नुकसान लक्षात घेता जर तुम्हाला काही बदल करायचा असेल तर तुम्ही सगळ्यात महत्वाचा एक बदल करु शकता तो म्हणजे तुम्हाला तुमची मान दुखू द्यायची नसेल. तर उशी खाली हात घेऊन आणि मान एका बाजूला करुन तुम्ही झोपू शकता. यामुळे तुमचे डोके अगदीच खाली जाणार नाही. म्हणजे समतोल राखला जाईल.
फायदे (benefits): श्वसनाचा त्रास होत नाही. मान दुखत नाही. झोप चांगली लागते.
तुम्हाला थोडे आणखी आरामदायी झोपायचे असेल तर ज्या प्रमाणे तुम्ही गुडघ्याखाली उशी ठेवून झोपला होता. अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला झोपायचे आहे. गुडघा आणि डोक्याखाली साधारण समांतर उंचीच्या उशीचा वापर करायचा आहे. पण हे करत असताना तुम्हाला तुमच्या कंबरेकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. त्यासाठीच तुम्हाला तुमच्या कंबरेखाली एक पातळ उशी ठेवायची आहे. जर तुम्ही पाठीवर झोपणारे असाल तर अशा पद्धतीने झोपण्यास काहीच हरकत नाही.
फायदे (benefits): रक्तपुरवठा व्यवस्थित होतो. झोप चांगली लागते. अंग दुखत नाही.
तर काही जण इतके विचित्र झोपतात की, त्यामुळे तुम्हाला नक्कीच त्रास होऊ शकतो. आता जर तुम्हीही अशा पद्धतीने झोपत असाल तर तुम्हाला आताच तुमची झोपण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे. झोपण्याच्या या विचित्र आणि चुकीच्या पद्धती कोणत्या ते देखील पाहुया.
झोपण्याच्या चांगल्या सवयींमध्ये पोटावर झोपण्याची पद्धत असली तरी ती वाईट विचित्र पद्धतींपैकी एक आहे. असे झोपल्यामुळे हमखास तुम्हाला त्रास होऊ शकतो. काही जण चक्क पोटावर झोपतात. त्यांना त्या शिवाय झोपच येत नाही. पण त्यानंतर त्यांना त्याचा त्रास होऊ लागतो.
तोटे ( Demerits): मान दुखू शकते, श्वास घेण्यास अडथळा येऊ शकतो. पाठीचा कणा दुखावू शकतो.
खूप जणांना उशी असूनही एका बाजूने झोपताना कानाखाली हात घेऊन झोपण्याची सवय असते. पण या अशा झोपण्याच्या पद्धतीमुळेही खूप त्रास होऊ शकतो. 10 पैकी 8 जणांना तरी अशाप्रकारे झोपायची सवय असतेच.
तोटे ( Demerits): मेंदूला होणारा रक्तपुरवठा विस्कळीत होतो. हात आणि मान दोन्ही दुखू लागतात.
काही जण उशी अगदी नावाला घेतात. म्हणजे त्यांना उशी घ्यायला अजिबात आवडत नाही. पण मानेला आधार देण्यासाठीच उशी वापरली जाते. पण त्याचा आकारही अगदी व्यवस्थित असायला हवा. जर उशीची उंची कमी जास्त झाली की, मग तुम्हाला फक्त त्रासच होऊ शकतो.
तोटे ( Demerits): कमी उंचीच्या उशीमुळे तुमच्या मानेला हवा असणारा आधार मिळत नाही. त्यामुळे तुमची झोप सतत तुटू शकते. तुमचे तोंडही यामुळे उघडे राहू शकते.
पाय फाकवून झोपण्याची सवयही खूप जणांना असते. पण अशी सवयही खराबच. पाय फाकवून झोपण्याचा जितका त्रास इतरांना होतो. त्याहून अधिक त्रास हा तुमच्या शरीराला होत असतो. त्यामुळे तुम्ही असे झोपत असाल तर ही सवय आताच बदला
तोटे ( Demerits): तुमच्या पायांमध्ये विनाकारण ताण निर्माण होतो. शिवाय पाय आणि पाठीचा कणाही दुखावला जातो.
पोटावर झोपण्याच्या पद्धतीमध्ये थोडासा बदल करत काही जण हात कुठे ठेवायचा हा विचार करत पोटावर झोपताना पोटाखाली हात घेऊन झोपतात. पण असे झोपल्यानंतरही चांगली झोप काही लागत नाही. उलट दुसऱ्या दिवशी त्याचा त्रासच अधिक होतो.
तोटे ( Demerits): हात दुखू लागतात. मान एका दिशेला झाल्यामुळे मानसुद्धा दुखू लागते
पाठीवर झोपण्याचाच हा एक प्रकार आहे असे म्हणायला हवे. पण काहींना पाय सरळ ठेवून झोपता येत नाही. ते पाठीवर झोपताना पाय पोटाशी घेऊन झोपतात. गुडघा इतका वर घेतात की, त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.
तोटे ( Demerits):पायांना ताण येतो. पायांना रात्री मुंग्या आल्यासारख्या वाटू लागतात. गुडघे दुखी वाढू शकते.
काही जणांना डाव्या अंगाला झोपायची सवय असते. जर तुम्ही डाव्या अंगाला झोपत असाल तर ती सवय आताच बदला कारण अभ्यासानुसार डाव्या बाजूला झोपण्यामुळे अनेक त्रास तुम्हाला होऊ शकतात.
तोटे ( Demerits): डाव्या बाजूने झोपल्यामुळे तुमच्या हृदयावर ताण पडतो. त्यामुळे हृदयविकार होण्याची शक्यता अधिक होते.तुमच्या किडनीवर सतत ताण पडल्यामुळे तुम्हाला रात्रभर लघवीला होण्याची शक्यता असते. याशिवाय तुम्हाला अनेक बारीक बारीक त्रास तुम्हाला अशा झोपण्याच्या पद्धतीमुळे होऊ शकतो.
झोपण्यासाठी निवडत असलेली उशी ही तितकीच महत्वाची असते. कारण जसे मिठाशिवाय जेवण पूर्ण होत नाही. अगदी त्याचप्रमाणे उशीशिवाय झोप पूर्ण होऊ शकत नाही. जर तुम्ही नव्याने उशी घेण्याचा विचार करत असाल तर मात्र तुम्हाला उशी निवडताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.
आता अगदी उशीप्रमाणे तुम्हाला सगळ्यात महत्वाची असते ती म्हणजे गादी. जर तुम्ही योग्य गादी घेतली तर त्याचे उत्तम फायदे तुम्हाला होतील. त्यामुळे तुम्ही गादीही चांगली घ्या
तुमचे आरोग्य तुमच्या झोपण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. जर तुम्ही कसेही झोप असाल तर त्याचा त्रास तुम्हाला नक्कीच होऊ शकतो. पाठदुखी, मानदुखी असे काही प्राथमिक त्रास तुम्हाला चुकीच्या झोपण्यामुळे नक्कीच होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या झोपण्याच्या पद्धतीचा आरोग्यावर नक्कीच दूरगामी परिणाम होतो.
जर तुम्ही योग्य पद्धतीने झोपलात तर तुमची रक्ताभिसरण क्रिया अगदी योग्य होते. झोपेमुळे तुमच्या शरीराला योग्य रक्तपुरवठा होता. जर तुम्ही योग्य पद्धतीने झोपलात तर तुमच्या शरीरावर आलेला ताणही कमी होतो.शरीराला योग्य आराम मिळाल्यामुळे तुम्हाला साहजिकच फ्रेश वाटते.
अनेकांना उशी घेऊन झोपण्याची सवय असते. पण काहींना उशी घेऊन झोपल्याचा त्रास होतो. अनेकदा डॉक्टर उशी न घेता झोपण्याचा सल्ला देतात. कारण जर तुम्ही मानेखाली कडक आणि मोठी उशी ठेवली तर तुम्हाला
अनेकदा कपडे घालून झोपायला हवे की, नाही असा प्रश्न विचारला जातो. पण अनेक अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की, जर तुम्ही कपडे न घालता झोपत असाल तर ते फार चांगले आहे. जर तुम्हाला संपूर्ण कपडे काढून झोपायला आवडत नसेल तर किमान आंर्तवस्त्र काढून तरी तुम्ही झोपायलाच हवे.तरच तुम्हाला आराम मिळेल. अंगावर तंग कपडे घालून झोपल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.
तुमच्या शरीरातील एक अशी बाजू झोपण्यासाठी चांगली किंवा वाईट अशी असू शकत नाही. तुम्हाला कोणती बाजू आरामदायी वाटते त्यानुसार तुम्ही तुमची बाजू निवडायला हवी. त्यामुळे तुम्हाला कोणत्या बाजून झोपल्यावर आरामदायी वाटते ते पाहा आणि मगच झोपा.