जीवन सुखी आणि समृद्ध व्हावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. मात्र दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्या आणि अडचणी दूर करता करता प्रत्येकाच्या नाकीनऊ येत असतात. आध्यात्मिक वातावरणामुळे मनाला शांतता आणि आत्मिक समाधान मिळते. कारण या वातावरणात आपल्या मनाची बैठक परमेश्वराच्या अगदी जवळ असते. सतत मनात असे सकारात्मक आणि आल्हाददायक वातावरण निर्माण व्हावं यासाठी हे आध्यात्मिक सुविचार तुम्हाला नक्कीच मदत करू शकतात. हे आध्यात्मिक विचार मराठी भाषेतील असून तुमच्या मनाला त्यामुळे नक्कीच शांतता मिळेल.
अध्यात्म म्हणजे आधि आणि आत्म. म्हणजेच सर्वात आधी स्वतःचे आत्मपरिक्षण करा असा याचा अर्थ होतो. स्वतःचे आत्मपरिक्षण करता करता माणसाला जीवनात साक्षात्कार अथवा पूर्णत्त्व प्राप्त व्हावं असू वाटू लागतं. आत्मपरिक्षण करताना आपण म्हणजेच मी कोण ? हा प्रश्न तो स्वतःला विचारू लागतो. ज्यातून जन्माला येण्यामागचं ध्येय गवसतं आणि त्याच्या खऱ्या जीवनाला सुरूवात होते. आत्मसाक्षात्काराचा हा शोध म्हणजे अध्यात्म होय. ‘स्व’चा शोध घेण्याच्या या प्रवासात माणसाला मार्गदर्शनाची गरज असते. आत्म साक्षात्काराचा हा प्रवास सुखकर करण्यासाठी जे अचूक आणि योग्य मागदर्शन करतात त्यांना 'सद्गुरू' असे म्हणतात. जगाच्या पाठीवर असे खरे सदगुरू फार कमी आहेत. यासाठीच जाणून घ्या हे आध्यात्मिक विचार मराठीतून
जीवन हे एक प्रकारचे युद्ध आहे. त्यामुळे जीवन जगत असताना माणसाला अनेक आव्हाने आणि संकटांना सामोरे जावे लागते. हे जीवन युद्ध जिंकण्यासाठी शरीर आणि मनाचे ऐक्य असणं फार गरजचं असतं. कारण शरीराने आणि मनाने साथ दिली तरच तुम्हाला जीवनात सुखी आणि समाधानी होता येतं. जीवनात समोर येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी मन शांत आणि निवांत कसं करायचं हे अध्यात्म विद्या शिकवते. अध्यात्म विद्या ही जीवनाचा एक छोटा पंरतू अत्यंत महत्वाचा आहे. जर तुमच्या कडे इतर सर्व कला असतील मात्र जीवन जगण्याची कलाच नसेल तर जीवन युद्ध यशस्वीपणे जिंकता येणं कठीण आहे. यासाठीच जीवनाचे सार्थक होण्यासाठी माणसाला अध्यात्म विद्या माहीत असणं गरजेचं आहे. जगातील अनेक थोर तत्त्वज्ञांनी आपले अनुभव आणि सुविचारांची शिदोरी जनमाणसाला दिलेली आहे. हे सुविचार माणसाला जीवन जगण्याचं बळ देतात. यासाठी आम्ही तुमच्यासोबत काही थोर संत आणि तत्वज्ञांचे विचार मांडण्याचा प्रयत्न करत आहोत.
1. उठा जागे व्हा, ध्येय प्राप्तीपर्यंत थांबू नका - स्वामी विवेकानंद
2. समजदार व्यक्तीसोबत काही मिनीटे केलेली चर्चा ही हजारो पुस्तके वाचण्यासमान आहे - स्वामी विवेकानंद
3. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार - सद्गुरू श्री वामनराव पै
4. तुमचे मानसिक समाधानच तुमच्या शत्रूंना पराभूत करेल - चाणक्य
5. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू हे - सदगुरू श्री वामनराव पै
6. पर्यावरण हाच खरा नारायण आहे - सदगुरू श्री वामनराव पै
7. आधि मन घेई हाती, तोचि गणराज गणपती - संत तुकाराम
8. देवाचिये द्वारी उभा क्षणभरी, तेणें मुक्ती चारी साधियेल्या - संत ज्ञानेश्वर
9. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे - श्री स्वामी समर्थ
10. हेंचि दान देगा देवा| तुझा विसर न व्हावा|| - संत ज्ञानेश्वर
11. प्रार्थना म्हणजे देवाला मनातलं सांगण्याचा जाण्याचा सोपा मार्ग - अज्ञात
12. अपराध करून जो मौज करतो त्याला देव कधीच क्षमा करत नाही - अज्ञात
13. माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे हिच आहे खरी ईश्वरभक्ती - सदगुरू श्री वामनराव पै
14. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले - संत तुकाराम
15. प्रयत्ने वाळुचे कण रगडिता तेलही गळे ? - संत तुकाराम
16. साधुसंत येती घरा| तोचि दिवाळीदसरा|| - संत तुकाराम
17. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी - संत तुकाराम
18. अमृताहूनि गोड तुझें नाम देवा - संत नामदेव
19. विचार बदला नशीब बदलेल - सदगुरू श्री वामनराव पै
20. जेव्हा सर्व काही संपले आहे असं वाटत असतं तिच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची - स्वामी विवेकानंद
21. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पापबुद्धी नको रे - संत रामदास स्वामी
22. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूचि शोधूनि पाहे - संत रामदास स्वामी
23. मन करा रे प्रसन्न| सर्व सिद्धीचें कारण || - संत तुकाराम
24. नित्य नेमी नामीं ते प्राणी दुर्लभ| लक्ष्मी वल्लभ तयां जवळी|| संत ज्ञानेश्वर
25. सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईजे - संत ज्ञानेश्वर
1. मना वीट मानू नको बोलण्याचा |
पुढे मागुता राम जोडेल कैचा ||
सुखाची घडी लोटता सुख आहे
पुढे सर्व जाईल काही न राहे || - संत रामदास स्वामी
2. मनाची एकाग्रता ही ध्यानसाधनेची गुरूकिल्ली आहे - स्वामी विवेकानंद
3. देवाच्या दरबारात माणसाच्या सर्व कर्मांचा जमा-खर्च असतो- गुरूनानक
4. जसा विचार तसा जीवनाला आकार - सद्गुरू श्री वामनराव पै
5. भगवंत माणासाच्या माध्यामातून जन्माला येत असतो - रविंद्रनाथ टागोर
6. कर्माचे फळ मिळो अथवा न मिळो विद्वान पुरूष त्यामुळे दुःखी होत नाही - महर्षी व्यास
7. देव त्यालाच मदत करतो जो लोकांची मदत करण्यास तयार असतो- डॉ. ए.पी. जे अब्दुल कलाम
8. आध्यात्मिक जीवन म्हणजे पूर्ण निस्वार्थता आहे - शिवानंद महाराज
9. देवाचे अखंड नामस्मरण केल्याने संसार चांग आणि परमार्थ सांग होतो - सदगुरू श्री वामनराव पै
10. जर एखादी गोष्ट तुम्हाला मिळाली नाही तर ती तुमच्यासाठी कधीच हिताची नव्हती हे समजा - अज्ञात
11. चिंता चिता समान आहे - अज्ञात
12. जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे, जनीं वंद्य ते सर्व भावे करावे - संत रामदास स्वामी
13. शुद्ध ज्याचा भाव झाला | दुरी नाही देव त्याला|| - संत ज्ञानेश्वर
14. जस जसं भय जवळ येईल तस तसा त्याच्यावर हल्ला करा आणि त्याचा सर्वनाश करा - चाणक्य
15. संकटात कुठेतरी संधी दडलेली असते - चाणक्य
16. परमेश्वर विश्वरूपाने समोर आहे, शरीर रूपाने जवळ आहे व सच्चिनानंद स्वरूपाने तो ह्रदयात आहे - सद्गुरू श्री वामनराव पै
17. भ्रमाला आलेला प्रत्यक्ष आकार म्हणदे अहंकार - सदगुरू श्री वामनराव पै
18. जनात पाहिजे अर्थ आणि मनात पाहिजे परमार्थ - सदगुरू श्री वामनराव पै
19. जो जीभ जिंकेल तो मन जिंंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल - सदगुरू श्री वामनराव पै
20. स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे इतरांना दोष देण्यासाठी तुम्हाला वेळच मिळणार नाही - स्वामी विवेकानंद
21. व्यक्तिमत्व चांगलं नसेल तर सुंदर दिसण्यात काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक आहे - स्वामी विवेकानंद
22. तुमच्या कर्मावर जर तुमची भक्ती असेल तरच तुमचं कर्म सार्थकी लागू शकतं - रामकृष्ण परमहंस
23. फुल उमललं की त्याच्या वासाने मधमाशी त्याच्याजवळ येते अगदी तसंच तुमच्या गुणांमुळे जग तुमचे गुणगाण गावू लागतं - रामकृष्ण परमहंस
24. जीवनावर प्रेम करणं म्हणजेच देवावर प्रेम करणं - अज्ञात
25. मुलं ही देवाघरची फुलं असतात - अज्ञात
आम्ही दिलेले हे सुविचार तुमच्या जीवनात कसे क्रांतीकारक ठरले हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा.
अधिक वाचा
जगण्याला बळ देतात प्रेरणादायी विचार
जाणून घ्या गुरूपौर्णिमा आणि गुरूपूजनाचे महत्त्व
जगण्याला बळ देतात प्रेरणादायी विचार
यशस्वी जीवनासाठी प्रयत्नपूर्वक करा सकारात्मक विचार
जागतिक जलदिनानिमित्त पाणी वाचवा घोषवाक्य
आयुष्यावर गौतम बुद्ध यांचे कोट्स (Gautam Buddha Quotes On Life)
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम