ADVERTISEMENT
home / Fitness
Black Tea Benefits In Marathi

जाणून घ्या काळा चहा पिण्याचे फायदे आणि दुष्परिणाम (Black Tea Benefits In Marathi)

बऱ्याच जणांसाठी चहा म्हणजे एक अमृततुल्य पेय आहे. काही जणांना चहाची इतकी आवड असते की, दिवसभरात चहा न प्यायल्यास त्यांचं डोकं दुखायला लागतं. चहा आणि कॉफी पिणाऱ्यांमध्ये तर नेहमीच यापैकी चांगलं काय यावरून वाद होताना दिसतात. पण दुधाच्या चहापेक्षा ब्लॅक टी (Black Tea) चे अनेक फायदे आहेत. काही जण अॅसिडिटीमुळे काळा चहा पितं तर काही जणांना काळा चहा प्यायला आवडतं म्हणून पितात. पण तुम्हाला माहीत आहे का? काळा चहा (Black Tea) हा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर समजला जातो. अनेकवेळा काळ्या चहाचा उपयोग औषध म्हणून केला जातो. खऱ्या अर्थाने एनर्जी वाढवण्याचं काम काळा चहा करतो. काळा चहा पिण्याचे फायदे (Black Tea Benefits In Marathi) काय आहेत तेच आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. 

ब्लॅक टी चे पोषण तत्व (Nutritional Value Of Black Tea)

Nutritional Value Of Black Tea

Nutritional Value Of Black Tea

बऱ्याचदा रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, काळा चहा पिण्याचे बरेच फायदे आहेत. काळा चहा प्यायल्याने अनेक रोगांपासून आपल्याला दूर राहाता येतं. पण असं असलं तरीही याचं सेवन तुम्ही अतिशय मर्यादेत करायला हवं. याचं अतिरिक्त सेवन करणं योग्य नाही. आपल्याला आलेला थकवा आणि आळस काढून टाकण्यासाठी याचा सर्वात महत्त्वाचा उपयोग होतो कारण यामधील अँटिऑक्सिडंट्स यासाठी महत्त्वाचं पोषण असतात. 

ADVERTISEMENT

काळा चहा हे अगदी वेगळंच मिश्रण आहे. सकाळच्यावेळी काळा चहा हे एक परफेक्ट एनर्जी ड्रिंक आहे तर याव्यतिरिक्त तुमचं सौंदर्य वाढवण्यासाठीही हे नैसर्गिक साहित्य आहे. काळा चहा तुम्ही रोज एक कप प्यायलात तर तुम्हाला मधुमेहापासून दूर ठेवण्यासाठी याची मदत होते. नियमित स्वरूपात याचं सेवन केल्यास, डोकं, लिव्हर आणि डागविरहित त्वचा तुम्हाला मिळते. शिवाय तुमच्या रोजच्या जीवनशैलीत काही अडचणी असतील तर त्यादेखील दूर होतात. तुमच्या सौंदर्यासाठी तुम्हाला याचा उपयोग करून घेता येतो. जाणून घेऊया काळ्या चहाचे नक्की काय काय फायदे आहेत. 

काळा चहा पिण्याचे फायदे सौंदर्यासाठी (Black Tea Benefits In Marathi For Beauty)

ब्लॅक टी अर्थात काळा चहा हा सौंदर्यासाठी लाभदायक आहे असं जर म्हटलं तर तुम्हाला थोडं आश्चर्य नक्की वाटेल ना? ब्लॅक टी पिण्याचे बरेच फायदे आहेत

त्वचेला खाज येत असल्यास उपयोगी ठरतो काळा चहा (Black Tea Can Calm Itchy Skin)

Black Tea Can Calm Itchy Skin

ADVERTISEMENT

Shutterstock

तुमच्या त्वचेला काही कारणाने खाज येत असेल तर त्यावर काळा चहा हा एक उत्तम उपाय आहे. तुम्हाला खाज येत असणाऱ्या ठिकाणी चहापत्ती असणारी थंड टी बॅग लावा आणि मग परिणाम पाहा. तुम्हाला ज्या ठिकाणी खाज येत असेल अथवा जळजळत असेल तिथली खाज अथवा जळजळ काही मिनिट्समध्ये काळ्या चहामुळे नाहीशी होते.

सूज आलेल्या डोळ्यांसाठी (For Puffy Eyes)

For Puffy Eyes

Shutterstock

ADVERTISEMENT

सूज आलेले डोळे नक्कीच कोणालाही आवडत नाहीत. आपल्यापैकी बऱ्याच जणींना ही समस्या असते. आपले डोळे हे आपल्या सौंदर्याचं प्रतीक असतात. त्यामुळे त्याजवळ काळे डाग अथवा सूज ही कोणालाही नकोशीच वाटते. ही सूज कमी करण्यासाठी तुम्हाला काळ्या चहाच्या बॅगचा उपयोग करून घेता येईल. तुम्ही तुमच्या डोळ्यांवर काही मिनिटांसाठी ही टी बॅग थंड करून ठेवलीत तर त्याचा खूपच चांगला परिणाम तुमच्या डोळ्यांवर होईल. काही मिनिट्समध्येच तुमच्या डोळ्यावरील सूज कमी होईल. 

केसांमध्ये चमक आणण्यासाठी (Add Shines To Hair)

Add Shines To Hair

Shutterstock

चमकदार केस कोणाला आवडत नाहीत? असे केस मिळवण्यासाठी तुम्ही ब्लॅक टी चा वापर करू शकता. यासाठी तुम्ही काही टी बॅग्ज साधारण 20 मिनिट्स पाण्यात उकळवा. हे पाणी रात्रभर तसंच राहू द्या. दुसऱ्या दिवशी या पाण्याने तुम्ही तुमचे केस धुवा. यामुळे तुमच्या केसांना योग्य पोषण मिळेल आणि तुमचे केस चमकदार राहतील. तसंच तुमचे केस काळे राखण्यासाठीही याचा उपयोग होतो. तुम्ही हे चांगल्या परिणामासाठी आठवड्यातून दोन वेळा नक्कीच करू शकता. 

ADVERTISEMENT

तुमच्या अंगावरील टॅन घालवण्यासाठी (Can Soothe Sunburn)

Can Soothe Sunburn

Shutterstock

अंगावर टॅन असणं अर्थातच कोणालाही आवडत नाही. आपल्याकडे उन्हाळा कडक असल्याने सूर्याच्या किरणांमुळे हमखास अंगावर टॅन येतंच. पण तुम्ही टी बॅग आपल्या टॅन झालेल्या त्वचेवर लावल्यास, सनबर्न झालेला भाग व्यवस्थित पहिल्यासारखा होतो. तुम्हाला जास्त काही कष्ट करावे लागत नाहीत. तुम्ही हे काळ्या चहाचं पाणीदेखील आपल्या अंगाला लावून सनबर्न घालवू शकता. 

लालसर पट्टे आणि त्रासातून मुक्तता (Relief From Redness, Pain)

Relief From Redness

ADVERTISEMENT

Shutterstock

अलर्जीने काही जणांच्या अंगावर लालसर पट्टे उठतात. त्यावर उपाय म्हणून तुम्ही काळ्या चहाचा वापर करू शकता. या पाण्यामुळे तुम्हाला त्रासातून सुटका मिळू शकते. लालसर पट्टे अंगावर चांगले दिसत नाहीत. पण घरच्या घरी हे उपाय तुम्ही करू शकता. 

पायाच्या दुर्गंधीपासून सुटका (Can Cure Smelly Feet)

Smelly Feet

Shutterstock

ADVERTISEMENT

पाय दिसायला जितके सुंदर असतात तितकीच त्याची काळजी घेणंही गरजेचं आहे. पायाची दुर्गंधी ही अतिशय खराब असते. यापासून सुटका हवी असेल तर काळ्या चहाची तुम्हाला यासाठी मदत होऊ शकते. काळा चहा तयार करून घ्या. पाणी थंड होण्याची वाट पाहा. नंतर तुम्ही तुमच्या पायाला हे काळं पाणी लावा. काही मिनिट्ससाठी ते तसंच ठेवा. यामुळे तुमच्या पायावरील बॅक्टेरिया आणि फंगल निघून जाईल.  

दातांची घेते काळजी (Looks After Your Teeth)

Teeth

Shutterstock

आपण सतत काही ना काहीतरी खात असतो. त्यामुळे दात पिवळसर होत असतात. तुमचे दात निरोगी ठेवायचे असतील तर त्यासाठी काळा चहा हा एक चांगला पर्याय आहे. ब्लॅक टी मधील पॉलिथिन्स हे तुमच्या दातातील कॅव्हिटी रोखण्यास मदत करतं. तसंच तुमच्या तोंडातील बॅक्टेरिया मारण्यासाठीही याचा उपयोग होतो. पण ब्लॅक टी हादेखील तुम्ही प्रमाणातच प्यायला हवा. त्याची कोणत्याही प्रकारची अतिशयोक्ती करू नका. 

ADVERTISEMENT

केसगळती रोखण्यासाठी (Prevent Hair Fall)

Prevent Hair Fall

Shutterstock

आजकाल केसगळती ही खूपच मोठी समस्या बनली आहे. सतत धूळ आणि प्रदूषणामुळे केसगळती ही बऱ्याच जणांसाठी डोकेदुखी ठरली आहे. सतत यावर उपचार घेणं काही जणांना शक्य नसतं. त्यामुळे अशा वेळी तुम्हाला ब्लॅक टी चा उपयोग करता येतो. तुम्ही आठवड्यातून तीन ते चार वेळा जर काळ्या चहाचं पाणी आंघोळीला वापरलं आणि त्याने केस धुतलेत तर तुमच्या केसांची गळती काही दिवसातच थांबेल. हा अगदी घरच्याघरी करण्यात येणारा सोपा उपाय आहे. 

ब्लॅक टी पासून तयार होणारे फेसपॅक आणि त्याचा वापर (Use Of Black Tea Facepack)

ब्लॅक टी चे अनेक गोष्टींसाठी वापर होतात. पण तुम्हाला माहीत आहे का? तुमच्या सौंदर्यासाठीही याचा खूप चांगला उपयोग तुम्हाला करून घेता येऊ शकतो. त्यासाठी फेसपॅक कसे तयार करायचे पाहूया.

ADVERTISEMENT

1. ब्लॅक टी आणि कोरफड (Black Tea And Aleo Vera)

Black Tea And Aleo Vera

Shutterstock

कोरफड ही उत्तम त्वचा मिळवण्यासाठी नेहमीच वापरली जाते. नैसर्गिक सौंदर्यासाठी याचा उपयोग होतो. ब्लॅक टी आणि कोरफड यांचं मिश्रण हे तुमच्या त्वचेवरील पोअर्स आणि छिद्र त्वरीत काढून टाकण्यास मदत करतात. तसंच कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी मॉईस्चराईजर म्हणूनही याचा चांगला उपयोग होतो. तुम्ही हे मिश्रण रात्रभर तुमच्या चेहऱ्यावर लावून ठेवल्यास तुम्हाला याचा चांगलाच फायदा होतो. तुमच्या त्वचेतील कोरडेपणा कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. 

कसे बनवावे आणि वापरावे

ADVERTISEMENT
  • 1 चमचा कोरफड जेलमध्ये 2 चमचे ब्लॅक टी घालून नीट मिक्स करून घ्या
  • तुमच्या चेहऱ्यावर हे मिश्रण लावा आणि सर्क्युलर पद्धतीने हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा
  • रात्रभर तुमच्या चेहऱ्यावर हे असंच ठेवा जेणेकरून हे तुमच्या त्वचेमध्ये नीट समाविष्ट होईल
  • हे तुम्ही रोज रात्री किमान आठवडाभर तरी करा आणि मग चेहऱ्यावर फरक पाहा

2. ब्लॅक टी आणि ग्रीन टी (Black Tea And Green Tea)

Black Tea And Aleo Vera

Shutterstock

ग्रीन टी मध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स हे तुमच्या चेहऱ्यावर तजेलदारपणा आणण्यासाठी मदत करतात. ब्लॅक टी आणि ग्रीन टी मिक्स केल्याने यातील गुण मिक्स होऊन तुमच्या चेहऱ्याला अधिक चमकदार करण्यासाठी याचा उपयोग होतो. तुमच्या चेहऱ्यावर असणारं अतिरिक्त तेल शोषून घेण्यासही याची मदत होते. त्वचा डिटॉक्झिफाय करण्यासाठी हा पर्याय चांगला आहे. 

कसे बनवावे आणि वापरावे

ADVERTISEMENT
  • 1 चमचा कडिलिंबाची पावडर आणि 1 चमचा ग्रीन टी पावडर घेऊन त्यात साधारण 3 चमचे काळा चहा मिक्स करा
  • हे सर्व मिश्रण थोडं घट्ट बनवून चेहऱ्यावर लावा आणि सुकू द्या
  • सुकल्यावर थंड पाण्याने धुवा आणि आठवड्यातून हे तुम्ही 4 वेळा करू शकता

3. ब्लॅक टी आणि संत्र्याचं साल (Black Tea And Orange Peel)

Black Tea And Orange Peel

Shutterstock

संत्र्याच्या सालीच्या पावडरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स गुण भरपूर प्रमाणात असतात. तुमची त्वचा मूळ स्वरूपाच्या रंगामध्ये आणण्यासाठी याचा उपयोग होतो. यामध्ये असणाऱ्या विटामिन सी मुळे चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी मदत होते. चेहऱ्यावर तुम्हाला इन्स्टंट ग्लो आणायचा असेल तर ब्लॅक टी आणि संत्र्याच्या सालीचा हा पर्याय तुमच्यासाठी उत्तम आहे. 

कसे बनवावे आणि वापरावे

ADVERTISEMENT
  • 1 चमचा संत्र्याच्या सालीची पावडर त्यामध्ये 2 चमचे काळा चहा घालून 1 चमचा टॉमेटोचा रस मिक्स करून नीट मिसळून घ्या
  • याची पेस्ट बनवा आणि तुमच्या चेहऱ्यावर लावा
  • सुकेपर्यंत ही पेस्ट तशीच ठेवा. सुकल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवा
  • आठवड्यातून किमान 3 वेळा असं केल्यास तुमच्या चेहऱ्यावर तकाकी येते

4. ब्लॅक टी आणि माती (Black Tea And Fuller’s Earth)

Black Tea And Fuller’s Earth

Shutterstock

फुलर्स अर्थ ही एक प्रकारची विशिष्ट माती असते जी तुमच्या त्वचेमधील धूळ आणि प्रदूषण शोषून घेण्यात मदत करते. यामध्ये ब्लॅक टी आणि टी ट्री ऑईलचं मिश्रण केल्यास, तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळा तजेलदारपणा येण्यास मदत होते. तुमच्या डेड स्किनवरील केमिकल काढून टाकण्यासही याची मदत होते. ही तुम्हाला बाजारामध्ये सहज उपलब्ध आहे. 

कसे बनवावे आणि वापरावे

ADVERTISEMENT
  • 1 चमचा फुलर्स अर्थ आणि त्यामध्ये 2 ते 3 थेंब टी ट्री ऑईल घाला आणि त्यात 3 चमचे काळा चहा घालून मिक्स करा
  • ही तयार झालेली पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा
  • ही पेस्ट व्यवस्थित सुकू द्या आणि मग गार पाण्याने चेहरा धुवा
  • आठवड्यातून किमान 3 वेळा असं केल्यास तुमच्या चेहऱ्यावर तकाकी येते आणि डेड स्किन निघून जाते

काळा चहा पिण्याचे फायदे आरोग्यासाठी (Black Tea Benefits In Marathi For Health)

ब्लॅक टी चे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पण बऱ्याच जणांना याची माहिती नसते. तुम्ही नियमित ब्लॅक टी चं सेवन केल्यास, तुम्हाला तुमचं आरोग्य निरोगी राखण्यास नक्कीच मदत होईल. जाणून घेऊया काय आहेत ब्लॅक टी चे आरोग्यदायी फायदे.

1. तुमच्या ओरल आरोग्यासाठी (Oral Health)

Oral Health

Shutterstock

ADVERTISEMENT

तोंडाला घाण वास आलेला कोणालाच आवडत नाही. आपण दिवसभर इतके खात असतो की दातामध्ये बऱ्याच प्रमाणात कॅव्हिटी निर्माण होत असते. त्यामुळे नेहमीच आपल्याला दिवसभरात दोन वेळा दात घासायचा सल्ला दिला जातो. पण ब्लॅक टी मुळे तुम्हाला यापासून सुटका मिळू शकते. ब्लॅक टी मध्ये असलेल्या पॉलिथिनमुळे दातांमधील कॅव्हिटी रोखली जाते आणि तोंडाला येणाऱ्या दुर्गंधापासूनही सुटका होते. आपल्या तोंडातील बॅक्टेरिया मारण्यासाठीही याची मदत होते. 

2. हृदयरोगाचा धोका टाळण्यासाठी (A Better Heart)

आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात बऱ्याच जणांना हृदयविकार आणि हृदयरोगासारखे आजार जडतात. पण तुम्ही नियमितपणे दिवसातून एक कप ब्लॅक टी चं सेवन केल्यास हा धोका टाळता येऊ शकतो. अनेक रिसर्चमधूनही हे सिद्ध झालं आहे. ब्लॅक टी मुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी असते. 

3. कॅन्सरपासून बचाव (Cancer Prevention)

ब्लॅक टी मध्ये अंतर्भूत असणाऱ्या पॉलिथिन्स आणि कॅटेचिन्समुळे काही प्रकारच्या कॅन्सरपासून ब्लॅक टी बचाव करू शकते असं रिसर्चमधून सिद्ध झालं आहे. तसंच ज्या महिला नियमितपणे रोज ब्लॅक टी पितात त्यांना इतर महिलांच्या तुलनेत ओव्हरीज कॅन्सर होण्याची शक्यता कमी असते असंही या रिसर्चमधून सिद्ध झालं आहे. त्यामुळे महिलांनी नियमितपणे दिवसातून किमान एक कप ब्लॅक टी प्यावा. 

4. बळकट हाडं (Healthy Bones)

काही वर्षांनंतर हाडांची बळकटी कमी व्हायला लागते. हाडं ठिसूळ होतात. पण ब्लॅक टी मुळे तुमची हाडं मजबूत राहण्यास मदत होते. तसंच तुम्ही नियमित ब्लॅक टी प्यायल्यास आर्थट्रायटिससारखे आजार तुमच्या आजूबाजूला फिरकतही नाहीत असं म्हटलं जातं. यामधील अँटिऑक्सिडंट्स तुम्हाला निरोगी राहण्यास आणि हाडांना मजबूती देण्यासाठी मदत करतात. 

ADVERTISEMENT

5. मधुमेहाला ठेवतं दूर (Lower Risk Of Diabetes)

Diabetes

Shutterstock

सध्या मधुमेह हा आजार अगदी कोणत्याही वयात होताना दिसून येत आहे. पण एका रिसर्चनुसार तुम्ही जर दिवसातून एक ते दोन कप नियमितपणे ब्लॅक टी पित असाल तर मधुमेह होण्याचा तुम्हाला 70 टक्के धोका कमी असतो असं सिद्ध झालं आहे. यातील अँटिऑक्सिडंट्स टाईप 2 मधुमेह होण्यापासून रोखतात असं म्हटलं जातं. त्यामुळे मधुमेहापासून दूर राहण्यासाठी तुम्ही ब्लॅक टी चा वापर करून घेऊ शकता. 

6. तणावमुक्तता (Stress Relief)

Stress Relief

ADVERTISEMENT

Shutterstock

आजकालच्या जीवनशैलीत प्रत्येकालाच तणावाखाली राहावं लागतं. ब्लॅक टी मध्ये असणारं एलथिनाईन हे अॅसिड आपला दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी फायदेशीर ठरतं. दिवसभर असलेला तणावमुक्त करण्यासाठी ब्लॅक टी चा उपयोग करता येतो. गरम गरम ब्लॅक टी प्यायल्यानंतर दिवसभराचा थकवा नाहीसा होतो. नियमित ब्लॅक टी प्यायल्यास, तुम्हाला थकवा कमी प्रमाणात जाणवून तणावमुक्तता नक्कीच लाभते. 

7. मुतखडा (Kidney Stones)

मुतखडा ही अशी समस्या आहे ज्यामध्ये खूप त्रास होतो. ब्लॅक टी नियमित प्यायल्याने तुम्हाला याचा त्रास कमी होतो. मुतखडा असणाऱ्या व्यक्तीला नेहमी पाणी जास्त पिण्याचा सल्ला देण्यात येतो. त्याचप्रमाणे तुम्ही दिवसातून एक कप ब्लॅक टीदेखील औषध म्हणून पिऊ शकता. याचा तुमच्या किडनीवर चांगला परिणाम होतो. तसंच मुतखडा लवकर निघायलाही घरगुती उपाय मदत करतात.

8. वजन कमी करण्यासाठी उपयोगी (Aids Weight Loss)

Weight Loss

ADVERTISEMENT

Shutterstock

ब्लॅक टी मधील मेटाबॉलिजम तुमचं वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरतं. पण याचा अर्थ असा नाही की, उपाशीपोटी सतत तुम्ही ब्लॅक टी प्याल. तुम्ही नियमितपणे मर्यादेत ब्लॅक टी चं सेवन करणं गरेजचं आहे. तसंच ब्लॅक टी बरोबरच नियमित व्यायामही तुम्ही करायला हवा. असं केल्यास, तुमचं वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल. 

9. प्रतिकारशक्ती वाढवते (Boosts Immunity)

आजारांशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम ब्लॅक टी करतं. यातील अँटिऑक्सिडंट्स यासाठी मदत करतात. पोटाचे विकार आणि अन्य तापाचे आजार याच्याशी लढा देण्यासाठी ब्लॅक टी चा उपयोग होतो. शरीरातील व्हायरस काढून टाकण्याचं काम ब्लॅक टी करत असल्याने तुमच्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्याचं काम योग्यरित्या होतं. 

10. दम्यापासून सुटका (Relieves Asthma)

ब्लॅक टी मुळे दम्यासारख्या आजारापासूनही सुटका मिळते. यातील पॉलिथिन आणि अँटिऑक्सिडंट्स या आजारापासून सुटका मिळवून देण्यास फायदेशीर ठरतात. दमा हा असा आजार आहे जो नियमित उपचार केल्यास, बरा होऊ शकतो. त्यासाठी ब्लॅक टी चा देखील उपयोग करता येतो. याचं नियमित सेवन होणं गरजेचं आहे. 

ADVERTISEMENT

काळा चहा कसा बनवायचा (How To Make Black Tea At Home)

How To Make Black Tea At Home

Shutterstock

तुम्ही घरी दोन प्रकाराने ब्लॅक टी करू शकता. दोन्ही प्रकार अतिशय सोपे आहेत. फक्त त्यामध्ये साखरेचा समावेश असावा की नसावा हे तुमच्यावर अवलंबून आहे. 

ADVERTISEMENT

1. नेहमीचा चहा करतो त्याप्रमाणे ही पद्धत आहे. फक्त यामध्ये दूध घालू नये. पाणी उकळत ठेवावे. त्यात चहा पावडर घालावी. तुम्हाला हवी असल्यास, साखर घालावी. नसली तरी उत्तम. तुम्हाला आवडत असल्यास, वेलची, दालचिनी घातली तरीही चालते. यामध्ये उकळल्यानंतर दूध घालू नये. नंतर कपात गाळून घ्यावा आणि प्यावा. 


2. बाजारामध्ये विविध प्रकारच्या ब्लॅक टी बॅग्ज उपलब्ध आहेत. तुमच्या आवडीनुसार आणि चवीनुसार तुम्ही त्यापैकी विकत घ्याव्या. घरी पाणी उकळून कपात घ्यावे आणि साधारण एक मिनिटपर्यंत ही टी बॅग कपात ठेवावी. त्याचा अर्क पाण्यात उतरल्यानंतर हा ब्लॅक टी तुम्ही पिऊ शकता.  

ब्लॅक टी ने होणारं नुकसान (Side Effects Of Black Tea In Marathi)

प्रत्येक गोष्टीचे जसे फायदे असतात त्याचप्रमाणे नुकसानही असतं. कोणतीही गोष्ट मर्यादेत करणं गरेजेचं आहे. त्याचप्रमाणे ब्लॅक टी ने देखील नुकसान होतं. नक्की हे काय नुकसान हे ते आपण पाहूया. आम्ही तुम्हाला याचे पाच तोटे सांगणार आहोत. 

ADVERTISEMENT

1. डायरिया (Diarrhea)

कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात केल्यास त्याचा त्रास होतो. तुम्ही प्रमाणापेक्षा अति ब्लॅक टी घेतल्यास, त्यातील कॅफेनमुळे डायरिया होण्याची शक्यता असते. तसंच अति ब्लॅक टी प्यायल्याने तुमची नर्व्हस सिस्टिम बिघडते आणि तुम्ही सतत चिडचिडे होत राहाता. यामुळे तुमची पचनक्रिया बिघडून त्याचा परिणाम डायरिया होण्यात बदलतो. त्यामुळे ब्लॅक टी पित असताना त्याचं प्रमाण आपल्या शरीराला किती चालणार आहे हे पाहून मगच प्या. अति पिण्याचा प्रयत्न करू नका. 

2. बद्धकोष्ठता (Constipation)

हे कदाचित तुम्हाला आश्चर्यकारक वाटेल. पण हो अति ब्लॅक टी प्यायल्यास, त्याचा परिणाम बद्धकोष्ठतेमध्ये होऊ शकतो. तुमच्या शरीराला याची सवय होते आणि तुमचं शरीर नको असलेले घटकही शरीरामध्ये जमवण्यास सुरुवात करतं. ज्याचा परिणाम तुमच्या पचनशक्तीवर होऊन तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होण्यास सुरुवात होते. त्यामुळे ब्लॅक टी हा साधारण दिवसातून एक ते दोन कप इतकाच प्यावा. 

3. पोटाचे विकार (Disturbed Stomach)

Disturbed Stomach

Shutterstock

ADVERTISEMENT

पचनक्रिया नीट न झाल्यामुळे पोटाचे विकार उद्भवतात. खरं तर पोटाच्या विकारांवर ब्लॅक टी औषधी आहे. पण तुम्ही याचं अतिसेवन केल्यास तुम्हाला त्याचा अधिक त्रास होतो. ब्लॅक टी मध्ये कॅफेन असल्याने त्याचा पोटावर परिणाम होतो. कोणत्याही व्यक्तीला अल्सर अथवा पोटाचा कॅन्सर असल्यास, त्याला ब्लॅक टी देऊ नये. त्याच्यासाठी ब्लॅक टी योग्य नाही.  

4. हृदयविकार असलेल्यांना ठेवा दूर (Cardiovascular Diseases)

हृदयविकार असलेल्या व्यक्तींना ब्लॅक टी देणं योग्य नाही. अशा व्यक्तींना कॅफेन न पिणं गरजेचं असतं. त्यामुळे ब्लॅक टी अथवा अन्य कोणत्याही कॅफेनयुक्त पदार्थांपासून त्यांना दूर ठेवायला हवं. तसंच ब्लॅक टी च्या अतिसेवनाने गॅसची समस्या निर्माण होते. ज्यामुळे हृदयावर ताण पडतो. त्यामुळे ब्लॅक टी घेणं टाळावं. 

5. गरोदर महिलांना वर्ज्य (Other Health Hazards)

Health Hazards

Shutterstock

ADVERTISEMENT

गरोदर महिलांनी शक्यतो ब्लॅक टी पिणं टाळायला हवं. यामध्ये असणाऱ्या कॅफेनमुळे बाळाच्या जीवाला धोका संभवतो. एक कपपेक्षा अधिक ब्लॅक टी गरोदर महिलांनी पिऊ नये. खरं तर या नऊ महिन्यांमध्ये जितकं टाळता येईल तितकं ब्लॅक टी पिणं टाळावं. यामध्ये कॅफेन अधिक प्रमाणात असतं. त्यामुळे आपल्या शरीरावर आणि बाळाच्या शरीरावर त्याचा दुष्परिणाम होऊ नये यासाठी ब्लॅक टी लांब ठेवावा. 

ब्लॅक टी संदर्भात प्रश्नोत्तर (FAQs)

1. ब्लॅक टी दिवसातून किती वेळा प्यावा?

लेखात म्हटल्याप्रमाणे ब्लॅक टी दिवसातून एक ते दोन कप पिणं योग्य आहे. त्यापेक्षा अधिक प्यायल्यास तुमच्या शरीराला हानी पोहचू शकते.

2. सौंदर्यासाठी नक्की कसा उपयोग होतो?

ब्लॅक टी मुळे तुमची डेड स्किन जाऊन तुमच्या त्वचेला अधिक पोषण मिळतं. यातील अँटिऑक्सिडंट्स तुमची त्वचा अधिक तजेलदार करण्यासाठी फायदेशीर असतात. 

ADVERTISEMENT

3. ब्लॅक टी मध्ये कॅफेनचं प्रमाण अधिक असतं का?

ब्लॅक टी मध्ये इतर गोष्टींपेक्षा कॅफेनचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळेच हा नियमित प्याला तरी प्रमाणात पिण्याचा सल्ला देण्यात येतो. 

07 Aug 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT