बाॅलीवूड सेलिब्रिटीज ज्यांचा साखरपुडा झाला पण लग्न मोडलं

बाॅलीवूड सेलिब्रिटीज ज्यांचा साखरपुडा झाला पण लग्न मोडलं

बॉलीवूडमध्ये प्रेम, साखरपुडा, लग्न आणि मग घटस्फोट होणं या खूप कॉमन गोष्टी आहेत. कोणत्या सेलिब्रिटीचं नातं किती दिवस चालेल, याचा अंदाज फॅन्स त्यांच्या अफेयर बातम्यांवरूनच सहज लावतात. काही जणाचं नातं काळासोबत चांगलं राहतं तर काहींचं कायमचं तुटतं. काही नाती तर अशी असतात की, ज्यांचा साखरपुडा तर होतो पण लग्नापर्यंत गाडी सरकण्याआधीच ते तुटतं.

बॉलीवूडमधील अशा सेलिब्रिटी जोड्या ज्यांचं लग्न फिस्कटलं

आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या अशा काही सेलिब्रिटीजबद्दल सांगत आहोत, ज्यांचा साखरपुडा झाला पण लग्न मात्र तुटलं. या सेलिब्रिटीजपैकी काही जणांनी तर लपूनछपून साखरपुडा केला होता. 

सलमान खान- संगीता बिजलानी

बाॅलीवूडच्या या बॅचलरच्या आतापर्यंत अनेक गर्लफ्रेंड्स झाल्या आहेत. पण संगीता बिजलानी ही सलमान खानचं पहिलं प्रेम होती. 90's मध्ये त्यांच्या अफेयरची त्या काळी बरीच चर्चा झाली होती. बातमी तर अशी होती की, या दोघांच्या लग्नाच्या पत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. पण ऐनवेळी संगीता बिजलानीने सलमान खानशी ब्रेकअप केलं. लेखक जसीम खान यांनी लिहीलेल्या बीइंग सलमान या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे 27 मे 1994 ला या दोघांचं लग्न होणार होतं. पण त्यांचं नातं काही टिकलं नाही.

अभिषेक बच्चन- करिश्मा कपूर

11 अक्टूबर 2002, ही तिच तारीख आहे, जेव्हा अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाच्या दिवशी संध्याकाळी अगदी आनंदात अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांच्या साखरपुड्याची घोषणा झाली होती. पण नशिबाचा खेळ वेगळाच असतो. ते कधी बदलेलं हे सांगता येत नाही. या घोषणेनंतर काही महिन्यांनी फ्रेब्रुवारी 2003 मध्ये या दोघांनी वेगवेगळे मार्ग धरले. नंतर आधी करिश्मा कपूरने बिझनेसमन संजय कपूरशी लग्न केलं तर अभिषेकचं लग्न अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत झालं. मात्र करिश्मा आणि संजयचा नंतर घटस्फोट झाला. चर्चा तर अशीही होती की, अभिषेक आणि राणी मुखर्जीचं लग्न होणार पण हे होण्याआधीच ऐश्वर्याने अभिषेकचं मन जिंकलं आणि बच्चन घराण्याची सून झाली. 

अक्षय कुमार- रवीना टंडन

अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांचं नातं जगजाहीर आहे. त्या काळी फिल्म इंडस्ट्रीमध्ये अक्षय कुमारची इमेजही कॅसानोव्हा अभिनेता अशी होती. बातम्यांनुसार एका मुलाखतीत रवीनाने खुलासाही केला होता की, तिचा आणि अक्षय कुमारचा सीक्रेटली साखरपुडाही झाला होता. पण 3 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर या दोघांचं ब्रेकअप झालं आणि त्यांचं नातं काही लग्नापर्यंत पोचलं नाही. पण आज हे दोघंही आपापल्या वैवाहिक आयुष्यात खूश आहेत. 

उपेन पटेल- करिश्मा तन्ना

उपेन पटेल आणि करिश्मा तन्ना यांच्या प्रेमाची सुरूवात झाली होती ती बिग बॉसच्या घरात. तर 'नच बलिए' च्या मंचावर उपेन पटेलने करिश्माला अंगठी घालून लग्नासाठी प्रपोज केलं होतं. पण काही काळानंतर दोघांचाही ब्रेकअप झाला आणि त्यांचं नातं तुटलं. आता हे खरंच प्रेम होतं की, रिएलिटी शोमधल्या टीआरपीजसाठी केलेला स्टंट होता, अशी चर्चा आहे.

साजिद खान- गौहर खान

बॉलीवूडच्या सूत्रानुसार, बॉलीवूड दिग्दर्शक साजिद खान आणि अभिनेत्री गौहर खान यांचा साखरपुडा झाला होता. पण दोघांनी कधीही हे पब्लिकली कबूल केलं नाही. पण काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत साजिद खानने कोणाचंही नाव न घेता हा खुलासा केला होता की, 2003 साली त्याचा एका अभिनेत्रीसोबत साखरपुडा झाला होता. पण काही कारणांमुळे हे नातं तुटलं. आता त्याचा इशारा गौहर खानकडे होता की, अजून कोणाकडे हे त्यालाच माहीत.