असे बॉलीवूड स्टार्स ज्यांचं यश त्यांच्या आईला पाहता आलं नाही

असे बॉलीवूड स्टार्स ज्यांचं यश त्यांच्या आईला पाहता आलं नाही

जेव्हा एखादी चांगली गोष्ट आपल्या आयुष्यात घडते तेव्हा आपण पहिल्यांदा आपल्या आईवडिलांना कळवतो. त्यातल्या त्यात आईला सांगण्याची आपल्याला जास्त घाई असते. आपल्या आईवडिलांसमोर जेव्हा मुलाला प्रसिद्धी मिळते तेव्हा त्याचा आनंद काही औरच असतो. मग याला अपवाद बॉलीवूड स्टार्स तर कसे असतील. त्यांनाही आपल्या यशाचा साक्षीदार आपले आईवडील असावेत, असं नक्कीच वाटत असेल. पण काहीवेळा ही इच्छा अपूर्ण राहते. असेच काही बॉलीवूड स्टार्स आज आपण पाहणार आहोत. ज्यांना स्टारडम मिळण्याआधीच आपल्या आईला गमावलं.

शाहरूख खान

Instagram

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख त्याची आई लतीफ फातिमा हिचा खूप लाडका होता. शाहरूखच्या आईचं स्वप्न होतं की, तिच्या मुलाने चित्रपटांमध्ये अभिनेता दिलीप कुमारप्रमाणे काम करावं. जेव्हा शाहरूखचे बॉलीवूडमध्ये स्ट्रगलचे दिवस सुरू होते तेव्हा शाहरूखची आई आजारी होती. नेमकं जेव्हा शाहरूखचा पहिला सिनेमा दीवाना रिलीज झाला, त्याआधीच शाहरूखची आई वारली होती.

संजय दत्त

Instagram

अभिनेता संजय दत्त आणि नर्गिस यांची दुर्दैवी कथा तर आपण सगळ्यांनी संजू या चित्रपटातही पाहिली आहे. संजय दत्त हा अभिनेता त्याच्या खाजगी आयुष्यात खूपच दुर्दैवी ठरला. ज्याचा पहिला सिनेमा रिलीज होण्याच्या फक्त पाच दिवसआधी अभिनेत्री नर्गिस दत्त म्हणजेच त्याची आई कॅन्सर रोगाने वारली. संजयचा पहिला सिनेमा रॉकी आणि त्याच स्टारडम नर्गिसला पाहता नाही आलं. 

जान्हवी कपूर

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मोठी मुलगी जान्हवी आज बॉलिवूडच्या यंग ब्रिगेडमधील एक अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आज तिच्याकडे मोठ्या बॅनरचे अनेक चित्रपट आहेत. पण तिला अभिनेत्री म्हणून घडवणारी तिची आई तिचा पहिला चित्रपट धडक रिलीज होण्याआधीच वारली. श्रीदेवीचं अपघाती निधन जान्हवीच्या पहिल्या सिनेमाआधीच झालं. त्यामुळे बॉलीवूडच्या चांदनीला आपल्या मुलीचं स्टारडम पाहण्याची संधी मिळाली नाही.

Instagram

अर्जुन कपूर

जान्हवीप्रमाणेच काहीसं नशीब तिच्या सावत्र भावाचं अर्जुन कपूरचंही आहे. त्याचा पहिला सिनेमा इश्कजादे रिलीज होण्याच्या दीड महिनाआधीच कॅन्सरग्रस्त असलेल्या त्याच्या आईचं मोना कपूरचं निधन झालं. अर्जुनला आजही या गोष्टीचं दुःख आहे की, त्याच्या आईला त्याचा पहिला सिनेमा पाहता आला नाही.

सुशांत सिंह राजपूत

Instagram

टीव्ही मालिकांमध्ये यश मिळवल्यावर बॉलीवूडमध्ये नाव कमावणारा अभिनेता म्हणजे सुशांत सिंह राजपूत. पण हे यश त्याचा आईला मात्र पाहता आलं नाही. सुशांतने 2008 साली मालिका किस देश में है मेरा दिल पासून करिअर सुरूवात केली. पण त्याच्या आईचं निधन मात्र 2002 सालीच झालं होतं. सुशांतने ना फक्त टीव्ही तर बॉलीवूडमध्येही चांगलंच नाव कमवलं आहे.

प्रतीक बब्बर

Instagram

अजरामर अभिनेत्री स्मिता पाटील आणि अभिनेता-राजकीय नेता राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक याचं नशीबही एवढं बलवत्तर नाही. प्रतीकच्या जन्मानंतर काही महिन्यातच स्मिता पाटील यांचं निधन झालं. प्रतीकचं संगोपन हे त्याच्या आजीआजोबांनी केलं. प्रतीकने 2008 मध्ये जाने तू या जाने ना या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केलं. आज तो बॉलीवूडमध्ये स्थिरावलाय आणि निवडक भूमिकांमधून आपल्या अभिनयाची चुणूकही दाखवत आहे. पण त्याचं हे यश पाहण्यासाठी स्मिता या जगात नाहीत.

आज या कलाकारांची आई त्यांच्यासोबत नसली तरी तिचा आशिर्वाद कायम त्यांच्यासोबत आहे. यामुळेच हे बॉलीवूड स्टार्स आज यशस्वी आहेत आणि नाव कमवत आहेत.

हेही वाचा -

या बॉलीवूड अभिनेत्री हुबेहूब दिसतात त्यांच्या 'आई'सारख्या

Flashback : सलमान खान ते आलिया... पाहा तुमच्या सेलेब्सचे Audition videos

बालकलाकार ज्या आता दिसतात ‘ग्लॅमरस’, बघा ओळखता येतं का