भावना व्यक्त करण्यासाठी हमखास उपयोगी पडतील असे Emotional Status In Marathi

भावना व्यक्त करण्यासाठी हमखास उपयोगी पडतील असे Emotional Status In Marathi

अनेकदा आपण पाहतो की, समोरचा मनातलं आपल्यासमोर व्यक्त करत नाही. पण त्याच्या मनाची व्यथा कळते ते त्याच्या सोशल मीडिया पोस्ट्स किंवा स्टेटसवरून असेच काही मनातील भावनांना हात घालणारे स्टेटस घेऊन आलो आहोत. असेच अनेक निरोप शायरी तुम्ही असे भावूक होता तेव्हा वाचता. तसेच हे स्टेटस आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आम्हाला नक्की कळवा हे स्टेटस तुम्हाला आवडले ते. चला पाहूया इमोशनल स्टेटस.

Table of Contents

  भावना तंतोतंत मांडणारे Emotional Status For Whatsapp

  • मन किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही मनात किती आपलेपणा किती आहे हे महत्त्वाचं आहे. 
  • अशिक्षित लोकांमुळेच मातृभाषा टिकली आहे सुशिक्षित लोकं मराठीत बोलणं टाळण्याचा प्रयत्न करतात. 
  • मतलबी दुनिया आहे ही आपला मतलब निघून गेला की साले ओळख पण विसरतात.
  • आयुष्यात हजारो लोकं मिळतील पण आपल्या हजार चुका क्षमा करणारे आईवडील पुन्हा मिळणार नाही.
  • का कुणास ठाऊक हल्ली एकटं राहणंच सोयीस्कर वाटतं.
  • काही लोकं स्लीपरसारखे असतात, साथ रोज देतात पण कधी कधी मागून चिखल पण उडवतात.
  • आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती जेव्हा आपल्या बाजूला असते तेव्हा वातावरणात एक वेगळीच जादू असते.
  • चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकांत राहून आनंदी राहिलेलं बरं.
  • आपण आयुष्यात कितीही चांगले असलो तरी आपण कोणाला किंवा कोणी तरी आपल्याला नक्की रिप्लेस करतं.
  • मनाने एकटे राहा त्यातच खरं सुख आहे.

  जबरदस्त मराठमोळे वॉट्सअप स्टेटस (Marathi Attitude Status)

  Canva

  प्रेमातील भावना सांगणारे Emotional Love Status

  • आज पुन्हा आला पाऊस आणि भिजलं सारं गाव खिडकीच्या काचेवर उमटलं आहे पुन्हा तुझं नाव.
  • आयुष्यात फक्त एकदाच आलीस पण सगळी लाईफ तुझ्या आठवणीत बिझी करून गेलीस.
  • प्रेमात हरलात म्हणून स्वतःला दोष देत बसू नका. कदाचित देवाने त्याहीपेक्षाही चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहून ठेवली असेल.  
  • तो थेंब थेंब करत बरसायला लागला जेव्हा मनातलं कागदावर उमटेनासं झालं. 
  • काळजी असेल तर प्रेम होतंच ना मग वय पाहिलं जातं ना रंग रूप.
  • प्रेम मिळो अथवा न मिळो पण ते अनुभवणं खूप सुंदर असतं.  
  • रोज तुझ्या रिप्लायची वाट पाहत बसते याला प्रेम म्हणावं की मूर्खपणा तेच कळत नाही आता मला. 
  • आता एकवेळ मरण आलं तरी चालेल पण कोणावर प्रेम न येवो
  • मन....बोलायचं असेल तर वेळ, मूड आणि शब्दांची गरज नसते त्यासाठी बोलायला मन असावं लागतं. 
  • ज्या प्रेमात आजपर्यंत हार मानली नाही ते प्रेम म्हणजे आईबाबा.
  Canva

  दोस्ती यारीचं समीकरण मांडणारे Emotional Friendship Status

  • मैत्री आणि प्रेमात फरक एवढाचं की, प्रेमाने कधी हसवलं नाही आणि मैत्रीने कधी रडवलं नाही.
  • मैत्री व नाती ही एका कांद्यासारखी आहे. ज्याला भरपूर थर आहेत जे तुमच्या आयुष्यात चव आणतात पण जर तुम्ही त्यांना मध्येच कापण्याचा प्रयत्न केलात तर ते तुमच्या डोळ्यात पाणी आणतात. 
  • सुख हे कणभर गोष्टींमध्ये लपलेलं असतं फक्त ते मनभर जगता आलं पाहिजे. 
  • माणूस बदलत नाही बदलते ती परिस्थिती...पण कायम राहते ती मैत्री.  
  • नशिबात असलेलं प्रेम आणि गरीबासोबत केलेली मैत्री आयुष्यामध्ये कधीच धोका देत नाही.
  • जर तुमचा बेस्टी तुमच्या दुसऱ्या मित्रांवर जळत असेल तर तो तुमचा खरा बेस्टी आहे. 
  • देवाने आयुष्यात मित्रच असे पाठवलेत की त्यांच्यामुळे आयुष्यातली सगळी दुःखच संपली आहेत. 
  • भावा खांद्यावर घेऊन फिरवण्याइतका हलका नसलास तरी काळजात ठेवून मिरवण्याइतका मोठा नक्कीच आहेस 
  • रक्त एक नाही पण रंगसारखा आहे नात्याने भाऊ नाही पण भावापेक्षा कमी नाही. 
  • खरे मित्र असे असतात ज्यांना दोन दिवस शिव्या दिल्या नाही तर विचारायला लागतात काय भावा रागावला आहेस का

  कुटुंब आणि कुटुंबातील व्यक्तींवरचे Emotional Status For Family

  Canva

  • जो व्यक्ती आपल्याला सगळ्यात जास्त रडवतो त्याच्यातच आपला जीव अडकलेला असतो. 
  • नात्यांमध्ये विश्वास आणि मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल तर लोकं गेम खेळायला सुरूवात करतात. 
  • माणसांवर जेवढं प्रेम करावं तेवढंच ते दूर जातात. 
  • माझ्या रुसण्याने कोणाला त्रास होत असेल ती म्हणजे माझी आई... बाकी कोणाला काय फरक पडत नाही. 
  • पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही आईच्या डोळ्यांत येणाऱ्या आनंदाश्रूंसाठी मोठं व्हायचंय.
  • गर्दीत आपली माणसं ओळखायला शिकलात तर संकटाच्यावेळी आपली माणसं गर्दी करायला विसरत नाहीत.
  • ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलंच कळलंय. 
  • माणसाने एखाद्याचं चांगलं नाही केलं तरी चालेल पण त्याच्याविषयी वाईट तरी बोलू नये. 
  • पापा...नशिबवान असतात ते लोक ज्यांच्या डोक्यावर वडिलांचा हात असतो. 
  • आजूबाजूची माणसं परिस्थिती वाईट बनवतात आणि त्यात अडकलेला माणूस वाईट बनत जातो.

  भावनावेग आवरता आला नाही की पोस्ट करा हे Sad Emotional Status

  • ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळत नाही त्यांच्यासाठी रडू नका. 
  • दुःखाची चव घेण्यापेक्षा ते पचवण्यात अधिक गोडी आहे.
  • संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली की तो यशस्वी होतोच. 
  • आयुष्यातील कुठली भेट शेवटची ठरेल सांगता येत नाही म्हणून घेतला जाणारा प्रत्येक निरोप असा घ्यावा की, त्याने फक्त चेहऱ्यावर हसू उमटेल. 
  • शब्द दिल्याने आशा निर्माण होतात आणि दिलेला शब्द पाळल्याने विश्वास
  • स्वतःच्या दुःखाची कितीही जाहिरात केली तरी त्याला खरेदी करणार जगात कुणीच भेटत नाही. 
  • आयुष्यावर कविता करता येते पण एखाद्या कवितेसारखं आयुष्य जगता येत नाही. 
  • अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच वाजू कळते दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची गरज असते. 
  • आयुष्यात फक्त स्वप्न फुकट पडतात बाकी सगळ्यांसाठी किंमत मोजावी लागते. 
  • कधी कधी तोंडात येईल ते बोलण्यापेक्षा मनात येईल ते बोललेलं चांगलं असतं.
  Canva

  जीवनाबाबत व्यक्त होण्यासाठी Emotional Status About Life

  • जीवनाची नेमकी व्याख्या कधीच करता येत नाही. पण काही कोट्सच्या माध्यमातून तूम्हीही आयुष्यावर काही नक्कीच बोलू शकता. 
  • असंख्य प्रयत्न करूनही जेव्हा काहीच हाती लागत नाही तेव्हा एक गोष्ट निश्चित हाती लागते ती म्हणजे अनुभव
  • लाईफ जगायची असेल तर पाण्यासारखी जगा कुणाशीही मिळा मिसळा एकरूप व्हा पण स्वतःच महत्त्व कमी होऊ देऊ नका. 
  • आयुष्यात दोन गोष्टी वाया जाऊ देऊ नका अन्नाच्या कणाला आणि आनंदाच्या क्षणाला
  • जीवनाच्या बँकेत जेव्हा पुण्याईचा बॅलन्स कमी होतो तेव्हा सुखाचे चेक बाऊन्स होतात. 
  • आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा प्रश्न नको असतात फक्त साथ हवी असते. 
  •  संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकाटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं. 
  • अपेक्षा करणं चुकीचं नसतं. चुकीचं असतं ते चुकीच्या माणसांकडून अपेक्षा करणं. 
  • मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी व्यक्ती शोधा, आयुष्य मनासारखं होईल. 
  • नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळं काही शक्य आहे.