ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
चेहऱ्यावरील फॅट कमी करतील हे सोपे व्यायामप्रकार

चेहऱ्यावरील फॅट कमी करतील हे सोपे व्यायामप्रकार

फोटो तेव्हाच चांगला येतो. जेव्हा तुमचा चेहरा टवटवीत आणि प्रसन्न दिसतो. आता हा चेहरा टवटवीत दिसणे म्हणजे तुम्ही छान झोपून उठणे.. मग फोटो काढणे असे होत नाही. तुमचा फोटो तुम्हाला परफेक्ट म्हणजे तुमचा चेहरा उठून दिसणे.. हे उठून दिसणे तुमच्या चेहऱ्याच्या फॅटवर अवलंबून असते. आता काहींचा चेहरा फारच मोठा असतो.त्यांचे गालही फार थुलथुलीत असतात.तर काहींना डबलचीन असते. असा हेल्दी चेहरा दिसायला कधीच चांगला दिसत नाही. जर तुम्हाला तुमचा चेहरा आकर्षक दिसावा असे वाटत असेल तर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील फॅट कमी करणे गरजेचे आहे. आज आपण अगदी सोपे सोपे व्यायाम प्रकार पाहुया. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील फॅट कमी होईल.

प्रेग्नंसीदरम्यान विमानाने प्रवास करताना या गोष्टी जरूर लक्षात ठेवा 

1.स्माईलिंग फिश फेस (smiling fish face)

shutterstock

ADVERTISEMENT

तुम्हाला तुमचे गाल कमी करायचे असतील तर तुम्हाला पहिला व्यायामप्रकार करायचा आहे तो म्हणजे स्माईलिंग फिश फेसचा. माशाप्रमाणे तोंड करणे म्हणजे काही सोपी गोष्ट नाही.  तुम्हाला तुमचे गाल आत ओढून ठेवायचे आहे. ही पोझीशन तुम्हाला साधारण एक मिनिटांसाठी तशीच रोखून धरायची आहे. असे तुम्हाला साधारण 5 ते 6 वेला करायचे आहे. 

*तुम्ही अगदी ऑफिसमध्ये बसल्या बसल्या हा व्यायामप्रकार करु शकता.

2.ब्लो किस (blow a kiss)

shutterstock

ADVERTISEMENT

चेहऱ्यावरील फॅट कमी करण्याचा हा दुसरा व्यायामप्रकार आहे. ब्लो किस म्हणजे आता तुम्हाला तुमच्या ओठांचा आकार किस करण्यासारखा करायचा आहे. पण यामध्ये थोडा ट्विल्ट आहे. तुम्हाला मान वर करुन मग किस करायची आहे. असे तुम्हाला 10 वेळा तरी करायचे आहे. हा व्यायामप्रकार करताना तुम्हाला तुमच्या मानेखाली ताण आलेला जाणवेल. यामुळे तुमचे गाल आणि डबलचीन कमी होईल.

3. रोअर लाईक अ लायन ( Roar like a lion)

shutterstock

 सिंह ज्यापद्धतीने जांभई देतो अगदी तसाच हा व्यायाम प्रकार आहे. तुम्हाला तुमचे डोळे बंद करुन डोळे मोठे करायचे आहेत. जीभ जितकी बाहेर काढता येईल तितकी काढायची आहे. असे तुम्हाला किमान 10 वेळा तरी करायचे आहे.  

ADVERTISEMENT

हा व्यायाम करताना तुम्हाला तुमच्या हनुवटीकडे आणि डोळ्यांच्या आजुबाजुला ताण जाणवेल. त्यामुळे तुमची डबलचीन आणि गाल कमी होतील. त्यामुळे तुम्ही हा व्यायाम एक दिवस आड करायला काहीच हरकत नाही.

तुम्ही पाहिली आहे का पांढरी चहापत्ती, ज्याची किंमत आहे हजारोंमध्ये

4.जॉ लाईन ( Jaw line)

shutterstock

ADVERTISEMENT

आता तुम्हाला तुमची जॉ लाईन रेखीव करायची असेल. तर तुम्ही हा व्यायाम करायलाच हवा. तुम्हाला तुमचा जबडा डाव्या उजव्या बाजूला करायचा आहे. असे करताना तुम्हाला तुमच्या जॉ लाईनवर ताण जाणवेल. कालांतराने तुम्हाला तुमच्या कानापासून जबड्याचा आकार वेगळा दिसू लागेल. तेथील फॅट कमी झाल्यामुळे तुमचा चेहरा अधिक खुलून दिसेल.

नेक अप अँड डाऊन (Neck up and down)

shutterstock

सल्या जागी करता येईल असा आणखी एक प्रकार म्हणजे मान खाली-वर करणं. या व्यायामप्रकाराचे इतरही फायदे असतील. पण त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील फॅटही कमी होते.  तुम्हाला खुर्चीवर किंवा एका ठिकाणी स्तब्ध बसून तुमची मान खाली आणि वर करायची आहे. तुम्हाला असेल करताना तुमच्या मानेखाली ताण जाणवेल. 

ADVERTISEMENT

बिकिनी शेव्ह करायचं असेल तर पहिले ‘या’ 6 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

तुम्हाला जर तुमच्या चेहऱ्यावरील फॅट कमी करायचे असेल तर तुम्ही किमान महिनाभर हे व्यायामप्रकार नियमित करुन पाहा.तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये नक्कीच फरक जाणवेल. या व्यायामप्रकारासोबत तुम्ही इतरही व्यायाम करत असाल तर तुम्हाला तुमच्यामध्ये हा फरक नक्की जाणवेल.

31 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT