अगदी आठवडाभरात असे कमी करा मांडी आणि नितंबावरील फॅट | POPxo

अगदी आठवडाभरात असे कमी करा मांडी आणि नितंबावरील फॅट

अगदी आठवडाभरात असे कमी करा मांडी आणि नितंबावरील फॅट

हल्ली अनेक जण फिगरबाबत फारच जागरुक झाले आहेत. जीम, योगा, पिलाटेस असे सगळे काम सांभाळून करण्याचा सपाटा अनेकांनी लावला आहे. आता प्रत्येकाच्या परफेक्ट बॉडीची defination ही वेगळी असते. म्हणजे काहींना त्यांचे ठराविक भागच कमी करायचे असतात. म्हणजे काहींना त्यांचे दंड बाहुबलीप्रमाणे बलदंड वाटतात. ते कमी करण्यासाठी त्यांची धडपड सुरु असते. काहींना पोट, काहींना कंबर, फेसफॅट, थाईज, नितंब.. असं बरचं काही कमी करायचं असतं. शरीवरील फॅट कमी करत असताना सगळ्यात जास्त त्रासदायक ठरतात ते मांडी आणि नितंबावरील फॅट. तुमच्याही मांड्या आणि नितंबाचा आकार शरीराच्या तुलनेत अधिक आहे तर मग तुम्ही या सोप्या टीप्सने आठवडाभरात तुमचे फॅट कमी करु शकता.


परफेक्ट फिगरसाठी करा ‘हा’ परफेक्ट डाएट आणि पाहा तुमच्यातील बदल (Weight Loss Diet Plan In Marathi)

स्कॉट्स (suqats)

shutterstock
shutterstock

तुम्हाला पहिल्यांदा स्कॉट्स हा व्यायाम करायचा आहे. तुम्हाला गुडघे समांतर ठेवून खाली बसायचे आहे. खूर्चीवर बसतात तसे तुम्हाला बसायचे आहे. पण हे करताना तुमचा गुडघा तुमच्या पायाच्या पुढे जायला नको. असे करताना तुमच्या मांड्या आणि नितंबावर ताण येईल. साधारण 10 पासून तुम्ही स्कॉट्स करायला सुरुवात करा. 

स्कॉटस करताना तुम्हाला थोडा पाय दुखल्यासारखे वाटेल. पण तुम्हाला किमान 10 वेळा तरी असे करायचे आहे. त्यानंतर तुम्ही यामध्ये वाढ करायला काहीच हरकत नाही.

जम्पिंग जॅक्स (Jumping jacks)

shutterstock
shutterstock

दोन्ही हातांची टाळी देऊन आणि दोन्ही पाय लांब करुन तुम्हाला हा व्यायाम करायचा असतो. तुम्ही ही क्रिया वारंवार करायची आहे. किमान 10 उड्यांपासून तुम्ही याची सुरुवात करा. नंतर तुम्ही उड्या वाढवू शकता. हे केल्यावर तुम्हाला थोडा थकवा येईल.

#WeightLoss : वजन कमी करण्यासाठी करा बर्फाचा वापर

हाय हिल्स (High heels)

shutterstock
shutterstock

पाय जितके वर उंचावता येईल तितके उंचावून तुम्हाला हा व्यायाम प्रकार करायचा आहे. असे करताना तुम्हाला तुमच्या मांड्यांचाव वरील भाग दुखेल असा वाटेल. पण ठिक आहे किमान 30 सेकंद तर तुम्ही हे करायला हवे. तरच याचा फायदा तुम्हाला होईल.

हाय हिल्स करत असताना तुम्ही जर तुमची गती वाढवली तर पाय मुरगळण्याची शक्यता असते. म्हणूनच अतिशय काळजीपूर्वक तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे. 

बट ब्रीज (Butt bridge)

shutterstock
shutterstock

पाठीवर झोपून तुम्हाला तुमचे नितंब वर उचलायचे आहेत. अगदी सेकंभरासाठी तुम्हाला तुमचे शरीर उचलून धरायचे आहे. असे तुम्हाला करायचे आहे. हे करत असताना तुम्हाला तुमच्या नितंबावर थोडा ताण जाणवेल. त्याचा फायदा तुम्हाला तुमचे नितंबावरील फॅट कमी करण्यास मदत करेल.

#sugarcraving कमी करण्यासाठी करा हे सोपे उपाय

सीझर्स ( scissors)

shutterstock
shutterstock

पाय हवेत वर करुन तुम्हाला कात्री प्रमाणे त्याची हालचाल करायची आहे. जर तुम्ही काऊंटीगवर ते करणार असाल तर  किमान 20 वेळा तरी असे करा आणि जर तुम्ही घड्याळ लावून करणार असाल तर किमान 30 सेकंद तरी करा. तुमच्या इनर थायमधील फॅट कमी होण्यास मदत होईल.

आठवडाभराच्या चॅलेंजसाठी व्हा सज्ज

आता तुम्हाला काही तरी कमी करायचे आहे. म्हणजे तुम्हाला काही नियमांचे पालन नक्कीच करावे लागेल. सात दिवस तुमच्या शरीरात जास्तीत जास्त फळ जाऊ द्या. कमीत कमी साखर आणि गोड पदार्थ ठेवा. जर तुम्हाला डाएट करणे शक्य नसेल तरी ठिक आहे.तुम्ही तुमचा आहार चौकस ठेवा. वेळेवर नाश्ता आणि जेवण असू दया. रात्री खूप उशीरा जेवू नका. 


जर तुम्ही काही नियम पाळले तर तुम्हाला याचा फायदा होईल. तुमच्या मांड्या आणि नितंब कमी होईल.

मुरुम मुरुमांमुळे काय होते