जागतिक कन्या दिन शुभेच्छा, लाडक्या लेकीसोबत साजरा करा हा दिवस - Daughters Quotes In Marathi | POPxo

कन्या दिन साजरा करण्यासाठी शुभेच्छा संदेश (Daughters Quotes In Marathi)

कन्या दिन साजरा करण्यासाठी शुभेच्छा संदेश (Daughters Quotes In Marathi)

घरात मुलगी जन्माला येणं  ही एक भाग्याची गोष्ट आहे. निसर्गाने स्त्रीकडे प्रजनन शक्ती दिलेली आहे. कारण स्त्री ही घराचा कणा असते. एक स्त्री घर आणि समाज अशा दोन्ही जबाबदाऱ्या उत्तम रित्या सांभाळू शकते. यासाठीच घर आणि समाजात प्रत्येक स्त्रीला सन्मानाची आणि आदराची वागणूक मिळणं गरजेचं आहे. मात्र दुर्देवाने समाजात असं चित्र दिसत नाही. यासाठी कन्या दिन साजरा करावा लागतो.  

Table of Contents

  कन्या दिन साजरा करण्यामागचं कारण (Daughters Day History)

  जागतिक कन्या दिन शुभेच्छा - Daughters Quotes In Marathi
  Shutterstock

  प्राचीन काळापासून स्त्रीयांना समाजात दुय्यम वागणूक देण्यात येत आहे. ज्यामुळे स्त्रीयांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. स्त्री भ्रूण हत्या, बालविवाह, अत्याचार,अन्याय याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी स्त्रीयांना मानसन्मान मिळवून देण्यासाठी ‘कन्या दिन’ साजरा केला जातो. स्त्रीच्या जन्माआधीच गर्भातच तिची हत्या केली जाते. स्त्री भ्रूण हत्या थांबविण्यासाठी, लोकांच्या मनात स्वतःच्या मुलींबद्दल प्रेम वाढण्यासाठी कन्या दिवस साजरा केला जातो.

  राष्ट्रीय कन्या दिन दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी साजरा करण्यात येतो. या वर्षी 27 सप्टेंबर 2020 ला राष्ट्रीय कन्या दिवस साजरा केला जाणार आहे. राष्ट्रातील लिंग विषमता कमी करण्यासाठी आणि मुलींना समाजात मुलांप्रमाणे प्राधान्य मिळावे यासाठी यूनिसेफ आणि Cry (Child Relief and You) या संघटनेकडून हा दिवस राष्ट्रीय कन्या दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय बालिका कन्या दिवस 11 ऑक्टोबरला साजरा केला जातो.

  कन्या दिनासाठी '10' सुविचार (Daughters Quotes In Marathi)

  Daughters Quotes In Marathi

  1.मुली या देवाघरच्या पऱ्या असतात - J lee

  2. मुली म्हणजे भूतकाळातील गोड आठवणी, वर्तमान काळातील आनंदी क्षण आणि भविष्य काळातील आशा आणि आश्वासन असतात  - अनामिक

  3. तुमच्या मुलींचा आदर करा. कारण त्या आदरणीय आहेत - Malala Yousafzai 

  4. मुली या निसर्गाने दिलेली एक अनमोल भेटवस्तू आहेत. - Laurel Atherton

  5. मुली नेहमी तिच्या आईच्या पावलावर पाऊल ठेवूनच चालतात म्हणून त्यांच्यासाठी आदर्श पालक व्हा - Elizabeth George

  6. जेवढं मुलींना तुमच्याबद्दल माहीत होत जातं तितक्या तुमच्या मुली मजबूत होत जातात - अनामिक 

  7. माझी मुलगी माझ्यासाठी सर्वस्व आहे - Whitney Houston

  8. प्रत्येक मुलीमध्ये देवाने त्याचे दिव्य गुण दिलेले असतात - Russell M. Nelson

  9. मुलगी ही तिच्या आईसाठी दैवी खजिना असते - Catherine Pulsifer

  10. मुलीवर वडीलांऐवढं प्रेम दुसरं कुणीच करू शकत नाही - Michael Ratnadeepak

  जागतिक कन्या दिन शुभेच्छा (Daughters Day Wishes In Marathi)

  जागतिक कन्या दिन शुभेच्छा - Daughters Day Wishes In Marathi

  आजकाल सोशल मीडियाचं साम्राज्य दिवसेंदिवस वाढत आहे. ज्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश देण्याची पद्धत रूढ होत आहे. यंदाचा कन्या दिन साजरा करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत काही शुभेच्छा संदेश आणि सुविचार शेअर करत आहोत.

  1. एक तरी मुलगी असावी, कळी उमलताना पाहता यावी, मनातील गुपितं तिने हळुच माझ्या कानी सांगावी. जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  2. पाहुनी रूप गोंडस मनी माया दाटते, अशी कळी मग गर्भातच का नकोशी वाटते. मुलींना जगवा, मुलींना वाचवा. कन्या दिनाच्या शुभेच्छा

  3. वंशाचा दिवा मुलगा असेल...पण’ती’च नसेल तर दिवा कसा लागेल. कन्या दिनाच्या शुभेच्छा

  4. मुली नेहमीच स्पेशल असतात, कारण त्यांच्याशिवाय घराला शोभा नाही. जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  5. लेक हे असं खास फुल आहे जे प्रत्येक बागेत फुलत नाही. माझ्या बागेत फुललं यासाठी देवा मी तुझा आभारी आहे. जागतिक कन्या दिन शुभेच्छा

  6. लेक वाचवा, देश घडवा. कन्या दिनाच्या शुभेच्छा

  7. लेक असते ईश्वराचं देणं, तिच्या  पाऊलखुणांनी सुखी होईल आमचं जिणं. कन्या दिनाच्या शुभेच्छा

  8. जशी सायलीची कळी, सोनचाफ्याची पाकळी तशी माझी…जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  9.  स्वागत तुझे मी असे करावे, अचंबित हे सारे जग व्हावे, तुझ्या गोड हास्याने जीवन माझे फुलूनी जावे. कन्या दिनाच्या शुभेच्छा

  10. प्रत्येक क्षण आता आनंदाने सजला, तुझ्या रूपाने माझ्या घरी सौख्याचा चरणस्पर्श झाला. जागतिक कन्या दिन शुभेच्छा

  आई आणि मुलीसाठी '15' शुभेच्छा संदेश (Mother & Daughters Quotes In Marathi)

  status for daughter in marathi

  आई आणि मुलीचं नातं हे एक खास नातं असतं. आईचं आपल्या प्रत्येक बाळावर समान प्रेम असतं.मग ती मुलगी असो वा मुलगा. तुम्ही एका मुलीची आई असाल तर हे शुभेच्छा संदेश खास तुमच्यासाठी आहेत.

  1. माझा श्वास तू, माझा जीव तू, माझ्या जगण्यासाचा अर्थ तू माझी लाडकी छकुली. जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  2. तुझ्यामुळे मज आईपण मिळालं कसं सांगू तुला, माझ्या बकुळीच्या फुला. जागतिक कन्या दिन शुभेच्छा

  3.माझी लेक म्हणजे आनंदाचा झरा, माझी लेक म्हणजे वात्सल्याचा दुवा कन्या दिनाच्या शुभेच्छा

  4. इवले इवले हात हलवत मिचकावत होतीस डोळे, तुला कुशीत घेताच स्वर्गसुख मज झाले. कन्या दिनाच्या शुभेच्छा

  5. तू फक्त नाहीस मुलगी तू आहेस श्वास माझा, उद्या जगावर राज्य करशील स्वप्न नाही आहे विश्वास माझा. कन्या दिनाच्या शुभेच्छा

  6. तुझ्या केवळ अस्तित्वाने रोम रोम माझे झंकारले, तूझ्या येण्याने जीवन माझे सार्थक झाले. कन्या दिनाच्या शुभेच्छा

  7. लेक लाडकी या घरची होणार राणी सासरची. कन्या दिनाच्या शुभेच्छा बेटा.

  8. माझी लेक माझी सखी परमेश्वराकडे एकच मागणं कधी नको होऊस तू दुःखी. जागतिक कन्या दिन शुभेच्छा

  9.  मुलगा तोपर्यंत माझा आहे जोपर्यंत त्याचं लग्न होत नाही. पण तु माझी तोवर आहेस जोवर माझं आयुष्य संपत नाही. कन्या दिनाच्या शुभेच्छा

  10. लेक माझी भाग्याची, राजकन्या आहे घराची. कन्या दिनाच्या शुभेच्छा

  11. तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा तुझ्यामुळे कळाला मज अर्थ जीवनाचा. कन्या दिनाच्या शुभेच्छा

  12. लाडाची लेक सोनुली माझी, आता होणार लवकर मीही आजी. कन्या दिनाच्या शुभेच्छा

  13.भाग्यवान असतात ते लोक ज्यांच्या घरी मुली जन्माला येतात. कन्या दिनाच्या शुभेच्छा

  14. एक तरी मुलगी सुनेच्या रूपात मिळावी लेकीची सर तिने थोडीतरी भरून काढावी. कन्या दिनाच्या शुभेच्छा

  15. मुलीचा जन्म म्हणजे आनंदाची उधळण. कन्या दिनाच्या शुभेच्छा

  बाबा आणि मुलीसाठी '15' शुभेच्छा संदेश (Father & Daughters Quotes In Marathi)

  daughter status in marathi

  बाबा आणि मुलगी हे एक अनोखं आणि खास नातं असतं. कारण असं म्हणतात की वडिलांचं त्यांच्या मुलीवर सर्वात जास्त प्रेम असतं. प्रत्येक मुलीलादेखील तिच्या बाबाशिवाय दुसरं कुणीच जास्त आवडत नाही. बाबाच्या कुशीत जितकं सुरक्षित वाटतं तितकं इतर कोणासोबत वाटत नाही. यासाठीच तुमच्या लाडक्या सोनपरीला या कन्यादिनाला हे शुभेच्छा संदेश जरूर द्या.

  1. प्रिय सोनु, थोडेच दिवस घरात राहिलीस पण आयुष्याभराच्या आठवणींची साठवण करून गेलीस… कन्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझा लाडका बाबा

  2. मुलगा जर माझ्या वंशाचा दिवा आहे तर तु माझ्या दिव्याची वात आहेस. कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, तुझा बाबा

  3. छोटी छकुली अशी असावी प्रत्येकाच्या घरी एक तरी लेक असावी. कन्या दिनाच्या शुभेच्छा बेटा

  4. नशिबवान असतात जे  लोक ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येते. कन्या दिनाच्या शुभेच्छा

  5. काही झालं तरी मुलीचं पहिलं प्रेम तिचा बाबाच असतो. कन्या दिनाच्या शुभेच्छा बेटा

  6. मुलगी जेव्हा घरी जन्माला येते साऱ्या घरात आनंद आणते. कन्या दिनाच्या शुभेच्छा

  7. सोड सारी चिंता आनंदात रहा बाळा, तुला रडताना पाहून तुझ्या बाबाचा लागत नाही डोळा. कन्या दिनाच्या शुभेच्छा

  8. एक तरी मुलगी असावी, छोटूशी पण नखरेल भारी, नाना मागण्या पूरवताना तिच्या बाबाची अशी तारांबळ उडावी. कन्या दिनाच्या शुभेच्छा

  9. लेक अशी असावी की तिच्यासोबत चालताना बापाची कॉलर ताठ असावी. कन्या दिनाच्या शुभेच्छा

  10. बाबाची लाडकी लेक गोडूंली, मोठी झाली सासरी चालली… कसा जगू आता मी तान्हुल्या, बाबाची लाडकी लेक गोडूंली. तुझा  बाबा

  11. मुलगी आपल्या बापाची लाडकी परीच असते. कन्या दिनाच्या शुभेच्छा

  12. जगातील अनमोल रत्न म्हणजे फक्त कन्यारत्न. कन्या दिनाच्या शुभेच्छा

  13. एक तरी लेक असावी कच्ची-पक्की पोळी प्रेमाने भरवण्यासाठी. कन्या दिनाच्या शुभेच्छा

  14. देव्हारातील चंदन तू, मला मिळालेलं वरदान तू. कन्या दिनाच्या गोड गोड शुभेच्छा

  15. लेकीची पसंती कळताच बाबाचं काळीज धडधडतं. चिमुकली घरटं सोडून जाणार म्हणून आतल्या आत बिचारं रडतं. कन्या दिनाच्या शुभेच्छा

  असा करा कन्या दिन साजरा (How To Celebrate Daughters Day In Marathi)

  असा करा कन्या दिन साजरा - daughters day quotes in marathi

  आजचा दिवस खास करण्यासाठी आणि तुमच्या मुलीसोबत हा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यासाठी या काही टिप्स जरूर फॉलो करा. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलीच्या चेहऱ्यावर खरा आनंद पाहता येईल

  तिच्यासोबत एखाद्या Dinner date वर जा

  नेहमीपेक्षा हटके काहीतरी करायचं असेल तर थोडा वेगळा विचार करायला हवा. आजचा कन्यादिन स्पेशल करण्यासाठी तुम्ही आज फक्त तुमच्या मुलीसोबत एखाद्या dinner date   घेऊन जाऊ शकता. जिथे तुमच्या व्यतिरिक्त घरातील इतर मंडळी नसतील. ज्यामुळे तुमच्या मुलीच्या मनात नेमकं काय सुरू आहे, तिला कोणत्या गोष्टी हव्या आहेत, तिचं करिअर, तिचे मित्रमैत्रिणी, तिच्या आवडीनिवडी, तिचे भविष्यातील प्लॅन्स याबाबत तुम्ही मोकळेपणाने चर्चा करू शकता. अशा डिनर डेटमुळे तुम्ही तुमच्या मुलीच्या मनात एक खास जागा मिळवू शकता. शिवाय हा दिवस असा साजरा केल्यामुळे तिला आनंददेखील मिळेल.

  तिच्या आवडीची भेटवस्तू तिला द्या

  मुलीचा जन्म हीच तुमच्यासाठी एक खास गोष्ट आहे. मुली आणि वडिलांचं नातं हे एक खास नातं असतं. त्यामुळे आजच्या दिवशी तुमच्या छकुलीच्या चेहऱ्यावरील आनंदाचा क्षण टिपण्यासाठी ही कल्पना नक्कीच छान आहे. तुमच्या लाडक्या लेकीसाठी तिच्या आवडीची एखादी भेटवस्तू खरेदी करा आणि तिला ती आज देऊन अगदी चकित करा.

  तिला वेकेशनवर घेऊन जा

  बऱ्याचदा काम आणि कामाची दगदग यामुळे आपल्या मुलांकडे पुरेसे लक्ष देणे पालकांना शक्य होत नाही. त्यामुळे मुलं आणि पालकांमधील संवाद दूरावला जातो. मात्र या समस्येला दूर करण्यासाठी कन्यादिनाचं निमित्त अगदी बेस्ट आहे. तुम्ही तुमच्या मुलीला हा दिवस स्पेशल करण्यासाठी तिच्या आवडत्या हॉलीडे डेस्टिनेशनवर घेऊन जाऊ शकता.

  तिला शॉपिंगसाठी घेऊन जा

  मुली म्हटलं की शॉपिंग हा त्यांचा अगदी विक पॉंईंट असतो. मग तुमची छकुली अगदी लहान असो अथवा मोठी तिला शॉपिंगसाठी जायला नक्कीच  आवडेल. आजचा कन्या दिन तुम्ही अशा हटके प्रकारे नक्कीच साजरा करू शकता. यासाठी तुमच्या लाडक्या लेकीला तिच्या आवडत्या ठिकाणी मनसोक्त शॉपिंग करण्यासाठी घेऊन जा. 

  तिच्यासाठी घरीच काहीतरी खास बनवा

  काम आणि इतर गोष्टींच्या व्यापातून तुम्हाला आज डिनरडेट, फिल्म, शॉपिंग असं कुठेच नेणं शक्य नसेल तर काहीच हरकत नाही. आपल्या प्रिय व्यक्तीला खुश करण्यासाठी कुठेही आणि कधीही वेळ काढता येऊ शकतो. घरी आल्यावर तिच्यासाठी तिच्या आवडीची एखादी डिश स्वतः तयार केली तरी ती नक्कीच खूश होऊ शकते. घरीच एकत्र बसून असं जेवण करण्यातदेखील एक वेगळीच मौज असू शकते. 

  फोटोसौजन्य - टरस्टॉक

  अधिक वाचा:

  आई असते जीव तर बाबा आयुष्याचा आधार….

  म्हणून यंदा नक्की साजरा करा ‘मातृदिन’, द्या हे अमूल्य गिफ्ट

  #Friendshipday साठी शुभेच्छा संदेश आणि स्टेटस