निरोगी आणि फिट राहण्यासाठी सकाळच्या ब्रेकफास्टची सुरूवात #oats ने करा असं बरेच लोक सांगतात. मात्र अनेकांना oats खाण्याचे फायदे माहीत नसतात. त्यामुळे oats खाण्याचा कंटाळा केला जातो. मात्र या ओटस् मध्ये असे काही गुणधर्म दडलेले असतात. ज्यामुळे तुमच्या शरीरावर आणि सौंदर्यावर चांगले फायदे झालेले दिसून येऊ शकतात. इतर तृणधान्यांप्रमाणेच ओट्स हे देखील एक धान्य आहे. मात्र हे धान्य कमी तापमान असलेल्या ठिकाणी पिकतं. oats हे एक हेल्दी फूड आहे. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर्स असतात. ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर त्याचा नक्कीच चांगला फायदा होतो. मात्र एवढंच नाही तर तुमच्या सौंदर्यांत भर घालण्यासाठीदेखील तुम्ही ओट्सचा वापर करू शकता. यासाठीच ओट्सचे हे फायदे जरूर जाणून घ्या.
ओट्समध्ये कॅलरिज कमी प्रमाणात असतात. ज्यामुळे तुमचं वजन कमी करण्यासाठी ते फायदेशीर ठरू शकतं. शिवाय ओट्समध्ये फायबर्स मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे तुमचं पोट भरल्यासारखं वाटतं. ओट्स खाण्यामुळे तुम्हाला वारंवार भुक लागत नाही. ज्यामुळे तुम्ही अती प्रमाणात आहार घेत नाही. ज्यामुळे सहाजिकच तुमच्या वजनावर योग्य नियंत्रण राहण्यास मदत होते.
कामाचा अती ताण, काळजी, चिंता यामुळे आजकाल उच्च रक्तदाबाची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मात्र जर तुम्ही नियमित ओट्सयुक्त आहार घेतला तर तुमची या समस्येपासून नक्कीच सुटका होऊ शकते. ओट्समध्ये असलेल्या फायबर्समुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राहते आणि रक्तदाबाची समस्या हळूहळू कमी होऊ शकते.
मधुमेहींना नेहमी कोणता आहार घ्यावा याबाबत चिंता सतावत असते. कारण अनेक पदार्थांमधुन त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याचा धोका असतो. मात्र ओट्स खाण्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. ज्यामुळे मधुमेही नियमित ओट्सयुक्त आहार नक्कीच घेऊ शकतात.
ओट्समुळे पोट साफ राहण्यास मदत होते. शिवाय ओट्समुळे पोट भरल्यासारखे वाटल्याने भुक कमी लागते ज्यामुळे अपथ्यकारक पदार्थ खाणे आपोआप कमी होते. याचा परिणाम तुमच्या पोटाच्या आरोग्यावर होतो आणि तुमचा बद्धकोष्ठतेचा त्रासदेखील कमी होतो. ओट्स खाण्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते आणि पोटाचे आरोग्यदेखील.
ओट्समध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन्स आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे तुमच्या शरीर आणि मनाचा योग्य विकास होण्यास मदत होते. कामाचा ताण कमी करण्यासाठी शरीर आणि मनाला आराम मिळणं गरजेचं असतं. ओट्समुळे पोट साफ होतं आणि तुम्हाला शारीरिक आणि मानसिक स्वास्थदेखील मिळतं.
जर तुम्हाला त्वचा कोरडी असल्यामुळे समस्यांना तोंड द्यावं लागत असेल तर मुळीच काळजी करू नका. कारण ओट्समुळे तुमची त्वचा मऊ आणि तजेलदार होऊ शकते. ओट्स कच्चा दूधात भिजवून त्याची पेस्ट नियमित त्वचेला लावल्यावे तुमच्या त्वचेवर एकप्रकारचा नैसर्गिक ग्लो येऊ शकतो.
त्वचेवर सतत धुळ, माती, प्रदूषणचा थर बसत असतो. ज्यामुळे तुमच्या त्वचेच्या आतील छिद्र बंद होतात. या समस्येमुळे पिंपल्स, त्वचेच्या समस्या, इनफेक्शन होण्याचा धोका निर्माण होतो. मात्र जर तुम्ही ओट्स आणि मधाचा स्क्रब चेहऱ्यावर लावला. तर ओट्समधील फायबर्समुळे तुमच्या त्वचेची छिद्रे मोकळी होतात. त्वचेवरील धुळ आणि प्रदूषण कमी होते. ज्यामुळे त्वचेला पुरेशा ऑक्सिजनचा पूरवठा होतो. तुम्ही फ्रेश आणि सुंदर दिसू लागता.
ओटस तुम्ही दूधासोबत, लाडू, इडली, उपमा, कटलेट, पेज, स्मूदी अशा विविध प्रकारे तुम्ही खाऊ शकता. ओट्सला स्वतःची अशी विशिष्ट अशी चव नसते. त्यामुळे त्याला तुमच्या मसाले आणि रेसिपिजचा टच देऊन चविष्ट करता येऊ शकतं. मात्र बाजारात मिळणारे इंस्टंट मसाला ओट्स खाणे टाळा. कारण त्यावर प्रक्रिया करून ते विकण्यात येतात. जास्त दिवस टिकण्यासाठी केलेल्या प्रक्रियेमुळे असे पदार्थ आरोग्यदायी नसतात.
अधिक वाचा
लहान मुलांना हेल्दी खाण्याची सवय कशी लावाल
या पावसाळ्यात करा कडधान्यांच्या या चटकदार हेल्दी रेसिपी
हेल्दी लाईफस्टाईल आणि वेटलॉससाठी वापरा हे 'नॅचरल स्वीटनर्स'
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम