नृत्य केल्याने शरीरात होतात 'हे' आश्चर्यकारक बदल

नृत्य केल्याने शरीरात होतात 'हे' आश्चर्यकारक बदल

आजकाल टेलिव्हिजनवर विविध डान्स शो सुरू असतात. इतरांना डान्स करताना पाहून मनाला एकप्रकारचा आनंद मिळतो. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत नृत्यकलेत पारंगत लोकांना डान्स करताना पाहण्यात एक वेगळीच मौज येते. मात्र डान्स अथवा नृत्य केल्यामुळे तुमच्या शरीरात आश्चर्यकारक बदल होऊ शकतात हे तुम्हाला माहीत आहे का?

होय, नृत्याचा तुमच्या शरीर आणि मनावर चांगला परिणाम होऊ शकतो. कारण नृत्य केल्यामुळे तुमच्या शरीराला योग्य व्यायाम आणि मनाला आत्मिक आनंद मिळत असतो. यासाठीच नृत्य करण्याचे हे फायदे जरूर वाचा

1. मेंदूला प्रोत्साहन मिळते

नृत्य केल्यामुळे तुम्हाला केवळ तुमच्या शरीराला व्यायाम मिळतो असं नाही तर तुमच्या मनाला यामुळे चालनादेखील मिळू शकते. नृत्य करणारी वृद्ध माणसं मनाने नेहमीच तरूण राहतात. अशा लोकांच्या शरीरावर वृद्धत्वाच्या खुणा लवकर येत नाहीत. शिवाय वृद्धापकाळात येणारा डिमेन्शिया हा आजार देखील त्यांना नक्कीच होत नाही. बऱ्याचदा वाढत्या वयानुसार लोकांमधील विस्मरणशक्ती वाढू लागते ज्यामुळे त्यांना काही गोष्टी लक्षात राहत नाहीत. पण जर तुम्ही नियमित डान्स करत असाल तर ही समस्या तुम्हाला होऊ शकत नाही. 

Instagram

2. शरीर लवचिक राहते

नृत्यामुळे तुमच्या शरीराला योग्य आणि पुरेसा व्यायाम मिळतो. ज्यामुळे तुमचं शरीर इतरांपेक्षा लवचिक राहतं. वय वाढताना शरीरात आपोआप एकप्रकारचा कठीणपणा येऊ लागतो. ज्यामुळे भविष्यात सांधेदुखी, कंबरदुखी, अंग दुखण्याच्या समस्या जाणवू लागतात. मात्र डान्स करणाऱ्या लोकांचे शरीर मुळातच लवचिक असल्यामुळे त्यांना अशा समस्या कमी प्रमाणात जाणतात.

3. ताण-तणाव कमी होतो

जर तुम्हाला सतत कामाचा अथवा इतर गोष्टींचा ताणतणाव जाणवत असेल तर तुम्हाला डान्स करण्याची गरज आहे हे ओळखा. कारण नृत्य केल्यामुळे मनाला  आपोआप आनंद मिळतो. एका संशोधनानुसार नृत्य केल्यामुळे स्ट्रेस कमी झाल्याची अनेक उदाहणे आढळून आली आहेत. जोडीदारासोबत नियमित नृत्य केल्यामुळे एकमेकांवरील प्रेमदेखील दृढ होते.

4. डिप्रेशन कमी होते

डान्स केल्यामुळे तुम्हाला आनंदी आणि उत्साही वाटू लागते. संशोधनानुसार डिप्रेशनमध्ये असणाऱ्या लोकांना डान्स करण्यास सांगितल्यामुळे त्यांच्यात आश्चर्यकारक बदल झालेले दिसून आले आहेत. त्यामुळे नैराश्याच्या अधीन होण्यापेक्षा एखाद्या नृत्यकलेत पारंगत व्हा. 

5. ह्रदयाचे आरोग्य वाढण्यास मदत होते

ज्यांना ह्रदयविकाराची समस्या आहे त्यांच्यासाठी नृत्य हा रामबाण उपाय आहे. कारण नृत्य केल्यामुळे तुमच्या शरीराला चांगला व्यायाम मिळतो. ज्यामुळे सहाजिकच तुमचे श्वासावरील नियंत्रण, ह्रदयाचे आरोग्य, रक्तदाब, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण यामध्ये कमालीची सुधारणा होऊ शकते. 

6. वजन नियंत्रणात राहते

वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करून तुम्ही थकला आहात का ? असं असेल तर मुळीच काळजी करू नका. आठवड्यातून तीन ते चार दिवस मनसोक्त नाचा. आश्चर्य वाटतंय का मग हा प्रयोग नक्कीच करून बघा. कारण डान्स मुळे तुमचं फक्त वजन कमी होणार नाही तर तुमच्या शरीराचा बांधा सुडौलदेखील होण्यास मदत होईल. 

7. शरीराचा तोल सांभाळ्यास मदत होते

काही लोकांना वयोमानानुसार पडण्याची भिती वाटत असते. मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे तोल जाऊन पडल्यामुळे तुम्हाला दुखापत होण्याचा धोका वाढतो. मात्र काही डान्स स्टेप्समुळे तुम्हाला तुमच्या शरीराचा तोल सांभाळण्यास मदत होऊ शकते. 

 

8. उत्साही वाटू लागते

तुम्हाला सतत कंटाळवाणं आणि  उदास वाटत असेल तर त्वरीत डान्स क्लासला अॅडमिशन घ्या. कारण डान्ससाठी विविध स्टेप्स आणि मूव्हज कराव्या लागतात. ज्यामुळे त्या करताना तुम्हाला तुमच्या शरीरातील ऊर्जा वापरावी लागते.ज्यामुळे तुम्हाला न थकता अधिक उत्साही वाटायला लागू शकतं.   

अधिक वाचा

हसण्याचे '7' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का

मिठी मारण्याचे 'हे' आहेत आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे

पावसाळ्यातही नाचायला (Rain Dance) आवडत असेल तर करून पाहा हे 5 ट्रेंडिंग डान्स प्रकार

Arangetram मधून झळकलं सुकन्या मोने यांचं 'नृत्यप्रेम'

अनिकेत विश्वासरावच्या 'सासूचा डान्स' व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

फोटोसौजन्य - इन्साग्राम