सकाळी सकाळी उठल्यानंतर आरशात पाहिल्यावर जर चेहऱ्यावर तुम्हाला पिंपल्स दिसले तर? दिवसाची सुरूवातच खराब होते ना? पिंपल्स (Pimples) म्हणजे नको असलेले पाहुणे. तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या पार्टीला किंवा कार्यक्रमाला जायचं असेल तर हमखास चेहऱ्यावर पिंपल्स येतातच. कितीही प्रयत्न केले तरीही हे पिंपल्स जाण्याचं नाव घेत नाहीत. आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स खूपच खराब दिसतात. हे लवकर जात तर नाहीतच पण तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचंही काम करतात. पिंपल्स येण्याची कारणं बरीच असू शकतात. पण आपण त्याचा आता विचार न करता सुंदर चेहरा मिळवण्यासाठी नक्की घरगुती उपाय काय करता येतील ते पाहूया. हे अतिशय सोपे आणि पटकन कामी येणारे उपाय आहेत. तुम्हाला घरच्या घरी मास्क बनवून या पिंपल्सचा समाचार घेता येईल.
हा मास्क बनवण्यासाठी आपल्याला स्ट्रॉबेरीचा वापर करावा लागतो. कारण यामध्ये जास्त प्रमाणात salicylic acid असतं जे पिंपल्स घालवण्यासाठी बनणाऱ्या बऱ्याच ointments मध्ये वापरलं जातं. हे त्वचेमधील तेलाचं प्रमाण कमी करतं आणि बॅक्टेरिया होण्यापासून वाचवतं. त्यामुळे याचा उपयोग पिंपल्स घालवण्यासाठी चांगल्या प्रकारे करता येतो.
स्टेप 1: काही स्ट्रॉबेरीज घेऊन मॅश करून त्याची पेस्ट तयार करून घ्या
स्टेप 2: या पेस्टमध्ये काही थेंब लिंबाचा रस मिसळा आणि 1 चमचा मध घालून मिक्स करून घ्या
स्टेप 3: हा मास्क पूर्ण चेहऱ्यावर लावा आणि 5 मिनिट्सनंतर पाण्याने चेहरा धुवा
तुम्ही नियमित या मास्कचा वापर केल्यास, तुम्हाला तुमच्या त्वचेवर परिणाम दिसून येईल. इतकंच नाही तर पिंपल्स येण्याचं प्रमाणही कमी होईल.
कोरफड हे त्वचेसाठी वरदान आहे. ही त्वचेला moisturize करण्यासाठी त्वचा निरोगी करण्यासाठीही उपयुक्त ठरतं हे सर्वांनाच माहीत आहे.
स्टेप 1: कोरफड जेलमध्ये थोडासा मध मिसळा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या
स्टेप 2: हा मास्क तुम्ही चेहरा आणि मानेवर लावा आणि साधारण 20-35 मिनिट्स तसंच ठेवा
स्टेप 3: आता सुकल्यानंतर तुम्ही हलक्या हातांना मळ काढल्याप्रमाणे काढा. लक्षात ठेवा की, चेहऱ्यावर हात रगडू नका. अगदी हलक्या हाताने मास्क काढा आणि मग गार पाण्याने चेहरा धुवा
हा मास्क पिंपल्सपासून तर सुटका मिळवून देतोच पण त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावरील डाग आणि सुरकुत्या कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो.
चेहऱ्यांवरील मुरुमांपासून कशी होणार सुटका - घरगुती उपाय, आहार आणि बरंच काही
Egg white अर्थात अंड्याचा सफेद भाग त्वचेतील अधिक तेल काढून त्वचा टाईट आणि toned ठेवण्यासाठी मदत करतो. त्यामुळे पिंपल्स लवकर जातात.
स्टेप 1: एक egg white घेऊन तुम्ही fork च्या मदतीने फेटून घ्या आणि त्यामध्ये फेस येईपर्यंत ते फेटत राहा
स्टेप 2: हा मास्क चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिट्सनंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा
पिंपल्सचा त्रास जास्त असल्यास, तुम्ही पूर्ण आठवडाभर दिवसातून दोन वेळा हा प्रयोग करा
डोकेदुखीसाठी अॅस्परिन गोळी असते हे सर्वांनाच माहीत आहे. पण पिंपल्ससाठीदेखील ही गोळी खूपच परिणामकारक म्हणून काम करते.
स्टेप 1: 5-6 aspirin च्या गोळ्या घ्या पण लक्षात ठेवा की, 6 पेक्षा अधिक गोळ्या असू देऊ नका
स्टेप 2: हा गोळ्या पाण्याबरोबर भिजवून याची पेस्ट करून घ्या
स्टेप 3: पेस्टमध्ये 1 चमचा मध घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या
स्टेप 4: हा मास्क पिंपल्स असणाऱ्या ठिकाणी लावा आणि 7-15 मिनिट्सनंतर चेहरा धुवा
तुमची त्वचा अधिक कोरडी असेल तर मधाऐवजी तुम्ही ऑलिव्ह ऑईल (olive oil) चा वापर करू शकता. हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून दोनवेळा करू शकता.
पुदिना (mint) चेहऱ्यावरील पिंपल्स साफ करतं आणि चेहऱ्याला एक थंडावा देतं. त्यामुळे खाण्याबरोबरच तुम्ही मास्क म्हणूनही याचा वापर करू शकता.
स्टेप 1: पुदिन्याची ताजी पानं वाटून पेस्ट बनवून घ्या
स्टेप 2: पेस्टमध्ये 1 चमचा बेकिंग सोडा आणि 1/2-1 चमचा दही घाला आणि मिक्स करा
स्टेप 3: मास्क तुमच्या पिंपल्स आलेल्या ठिकाणी लावा आणि जेव्हा पूर्ण सुकेल तेव्हा चेहरा पाणी अथवा फेसवॉशने धुवा आणि मग क्रिम लावा
कडिलिंब हा नेहमीच त्वचेच्या कोणत्याही समस्येसाठी अप्रतिम उपाय आहे. यामुळे त्वचेवरील बॅक्टेरिया नष्ट होतात. त्यामुळे अगदी अंगाला खाज आली तरीही याच्या पाण्याने आंघोळ करणं हा सोपा उपाय आहे.
स्टेप 1: दोन चमचे कडिलिंबाची पावडर अथवा ताज्या कडिलिंबाच्या पानाची पेस्ट करून घ्या
स्टेप 2: यामध्ये 1 चमचा हळद मिसळा. थोडंसं पाणी घालून पेस्ट बनवा. ताज्या पानाची पेस्ट बनवली असेल तर पाण्याची गरज भासणार नाही
स्टेप 3: चेहऱ्याला मास्क लावा आणि पूर्ण सुकेल तेव्हा साध्या पाण्याने धुवा
जास्त पिंपल्स असल्यास, हे आठवड्यातून 6 वेळा करा
हा मास्क तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी वापरा कारण हळदीमुळे तुमचा चेहरा पिवळा होतो.
You Might Like This: