14 ऑगस्ट 2019 चं राशीफळ, सिंह राशीसाठी आज उत्साहाचे वातावरण

14 ऑगस्ट 2019 चं राशीफळ, सिंह राशीसाठी आज उत्साहाचे वातावरण

मेष - ताण-तणाव येण्याची शक्यता

अचानक प्रवास करावा लागल्याने ताण येण्याची शक्यता आहे. स्वभाव चिडचिडा होऊ शकतो. संतान सुख मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी बदल होतील. जोडीदाराशी नाते मजबूत होईल. 

कुंभ - अचानक धनलाभ होईल

आज तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सुखसाधनांमध्ये वाढ होईल. कामाच्या ठिकाणी अधिकारी साथ देतील. व्यावसायिक प्रवास होऊ शकतो. भेटवस्तू आणि मानसन्मान मिळेल.

मीन- चांगली संधी गमवाल

आज तुमच्या दुर्लक्षपणामुळे अथवा आळसामुळे एखादी चांगली संधी गमवाल. वाहन चालवताना सावध रहा. विद्यार्थ्यांना अभ्यासात मेहनत घ्यावी लागेल. आरोग्याची काळजी घ्या. उत्पन्न आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. 

वृषभ - रोमॅंटिक दिवस आहे

आज तुमच्यासाठी रोमॅंटिक दिवस आहे. व्यवसायात राजकारण आणि कुटुंबाची साथ मिळेल. कोर्ट कचेरीत तुमचा  पक्ष मजबूत असेल. रचनात्मक कार्यात सन्मान मिळेल. देण्या-घेण्याचे व्यवहार सहज होतील. 

मिथुन - तंत्रज्ञान घेण्यात यश मिळेल

आज तंत्रज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. नवीन कामात मन रमवाल. कामाच्या ठिकाणी मनासारखे काम करण्यास मिळेल. आत्मविश्वास वाढेल. परदेशी जाण्याचा योग आहे. 

कर्क - आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे

आज कुणावर विश्वास ठेवून काम करू नका. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कोणतीही महागडी वस्तू आज खरेदी करू नका. कर्ज घेणे टाळा. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. आत्मविश्वास वाढणार आहे. प्रवास करणे टाळा.

सिंह - फ्रेश वाटेल

आज तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटणार आहे. मानसिक समाधान मिळेल. घरातील वातावरण आनंदाचे असेल. जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे. सामाजिक मानसन्मान आणि धनसंपत्तीत वाढ होईल. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. 

कन्या - जोडीदाराचा तणाव वाढू शकतो

जोडीदाराचा तणाव वाढण्याची शक्यता आहे. गोष्टी लपवून ठेवल्यामुळे आज कुटुंबात वादाचे वातावरण निर्माण होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी आज चांगला दिवस आहे. आरोग्याची काळजी घ्या. व्यावसायिक भागिदारीत वाद होतील.  

तूळ - जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या

आज तुमच्या जोडीदाराला अॅलर्जीचा त्रास होऊ शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. व्यावसायिक कामात व्यस्तता वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कौशल्याने अधिकारी खुश होतील. 

वृश्चिक - आर्थिक प्रगतीची संधी मिळेल

आज तुम्हाला आर्थिक प्रगतीची संधी मिळेल. मित्रांकडून भेटवस्तू मिळणार आहेत. जोडीदारासोबत प्रवास सुखाचा असेल. मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण कराल. व्यावसायिक योजना फायदेशीर ठरेल. 

धनु - नात्यात जवळीक निर्माण होईल

आज इतरांच्या मदतीने तुम्हाला यश मिळेल. नात्यात जवळीक निर्माण होऊ शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या निमित्ताने परदेशी जाण्याचा योग आहे. आरोग्याची काळजी घ्या. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. 

मकर- विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात रमणार नाही.

आज काही विद्यार्थ्यांचे मन अभ्यास करण्यात लागणार नाही. मनासारखी  नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. जोखिम घेणे टाळा. भावनांवर नियंत्रण ठेवा. देणी घेणी करताना सावध रहा. मित्रांशी भेट होईल.

अधिक वाचा

12 राशीमध्ये चार राशी असतात जास्त बलशाली

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी