17 ऑगस्ट 2019 चं राशीफळ, वृषभ राशीला मिळेल धनसंपत्तीबाबत सुखवार्ता

17 ऑगस्ट 2019 चं राशीफळ, वृषभ राशीला मिळेल धनसंपत्तीबाबत सुखवार्ता

मेष - नकारात्मक विचारांचा प्रभाव जाणवेल

आज विद्यार्थ्यांवर नकारात्मक विचारांचा प्रभाव जाणवेल. कामाच्या ठिकाणी समस्या येऊ शकतात. विनाकारण कामाचा ताण जाणवेल. आरोग्याची काळजी घ्या. रचनात्मक कार्यात प्रगती होणार आहे. कामाच्या ठिकाणी रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. 


कुंभ - धनप्राप्तीचा योग 

आज तुम्हाला घरातील एखाद्या वृद्ध व्यक्तीकडून धनप्राप्तीचा योग आहे. नोकरीत पदोन्नती होण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदाचे असेल. घरात सजावटीचे काम करणार आहे. 


मीन - व्यवसायात भावंडांची साथ मिळेल

आज भावंडांमुळे व्यवसायात वाढ होणार आहे. कौटुंबिक समस्या दूर होतील.राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. जोडीदारासोबत परदेशी जाण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती मजबूत असेल. 

 

वृषभ - रखडलेले पैसे परत मिळतील

आज तुम्हाला एखादी आनंदवार्ता समजेल. रखडलेले पैसे परत मिळतील. व्यावसायिकांना नवीन कामातून पद आणि सन्मान मिळेल. मुलांची कर्तव्ये पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेत यश मिळेल.


मिथुन -  एखादे काम रद्द होण्याची शक्यता

व्यवसायात कठिण समस्यांचा सामना करावा लागेल. एखादे काम रद्द होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी एखादे काम मनाविरूद्ध करावे लागेल. विनाकारण समस्या सहन कराव्या लागतील. प्रेमसंबंध मजबूत होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. 


कर्क - हात-पायाचे दुखणे होण्याची शक्यता

आज तुम्हाला हात आणि पायांमध्ये दुखणं जाणवेल. पूर्ण दिवस आज तुम्हाला थकवा जाणवण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. जोडीदाराशी नातं मजबूत होईल. सामाजिक सन्मान वाढणार आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. 


सिंह - समस्या समजूतदारपणे सोडवाल

आज तुमच्या मित्रमंडळी अथवा कौटुंबिक समस्या तुम्ही प्रेम आणि समजूतदारपणे सोडवणार आहात. विनाकारण वाद घालू नका. एखाद्या राजकारणी व्यक्तीसोबत तुमची भेट होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. आत्मविश्वास वाढणार आहे. 


कन्या - रचनात्मक कार्यात वाढ 

आज तुमचा एखादा व्यावसायिक कामात फायदा होणार आहे. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण करण्यात यश मिळेल. उत्पन्नाचे साधन वाढेल. जोखिमेची कामे करू नका. धार्मिक कार्यासाठी प्रवास कराव लागेल. मित्रांशी भेट होणार आहे. 


तूळ - एखादी महागडी वस्तू हरवेल

आज तुम्हाला पैशांबाबत एखादी समस्या सहन करावी लागणार आहे. एखादी महागडी वस्तू हरवेल अथवा चोरीला जाईल. व्यवसायातील कामे होता होता रखडणार आहेत. पैसे खर्च करूनसुद्धा फायदा होणार नाही. जोडीदाराशी सांबाळून घ्यावं लागेल.


वृश्चिक - आईच्या आरोग्यात सुधारणा

आज तुमच्या आईच्या आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण चांगले असेल. विद्यार्थ्यांना समस्या येऊ शकतात. कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. बिघडलेली कामे मेहनत करून नीट करावी लागतील.


धनु - तणाव वाढणार आहे

आज तुम्हाला एखादा महिलेचा त्रास सहन करावा लागणार आहे. कौटुंबिक मतभेद होण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत वाद घालू नका. नातेवाईकांसोबत देणी घेणी करताना सावध रहा. विनाकारण त्रास होण्याची शक्यता आहे. व्यवसायात समस्या येतील. विनाकारण खर्च करणे टाळा. शैक्षणिक समस्या सुटणार आहेत.


मकर- पोटाची समस्या जाणवेल

आज तुम्हाला पोटाची समस्या त्रास देणार आहे. खाण्या-पिण्याबाबत सावध रहा. व्यवसायात चढ-उतार जाणवतील. नात्यात देणी घेणी करताना सावध रहा. विरोधक सावध होतील. वाहन चालवताना सावध रहा. मुलांकडून आनंदवार्ता मिळतील.

अधिक वाचा

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी

जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम'