19 ऑगस्ट 2019 चं राशीफळ, मेष राशीला होणार धनलाभ

19 ऑगस्ट 2019 चं राशीफळ, मेष राशीला होणार धनलाभ


मेष - धनसंपत्ती मिळण्याचा योग

आज तुमच्यासाठी अतिशय चांगला दिवस आहे. एखादे नवे काम मिळाल्यामुळे आनंदी व्हाल. कामाच्या ठिकाणी उत्पन्न वाढेल. अचानक डुबलेले पैसे परत मिळतील. रखडलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक मानसन्मान मिळेल.


कुंभ - वैचारिक मतभेद होण्याची शक्यता

आज मित्रमंडळींच्या वागण्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीशी मतभेद होतील. अनावश्यक वाद करणे टाळा. मुलांकडून त्रास होईल. धुर्त लोकांपासून सावध रहा.


मीन- शारीरिक समस्या वाढतील

जोडीदाराला शारीरिक समस्या वाढणार आहेत. सर्दी-खोकला होऊ शकतो. विद्यार्थ्यांचे सामाजिक कार्यात मन रमणार आहे. मित्रांच्या मदतीने रखडेलेली कामे पूर्ण कराल. रचनात्मक कार्यात प्रगती होईल.


वृषभ - मुलांकडून आनंदवार्ता मिळेल

आज तुम्हाला मुलांकडून आनंदवार्ता मिळेल. कौटुंबिक मौजमस्तीचे वातावरण असेल. जोडीदारासोबत मंगल कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. बिघडलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक मानसन्मान मिळेल. 


मिथुन - व्यावसायिक काम रद्द होतील

कामाच्या ठिकाणी दबाव वाढेल. कामात दुर्लंक्ष करू नका. एखादे व्यावसायिक काम रद्द होण्याची शक्यता आहे. विनाकारण खर्च करणे टाळा. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. वाहन चालवताना सावध रहा.


कर्क - कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल

आज तुम्हाला प्रॉपर्टीबाबत चाललेल्या कोर्ट कचेरीच्या कामातून सुटका मिळेल. रखडलेले पैसे आज परत मिळतील. मानसिक समाधान मिळणार आहे. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल. जोडीदारासोबत परदेशी जाण्याचा योग आहे. आईच्या तब्येतीची काळजी घ्या.

 

सिंह - चांगली संधी गमवाल

आज तुम्ही आळस आणि दुर्लक्ष केल्यामुळे एखादी चांगली संधी गमवणार आहात. व्यावसायिक गोष्टींसाठी दगदग करावी लागेल. कामाच्या ठिकाणी समस्या निर्माण होतील. जोडीदारासोबत आनंदी क्षण घालवाल. महत्त्वाची कामे आज रखडण्याची शक्यता आहे. देणी घेणी करताना सावध रहा.


कन्या - आरोग्याची काळजी घ्या

आज तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. मन निराश होऊ शकते. धार्मिक कार्यात मन रमवा. अचानक धनलाभ होऊ शकतो. मुलांकडून एखादी आनंजवार्ता मिळेल. क्रीडा क्षेत्रात यश मिळू शकतं.


तूळ - नातेसंबंध सुधारल्यामुळे आनंदी व्हाल

आज तुम्हाला जोडीदाराच्या भावना समजून घ्याव्या लागतील. गैससमज समजूतदारपणे  दूर करा. नवीन लोकांशी ओळख वाढणार आहे. मन आनंदी असेल. तुमच्या गोड स्वभावामुळे सामाजिक सन्मान मिळणार आहे. रखडेलेल पैसे मिळतील. मित्रांसोबत वेळ चांगला घालवाल.

 

वृश्चिक - व्यावयासिक योजना सफळ होतील

आज युवकांना स्पर्धा परिक्षा अथवा मुलाखतीत यश मिळेल. व्यावसायिक योजना सफळ होतील. हरवलेला आत्मविश्वास पुन्हा मिळेल. वाहन चालवताना साववध रहा. मनोरंजनाची संधी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.


धनु - आर्थिक नुकसान होऊ शकते

आज व्यवसायात तोटा होण्याची शक्यता आहे. एखादी महागडी वस्तू खरेदी कराल. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना अभ्यासात मेहनत घ्यावी लागेल. रखडलेले एखादे काम आज पूर्ण होईल.


मकर- आरोग्यात सुधारणा होऊ शकते

आज तुम्हाला आरोग्यात सुधारणा होत असल्याचे जाणवेल. कौटुंबिक वातावरण मौजमस्तीचे असेल. नोकरीत प्रगती होऊ शकते. मित्रांच्या मदतीने उत्पन्नाचे साधन वाढणार आहे. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढतील. 

अधिक वाचा

तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा 'आई' आहात

राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली

जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम'