2 ऑगस्ट 2019 चं राशीफळ, कुंभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभाचा योग

2 ऑगस्ट 2019 चं राशीफळ, कुंभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभाचा योग

मेष - आरोग्य बिघडण्याची शक्यता

आई-वडीलांची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. मन निराश आणि असमाधानी राहील. कामाचे ठिकाण बदलण्याचा योग आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात अपयश येऊ शकते. रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.  

कुंभ - आर्थिक लाभ होऊ शकतो

आज तुम्ही चल-अचल संपत्ती खरेदी कराल. शेअर बाजारातील लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात वाढ होईल. जोडीदाराशी नाते सुधारेल. प्रवासाला जाण्याचा योग आहे.

मीन- तरूणांना नवी संधी मिळेल

आज तरूणांना नवीन संधीचा लाभ मिळेल. भावनेच्या आहारी जाऊन घेतलेले निर्णय बदलावे लागतील. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. राजकाराणातील जबाबदाऱ्या वाढतील. वाहन चालवताना सावध रहा.

वृषभ - प्रेमाची भावना मनात निर्माण होईल

एखाद्या बद्दल तुमच्या मनात आज प्रेमाची भावना निर्माण होऊ शकते. घरातील मोठ्यांचा सल्ला तुमच्यासाठी वरदान ठरेल. विरोधकांना मात देण्यात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती होईल. रचनात्मक कार्यात तुम्हाला यश मिळणार आहे.

मिथुन - रिअल इस्टेटमध्ये लाभ होईल

रिअल इस्टेटच्या व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यावसायिक सेमिनार अथवा सम्मेलनात तुमची छाप सोडण्यात तुम्हाला यश मिळेल. खेळात प्राविण्य मिळवाल. प्रेमसंबध सांभाळा. वादविवाद करू नका. 

कर्क - व्यावसायिक करार तुटण्याची शक्यता

आज तुमचा एखादा व्यावसायिक करार तुटण्याची शक्यता आहे. ज्यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. मानसिक ताण येऊ शकतो. आई-वडीलांकडून भावनिक साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी वातावारण अनुकूल असेल.

सिंह - फ्रेश आणि उत्साही वाटेल

आज तुमचे आरोग्य उत्तम राहील. तुम्हाला फ्रेश आणि उत्साही वाटेल. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. आर्थिक समस्या दूर होतील. जोडीदारासोबत नातेसंबंध मजबूत होतील. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढतील.

कन्या - मित्रांसोबत तणाव वाढेल

आज तुमचा मित्रांसोबत तणाव वाढणार आहे. कौटुंबिक समस्या निर्माण होऊ शकतात. कोणतेही कर्ज घेऊ नका. धार्मिक कार्यात रस वाढेल. कामाच्या ठिकाणी अधिकारी वर्गाशी वाद वाढेल. 

तूळ - ताणतणाव अथवा डोकेदुखी जाणवेल

तणाव वाढल्याने डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. योजना अयशस्वी ठरण्याची शक्यता आहे. राजकारणातील रस वाढेल. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. रखडलेली कामे मित्रांच्या मदतीने पूर्ण होतील.

वृश्चिक - अचानक धनलाभ होण्याची शक्यता

आज तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची  शक्यता आहे. व्यावसायिक महिलांना धनप्राप्ती होऊ शकते. नवीन योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची मदत मिळेल. धार्मिक आणि आध्यात्मिक रस वाढेल.

धनु - नवीन प्रेमसंबंधांना सुरूवात होईल

आज तुमचे एखाद्याशी सूत जुळणार आहे. नवीन प्रेमसंबंध निर्माण होऊ शकतात. कौटुंबिक वादात समाधानकारक मार्ग निघेल. कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळेल. व्यावसायिक भागिदारी लाभदायक ठरेल. वृद्धांनी आरोग्याची काळजी घ्यावी.

मकर- अधिकारी नाराज होतील

आज कामाचया ठिकाणी तुमच्या कामामुळे अधिकारी नाराज होण्याची शक्यता आहे.  नवीन जबाबदारी मिळाल्याने व्यस्त राहाल. व्यवसायातील मंद गतीमुळे तणाव वाढू शकतो. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. सन्मान आणि संपत्ती वाढण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

12 राशीमध्ये चार राशी असतात जास्त बलशाली

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का