21 ऑगस्ट 2019 चं राशीफळ, मकर राशीच्या लोकांना मेहनतीचे मिळेल फळ

21 ऑगस्ट 2019 चं राशीफळ, मकर राशीच्या लोकांना मेहनतीचे मिळेल फळ

मेष - अधिकारी निराश होतील

आज तुमच्या कुटुंबात एखादा वादाचा मुद्दा डोकं वर काढणार आहे. तुमच्या कोरड्या व्यवहारामुळे घरातील मंडळी निराश होतील. उत्पन्नात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी दगदग वाढेल. अधिकारी नाराज होतील. राजकारणातील जबाबदारी वाढणार आहे.


कुंभ - गुंतवणूक करताना सावध रहा

आज एखादा नव्या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी नीट विचार करा. आर्थिक जबाबदाऱ्या टाळण्याऐवजी त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. विनाकारण खर्च करू नका. व्यवसायात नवीन ओळखी काळजीपूर्वक करा. रखडलेली कामे पूर्ण होतील.


मीन- आज तब्येत चांगली असेल

आज तुमची तब्येत चांगली असेल. दिवसभर फ्रेश वाटेल. जोडीदारासोबत वातावरण मौजमस्तीचे असेल. कामाच्या ठिकाणी तुमचा मानसन्मान वाढणार आहे. व्यावसायिक योजनांसाठी साठवलेले पैसे  खर्च करावे लागतील. प्रवासाचा योग आहे. 


वृषभ - दातांचे दुखणे वाढण्याची शक्यता

आज तुमचे दातांचे दुखणे वाढण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. रचनात्मक कार्यात आर्थिक लाभ होण्याची  शक्यता आहे. उच्च अधिकाऱ्यांच्या सहकार्यांने यश मिळेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात प्रगती मिळेल.


मिथुन -कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता

आज तुम्हाला कौटुंबिक संपत्ती मिळू शकते. कोर्ट कचेरीत यश तुमच्या बाजूने असेल. थोडीशी मेहनत घेऊनही चांगलं यश मिळू शकतं. रखडलेली कामे आज पूर्ण होतील. जोडीदाराला आर्थिक लाभाचा योग आहे. रखडलेली कामे आज पूर्ण होतील. जोडीदारासोबत नाते मजबूत होणार आहे. कौटुंबिक स्वास्थ चांगले असेल. 


कर्क - आज दिवस रोमॅंटिक असेल

आज तुमच्यासाठी दिवस प्रेमाचा असेल. व्यवसायात नवीन संबंध मजबूत होतील. सामाजिक समारंभात मित्रांसोबत जाण्याचा योग येईल. कौटुंबिक वातावरण सुखाचे असेल. सामाजिक सन्मान आणि धनसंपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. 


सिंह - पदोन्नतीत अडथळा येण्याची शक्यता

आज तुमच्या आळस आणि कमी वेगामुळे तुमचे अधिकारी निराश होऊ शकतात. पदोन्नतीत बाधा येण्याची शक्यता आहे. कोर्ट-कचेरीत समस्या निर्माण होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत भिती वाटण्याची शक्यता आहे.  


कन्या -  उत्पन्नाचे नवे साधन निर्माण कराल

आज तुम्ही एखादे नवी जागा विकत घ्याल. उत्पन्नाचे साधन वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक प्रवास करण्याचा विचार कराल.राजकारणातील जबाबदाऱ्या वाढतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जुन्या मित्रांसोबत भेट होण्याची शक्यता आहे.  


तूळ - करिअरमध्ये चढ-उतार येतील

आज तुम्ही कामाच्या निमित्ताने घरापासून दूर जाण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये चढ-उतार येऊ शकतात. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करा. धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे. प्रवास करणे तात्पूरते टाळा. 


वृश्चिक - ताण-तणाव जाणवेल

आज तुम्हाला अचानक एखादी भिती जाणवणार आहे. ताण आणि तणाव वाढण्याची शक्यता आहे. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावध रहा. कोर्ट कचेरीतून सुटका मिळण्याची शक्यता आहे. 


धनु - जोडीदाराच्या सहकार्याने रखडलेली कामे पूर्ण कराल

आज तुमच्या जोडीदाराच्या सहकार्याने तुम्ही तुमची रखडलेली कामे पूर्ण कराल. कामाच्या ठिकाणी समस्या निर्माण होऊ शकतात. प्रवासात एखादा जुना मित्र अथवा मैत्रिण भेटेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेत यशस्वी होण्याचा योग आहे.


मकर-  कामाच्या ठिकाणी मेहनतीचे फळ मिळेल

आज तुमची एखादी महत्त्वाची योजना यशस्वी होईल. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे फळ मिळेल. व्यावसायिक प्रवास घडण्याची शक्यता आहे. तुमचा एखादा मित्र अथवा मैत्रिण तुमच्या यशात सहभागी होऊ शकते. आरोग्य चांगले असेल.

अधिक वाचा

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

राशीनुसार जाणून घ्या कोणाला कसली वाटते भीती

तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा 'आई' आहात