25 ऑगस्ट 2019 चं राशीफळ, वृषभ राशीला नवीन संधी मिळेल

25 ऑगस्ट 2019 चं राशीफळ, वृषभ राशीला नवीन संधी मिळेल

मेष - नव्या प्रेमयुगूलांसाठी दिवस चांगला

आज नव्या प्रेमयुगूलांसाठी दिवस आनंदाचा असेल. रोमॅंटिक होण्याची चांगली संधी आहे. एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सन्मानित होण्याची शक्यता आहे. देणी-घेणी करताना सावध रहा.


कुंभ - चांगली संधी गमवण्याची शक्यता आहे

आज तुम्ही दुर्लक्ष केल्यामुळे एखादी चांगली संधी गमवण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात रमणार नाही. व्यावसायिक भागिदारीमुळे तणाव वाढणार आहे. व्यवहारात बदल करावा लागेल. कुटुंबात सुख-शांती असेल.


मीन- गुडघे दुखी जाणवेल

आज तुम्हाला आईच्या दुखण्याचा त्रास होणार आहे. महत्त्वपूर्ण निर्णय घेताना नीट विचार करा. एखादा निर्णय तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल.  आर्थिक स्थिती चांगली असेल.

 

वृषभ - नवीन संधी मिळेल

आज तुम्हाला नोकरीची नवीन संधी मिळेल. व्यापारात नवीन संधी मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी पगारवाढ आणि प्रमोशनची बातमी मिळेल. रखडलेल्या कामातील अडथळे दूर होतील.


मिथुन - खर्च वाढण्याची शक्यता

आज  तुमची एखादी मौल्यवान वस्तू हरवली जाण्याची शक्यता आहे. दिवसभर चिंताग्रस्त राहाल. अचानक खर्च वाढणार आहे. या काळात कौटुंबिक साथ मिळाल्याने कुटुंबावरील विश्वास वाढेल. शैक्षणिक क्षेत्रात मेहनतीचे फळ मिळेल. छोटी-मोठी आरोग्यसमस्या डोकं वर काढू शकते. 


कर्क - आईच्या तब्येतीची काळजी घ्या

आईच्या तब्येतीत आज सुधारणा होणार आहे. एखादा मित्र व्यवसायात आर्थिक मदत करू शकतो. व्यवसाय आणि  कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. जोखिमेच्या कामापासून दूर रहा. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष देण्याची गरज आहे. 


सिंह - शेजाऱ्यांचा  त्रास जाणवेल

आज तुम्हाला शेजारी अथवा एखाद्या सहकाऱ्याचा त्रास जाणवणार आहे. जोडीदाराच्या भावनांचा मान राखा. विरोधक तुमच्या कमजोरीचा फायदा उचलू शकतात. थोरामोठ्यांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. प्रवासामुळे थकवा जाणवेल.


कन्या - दुखण्याने त्रस्त व्हाल

आज तुम्हाला पाठदुखीचा त्रास जाणवू शकतो. छोट्या मोठ्या आजारपणाकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. देणी-घेणी सांभाळून करा.


तूळ - शेअर बाजारात आर्थिक लाभ होऊ शकतो

आज तुम्हाला शेअर बाजारात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. काही लोकांशी भेट रोमांचक असेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.


वृश्चिक - प्रियकरासोबत मौजमस्ती करण्याचा योग

आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत आनंदात वेळ घालवणार आहात. एखाद्या ठिकाणी फिरायला जाण्याचा बेत आखाल. खर्च वाढेल मात्र आर्थिक सोय होईल. कामाच्या ठिकाणी कोणताही वाद घालू नका. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. 


धनु - कामाच्या ठिकाणी समस्या येतील

आज कामाकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी समस्या येऊ शकतात. जोडीदारामध्ये भावनिक बदल होतील. वाहन चालवताना सावध रहा.


मकर-  नवीन संपत्ती खरेदी  कराल

आज तुम्ही एखादी नवी संपत्ती खरेदी करणार आहात. व्यापारात नवीन संबंध निर्माण होतील. भविष्यात फायदा होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होईल. पदोन्नतीची संधी मिळेल. रखडलेली कामे करण्यात यश मिळेल.

अधिक वाचा

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली

तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा 'आई' आहात