26 ऑगस्ट 2019 चं राशीफळ, वृश्चिक राशीला धनसंपत्तीबाबत मिळेल आनंदवार्ता

26 ऑगस्ट 2019 चं राशीफळ, वृश्चिक राशीला धनसंपत्तीबाबत मिळेल आनंदवार्ता

मेष - भविष्याची चिंता सतावेल

आज तुम्हाला भविष्याबाबत चिंतेमुळे तणाव येण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. नोकरी अथवा व्यवसायाची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. सामाजिक जबाबदाऱ्या वाढणार आहेत. रखडलेली कामे पूर्ण होतील.


कुंभ - मुलांकडून आनंदवार्ता मिळेल

आज तुम्ही तुमच्या प्रियकराला जास्त लक्ष आणि वेळ द्याल. मुलांकडून आनंदवार्ता खुशखबर मिळेल. राजनैतिक सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. आज रिसर्चशी निगडीत उच्च शिक्षणाची संधी मिळेल. 


मीन - आव्हाने समोर येण्याची शक्यता

आज तुम्हाला व्यवसायात प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी आव्हाने समोर येतील. सुट्टी मिळणे कठीण जाईल. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक कार्यात मन रमवा.


वृषभ - आर्थिक संकट दूर होण्याची शक्यता

आज भावंडांच्या मदतीमुळे तुमचे आर्थिक संकट दूर होऊ शकते. नवीन व्यावसायिक संबंध मजबूत होतील. एखाद्याय कार्यामुळे आनंदात वाढ होणार आहे. सामाजिक मानसन्मान वाढेल. जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. प्रवासाचा योग आहे. 


मिथुन - महत्त्वाची कामे करणे सोपे जाईल

आज बऱ्याच दिवसांपासून रखडलेली तुमची कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ होण्याचा योग आहे. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. देणी-घेणी  सांभाळून करा.


कर्क - देणी-घेणी करताना भांडण होण्याची शक्यता

आज एखादा व्यवहार करताना वाद होण्याची शक्यता आहे. एखादी मौल्यवान वस्तू तुटण्याची अथवा खराब होण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यात मन रमवाल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. मित्र भेटण्याची शक्यता आहे. प्रवासाला जाणे टाळा. 


सिंह - दीर्घ आजारापणातून सुटका

आज तुम्हाला एखाद्या दीर्घ आजारपणातून सुटका मिळणार आहे. व्यवसायात राजकारणातील लोकांची मदत मिळेल. वेतनवाढ होण्याची शक्यता आहे. मुलांकडून शुभवार्ता मिळतील. रखडलेली कामे पूर्ण होतील.


कन्या - कौटुंबिक वादविवाद होण्याची शक्यता

आज तुम्ही भावनेच्या भरात एखादा चुकीचा निर्णय घ्याल. कौटुंबिक वादविवाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत असेल. कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता  आहे. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढतील. 


तूळ- आरोग्य बिघडण्याची शक्यता 

आज तुमची दगदग होण्याची शक्यता आहे. कामात समस्या येतील. तुमचे मत पटवून देण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहा. मित्रांच्या मदतीने उत्पन्नांची नवी साधने मिळतील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.


वृश्चिक - धनसंपत्तीबाबत आनंदवार्ता मिळेल

आज तुम्हाला धनसंपत्तीबाबत आनंदवार्ता मिळेल. घरातील सुखसाधनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन योजनांना यश मिळेल. सहज वाटणारी कामे करणे मात्र थोडं कठीण जाणार आहे.


धनु - अतिरिक्त जबाबदाऱ्या मिळतील

आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला मनाविरूद्ध जबाबदाऱ्या मिळतील. कामासाठी घरापासून दूर राहवं लागणारं आहे. व्यवसायात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कोर्ट कचेरीमुळे निराश व्हाल. देणी - घेणी सांभाळून करा.  


मकर - घरातील वृद्ध लोकांची तब्येत बिघडेल

अचानक घरातील एखाद्या वृद्ध व्यक्तीची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. महत्त्वपूर्ण कामे रखडण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती खराब असेल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल.

अधिक वाचा

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा 'आई' आहात

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’