27 ऑगस्ट 2019 चं राशीफळ, मिथुन राशीच्या लोकांना सामाजिक मानसन्मान मिळेल

27 ऑगस्ट 2019 चं राशीफळ, मिथुन राशीच्या लोकांना सामाजिक मानसन्मान मिळेल

मेष - घाईघाईत चुकीचा निर्णय घेऊ नका

आज घाईघाईत एखादी चुक तुमच्या हातून घडू शकते. कामाच्या ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल. जोखिमेच्या कामासाठी दूर रहा. देणी-घेणी करताना सावध रहा. 


कुंभ -  तरूण एखादी चांगली संधी गमावण्याची शक्यता

आज तरूण मंडळी आळसामुळे एखादी चांगली संधी गमावण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी नवीन पद्धतीमुळे काम करताना अडचणी येण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांमुळे तणाव येण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा.


मीन- रखडलेले धन मिळण्याची शक्यता

आज तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्या आहे. एखाद्या स्पर्धेत पैशांचे बक्षीस मिळेल. कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल. घरातील लहान मुलांसोबत पैशांच्या व्यवहाराबाबत कठोर वागावे लागेल.आरोग्य चांगले असेल.

वृषभ - घरातील वृद्धांची तब्येत बिघडण्याची शक्यता 

आज तुमच्या घरातील वृद्ध व्यक्तीची तब्येत अचानक बिघडण्याची शक्यता आहे. मनात अनामिक भिती निर्माण होईल. घरातील समस्या कमी होतील. मित्रांच्या सहकार्याने वातावरण चांगले होईल. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. 


मिथुन - सामाजिक मानसन्मान मिळेल

महत्त्वपूर्ण गोष्टी पूर्ण करण्यासाठी घरातील वृद्ध लोकांचा सल्ला घ्यावा लागेल. एखाद्या सामाजिक संस्थेद्वारा सन्मानित व्हाल. नवीन संबंधांमुळे व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढणार आहे.


कर्क - सकारात्मक विचारांमुळे यश मिळेल

विद्यार्थ्यांना सकारात्मक विचारसरणीमुळे फायदा होईल. कामातील कौशल्यामुळे अधिकारी खुश होतील. व्यावसायिक यात्रेतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यातून यश मिळण्याची शक्यता आहे.


सिंह - आर्थिक नुकसान होण्याची शक्यता

जास्त कमवण्याच्या प्रयत्नात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक कामात विचारपूर्वक निर्णय घ्या. कोणताही तर्कवितर्क करू नका. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे.


कन्या - आरोग्य चांगले असेल

आज तुमची तब्येत चांगली असण्याची शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्यात रमणार आहात. कार्यात यश मिळेल. विनाकारण खर्चावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयारी करावी लागेल. देणी-घेणी करताना सावध रहा.


तूळ - मानसिक तणाव जाणवेल

कौटुंबिक समस्यांमुळे मानसिक तणाव जाणवेल. जोडीदारामुळे तणाव वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी विरोधक त्रास देतील. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा तणाव जाणवेल. मित्रांची मदत मिळेल.


वृश्चिक -  आरोग्य समस्या जाणवतील

आज तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. आहाराची नीट काळजी घ्या. रोजच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. एखाद्या गोष्टीमुळे आज द्विधा मनस्थिती होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल.


धनु - प्रॉपर्टीतून लाभ मिळेल

आज तुम्हाला प्रॉपर्टीमधुन चांगला लाभ मिळणार आहे. उच्च शिक्षणासाठी पैशांची व्यवस्था होईल. व्यवसायात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. थोरा-मोठ्यांच्या सल्यानुसार पैशांची गुंतवणूक करा. जोडीदारासोबत नाते दृढ होईल.


मकर - कौटुंबिक सहकार्य मिळेल

आज तुमची कामाच्या ठिकाणी प्रशंसा होणार आहे. कौटुंबिक साथ मिळण्याची शक्यता आहे. धनलाभाचा योग आहे. कोर्टकचेरीतून सुटका मिळेल. विद्यार्थ्यांना आनंदवार्ता समजेल.

अधिक वाचा

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का

तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा 'आई' आहात