31 ऑगस्ट 2019 चं राशीफळ, कर्क राशीच्या लोकांना मिळेल वारसाहक्काने संपत्ती

31 ऑगस्ट 2019 चं राशीफळ, कर्क राशीच्या लोकांना मिळेल वारसाहक्काने संपत्ती

मेष - नवीन कामे मिळतील

आज तुम्हाला नवीन कामे मिळणार आहेत. व्यवसायात नवीन ओळखी वाढतील. तुमच्या कार्यशैलीमुळे नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे. मित्रांची भेट होईल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. 


कुंभ - वादविवाद वाढण्याची शक्यता आहे

आज तुमच्या दिवसाची सुरूवात तणावाने होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वाढू शकतो. जोडीदाराकडे दुर्लक्ष करू नका. खाडगी नात्यात समतोल राखा. आर्थिक स्थिती चांगली असेल. कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल.


मीन -  मानसिक तणाव होण्याची शक्यता आहे

आज मानसिक ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. शारीरिक थकवा वाढणार आहे. तुमच्या जीवनशैलीमुळे सुधारणा होणार आहेत. सहकाऱ्यांसोबत योग्य ताळमेळ राखा. सामाजिक मानसन्मान आणि धनसंपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या भावनांचा विचार करा. 

 

वृषभ - नवीन प्रेमसंबंध निर्माण होतील

आज तुम्ही फारच खुश असणार आहात. कारणा तुमची जुनी मैत्री आज प्रेमात बदणार आहे. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवा. नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होणार आहेत.


मिथुन - दुर्लक्षपणा त्रासदायक ठरणार आहे

आज कामाच्या ठिकाणी दुर्लक्षपणा तुम्हाला महागात पडण्याची शक्यता आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. कोर्टकचेरीतून सुटका मिळेल. धुर्त लोकांपासून सावध रहा. 


कर्क - कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे

आज तुम्हाला कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना सकारात्मक विचारसरणीचा फायदा होईल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळेल. कुटुंबासोबत  एखाद्या पार्टीला जाणार आहात. परदेशी जाण्याचा योग आहे. 


सिंह -  विद्यार्थ्यांचे मन भटकणार आहे

आज विद्यार्थ्यांचे मन अभ्यासातून भटकणार आहे. मूडस्वींग अथवा बदलण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी समस्या येण्याची शक्यता आहे. वादविवाद करणे टाळा. खर्च वाढल्याने त्रस्त व्हाल. मित्रांसोबत वेळ मौजमजेत जाईल.


कन्या - वातावरणातील बदलांमुळे त्रास होण्याची शक्यता

आज तुम्हाला वातावरणातील त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. जोडीदारासोबत वेळ मजेत जाईल. व्यवसायात नफा आणि नोकरीत पदोन्नती मिळेल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. वाहन चालवताना सावध रहा. एखाद्यासोबत अचानक घडलेली भेट खास असेल


तूळ - जोडीदारासोबत प्रेमसंबंध मजबूत होतील

आज  मित्र अथवा नातेवाईकांच्या मदतीने तुम्हाला आनंद मिळणार आहे. जोडीदाराशी नाते मजबूत होणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. विद्यार्थ्यांसाठी आज वेळ चांगला असेल.


वृश्चिक -  नवीन काम मिळण्याची शक्यता

आज तुम्हाला करिअरबाबत चांगली बातमी मिळेल. तरूणांचा नोकरीचा शोध संपणार आहे. व्यवसायात यश अथवा चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे.


धनु - शेअर बाजारात नुकसान होण्याची शक्यता

आज शेअर बाजारात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रवास करणे टाळा. आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे. धार्मिक कार्यात मन रमणार आहे. सामाजिक संस्थेद्वारा सन्मानित होण्याची शक्यता आहे. 


मकर - जीवनशैलीत बदल करावा लागेल

आज तुम्हाला नव्या ऊर्जेसह कामाला सुरूवात करावी लागेल. आहाराबाबत काळजी घ्या. घरातील वृद्ध लोकांची काळजी घ्या. आर्थिक बाजू चांगली असेल. कौटुंबिक प्रवास होण्याची शक्यता आहे.

 

अधिक वाचा

जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम'

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा 'आई' आहात