8 ऑगस्ट 2019 चं सिंह राशीच्या लोकांना मिळणार मौल्यवान भेटवस्तू

8 ऑगस्ट 2019 चं सिंह राशीच्या लोकांना मिळणार मौल्यवान भेटवस्तू

मेष - दिवसभर कंटाळवाणं वाटेल

आज तुम्हाला दिवसभर कंटाळवाणं वाटेल. नियमित जीवनक्रम आणि आहाराबाबत सावध रहा. प्रवास करणे टाळा. रचनात्मक कार्यात मन रमवा. राजकारणातील तुमचे स्थान मजबीत होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल.

कुंभ - आरोग्य चांगले राहील

आज तुम्हाला आरोग्याची चांगली साथ मिळणार आहे. कार्यक्षमतेत वाढ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायात नवीन संधी मिळणार आहेत. भविष्यात याचा चांगला फायदा जाणवेल.आत्मविश्वास वाढणार आहे. नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार कराल. 

मीन- नातेसंबंध कमजोर होतील

आज तुमचं एखादं नातं कमजोर पडणार आहे. काही मित्रांच्या वागण्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. आत्मविश्वास कमी होईल. आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यात प्रसिद्धी मिळणार आहे.

वृषभ - शेअर बाजारात फायदा होईल

आज तुम्हाला शेअर बाजारात फायदा होण्याची शक्यता आहे. एखादी अपूर्ण ईच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यवसायातील एखादे लक्ष प्राप्त करण्यात यश मिळेल. अविवाहित लोकांचे एकटेपण दूर होईल.

मिथुन - प्रेमसंबंध यशस्वी होतील

आज तुमच्या प्रेमसंबंधांना यश मिळेल. घरातील मोठ्यांच्या सहकार्यांने कौटुंबिक संपत्तीचा वाद मिटणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळेल. व्यावसायिक भागिदारीतून लाभ मिळेल.

कर्क - कामाच्या ठिकाणी समस्या वाढणार आहेत

आज कामाच्या ठिकाणी तुमच्या समस्या वाढणार आहेत. घाईघाईत एखादी चुक करू नका. विचारपूर्वक कामे करा. एखादे महत्त्वाचे काम तुमच्याकडून दुर्लक्षित केले जाण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ मिळू शकतो.

सिंह - मौल्यवान भेटवस्तू मिळेल

आज तुम्हाला जोडीदार अथवा मित्रांकडून मौल्यवान भेटवस्तू मिळेल. आज एखाद्या निर्णयामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. नवीन व्यावसायिक ओळखी वाढतील. रचनात्मक प्रगती होणार आहे. परदेशी जाण्याचा योग आहे.

कन्या - विद्यार्थ्यांचा तणाव वाढणार आहे

आज विद्यार्थ्यांना काही खास कारणांमुळे ताणतणाव जाणवणार आहे. व्यवसायात सावध राहील्याने फायदा मिळणार आहे. कामाच्या ओझ्यामुळे आज तुमच्या समस्या वाढणार आहेत. प्रेमसंबंधांला सुरूवात होणार आहे. 

तूळ - आईच्या हात-पायांमध्ये वेदना जाणवतील

आईच्या हात-पायांमधील दुखणं जाणवेल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी आनंदाचं वातावरण असेल. विरोधक नमणार आहेत. धनसंपत्तीबाबत एखादी चांगली बातमी मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक प्रतिष्ठेत वृद्धी होण्याची शक्यता आहे. 

वृश्चिक - विवाहातील अडचणी दूर होतील

अविवाहित लोकांच्या विवाहातील अडचणी दूर होणार आहेत. जुन्या मित्रांशी भेट होईल. जोडीदारासोबत परदेशी जाण्याचा योग आहे. व्यावसायिक योजना सफळ होतील. वाहनातून प्रवास करताना सावध रहा.

धनु - नवीन योजनांची संधी मिळेल

आज व्यवसायात नवीन योजनांची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांसोबत झालेली भेट फायद्याची ठरेल. मित्रांच्यासोबत प्रवासाला जाण्याचा योग आहे. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल.

मकर- आर्थिक तोटा होण्याची शक्यता

आज शेअर बाजारात तोटा होण्याची शक्यता आहे. व्यवसायात जास्त लक्ष देण्याची गरज आहे. सामाजिक स्तरावर एखादी समस्या येण्याची शक्यता आहे. जोडीदारासची भावनिक साथ मिळेल. देणी-घेणी सांभाळून करा.

अधिक वाचा

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

राशीनुसार निवडा तुमचे करिअर