#HouseInterior : तुमचे घर किती हरित आहे?

#HouseInterior : तुमचे घर किती हरित आहे?

हरित घर ही संकल्पना तुम्ही ऐकली आहे का? तुम्हालाही पर्यावरणाच्या वाढत्या समस्येबाबत काळजी वाटते का? त्यातूनच समोर आली आहे हरित घराची संकल्पना. पण हरित घर तयार करण्यासाठी नेमकं काय करावं लागतं, असा विचार तुमच्या मनात कधी आला आहे का? या संकल्पनेमध्ये तुमच्या घराच्या भोवती भरपूर हिरवळ लावावी लागते का की, तुमच्या घराला वीज पुरवण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा वापरावी लागते की, तुमचे घर हाय टेक मशीनवर चालवावे लागते?

Instagram

हरित घर म्हणजे पर्यावरणाला पूरक आणि पर्यावरणाचे संवर्धन होईल, अशा घरांची निर्मिती करणे. सर्वात आधी हा गैरसमज दूर करूया की, हरित घर किंवा इमारत उभारणे, हे पारंपरिक घर किंवा इमारत उभारण्यापेक्षा महागडे नसते आणि त्यातून मिळणारे रिझल्ट्सही लगेच मिळतात. यातून दीर्घ काळामध्ये लक्षणीय बचत होते. त्यामुळे जर तुम्ही नवे घर शोधत असाल किंवा तुमच्या जुन्या घराचे नूतनीकरण करणार असाल तर तुम्ही हरित घराचा पर्याय निवडावा. हरित घराच्या बांधकामादरम्यान डिझाईन, ऊर्जा, पाणी आणि अन्य संसाधने यांचा कार्यक्षमपणे वापर करण्यावर भर दिला जातो. परिणामी असे घर चालवण्यासाठी आयुष्यभर कमी खर्च येतो. उदाहरणार्थ, विजेची बचत करणारे फिटिंग्ज्स आणि उपकरणे अनेक पटींनी अधिक उपयोगी ठरतात.

Also Read Vastu Tips For Home In Marathi

हरित घराची वैशिष्ट्यं

हरित घराची काही वैशिष्ट्ये म्हणजे नैसर्गिक प्रकाश आणि हवा यांचा जास्तीत जास्त वापर करून या घरांची उत्तम रचना केली जाते. यामुळे उन्हाळ्यात ही घरे थंड राहतात आणि हिवाळ्यात ऊबदार राहतात. यामुळे घरातील रहिवाशांना विजेसाठी कमी खर्च करावा लागतो. यू. एस. ग्रीन बिल्डिंग कौन्सिलने केलेल्या अभ्यासानुसार, पारंपरिक इमारतींच्या तुलनेत हरित इमारती 25 ते 30% विजेची बचत करू शकतात. आधुनिक हरित इमारतींमध्ये कॉमन एरियांना वीज पुरवण्यासाठी सौरऊर्जेचा वापर केला जातो किंवा किमान अपारंपरिक उर्जेचा तरी वापर केला जातो. हरित इमारतींमुळे पाण्याचि बचत केली जाते आणि भूजल पाण्याची पातळी पुन्हा साध्य केली जाते. सार्वजनिक परिसर स्वच्छ करण्यासाठी आणि उद्यानांना तसंच परिसरातील लँडस्केप्ड भागांना पाणी पुरवण्यासाठी सांडपाण्यावर पुन्हा प्रक्रियाही केली जाते. पाण्यासाठी वापरलेल्या फिक्शरमुळे पाण्याचा प्रवाह अशा प्रकारे कमी केला जातो की, कोणतेही काम करण्यासाठी पाणी कमी पडत नाही, पण पाण्याचा वापर जपून केला जाईल, याची काळजी घेतली जाते.

Instagram

हरित घराचं बांधकाम

घराच्या बांधकामाच्या टप्प्यादरम्यान पर्यावरणपूरक साहित्याचा जास्तीत जास्त वापर केला जातो. उद्योगातील उपउत्पादनाचा वापर, ज्या साहित्याच्या वापराने आणि उत्पादन करताना पर्यावरणाची हानी होणार नाही. अशा साहित्याचा वापर करणे हे काही हरित घराच्या निर्मितीचे पैलू आहेत. या साहित्यामुळे इमारतीची ऊर्जाबचतीची क्षमताही वाढते. इमारतींमध्ये फ्लोअरिंग, प्लास्टरिंग, रंगकाम आदीसाठी वापरल्या जाणाऱ्या या साहित्यामुळे घरातील वातावरण अधिक चांगले राहते. यामुळे घरामध्ये नेहमी ताजेतवाने वाटते आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण होते.

Also Read Home Decor Ideas In Marathi

हरित जागेबद्दल वाढती जागृती

हरित जागेमध्ये राहण्याबद्दल जागृती वाढते आहे. जे लोक हरित इमारतींमध्ये राहत आहेत. त्यांना या तंत्रज्ञानाचे फायदे अनुभवता येत आहेत. भारतातील दोन-तृतियांश इमारत पायाभूत सुविधा अद्याप यामध्ये समाविष्ट व्हायचे आहे. हरित इमारतींसाठी मागणी वाढली तर पुरवठाही वाढेल आणि विजेच्या बचतीमुळे देशातील कार्बनचे प्रमाण कमी करण्यासाठी मोठे योगदान दिले जाईल. हरित बांधकामाला उत्तेजन देण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना अमलात आणून या प्रयत्नांमध्ये हातभार लावते आहे. 

चांगली बातमी म्हणजे जुन्या इमारती हरित करण्यासाठी त्यांच्यामध्ये बदल करता येऊ शकतात. वॉटर हार्नेसिंग, एलईडी लायटिंग फिटिंग, कचरा विभाजन, ऑरगॅनिक वेस्ट कम्पोस्टिंग, स्टार-रेटेड उपकरणांचा वापर, ऊर्जाक्षमतेसाठी छपरावर प्रक्रिया, अपारंपरिक ऊर्जेचे संपादन किंवा अवलंब, असे उपाय केल्यास जुन्या इमारतीही आत्ता आहेत त्यापेक्षा अधिक हरित करता येऊ शकतात आणि त्यांचे कार्बन उत्सर्जन व खर्च कमी करता येऊ शकतो. हरित इमारतींची चळवळ चांगल्या प्रकारे सुरू आहे आणि खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात येत आहे. सर्वांनी या चळवळीमध्ये सहभागी व्हावे आणि गृह पायाभूत सुविधांच्या बाबतीत भारत हा जगातील सर्वाधिक हरित देश बनण्यासाठी योगदान द्यावे.

या लेखाचे *लेखक अनिर्बन घोष* हे महिंद्रा समूहात चीफ सस्टेनेबिलिटी ऑफिसर आहेत.