काजळ लावण्याची योग्य पद्धत How to apply kajal in eyes

काजळ लावण्याची योग्य पद्धत How to apply kajal in eyes

आपल्या डोळ्यांच्या सौंदर्यात भर टाकते ते काजळ (Kajal). काजळ लावल्याने प्रत्येक स्त्रीचे डोळे अधिकच सुंदर दिसतात. काजळाला काजल किंवा कोहल असंही म्हटलं जातं. काजळ म्हणजे एक मऊ आणि क्रिमी प्रोडक्ट आहे ज्याच्या वापराने तुमच्या डोळ्यांना एक चमक येते. अनेकजणी काजळ तर लावतात पण ते योग्यरित्या लावण्याची पद्धत त्यांना माहीत नसते. त्यामुळे जर तुम्ही रोजच्या रोज काजळ वापरत असाल तर तुम्हाला ही माहिती असायलाच हवी.  

खरंतर काजळ लावणं खूपच सोपं आहे. पण हे लावल्यावर तुमचे डोळे तेव्हाच सुंदर दिसतील जेव्हा तुम्ही योग्य प्रकारे लावलं असेल. चला जाणून घेऊया डोळ्यांमध्ये काजळ लावण्याची योग्य पद्धत.

वाचा - खाज सुटलेल्या डोळ्यांविषयी

डोळ्यांना असं लावा काजळ

 • काजळ लावण्याआधी चेहरा क्लींजर किंवा फेसवॉशने स्वच्छ करून घ्या. 
 • आता डोळ्यांच्या आसपासचा भाग सुक्या टॉवेलने चांगला पुसून घ्या. 
 • जर तुमची त्वचा तेलकट आहे आणि डोळ्याच्या आसपासची तेलकट त्वचा स्वच्छ करायची असेल तर फेस पावडरचा वापर करा. 
 • आता काजळ घ्या आणि सर्वात आधी आपल्या डोळ्यांच्याखालील वॉटरलाईनवर काजळ लावा. हे गडद करण्यासाठी बाहेरील बाजूने आतल्या बाजूला काजळ लावायला सुरूवात करा. जर तुमचे डोळे छोटे असतील तर वॉटरलाईनवर काजळ लावू नका. यामुळे तुमचे डोळे अजून छोटे दिसतील. 
 • काजळ लावल्यानंतर त्यावर पुन्हा एकदा काजळ लावा. असं केल्याने काजळ बराच वेळ राहील आणि डोळ्यांना आकर्षक लुक मिळेल. जर तुमचे डोळे छोटे असतील तर डोळ्याच्या वॉटरलाईन खाली काजळ लावा. त्यामुळे डोळे मोठे दिसतील. 
 • तुम्ही काजळाने डोळ्यांना स्मज लुकसुद्धा देऊ शकता. त्यासाठी वापर करा स्मज ब्रशचा. 
 • डोळ्यांना आयलाईनर लावणं जमत नसल्यास तुम्ही त्या ऐवजी काजळ पेन्सिलचा वापर करू शकता. पण हे करताना पापण्यांची लाईन फिल करायला विसरू नका. यामुळे तुमच्या पापण्या दाट असल्यासारख्या दिसतात. 
 • पार्टीला किंवा एखाद्या फॅमिली फंक्शनला जाताना तुम्ही आर्टीफिशियल आयब्रो किंवा वेगवेगळ्या रंगांच्या काजळाचा वापर करून डोळ्यांची सुंदरता वाढवू शकता. 

*लक्षात ठेवा काजळ लावल्यावर भुवयांना विसरू नका. भुवया दाट दिसण्यासाठी ब्रो पोमेडचा वापर करा.

 

 

काजळ लावताना हे लक्षात ठेवा

 • आपले डोळे फारच नाजूक असतात. त्यामुळे त्यांच्यावर अप्लाय करण्यात येणार काजळही चांगल्या क्वालिटीचं असलं पाहिजे. नाहीतर डोळ्यांना नुकसान पोचू शकतं. खासकरून डोळ्यांच्या आता काजळ लावताना विशेष काळजी घ्यावी.
 • सर्वात आधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची काजळ पेन्सिल कोणाशीही शेअर करू नका. कारण यामुळे इन्फेक्शनची भीती असते. ज्यामुळे तुमच्या डोळ्यांना इन्फेक्शन होऊ शकतं.
 • जर तुम्ही कॉन्टेक्ट लेन्स वापरत असाल तर काजळ पेन्सिलचा वापर करू नका. कारण काजळामुळे लेन्सेसना नुकसान पोचू शकतं आणि तुमच्या डोळ्यांनाही.
 • चालत्या गाडीत किंवा प्रवासादरम्यान कधीही डोळ्यांना काजळ लावण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे तुमच्या डोळ्याला इजा पोचू शकते.
 • जेव्हा तुमच्या डोळ्यांची जळजळ होत असेल किंवा डोळ्यांना एखादं इन्फेक्शन झालं असेल तेव्हा काजळ लावणं टाळा. 


सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी नेहमी मेकअप रिमूव्ह करा. डोळ्यांचा मेकअप काढण्यासाठी उदा काजळ, आयलाईनरसाठी नारळाच्या तेलाचा वापर करा.

हेही वाचा - 

मेकअप आर्टिस्टप्रमाणे तुम्ही कसे लावाल आयलायनर

आयलायनरच्या 20 वेगळ्या स्टाईल्स, बदलेल तुमचा लुक

मेकअपचं साहित्य एक्स्पायर्ड झालं आहे हे कसं ओळखाल

घरच्या घरी करा असा मेकअप जो तुम्हाला देईल प्रोफेशनल लुक

डोळ्यांची काळजी कशी घ्यावी